मुक्ता बर्वे फॅन क्लब

Submitted by गिरीकंद on 29 May, 2012 - 03:19

मुक्ता बर्वेच्या सर्व चाहत्यांचे इथे स्वागत आहे.
मुक्ताच्या आवडलेल्या मालिका, चित्रपट यांची चर्चा इथे करु शकतो. Happy

http://www.muktabarve.com/ - अधिकृत वेबसाईट

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एडाधो मधला तिचा अभिनय पाहिल्या पासुन मी तिच्या वर फिदा आहे. आपल्याला लय आवडती.

मुक्ता बर्वे एक प्रतिभावन्त, चतुरस्र अभिनेत्री आहे..मराठी मधे आज तिच्या तोडीची दुसरी अभिनेत्री दिसत नाही..., जोगवा पाहिला आणि कयमचा चाहता झालो तिचा...

एडाधो मधला तिचा अभिनय पाहिल्या पासुन मी तिच्या वर फिदा आहे. आपल्याला लय आवडती.>>>>+१ खरच कमालीचा अभिनय आहे तिचा. एडाधो मध्ये तर तिने रंगवलेले पात्र दुसरे कोणीही करू शकत नाही. Happy

एडाधो यात आणखी एक गुणी कलाकार आहे ( चिंचवडचा ) - किरण यज्ञोपवित. ज्या शिक्षण संस्थेत अशोक सराफ जातो त्या संस्थेतला एक डायरेक्टर.

नितिनदादा, मला त्या डायरेकटर्स पैकी कोनीच आवडलं नव्हतं Uhoh
तो खादाड डायरेक्टर तर युजलेसच वाटला मला, ओढुन ताणून अभिनय

एक डाव पहावाच का आता?
मी फक्त तिला मु-पु-मु मधे पाहिले व जोगवा. आवडलीच एकदम. तरी जोगवा खुप पुर्वी पाहिला. पुन्हा पाहिल्यावर कळले की ती मुक्ता बर्वे होती, तेव्हा लक्षात नाही आले.
मु-पु-मु मुळे मला खरी ओळ्ख झाली तिची.

एडाधो मधला तिचा अभिनय पाहिल्या पासुन मी तिच्या वर फिदा आहे. आपल्याला लय आवडती<<<<<< पाहिला पाहिला..... फारच मस्त !!

मुक्ता 'सखाराम बाइंडर' घेऊन येत आहे. फक्त पाचच प्रयोग असणार आहेत. पैकी ३ प्रयोग मुंबईत आणि २ पुण्यात.
पहायला मिळणार नाही याची खंत आहेच, पण प्रयोग खणखणीत होणार याची खात्री देखील आहे..
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-natak-sakharam-binder-ar...

मुक्ता, चंपाचा रोल कसा करेल याची मला उत्सुकता आहे. या भुमिकेवरचा लालन सारंग चा ठसा पुसणे फार अवघड आहे.
आणि लालन ने या भुमिकेसाठी जे सोसलं, त्याला तोड नाही.. तिच्यामूळे पुढे अनेक कलाकारांचा मार्ग सोपा झाला. ( मी स्वतः तिची भुमिका बघितली आहे. लक्ष्मीच्या भुमिकेत प्रिया तेंडूलकर होती. )

आय लव मुक्ता. फार ताकदीची अभिनेत्री आहे. मला तिचं काम नेहेमीच आवडतं. विविध भुमिका सराईतपणे करते. रिस्पेक्ट.

सखाराम नाही बघता येणार पण कोडमंत्र बघायचं आहे तिचं.

लालन ने या भुमिकेसाठी जे सोसलं, त्याला तोड नाही>>> ह्याबद्दल वाचलंय मी. भुमिका चंपाची, टिव्हीवर एक शॉट बघितला आहे लालन यांचा पण लहान होते, फारसं आठवत नाही. सलाम त्यांना.

Even I like Mukta...अग्निहोत्रचे सगळे एपिसोड्स कुठे बघायला मिळतील...होटस्टार वर फक्त पहिले ६० एपिसोड्स दिसतात....

काल दुपारी पण लागला होता एडाधोप ! परत एकदा मजा आली पाहताना.
खुद्द अशोक मामांसमोर सुद्धा मुक्ता फिकी पडत नाही ! ( तोंडाचा चंबू करुन आईविना पोर म्हणणं , पोटुशी वगैरे अनेक सीन्स)

पाहिला तो इंट्ररव्ह्यु परवा, खूप सुरेख, इन्टेन्स बोलली आहे नाटक विश्वाबद्दल मुक्ता !
ती मुलाखत घेणारीही हुषार वाटली, काय सुंदर मराठी आहे , ऐकत रहावं !

इंटरव्युज नाही बघितले पण अग्निहोत्र पार्ट 2 येणार आहे त्यात मुक्ता असेल तर आवडेल मला बघायला. पण नसेल कदाचित. जुन्यापैकी शरद पोंक्षे असणार आहेत, बाकी समजलं नाही.

Pages