मुक्ता बर्वे फॅन क्लब

Submitted by गिरीकंद on 29 May, 2012 - 03:19

मुक्ता बर्वेच्या सर्व चाहत्यांचे इथे स्वागत आहे.
मुक्ताच्या आवडलेल्या मालिका, चित्रपट यांची चर्चा इथे करु शकतो. Happy

http://www.muktabarve.com/ - अधिकृत वेबसाईट

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यू सेड इट मित. अफाट नयनाभिनय्,मुद्राभिनय....

ह्या क्लबात आमीबी सामील.

निलिमा >> अहो 'अभिनेत्री' हा शब्द माहिती आहे. पण 'अभियंता' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप काय ? 'अभियंती' का? असा प्रश्ण होता माझा . . .

बाकि - २००४ किंवा २००५ ची पास आउट - वगैरे निकालात निघालाय अता . . तो माझा गैरसमज होता Lol

मुक्ताच्या फॅन क्लबमधे मी पण आहे! ती खुप सहज वावरते आणि कुठल्याही रोल मधे असो, ती मुक्ता न वाटता ते कॅरॅक्टरच वाटते. म्हणजे एल्दुगो मधली मुक्ता पाहील्यावर हीच का ती अग्निहोत्र मधली मुक्ता असा प्रश्न पडतो.

कालचा दिवसच भारी होता..

एलदुगो मधे अचानक आलेल्या घनाला पाहून मोहरलेली राधा भारीच उभी केली...

एलदुगो संपल्या नंतर डिस्कव्हरीवगैरे चॅनल्सवर फिरुन आलो, आणि सहजच झी सिनेमा लावला.. तर एडाधोप.. अजून काय पाहिजे राव ! Happy

मित Happy
कालच बदाम राणी आणि गुलाम चोर त्याचा ट्रेलर पाहिला, भन्नाट दिसतेय त्यात मुक्ता
http://www.youtube.com/watch?v=3HiTCfNnrCo Happy अगदी वेगवेगळे लुक्स आहेत तिचे. अन एडाधोप सारखा धम्माल असावा चित्रपट. बघु या कधी लागतोय. मुक्तासाठी तरी नक्की बघणार. काही सिन्समध्ये तर खुपच ग्लॅमरस दिसतेय Happy

रीया | 29 May, 2012 - 03:41
एडाधो.. आवडते डायलॅग :-

दादा, मी काशीत जाते.....काशीला जाते..

तो ना, मला ना .... अमेरिकेला नेणारे..

पोटुशी
+१

परवाच ते एक्सप्रेसवे वर 'दत्त स्नॅक्स' की काहीतरी आहे तेथे चहाला थांबलो होतो. तेव्हा मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री वगैरे बसले होते. लोक ५-१० फुटांवर उभे राहून पाहात होते त्यांच्याकडे. एक दोन जण सही घेऊन आले. मग लहान मुले जाऊन फोटो बिटो काढत होते. सर्वांशी नीट बोलत, हसत वगैरे होते सगळे.

मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री वगैरे बसले होते.>>> बदाम राणी गुलाम चोरची टीम ना ही?

मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री वगैरे बसले होते.>>> बदाम राणी गुलाम चोरची टीम ना ही?

>>>> होय प्राची.

इथलं वर्णन ऐकून धोबी पछाड (का?) पाहिला :(.
फार आपेक्षेनी पाहिला पण कसला पकाउ आहे, अशोक सराफ - मुक्ता बर्वे कडून इतकी फालतु कॉमेडी(!) आपेक्षित नव्हती :(.
मुक्ता बर्वे आघात, जोगवा, फायनल ड्राफ्ट मधे खूप आवडली !

पण कसला पकाउ आहे >>> एक फुस... पुन्हा एकदा पहा.. नक्की आवडेल, मलाही पहिल्यांदा पाचकळ वाटला होता, पण पुन्हा पुन्हा पाहिल्यावर मस्त वाटतो Happy

मुक्ता ग्रेटच आहे. विनोदी,गंभीर, अल्लड, हलक्याफुलक्या सर्व प्रकारच्या भूमिका ती सहजपणे पार पाडते. कथानक कंटाळवाणे असले तरीही मुक्तामुळे बघावेसे वाटते. कपडे,रंगसंगती, मेकप ह्यागोष्टी तिच्या अभिनयाच्या दृष्टीने गौण ठरतात. तसेच नाटक,सिनेमा, मालिका सगळ्यात ती शोभून दिसते. तरीही रंगभूमीवरची 'मुक्ता' सध्याच्या काळातील सर्वश्रेठ!

..आज फायनल ड्राफ्ट बघायला गेली होती .मस्त नाटक होते .
नाटक संपल्यावर मुक्ता भेटली .सही आणि फोटो ! मज्जा ! खूप गोड मुलगी आहे ती .

बरागुचो पहिला का? >>> कसले भयानक शॉर्टफॉर्म करता रे. पण मुक्ता इज मुक्ता . ते पोडुशी....मुका घ्या ना .... हसुन हसुन मेलो होतो , ते फक्त मुक्ताच करु जाणे.

मुक्ता बर्वे साठी आज परत एकदा एक डाव दोभी पछाड फास्ट फॉ करुन पाहिला.
पोटुशी http://www.youtube.com/watch?v=JHRBWxktHKY&feature=relmfu
घड्यावर घडे सात घडे http://www.youtube.com/watch?v=5Qg3MOvHqMw&feature=relmfu
ए भुसनाळ्या http://www.youtube.com/watch?v=ah7GaeNcsIU&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=ah7GaeNcsIU&feature=relmfu
मुका बिका घ्या की राव http://www.youtube.com/watch?v=QnuHAMdFRfs&feature=relmfu

एडाधोप मध्ये अशोक सराफ जेव्हा तिच्या सीडीज घेऊन जात असतात तेव्हा, ती हात पुढे करून "दादा... अहंहं...अहंहंहं" करते... आई गं... तिच्यासारखं कुणालाच जमणार नाही ते Happy

Pages