प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसुन त्याच्या आपल्या आवडी प्रमाणे प्रत्येक लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करुन घ्या.
आता एकीकडे मेथी थोड्या तेलावर भाजून वाटून घ्या. ती गार झाली की मिक्सरमध्ये तिची पुड करा. (साहित्याच्या फोटोत छोट्या वाटीत आहे)
लिंबाच्या फोडींवर मिठ टाकुन कालवून ठेवा.
१ पळीभर तेल चांगले गरम करून गॅस बंद करा व त्यात मोहरीची डाळ टाका.
आता ही फोडनी पुर्ण थंड होऊ द्या. हिंग, हळद, मिरचीपुड, मेथीपुडवर ही थंड झालेली फोडणी ओतून मिसळा.
आता हे मिश्रण मिठ चोळलेल्या लिंबांमध्ये एकजीव करा.
आता ह्या मसाला मिश्रीत फोडी एका बरणीत दाबून दाबून भरा.
राहीलेल तेल गरम करुन पुर्ण थंड करा व बरणीतील लोणच्यात ओता. झाकण घट्ट बंद करून ८-१० दिवस चांगले मुरल्यावर खायला घ्या.
लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता पण त्यात माझ्यामते मजा येत नाही.
मेथीपुड बाजारात मिळते पण घरी केलेल्या पुडीला जास्त खमंगपणा असतो.
कोणत्याही लोणच्यात लोणच्याच्या फोडी बुडेपर्यंत तेल बरणीत घालावे म्हणजे लोणच्याला बुरशी चढत नाही.
इतर लोणची :
पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे - http://www.maayboli.com/node/25660
चिंचेच्या रसातील मिरचीचे लोणचे - http://www.maayboli.com/node/29204
भोकराचे लोणचे - http://www.maayboli.com/node/35165
धन्स जागू. तोंपासु एकदम.
धन्स जागू. तोंपासु एकदम.
कुणाला उत्तर भारतीय
कुणाला उत्तर भारतीय पद्धतीप्रमाणे बनवायची लोणची येतात का? ते लोक त्यात बडीशोपेची पावडर घालतात. खूप छान लागतात त्यांची लोणची. वरच्या कृतीमध्ये मेथीबरोबरच बडीशोप पण तेलावर भाजून त्याची पूड अॅड केली तर अजून चव येईल असं वाटतं.
लोणच्याचा तयार मसाला वापरू
लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता पण त्यात माझ्यामते मजा येत नाही.
मेथीपुड बाजारात मिळते पण घरी केलेल्या पुडीला जास्त खमंगपणा असतो. >>>>>> याबद्दल तुला +१००.
या लोणच्यात मात्र मी फोडणी/तेल काहीच घालत नाही. बाके कृती सेमच.
स्स्स्स्स.......... जागुले..
स्स्स्स्स.......... जागुले.. तोंपासु
हे लोणचं दहीभाताबरोबर्.........स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!!
छानच
छानच
निंबूडा धन्स. मॉल्स मधली बरीच
निंबूडा धन्स. मॉल्स मधली बरीच लोणची असतात बडीशेप टाकलेली. करण्याची पद्धत शोधायला हवी.
मानुषी, वर्षू, जगावेगळी धन्स.
तिस-या प्रचिपासूनच तोंपासु...
तिस-या प्रचिपासूनच तोंपासु...
तोंपासु एकदम. ..........
तोंपासु एकदम. ..........
जागू..............कस्लं मस्त
जागू..............कस्लं मस्त दिस्तंय लोण्चं.........छान आहे पाकृ.
जागू, काय तो उत्साह तूला
जागू, काय तो उत्साह तूला !!
आमचे लिंबाचे लोणचे, बिन तेलाचे.
अक्षरशत्रू, शांकली, सृष्टी
अक्षरशत्रू, शांकली, सृष्टी धन्यवाद.
दिनेशदा मी केले होते एकदा बिनतेलाचे लोणचे तेही छान होते.