लंडन ऑलिंपिक्स २०१२

Submitted by Adm on 10 May, 2012 - 05:26

दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्‍यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.

हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....

http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..

प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉशिंग्टन झू मधील दोन चित्त्यांच्या पिल्लांना जीटर, गॅटलिन या धावपटू ऑलिंपियन्सची 'कार्मेलिता' आणि 'जस्टिन' अशी नावे दिली आहेत. Happy

http://www.washingtonpost.com/politics/national-zoo-cheetah-cubs-named-f...

यंदाचे ऑलिंपीक सगळ्यांबरोबर इथे फॉलो करायला मजा आली खूप ! Happy
कितीवेळा लाईव्ह पहाता यायचं नाही, नुसते स्कोर वाचून ताण असहय्य व्हायचा तेव्हा इथल्या बाफंवर पोस्टी टाकत राहीलं की बरं वाटायचं.. (विजय कुमारच्या मॅचच्या वेळी तर ताण सहन न होऊन मी एलदुगो बाफ वाचायला घेतला होता!! :P) कधी कधी नियम माहित नसायचे.. कोणीतरी वाचून इथे लिहायचं, चर्चा व्हायच्या... धमाल आली एकंदरीत.. ! गेल्या ऑलिंपीकच्या तुलनेत यंदा खूप जणांनी एकदम उत्साहात फॉलो केलं ऑलिंपीक..

यंदा मुकुंदने लेख न लिहिल्याने लेखांचीच तेव्हडी कमी जाणवत होती ती ललिताच्या लेखाने भरून काढली.. Happy

बॉस्टन ऑलिंपिक्स २०२४! अस झल तर खरच मजा येइल... अमेरिकेतर्फे बॉस्टनची २०२४ ऑलिंपिक्स साठी निवड झाली आहे..

बॉस्टनची निवड झाली तर एक आधीच विचारुन ठेवतो..बॉस्टनवासी मायबोलिकर... जागा मिळेल का राहायला ऑलिंपिक्सच्या वेळी? Happy

Pages