लंडन ऑलिंपिक्स २०१२

Submitted by Adm on 10 May, 2012 - 05:26

दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्‍यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.

हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....

http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..

प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑलिंपिक स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत ऑलिंपिक ज्योत सतत तेवत ठेवली जाती. ह्या ज्योतीचे प्रज्वलन स्पर्धा सुरू व्हायच्या बरेच माहिने आधी ग्रीसमधल्या ऑलिंपिया ह्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने म्हणजे सूर्याची किरणे आणि आरसा ह्यांच्या सहाय्याने केले जाते. नंतर ती ज्योत यजमान शहरात आणली जाते.
ह्या ज्योतीच्या प्रज्वलन समारंभाची रंगीत तालीम काल ऑलिंपीया येथे पार पडली. खरा समारंभ येत्या गुरुवारी आहे. जर ऐनवेळी ढग आले, तर काल पेटवली गेलेली ज्योत बॅकअप म्हणून वापरणार आहेत.
लंडन शहरात ज्योतीच्या रिलेची रंगीत तालीम आज पार पडणार आहे.
मुख्य स्टेडियममधली ज्योत प्रज्वलित करायचा मान यंदा कुठल्या ब्रिटीश अ‍ॅथलीटला मिळतोय ह्याबद्दल उत्सुकता आहे. !

मुख्य स्पर्धा सुरु व्हायला केवळ ७८ दिवस राहिले आहेत ! तोपर्यंत वातावरण तापवण्यासाठू मुकुंदला साकडे घालावे काय ? Happy

'टॉर्चरिले' ची साईट लाइव्ह गेली आज.. ह्या आणी इतर ऑलिपिक्स च्या प्रोजेक्ट वर काम करतीये..

इथे भेट द्या http://www.bbc.co.uk/torchrelay

केवळ ७८ दिवस राहिले आहेत >> तुम्हाला छान आहे असं म्हणायला पण आमची इथे वाट लागलीये Happy असो..

माधुरी, काम व्यवस्थित पार पडण्यासाठी शुभेच्छा!

आमच्याकडे ज्योतीच्या स्वागताची तयारी सुरू झाली या आठवड्यात. २२ मे ला येणार आहे बाथला.

आली पग्याला जाग आली.... चला आता मुकुंदांना विपू करुन सगळ्यांनी पिडूया... यंदा साठी नवीन काहीतरी लिह म्हणून.. किंवा बीजिंग ऑलिम्पिक्स मधले थरारक क्षण पण चालतील...

यंदा फक्त ब्रिटन मध्येच टॉर्च रॅली होणार.. जी पूर्वी सहभागी देशातही होत असे...

इथे कोणीतरी गाजलेल्या ऑलिंपिकपटूंवर लेख लिहायला घेतले होते. जेसी ओवेन्सवरचा लेख वाचला होता. पुढे काही लिहिले का त्यांनी?

त्याआधीच विंबल्डन आहे ना जून-जुलै मध्ये. (गो फेडी Proud )

भारताची टीम
http://en.wikipedia.org/wiki/India_at_the_2012_Summer_Olympics

भारताचा ध्वजधारक कोण आहे?

माधुरी, मृदुला लकी आहात. तुम्ही जाणार आहात का लाईव बघायला ?

मॅस्कॉट्स Wenlock and Mandeville

2315[1].jpg

यंदा तरी भारतीय खेळाडू कडून काही अपेक्षा ठेवाव्या का? की नेहमीसारखीच रिकामी झोळी घेवून परत येणार?

भारतातील एकूण (गैर)कारभार आणि क्रीडा क्षेत्राकदे होणारे दुलक्ष्य याचा विचार करता फारश्या अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाहीच

हे भगवान ! कधी सुधारणार भारत आणि तिथला कारभार ?

माधुरी, मृदुला.. तुम्ही वॉलेंटीयरींग करताय का? की काही असाइअनमेंटवरच काम करताय ? दोन्ही असलं तरी जबरी !
बादवे.. तुमचं ऑलिंपिक चायना किंवा अथेन्स सारखं वेलकमिंग वातावरणात होणार का की ब्रिटीश शिष्ठपणाच जास्त दिसणार ? Wink

मॅस्कॉट्स छान आहेत पण त्या टेली टबीज सारखे मंद दिसतायत.. Proud

चमन, विंबल्डनच्या आधी फ्रेंच ओपनपण आहे बर्का.. Wink

मयेकर, मंजूडीने दिल्या आहेत बघा लिंक.. मुकुंदनी लेख लिहिले होते गेल्या ऑलिंपिकच्या वेळी..

Lol

एकच धागा पुरणार नाही. नंतर वेगळे काढा 'ट्रॅक अ‍ॅन्ड फील्ड', 'जलतरण', 'कुस्ती', फेन्सिन्ग इ.
एकदम डिटेलमध्ये काढायचे तर १०० मी. २०० मी., फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन इ. Wink

>> तुम्ही जाणार आहात का लाईव बघायला ?
छे हो. तिकिटे मिळाली नाहीत. आमच्या ऑफिसातल्या/ ओळखीतल्या केवळ दोघांनाच मिळाली आहेत तिकिटे.
मी वॉलंटियरिंगही करत नाहीये. बाथ हे लंडनपासून दोनेकशे किमीवर असेल. नुसताच आपला ऑलिंपिकचा आनंद. Happy

माधुरी काय (काय) करतेय ते तिलाच सांगू दे. Happy

>>ब्रिटीश शिष्ठपणाच जास्त दिसणार
ब्रिटिश शिस्त दिसेल अशी आशा आहे.
ऑगस्टात पाहुण्यांना सुंदर फुलांच्या बागा, हिरवळ बघायला मिळावी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून फुलांचे खास वाफे तयार करण्यात येतायत असे एका कार्यक्रमात बघितले हल्लीच. (नाहीतर ऑगस्टात नुसती फळे, फुले एप्रिलमध्ये)
बाकी तिजोरीतले पैसे संपत आल्याने ऑलिंपिकची एक्सायटमेंट थोडी कमी झाली आहे.

मागच्या ४ वर्षात कोणी काही पराक्रम नवीन रेकॉर्ड्स वगैरे केलेत का?
मागच्या वेळच्या फेल्प्स सारखं कोणी आहे का आगामी आकर्षण वगैरे?
फेडररचं गोल्डमेडल आकर्षण आहेच म्हणा Wink पण अजून काही ईतर क्रीडाप्रकार?
साईना Uhoh

टेनिसमध्ये कोणीच नाही का यंदा भारताकडून. विकी लिंक वर तरी दिसत नाहीये.
शूटींग आणि रेसलिंगमध्ये अपेक्षा ठेऊन आहे.
बॅडमिंटन आणि हॉकी कडून आशा आहेत.

टेटे मधला आपला सौम्यजित खरंच गुणी आहे पण चायनीज आव्हान पेलणं केवळ अशक्य.
थोडाकाळ मी जिच्याकडून कोचिंग घेतलं (ती स्वतः ऑलिंपिअन असूनही दुर्दैवाने खेळाऐवजी पैशांवर अतिप्रचंड प्रेम Sad ) तिचा मुलगाही होता डीझर्विंग कँडीडेट पण ट्रायल्स्मध्ये बहूतेक लंडनसाठी पात्र ठरला नाही. अमेरिकेच्या टीममध्येही सगळे चीनवंशीयच आहेत (कदाचित पुढल्यावेळी दोघे भारतीय वंशाचेही दिसतील) पण चायनासमोर सगळेच धुळधाण होतात. त्यांच्यापुढे तरले तर स्वीडीश आणि जर्मन आहेतच.
ते वंशीयवगैरे सांगण्याचा मुद्दा हाच की हा खेळ खरंच चायनीज लोकांनी अक्षरशः डॉमिनेट केला आहे.
जपान, कोरिया सुद्धा नाही फक्त चायनाच. बॅडमिंटनची सुद्धा तीच गत.

टेटे बद्दल खरच अनुमोदन... देश जरी वेगळे असले तरी मूळचे चीन मधलेच असतात... चीन मध्ये चान्स मिळत नाही त्यामुळे दुसर्‍या देशाचे नागरिकत्त्व घेऊन तिकडून खेळतात...

बॅडमिंटनमध्ये जरी चीनचे वर्चस्व असले तरी वेळोवेळी मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया, डेन्मार्क इथल्या खेळाडूंनी धक्के दिलेले आहेत.. अर्थात गेल्या ३-४ वर्षांत चीनचे बर्‍यापैकी वर्चस्व आहे पण सांगता येत नाही... कोणीतरी दुसर्‍या देशातला विजेता होऊ शकतो.. हे पुरुषांमध्येच... महिलांमध्ये चीनची मक्तेदारी आहेच..

अजून म्हणावं तसं वातावरण तापलेलं नाहीये ऑलिम्पिक्सचं.. त्यामुळे कळत नाहीये कोण कोण खेळाडू आहेत ते...

यंदा महिला बॉक्सिंग पहिल्यांदाच ऑलिम्पिक्स मध्ये आहे... मेरी कोम पदक मिळवू शकत होती.. पण पात्रता स्पर्धेत उपांत्य फेरीत बाद झालीये... त्यामुळे जिच्याकडून हारली ती जर जिंकली तरच तिला ऑलिम्पिक्स मध्ये खेळता येईल.. तसे झाले तर मात्र इथे पदकाची नक्कीच अपेक्षा ठेवता येईल..

मंजु, हिम्सकुल्,पराग,नंदिनी..... माझी आठावण काढल्याबद्दल धन्यवाद. सध्या कामात खुप बिझी आहे त्यामुळे मायबोलिवर लिहायला जमत नाही पण मीसुद्धा लंडन ऑलिंपिक्सची आतुरतेने वाट बघत आहे. लंडन ऑलिंपिक्सच्या निमित्ताने ऑलिंपिक्सच्या अजुन काही आठवणी व गोष्टी इथे लिहायला बैजिंगसारखे यावेळेलाही आवडेल व प्रयत्नही जरुर करीन. पराग .. हा धागा काढुन तु खुप बरे केलेस बघ!

दरम्यान ऑलिंपिक्सच्या वातावरणनिर्मितीसाठी जुन्या मायबोलिवरचा माझ्या स्वतःच्या अ‍ॅट्लांटा ऑलिंपिक्सच्या आठवणीबद्दलचा हा लेख पुनः इथे नविन मायबोलिवर देत आहे. जे कोणी लंडनवासी मायबोलिकर व इतर मायबोलिकर लंडनला ऑलिंपिक्सला जायचा विचार करत आहेत ते हा माझा हा लेख वाचुन आपला विचार पक्का करतील अशी आशा आहे... मलाही जायचे होते लंडनला ५ जुलै ते ८ ऑगस्ट असे एक महिन्याकरता व ऑलिंपिक्स व विंबल्डन असे एका दगडात (दोन मोट्ठे!) पक्षी मारुन यायचे होते पण ते शक्य होणार नाही Sad

तर मंडळी.. हा माझा १९९६ अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सचा अविस्मरणिय अनुभव...

ऍटलांटा ऑलिंपिक्स दोन वाइट गोष्टींसाठीही सगळ्यांच्या लक्षात राहीले.. एक म्हणजे या ऑलिंपिक्सवर आलेले ओव्हर कमर्शलायझेशनचे सावट व दुसरे म्हणजे या ऑलिंपिक्सच्या आठव्या दिवशी झालेला सेंटेनियल ऑलिंपिक्स पार्कमधला बॉम्बस्फोट!

पण या वाइट गोष्टींबद्दल लिहायच्या आधी मला माझे ऍटलांटामधले एक दोन अजुन अविस्मरणिय अनुभव सांगावेसे वाटतात....

१९९६ ला माझ्या नशिबाने माझा भाउ ऍटलांटालाच सिटा या फ़्रेंच टेलीकम्युनीकेशन कंपनीत कामाला होता. तो त्यावेळी मेरिआटाला राहायचा. मेरीआटापासुन डाउनटाउन ऍटलांटा डनवुडीपासुन येणारी ट्रेन घेतली तर ३० मिनिटावर होते.जुलै २७ १९९६ च्या सेंटेनिअल ऑलिंपिक पार्कमधील बॉंबस्फोटानंतरच्या दुसर्‍याच दिवशी आम्हाला पुरुषांच्या १०० मिटर्स फ़ायनल्स असलेल्या ऍथेलेटिक्स इव्हेंटला जायचे होते. त्या संध्याकाळच्या सेशनमधे १०० मिटर्स फ़ायनलबरोबरच पुरुषांची २०० मिटर्स सेमिफ़ायनल, पुरुषांची लॉंग़ जंप फ़ायनल व १०,००० मिटर्स लेडिज फ़ायनल व महिलांच्या हेप्टेथलॉनच्या पहिल्या ४ राउंड्स..... अश्या बर्‍याच स्पर्धा होत्या. मी, माझा भाउ, माझी आई व माझी वहिनी(यात वहिनी व आईला आम्हा दोघा भावांनी बळेच ओढुन आणले होते हे आधीच नमुद करतो!)डनवुडी पासुन निघालेली मार्टा(ऍटलांटा अंडरग्राउंड रेल्वे) ट्रेन घेउन डाउनटाउन ऍटलांटाला मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम(टर्नर फ़िल्ड)ला जायला दुपारी २ लाच निघालो. सेशन संध्याकाळी ७ ला सुरु होणार होते पण आदल्या दिवशीच्या बॉंबींगमुळे टिव्हीवर सांगीतले होते की सुरक्षा खुप कडक असणार आहे व प्रेक्षकांची कडक तपासणी केली जाणार आहे त्यामुळे रांगा मोठ्या असतील तेव्हा ३ ते ४ तास आधीच स्टेडिअमवर या.त्या सुचनेला मान देउन आम्ही घरुन २ वाजताच कुच केले. आणी मेन ऑलिंपिक स्टेडिअमवर गेलो तर खरच तिथे मारुतीच्या शेपटीसारखी रांग होती. त्या रांगेत ३ तास उभे राहुन आम्ही ६.३० ला स्टेडीअममधे प्रवेश केला व आत पाहीलेल्या द्रुष्याने अंगावर काटा आला... इतकी वर्षे या ऑलिंपिक्सबद्दल फक्त ऐकत किंवा वाचत किंवा टिव्ही वर बघत आलो होतो.. आज प्रत्यक्ष..याची देहा याची डोळा..... मी मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम अनुभवत होतो. ८० हजार लोकांचा जनसमुदाय डोळ्यासमोर उभा होता. पाठीमागेच वरच्या सेक्शनमागे ऑलिंपिक्सची मशाल तेवत होती..(पण ती मशाल मला मॅकडॉनल्डच्या फ़्रेंच फ़्राइजच्या पुड्यासारखीच भासत होती... ओव्हरकमर्शलायझेशनचा परिणाम!..मॅकडॉनल्डने त्यासाठी किती पैसे दिले कोणास ठाउक!)

ठिक सात वाजता जॉन विलिअम्सच्या मनोवेधक ऑलिंपिक्स म्युझिकने सेशनला सुरुवात झाली. मी भारावुन जाउन ते सर्व जबरदस्त ऍथलिट जवळुन पाहात होतो. सगळ्यात आधी महिलांच्या हेप्टेथलॉनच्या चार स्पर्धा झाल्या.यातली एकही स्पर्धक माझ्या माहीतीची नव्हती पण त्यांची तुकतुकीत वेल टोन्ड कांती ते जागतीक दर्जाचे ऍथलिट आहेत याची साक्ष देत होते.

मग आले मेन्स २०० मिटर्स सेमीफ़यनलमधले स्पर्धक व सगळ्या स्टेडिअममधे फ़्लॅश लाइट्समुळे काजवे चमकत आहेत असा भास झाला. ते फोटो दुसर्‍या तिसर्‍या कोणासाठी नसुन अमेरिकेचा गोल्डन रनर मायकेल जॉन्सन यासाठी होते. विश्वविक्रम करुन ती रेसच नाही पण ४०० मिटर्सची रेसपण तोच जिंकणार हे सगळ्यांना ठाउक होते.. फक्त किती मिलिसेकंदाने तो आपलाच विश्वविक्रम तोडतो हे सगळ्यांना पाहायचे होते. नायके शुज कंपनीने त्याला सोन्याचा वर्ख असलेले शुज घालायला दिले होते. ते सोनेरी शुज त्याच्या पायात चम चम असे चमकत होते. बंदुकीच्या गोळीचा फाट... असा आवाज झाला व मायकेल जॉन्सन जो सुसाट सुटला म्हणुन सांगु! १९ सेकंदांनी जेव्हा सेमीफ़ायनलची पहीली हिट संपली तेव्हा सगळे स्टेडिअम लोकांच्या ओरडण्याने दणदणुन गेले होते... मायकेल जॉन्सनने त्याच्या चाहत्यांची निराशा केली नव्हती... स्कोरबोर्डवर त्याच्या नावावर विश्वविक्रम दाखवला जात होता.. स्टेडिअम शांत व्हायला तब्बल १० मिनिटे लागली... त्याचा तो सुसाट वेग खरच एकदम इंप्रेसिव्ह होता...

मग आले मेन्स लॉंग जंपमधले खेळाडु व पुन्हा एकदा सगळे स्टेडीअम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमुन गेले... साक्षात कार्ल लुइसने स्टेडिअममधे पदार्पण केले होते... आतापर्यंत ऑलिंपिक्स स्पर्धेत आठ सुवर्ण पदके मिळवुन कार्ल लुइसने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात अजरामर केलेच होते पण आज तो लांब उडीमधे लागोपाठ चौथे सुवर्णपदक मिळवायचा प्रयत्न करणार होता. जवळजवळ दिड तासाच्या लढ्यानंतर कार्ल लुइसने सुवर्णपदक जिंकुन फ़िनलंडच्या पावलो नुर्मीच्या ९ सुवर्णपदकाच्या ऑलिंपिक्स विक्रमाची बरोबरी केली.या महान ऍथलिटला धावण्याच्या शर्यतीत नाही तरी लांब उडीच्या शर्यतीत तरी बघण्याचे सौभाग्य मला लाभले. लांब उडीच्या आधी स्टार्ट घेताना तो १०० मिटर्स स्प्रिंट करत आहे असाच तो धावत होता... त्याचा तो स्पिड पाहुन तो १०० मिटर्सच्या फ़ायनलमधे नाही हे बघुन मला खरच नवल वाटले.

एव्हाना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. मी व माझा भाउ एका सेक्शनमधे तर वहिनी व आई एका सेक्शनमधे अशी तिकिटे आम्हाला मिळाली होती. थोड्याच वेळात ऑलिंपिक्समधली सगळ्यात प्रिमिअम स्पर्धा.. ज्याने फ़ास्टेस्ट मॅन ऑन अर्थ हा किताब कोणाला तरी मिळणार होता... ती स्पर्धा सुरु होणार होती..१०० मिटर्स फ़ायनल्स! आठ अव्वल दर्जाचे खेळाडु शर्यतीला उभे राहीले.... एवढ्यात आमच्या मातोश्री व वहिनी आमच्याकडे आल्या.... व जोरात माझी वहिनी(जी मराठी नाही) तिने इंग्लिशमधे प्रश्न केला.... when do we go home? we are sleepy and tired!त्या प्रश्नाने मला एकदम लाज वाटली... इथे जगातले सगळ्यात फ़ास्टेस्ट ऍथलिट्स फ़ायनल धावायला तयारीत उभे आहेत व माझी वहिनी व आई झोपायच्या गोष्टी करत होत्या... मी त्यांना कसेबसे आवरले व सांगीतले की अजुन थोडा वेळ कळ काढा... आजुबाजुचे सगळे दर्दी प्रेक्षक आमच्याकडे पाहात होते... व त्यांच्या नजरेत मला पुर्ण दिसत होते की ते म्हणत आहेत.... अरे या लोकांना १०० मिटर्स फ़ायनलला झोप येउ शकते?... कमाल आहे या लोकांची!...

असो. पण याही शर्यतीत आम्हाला दिवसातला दुसरा विश्वविक्रम बघायला मिळाला. १९९२ चा ऑलिंपिक विजेता ब्रिटनचा लिनफ़ोर्ड ख्रिस्टी दोनदा फ़ॉल्स स्टार्ट केल्यामुळे बाद झाल्यावर कॅनडाच्या डॉनाव्हन बेलीने ९. ८६ सेकंदाच्या वर्ल्ड रेकॉर्ड टाइममधे १०० मिटर्सची स्पर्धा डोळ्याचे पाते लवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात जिंकली...

तर अशी १०० मिटर्स फ़ायनल्सची शर्यत डॉनाव्हन बेलीने जागतीक विक्रम करुन जिंकल्यावर मी माझ्या भावाला सांगीतले की तु आई व वहिनीबरोबर घरी जा मी मात्र संपुर्ण सेशन संपेसपर्यंत इथे राहाणार आहे. एव्हाना जोराचा पाउसही सुरु झाला होता व अर्धे स्टेडिअम रिकामे झाले होते. महत्वाच्या शर्यती ज्यात अमेरिकन ऍथलिट्स भाग घेणार होते त्याही संपल्या होत्या व आता फक्त महिलांची १०,००० मिटर्सची शर्यत बाकी होती. १०,००० मिटर्स म्हणजे स्टेडिअमला २५ फेर्‍या मारायच्या. म्हणजे अजुन ४५ ते ५० मिनिटेतरी अजुन ती शर्यत संपायला लागणार असा विचार करुन बरेच जण पावसापासुन व शेवटी होणार्‍या गर्दीपासुन सुटका व्हावी म्हणुन स्टेडिअम सोडुन चालले होते. पण माझ्यासारखे क्रिडाप्रेमी पावसात थांबुनच राहीले होते. पण अर्धी माणसे निघुन गेल्यामुळे एक फायदा झाला... संयोजकांनी बाकीच्यांना पुढे येउन बसण्याची मुभा दिली व मला ट्रॅकपासुन अगदी ४ फ़ुटांवर पहिल्या रांगेत जागा मिळाली जिथुन मला सगळे स्पर्धक हाकेच्या व हात शेक करायच्या अंतरावरुन बघायला मिळणार होते.

शर्यत सुरु झाली. मी माझा या शर्यतीबद्दलचा थोडा अभ्यास आधीच घरुन करुन आलो होतो. त्यावरुन मला माहीत होते की १९९२ मधे बार्सिलोना मधे ही शर्यत इथिओपियाची डिरार्टु टुलु हिने जिंकली होती व याही वेळी तिच संभावीत विजेती होती. पहिल्या दहा फेर्‍यांनन्तर टुलुच पहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा टुलु माझ्या समोरुन पास होत होती तेव्हा मी जोरात ओरडुन 'गो टुलु गो' असे ओरडुन तिला प्रोत्साहन देत होतो. मी पहिल्या रांगेत असल्यामुळे तिला माझा आवाज ऐकु येत होता. तिला वाटले असेल की हा कोण आहे माझ्या नावाने मला प्रोत्साहन देणारा? माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... त्या महान ऍथलिट्सनी जेव्हा ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर आपापले मास्टरपीस(स्लार्टीच्या भाषेत.... मालकतुकडे!)सादर केले होते तेव्हा मी त्याला मुकलो होतो... आज टुलुला प्रोत्साहन देताना माझ्या मनात मी अप्रत्यक्षरित्या त्या व त्यांच्यासारख्या महान ऍथलिट्सना पोस्थ्युमसली एनकरेज करत होतो... माझे अंग पावसात पुर्ण भिजले होते पण त्याहीपेक्षा माझे मन माझ्या ऑलिंपिक्सच्या आठवणींनी त्याक्षणी जास्त भिजले होते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात परत कधी अनुभवयाला मिळेल की नाही हे मला माहीत नव्हते म्हणुन मनापासुन टुलुला नावाने व बाकीच्यांनासुद्धा प्रोत्साहन देत मी संपुर्ण शर्यत संपेसपर्यंत उभा होतो. शर्यत संपली... टुलु पहीली आली नाही... तिला यावेळेला पदकही मिळाले नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. ती आणी हे सगळे वर्ल्ड क्लास ऍथलिट्स शर्यतीत भाग घेउन..... माणसाचे जे स्वाभावीक नेचर असते की आपण आपले सर्वस्व पणाला लावुन ट्राय टु बी द बेस्ट..त्याचे उत्तम उदाहरण होते. माझ्या मनात ते सगळे विजयी होते. मला शेवटचा नंबर आलेल्या ऍथलिटची तिने या ऑलिंपिक्समधे भाग घेण्यासाठी केलेली आयुष्यभरची मेहनत दिसत होती व म्हणुन तिचेही टाळ्या वाजवुन मी कौतुक करत होतो.

शर्यत संपली. लोक स्टेडिअम रिकामे करुन जात होते. मी मात्र झिम झिम पावसात माझ्या सिटवर बराच वेळ बसुन होतो. त्या ऑलिंपिक्सच्या विशाल स्टेडिअमकडे बघत माझ्या मन्:पटलावर मला माहीत असलेले ऑलिंपिक्सचे जुने क्षण आणत होतो व ते क्षण या स्टेडीअममधे परत एकदा जगत होतो. स्टेडिअम रिकामे असुनसुद्धा मला १९५२ मधल्या हेलसिंकी ऑलिंपिक्स स्टेडिअममधला झाटो...पेक....झाटो....पेक.. चा गजर ऐकु येत होता... मला जेसी ओवेन्स माझ्यासमोरुन वार्‍याच्या वेगात धावताना दिसत होता... भारताचा महान हॉकीपटु ध्यान चंद व त्याचा भाउ रुप चंद बर्लिन ऑलिंपिक्समधे त्यांच्या हॉकीच्या तळपत्या बॅटीची जादु दाखवत बॉल ड्रिबल करत सफ़ाइने गोल करताना दिसत होते...झालच तर आपल्या भारताची पलावलकुंडी ठाकरमपिल उषा फक्त एक शतांश सेकंदाने ४०० मिटर्स हर्डल्समधे पदक हुकल्याने कंबरेवर हात ठेवुन वाकुन निराशेने लॉस ऍन्जेलीस ऑलिंपिक्स स्टेडिअममधे उभी असलेली दिसत होती...

स्टेडिअममधले दिवे मालवले गेले व शेवटी मला उठायलाच लागले. परत एकदा त्या भव्य पण रिकाम्या ऑलिंपिक्स स्टेडिअमकडे पहात व माझ्या पाठीच तेवत असलेल्या ऑलिंपिक्स मशालीला मनातल्या मनात वंदन करुन मी भिजल्या अंगाने व ऑलिंपिक्सच्या आठवणींनी तितक्याच भिजल्या मनाने स्टेडिअममधुन जड अंत्:करणाने काढता पाय घेतला व डनवुडी ट्रेन पकडुन मध्यरात्री घरी पोहोचलो.....

अरे वा मुकुंद आला !!! aha.gif
स्वागत !!

पण आधीच लिहीलेले अनुभव परत नाही लिहायचे. ह्या धाग्यावर आता नवीन पायजे ! Wink

जे कोणी लंडनवासी मायबोलिकर व इतर मायबोलिकर लंडनला ऑलिंपिक्सला जायचा विचार करत आहेत ते...>>> जायच तर मनात आहे. कसंबसं एक तिकिट मिळाल पहिल्या विक्री च्या फेरीत.. आता उद्या परत तिकिट विक्री आहे ऑनलाईन.. बघुया मिळेल की नाही ते

तुमचे अनुभव / लिखाण येऊद्या वाचायला उत्सुक आहोत आम्ही Happy

मृदुला, अगो मस्त!!! Happy
अगो, तिकीट काढलं आहे का कुठल्या गेम चं ??
आमच्या गावातुन नाही जाणार Sad

Pages