लंडन ऑलिंपिक्स २०१२

Submitted by Adm on 10 May, 2012 - 05:26

दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्‍यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.

हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....

http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..

प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाली माझ्याकडे पण.. मी त्याचे मराठीकरण लवकरच टाकतो आहे..

प्रत्येक खेळासाठी यंदाच्या स्पर्धेतील संभाव्य विजेते वगैरे पण टाकावेत का???

हिमस्कूल, स्पर्धेचा ग्रूप केला आहे. प्रत्येक खेळाचा वेगळा धागा काढलास तर बरं होईल.
बाकी कोणा माबोकरांना ते ज्या देशात आहेत त्यांची टीम, खेळाडू इ. बद्दल धागा काढून लिहिता येईल.

Two-time Olympic fencing champion Mariel Zagunis will carry the U.S. flag in the opening ceremony of the London Games.
smiley-flag-static-002.gif

मी ही भाषांतर करायला तयार आहे. कुठले करू ते ललिता , हिम्सकुल तुम्ही ठरवुन सांगितले तर चालेल. म्हणजे उगाच डबल होणार नाही.

फुटबॉलमध्ये जगज्जेते आणि युरोकप विजेते स्पेन जपानकडून पराभूत.
फुटबॉलमध्ये राउंड रॉबिन आहे की सरळ बाद फेरी?
भारताच्या कामगिरीची सुरुवात तीरंदाजीने लॉर्डसमधून

मयेकर राऊंड रॉबिन आहे फूटबॉलमध्ये सुरुवातीला.. म्हणून तर उद्घाटनाच्या दोन दिवस आधी सुरू कराव्या लागतात फूटबॉलच्या स्पर्धा..

उद्यापासून बर्‍याच स्पर्धा सुरु होणार आहेत...
बॅडमिंटन, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग - रोड, घोडेस्वारी, तलवारबाजी, हँडबॉल, ज्युडो, रोईंग, शूटींग, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलिबॉल, वेट लिफ्टींग...

तुम्हाला ज्याचे मराठीकरण जमणार असेल ते इथे लिहा.. प्रत्येकी दोन केले तर संध्याकाळी उद्घाटनापर्यंत सगळे होतील..

मी.. बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि शूटींग - नेमबाजी बद्दल लिहितो आहे....

ललिता, सावली, पराग तुम्ही कशावर लिहिणार आहेत ते सांगा...

कालच्या मुंबई टाईम्स मधे भारतीय खेळाडुंच्या इव्हेंटचे वेळापत्रक आले आहे. ते इथे देतेय.

मेन्स १०मी शूटिंग फायनल
गगन नारंग - अभिनव बिंद्रा
जुलै ३० दु ४:४५

तिरंदाजी सेमी-फायनल
दिपिका कुमारी वि साउथ आफ्रिका
ऑगस्ट २ , सायंकाळ ७:२२

मेन्स डबल ट्रॅप शूटिंग फायनल
रोन्जन सिंग सोधी वि पिटर विल्सन
ऑगस्ट २ , सायंकाळ ७:३०

वुमेन्स सिंगल्स बॅडमिंटन सेमी फायनल
सायना वि चिन
ऑगस्ट ३ दु १:३०

वुमेन्स फ्लायवेट बॉक्सिंग क्वा. फा.
मेरी कोम
ऑगस्ट ६ , दु ६:००

इथे एन्बीसी आणि एन्बीसीची बाकीची चॅनेल्स यावरचे वेळापत्रक आहे-
http://www.nbcolympics.com/tv-listings/index.html

बायकांचे टेटे चालू आहे एके ठिकाणी, आणि ब्रावो वर सेरेना-यांकोविच.

ह्यावर्षीच ऑलंपिक फॉलो करणार आहोत. हिम्सकुल,ललिता-प्रीति,मंजुडी यांनी सोप्प्या भाषेत प्रत्येक खेळाचे नियम समजावून सांगितले आहेत ह्याबद्द्ल खूप खूप आभार. Happy
सावली, भारतीय खेळाडुंच्या इव्हेंटच्या वेळापत्रका बद्द्ल धन्यवाद!

हँडबॉल, वॉटरपोलो बघायला मजा आली.
पोलोच्या USA-Italy मॅचमध्ये तर Italy च्या कोचलाच रेड कार्ड दिले Proud तिथून हाकलले आणि पुढच्या मॅचमध्ये येता येणार नाही.
हँडबॉल फास्ट गेम आहे एकदम.

अमेरिकेतले इमिग्रन्ट्स आणि ऑलिम्पिक टाईम Happy एक लेख-

There’s nothing like the Olympics to lift national pride and spur international rivalries — and to remind immigrants of the cultures they came from.

For many members of Washington’s vibrant international community, the London Games have been an excuse to renew old allegiances. They also have given the younger generation a reason to celebrate a parent’s culture, and sometimes they have opened up old political wounds.

पुढे वाचा-
Cheering from afar..

पोलोच्या USA-Italy मॅचमध्ये तर Italy च्या कोचलाच रेड कार्ड दिले >>> Lol

सध्या लोकसत्तामधे येणारे वि.वि.करमरकरांचे रोजचे लेख छान असतात.

चांगला लेख आहे, धन्यवाद. बाकीचे वाचते.

४०० मी. हर्डल्स सेमिमध्ये काल अमेरिकेची लशिन्डा डीमस पहिली आली, आज फायनल असेल. तिची थोडीशी स्टोरी/मुलाखत पाहिली. गेल्या वेळी क्वालिफाय झाली नव्हती. अडचणी, कौटुंबिक जबाबदार्‍या सगळं पार पाडून ती पुन्हा आली आहे. यावेळी ती धावताना तिची दोन छोटी जुळी मुले प्रेक्षकांत बसून "गो मॉम्मी गो!" ओरडत होती. Happy

Pages