लंडन ऑलिंपिक्स २०१२

Submitted by Adm on 10 May, 2012 - 05:26

दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्‍यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.

हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....

http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..

प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेचा ओपनिंग सेरेमनी गिअर- (हाच तो राल्फ लॉरेन, मेड इन चायना. Wink )
ब्रायन ब्रदर्स, रॉडिक आणि रायन हॅरिसन

फोटो- फेबु, टेनिस अपडेट.

gear.jpg

आज पासून ऑलिम्पिक्सला सुरुवात... ओपनिंग सेरेमनी होण्याच्या आधीच फूटबॉलचे सामने आज पासून सुरु.. आज महिलांचे सामने.. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये...

पुढचे १५ दिवस नुसता धुमाकूळ...

भारतीय खेळाडू यंदा जास्त पदके मिळवू शकतील असे फार वाटते आहे... तिरंदाजी, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन.. ह्या खेळात पदके मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे..

भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

उद्घाटनाच्या वेळी एक एक देशाचा चमू मैदानात येतो तो भाग पहायला मला फार आवडतो. १९८८च्या सेऊल गेम्सच्या वेळी आम्ही ओळीने सर्व देशांची नावं लिहून घेतली होती. पुढे अनेक दिवस तो कागद मी जपून ठेवला होता. (आत्ता नावं लिहून घेतली नाहीत, तर मग सर्व सहभागी देशांची नावं कशी लक्षात राहणार ही शंका रास्त असण्याचे इंटरनेट पूर्वीचे ते दिवस Happy )

छत्रे काकू.. देशाचे चमू स्टेडियम मध्ये प्रवेश करण्याचा क्रम ठरलेला असतो..
बहुतेक गत वेळचा ऑलिम्पिक आयोजित करणार्‍या देशाचा संघ पहिला, नंतर आल्फाबेटीकली सगळे संघ आणि शेवटी ह्या वेळचा ऑलिम्पिक आयोजित करणार्‍या देशाचा संघ..

मने खबर छे, हिम्सभाई... Wink

बहुतेक गत वेळचा ऑलिम्पिक आयोजित करणार्‍या देशाचा संघ पहिला >>> हे कन्फर्म करायला हवं.

http://www.london2012.com/easyread/sports/

इथे प्रत्येक क्रिडाप्रकाराची आणि त्यातल्या विविध स्पर्धाप्रकारांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे. (पीडीएफ स्वरूपात) ती वाचायला छान आहे. काही गोष्टी नव्याने कळतायत. (मी जलतरणाची माहिती वाचून काढली. तो माझा सर्वात आवडता क्रिडाप्रकार आहे. त्यापाठोपाठ जिम्नॅस्टिक्स आणि मग ट्रॅक अँड फील्ड)

उद्घाटनाच्या वेळी एक एक देशाचा चमू मैदानात येतो तो भाग पहायला मला फार आवडतो. >>> अगदी अगदी.. Happy आणि ह्यावर्षी खूप टेनिस प्लेयर्स झेंडाधारी असणारेत!

जमलं तर मराठीकरण करणार आहे त्या माहितीचं.. >>> बेस्ट आयडिया, हिम्स. Happy मराठीकरण करून इथे टाकणार का? की स्वाऽन्तसुखाय?

मस्त!

अगो सही!!!

मी सिडनी ऑलिंपिक्स २००० ट्रॅक & फिल्ड रिले बघितला आहे आणि मॅस्कॉट्स बरोबर फोटु पण काढलाय.... प्रिंट्स असल्यामुळे स्कॅन कराव्या लागतिल.

शेवटच्या दिवशीचे फायरवर्क्स सिडनी ऑपेरा हाऊस जवळ प्रचंड गर्दीत जाऊन अनुभवले आहेत Happy

इथे टाकायलाच करणार.. आणि मुशोसाठी तुलाच पिडणार >>> Lol

मी मराठीकरणातही मदत करायला तयार आहे. Happy (याच ग्रूपमधे निराळा धागा काढायचा का? आधी भारत ज्या क्रीडाप्रकारात भाग घेणार आहे त्याची माहिती टाकू. व्हॉट से?)

बाकी, काल नंतर आर्चरीचीही माहिती वाचली. त्याची एकंदर स्पर्धाप्रक्रिया बरीच किचकट आणि लांबलचक आहे.

काल संध्याकाळी ईएसपीएनवर २-३ फीचर-टाईप कार्यक्रम पाहिले. तुर्कस्थानचे पुरूष बॉक्सर्स, थायलंडच्या महिला वेटलिफ्टर्स, भारताची कृष्णा पुनिया आणि ओल्ड क्लासिक्समधे बार्सिलोनात बॅडमिंटन एकेरी गोल्ड जिंकलेले इंडोनेशियाचे अ‍ॅलन बुधी कुसुमा आणि सुसी सुसांती होते. वातावरणनिर्मिती म्हणून सही वाटलं पहायला. Happy

लाजो, स्कॅन करून टाक ना फोटो. खासकरून रीलेचे असतील तर...

लले,प्रिंट्स्च्या बॉक्सात शोधायला लागतिल... विकांताला' शोधते...\

'सिंक्रोनाईज्ड स्विमिंग' आणि 'फेन्सिंग' ला मराठी प्रतिशब्द सांगा बर कुणीतरी....

अरे व्वा ललिता-प्रीति, लिन्कबद्दल खूप धन्यवाद.
एकदम सोप्या शब्दात सचित्र माहिती दिली आहे. मी असलंच काहीतरी शोधत होते.
मराठीकरणाचं नक्की मनावर घ्या Happy

दिअं२०१२ ची टीम परत कामाला लागणार काय???

प्रत्येक दिवशी जे खेळ सुरु होतील त्या त्या खेळांची माहिती टाकावी असे वाटते आहे.. म्हणजे आपोआपच त्या त्या खेळांवर लक्ष राहिल..

हिम्सकूल,
दुसर्‍या दिवशी चालू होणार्‍या खेळाची माहिती आदल्या दिवशीच टाकता आली तर फार छान होईल.
आम्हाला पार्श्वभूमी तयार व्हायला मदत होईल.
लाजो, तुझे फोटो टाक ना.

काल त्या साईटवरच्या वेळापत्रकाप्रमाणे भारतातल्या रात्री ८:००वाजता महिला फुटबॉलची मॅच सुरू होणार असं दिसत होतं. मी शकुनाची (:फिदी:) पहिली इव्हेण्ट म्हणून टी.व्ही. लावून बसले होते. पण मॅच दाखवली गेली नाही. नंतर फॉलोअप करायला जमलं नाही.

एकूणच ऑलिम्पिकमध्ये असले भारी प्रकार असतातच ललिता... त्यामुळे कित्येक मात्तबर फूटबॉलपटू बाहेर आहेत पण.. इंग्लंडच्या बेकहॅमला खेळायचे होते पण वयाच्या अटीमुळे त्याला घेता आले नाही टीम मध्ये.

फेन्सिन्ग - तलवारबाजी.. एकदम बरोबर...
सिंक्रोनाईज्ड स्विमिंग - सांघिक जल नृत्य..

रुणुझुणू - तसेही चालू शकेल... पण असेही भारतीय प्रमाणवेळेच्या साधारण १२ नंतरच सगळे खेळ सुरु होतील त्यामुळे तयारी करायला काही प्रॉब्लेम येणार नाही...

कालची एकही मॅच दाखवली नाही... मुख्य स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावरच टीव्हीवर बहुतेक पुढच्या स्पर्धा दाखवतील... पण पेपरमध्ये व्यवस्थित बातम्या आल्या आहेत.. बातमी.कॉम जिंदाबाद..

ट्रायल म्हणून फुटबॉलच्या माहितीचे मराठीकरण केले आहे. Proud (अगदी राहवेना, म्हणून)

-----------------------

फुटबॉल

१३ दिवस, ५०४ खेळाडू, २ सुवर्णपदके

- १९०४ साली पॅरीस इथे झालेल्या ऑलिंपिकमधे फुटबॉलचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यापश्चात प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत हा खेळ खेळवला गेला, अपवाद १९३२ सालच्या लॉस एंजल्स येथील स्पर्धेचा.
महिला फुटबॉलचा समावेश सर्वप्रथम १९९६ सालच्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी करण्यात आला.

- एका सामन्यात ११-११ खेळाडूंचे दोन संघ एकमेकांशी झुंजतात. प्रत्येक संघाकडे ७ बदली खेळाडू असतात, जे मैदानातील खेळाडूची जागा घेऊ शकतात.

- फुटबॉलच्या मैदानाची लांबी कमीतकमी १०० मीटर आणि जास्तीत जास्त ११० मीटर, तर रुंदी कमीतकमी ६४ मीटर आणि जास्तीत जास्त ७५ मीटर असते. पेनल्टीची जागा गोलपोस्टपासून बरोबर ११ मीटर अंतरावर असते.

- प्रत्येक सामना ४५ मिनिटांच्या दोन भागांत खेळवला जातो. रेफ्रीद्वारे शेवटी जास्तीचा वेळ दिला जाऊ शकतो. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिला, तर अतिरिक्त वेळेच्या प्रत्येकी १५ मिनिटांच्या दोन भागांत सामना पुढे खेळवला जातो. तरीही बरोबरी राहिली, तर पेनल्टी-शूटआऊटचा आधार घेतला जातो. प्रत्येक संघाला प्रत्येकी ५ पेनल्टीज्‌ मिळतात. तरीही बरोबरी राहिली, तर विजेता ठरेपर्यंत पेनल्टी-शूटआऊट चालू ठेवले जाते.

- खेळाडूंपैकी केवळ गोलरक्षकालाच चेंडूला हाताने स्पर्श करण्याची परवानगी असते.

- पुरूष संघ आणि महिला संघ प्रत्येकी १ सुवर्णपदकासाठी झुंजतात. पुरुषांचे एकूण १६ संघ सहभागी होतात; तर महिलांचे १२ संघ असतात.

- प्रत्येक पुरूष संघातील बहुतेक खेळाडूंचे वय जास्तीत जास्त २३ वर्षे असावे लागते. दर संघामागे त्यापेक्षा अधिक वयाचे जास्तीत जास्त ३ खेळाडू सहभागी होऊ शकतात. महिला खेळाडूंसाठी वयाची कोणतीही अट नाही.

- पुरुषांचे संघ ४ गटांत विभागलेले असतात, तर महिलांचे संघ ३ गटांत विभागलेले असतात.

- सामना जिंकणार्‍या संघास ३ गुण मिळतात. सामना बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी १ गुण मिळतो. सामना हरणार्‍या संघास एकही गुण दिला जात नाही.

- पु्रुषांच्या प्रत्येक गटातले सर्वोकृष्ट २ संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करतात. महिलांच्या प्रत्येक गटातील सर्वोकृष्ट २ संघांसोबतच तिसर्‍या क्रमांकावरचे सर्वोकृष्ट २ संघही उपउपांत्य फेरीत प्रवेश करतात.

- उपउपांत्य फेरीचे चार सामने होतात. विजेते ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतात. उपांत्य फेरीतील २ विजेते अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी झुंजतात.

- अंतिम सामन्यांत पराभूत होणार्‍या संघाला रजतपदक बहाल केले जाते. उपांत्य फेरीत पराभूत होणार्‍या संघांमधे अजून एक सामना खेळवला जातो आणि विजेत्यास कास्यपदक बहाल केले जाते.

- आजवरच्या इतिहासात फक्त एकदाच अंतिम फेरीत विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटच्या आधार घ्यावा लागला आहे. २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमधे पुरूषांच्या अंतिम सामन्यात कॅमेरूनने स्पेनला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले होते.

- लंडन येथील फुटबॉल स्पर्धेत एकूण २४०० बॉल वापरले जाणार आहेत.

- पुरूष आणि महिला विभागाचे दोन्ही अंतिम सामने वेंब्ली स्टेडियममधे खेळवले जाणार आहेत.

Pages