लंडन ऑलिंपिक्स २०१२

Submitted by Adm on 10 May, 2012 - 05:26

दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्‍यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.

हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....

http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..

प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..

दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..

http://en.wikipedia.org/wiki/List_of_2012_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोचे प्रयत्न बर्‍यापैकी फसले आहेत. टॉर्चबेअरर व्हीलचेयरवर होता. त्याने मग एका पळणार्‍याला तो पुढे दिला. गर्दीच गर्दी.. त्यामुळे थोडे फार दिसले. लोक छपरावर, झाडावर वगैरे चढून वाट बघत होते .. Happy एकूण चियरिंग आणि उत्साह मस्त! एकदमच छान वाटते आहे..

माबोवर येऊन मुकुंद फक्त कोथिंबीरीचे भाव विचारून गेला की काय ? मला वाटलं इथे काहीतरी लिहिलं असेल...

लंडन ऑलिंपिक्स २०१२ मधे सहभागी होणारा भारतीय संघ :
(साभारः ई-सकाळ )
--------------------------
1) तिरंदाजी : एकूण : 06
पुरुष :
जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी आणि तरुणदीप राय :
स्पर्धा सहभाग : वैयक्तिक आणि सांघिक
महिला :
लैशराम बोम्बय्ला देवी, दीपिका कुमारी आणि चेक्रोवोलू स्वुरो
स्पर्धा सहभाग : वैयक्तिक आणि सांघिक
-----------
2) ऍथलेटिक्‍स : खेळाडू : 14
पुरुष :
- ट्रॅक अँड रोड इव्हेंट्‌स : खेळाडू : 05
वसंत बहादूर राणा (50 किमी चालणे)
बलजिंदर सिंग, गुरमीत सिंग आणि इरफान कोलोथुम थोडी (20 किमी चालणे)
रामसिंग यादव (मॅरेथॉन)
- फिल्ड इव्हेंट्‌स : खेळाडू 03
विकास गौडा (थाळीफेक)
ओम प्रकाश कऱ्हाना (शॉट पूट)
आर. माहेश्‍वरी (ट्रिपल जम्प)
महिला :
- ट्रॅक अँड रोड इव्हेंट्‌स : खेळाडू : 02
टिंटू लुका (800 मीटर)
सुधा सिंग (3000 मीटर स्टीपलचेस)
- फिल्ड इव्हेंट्‌स
सीमा अंटिल (थाळी फेक)
मायुखा जॉनी (ट्रिपल जंप)
कृष्णा पूनिया (थाळी फेक)
सहाना कुमारी (उंच उडी)
-------------------
3) बॅडमिंटन : खेळाडू : 05
पी. कश्‍यप (पुरुष एकेरी)
साईना नेहवाल (महिला एकेरी)
ज्वाला गुट्टा-अश्‍विनी पोनप्पा (महिला दुहेरी)
व्ही. दिजू-ज्वाला गुट्टा (मिश्र दुहेरी)
--------------------
4) बॉक्‍सिंग : खेळाडू : 08
पुरुष :
देवेंद्रो सिंग (लाइट हेवीवेट)
शिवा थापा (बॅंथमवेट)
जय भगवान (लाइटवेट)
मनोज कुमार (लाइट वेल्टरवेट)
विकास कृष्णन यादव (वेल्टरवेट)
विजेंदर सिंग (मिडलवेट)
सुमीत संगवान (लाइट हेवीवेट)
महिला :
मेरी कोम (फ्लायवेट)
----------------------
5) फिल्ड हॉकी
भरत छेत्री (कर्णधार, गोलरक्षक), सरदार सिंग (उपकर्णधार), पी. आर. श्रीजेश (गोलरक्षक), संदीप सिंग, व्ही आर. रघुनाथ, इग्नेस तिर्की, मनप्रीत सिंग, वीरेंद्र लाक्रा, गुरबाज सिंग, एस. सुनील, दानिश मुजताबा, शिवेंद्र सिंग, तुषार खांडकर, गुरविंदर सिंग चंडी, धरमवीर सिंग, एस.के. उथप्पा
-----------------------
6) ज्युडो : खेळाडू : 01
गरिमा चौधरी (महिला ; 63 किलो)
----------------------
7) रोईंग : खेळाडू : 03
स्वर्णसिंग विर्क (सिंगल स्कल्स)
संदीप कुमार आणि मनजीत सिंग (लाइटवेट डबल स्कल्स)
-----------------------
8) शूटिंग : खेळाडू : 11
पुरुष :
अभिनव बिंद्रा (10 मीटर एअर रायफल)
जॉयदीप करमरकर (50 मीटर रायफल प्रोन)
विजय कुमार (25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल)
गगन नारंग (10 मीटर एअर रायफल)
गगन नारंग (50 मीटर रायफल, 3 पोझिशन्स)
संजीव राजपूत (50 मीटर रायफल 3 पोझिशन्स)
मानवजित सिंग संधू (ट्रॅप)
रोंजन सोधी (डबल ट्रॅप)
महिला :
शगून चौधरी (ट्रॅप)
राही सरनोबत (25 मीटर पिस्तूल)
हीना संधू (25 मीटर पिस्तूल
अनुराज सिंग (10 मीटर पिस्तूल)
-----------------------
9) जलतरण : खेळाडू : 01
गगन उलालमठ (1500 मीटर फ्रीस्टाईल)
-----------------------
10) टेबल टेनिस : खेळाडू : 02
सौम्यजित घोष (पुरुष एकेरी)
अंकिता दास (महिला एकेरी)
-----------------------
11) टेनिस : खेळाडू 07
सोमदेव देववर्मन (पुरुष एकेरी)
महेश भूपती-रोहन बोपण्णा (पुरुष दुहेरी)
लिअँडर पेस-विष्णू वर्धन (पुरुष दुहेरी)
रश्‍मी चक्रवर्ती-सानिया मिर्झा (महिला दुहेरी)
लिअँडर पेस-सानिया मिर्झा (मिश्र दुहेरी)
-----------------------
12) वेटलिफ्टिंग : खेळाडू : 02
के. रवी कुमार (पुरुष-69 किलो)
एन. सोनिया चानू (महिला-48 किलो)
-----------------------
13) कुस्ती : खेळाडू : 05
पुरुष : फ्रीस्टाइल
अमित कुमार (55 किलो)
योगेश्‍वर दत्त (60 किलो)
सुशील कुमार (66 किलो)
नरसिंग यादव (74 किलो)
महिला : फ्रीस्टाइल
गीता फोगट (55 किलो)
-----------------------

काल संध्याकाळी आणि आज सकाळी ऑलिंपिक ज्योत आमच्या शहरातून, आमच्या घरासमोरुन गेली. काल बाल्कनीतून पाहिली आणि आज रस्त्यावर उतरुन. तो उत्साह, भारलेले वातावरण, लोकांचे आनंदाने पाणावलेले डोळे त्यांच्यातील एक होऊन अनुभवायला खूप मजा आली. आमच्याच रस्त्यावर ज्योत एकाने दुसर्‍याला दिली ( torch change over ) हे काही फोटो :

Olympic parade.jpgTorch change over.jpgOlympic flame.jpg

वा, वा! मस्तच अगो.
एम्जी धन्यवाद. झेंडा कोणाकडे? Happy

राड्वान्स्का तिच्या देशाची झेंडाधारी आहे असे कळले.

धन्यवाद लोकहो Happy
ऑलिंपिक पार्कची तिकीटं मिळाली आहेत त्यामुळे हजेरी लावणार हे नक्की. स्वतंत्र इव्हेंटची एकतर मिळत नाहीयेत किंवा जी मिळत आहेत ती काल प्रत्येकी पाचशे पाऊंडस वगैरे दिसत होती. त्यामुळे घेतली नाहीत.

अगो मस्त फोटो.
अनेक टेनिसपटू झेंडाधारी आहेत. शारापोव्हा, राफा, फेडी, जोको, मॅक्स मिर्नी...

भारतीय जलतरणसंघात काही अनाकलनीय कारणांमुळे वीरधवल खाडे आणि संदीप सेजवाल यांचा समावेश झालेला नाही.

अगो, सहीच !! Happy

माधुरी, कशा प्रकारचं काम करता तुम्ही, कामाच्या पध्दती, - याबद्दल वाचायला आवडेल. (ऐकल्यावर जरा निराळ्या प्रकारचं काम वाटलं हे, जाणून घेण्याची उत्सुकता आहे Happy )

ललीता-प्रिती अगं काही नाही ऑलिंपिक च्या बीबीसी च्या आयटी प्रोजेक्ट वर काम करतीये अ‍ॅज अ sr. analyst Happy ऑलिंपिक संपला की आमचा कॉन्ट्रॉक्ट पण संपला Happy

खुप आधी बुक केलं होत त्यामुळे अ‍ॅटलिस्ट आम्हाला १-२ खेळांची तरी तिकीट्स मिळाली आहेत ..

पण अगो ने सांगितल्या प्रमाणे सध्या तिकिट्स मिळणं कठिण आणि जे आहेत ते खुप महाग आहेत.
इथे सगळ्यांना पाऊसाची चिंता सतावत आहे.. पाऊसाने काही व्यत्यय आणु नये म्हणजे मिळवलं !!!

ऑलिंपिक पार्कची तिकीटं मिळाली आहेत >> अभिनंदन अगो Happy

ऑलिंपिक पार्कची तिकीटं मिळाली आहेत >> >> आत शिरताना ७०% लोकांना मॉलमधून जावे लागते असे वाचले. हे design करणार्‍याला मानले पाहिजे Happy

लोला तेच विचारणार होते...
यंदा भारताचे टेनिसपटू भांडणासाठी लक्षात राहणार ..गेमचं न!तर्‍ पाहू Proud

तुम्ही म्हणताय तिकिट्स नाहीत म्हणून.. पण पेपर मध्ये तर भरपूर तिकिट्स शिल्लक आहेत असं आले आहे.. स्पेसिफिकली फुटबॉलच्या सामन्यांची.. आणि त्यावर उपाय म्हणून स्टेडियमची बसण्याची क्षमता कमी करणार वगैरे ही आले आहे..

हिमस्कूल, ते वरच्या 'प्रॉब्लेम' लिंकमध्येही आहे. त्याचं कारण म्हणजे ते सामने Glasgow, Cardiff इ. लांबच्या ठिकाणी आहेत. ख.खो. लंडनवासी जाणोत..

ऑगस्ट ८ च्या पुढची जी काही तिकिटे आहेत ती बहुतेक १५० पांउंडाच्यावर आहेत. काही काही तर ७५० पाउंड आहेत. क्लोझिंग सेरेमनीची तिकिटे ९५० अन १५०० पाउंड अशी आहेत.
फक्त मॅरथॉनच्या एंडपॉईंटजवळची तिकिटे ४०-५० पाउंड होती . डायव्हिंग , बॉक्सिंग , रेसलिंग अन टेटे ची तिकिटे होती असं दाखवत होती वेबसाईट . पण त्याची वेळ आम्हाला सोयीची नसल्याने किमती पाह्यला नाहीत.

Pages