निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्याद्रीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकान वाचलाच पाहिजे असा लेख -

घाट दाखवण्याचे राजकारण!
पश्चिम घाट परिसंस्था तज्ज्ञ समितीच्या अहवालावरून गेले काही महिने देशभरात वाद सुरू आहे. खरे म्हणजे २०११ सालच्या ऑगस्ट महिन्यात डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केला. त्यानंतर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने तो लोकचर्चेसाठी खुला करणे अपेक्षित होते..

http://www.lokprabha.com/lokprabha/20120608/matitartha.htm

कोण कोणाच्या हद्दीत घुसलाय? बिबट्यांबद्दल चांगला लेख -

बिबटय़ा.. तुमचा, आमचा, सर्वाचा
डॉ. विनया जंगले
सगळ्या ठिकाणी वाढलेली भटक्या कुत्र्यांची अतोनात संख्या हे याचं प्रमुख कारण आहे. वस्तीच्या आजूबाजूला कचरा वाढला की कुत्रे वाढतात आणि मग त्या कुत्र्यांना पकडण्यासाठी बिबटे वस्तीजवळ येतात. त्यातलाच एखादा बिबटय़ा कधीतरी माणसांना रात्रीच्या वेळेला दिसतो आणि मग ‘बिबटय़ा आला, ़बिबटय़ा आला’ अशी ओरड होते.

http://www.lokprabha.com/lokprabha/20120608/jungal_ani_manus.htm

पहिल्या सह्याद्रीच्या लेखात जंगले कशी नष्ट होत आहेत ते लिहिलेय तर दुसर्‍या बिबट्याच्या लेखात प्राणी.

मानव (एलदुगो मधला नाही) एकुणातच कसा निसर्गाचा नाश करत आहे Sad

मी पावसाचीच वाट बघत होतो, आता बॅगा भरायला सुरवात करतो.
देशोदेशीचे पावसाळे बघितले, पण आपल्या भारतासारखा पाऊस नाही... हे.मा.वै.म. !!!!

लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग

झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग

साधना, किती तो द्वेश ! चित्रातले मांजर मृत आहे (आत्मा म्हणू या हवे तर !)

काय करु, घरी मांजर आणल्यापासुन माझा मार्जारद्वेष अजुन वाढीला लागलाय. माझ्याकडे तो 'मला खायला घालायची जबाबदारी असलेली माझी मोलकरीण' या नजरेने पाहतो. आणि मासे सोडुन इतर काही घातले की कर्कश आवाजात माझा निषेध करतो. मांजराइतका लुब्रा, लोचट, दोन घास अन्नासाठी कोणत्याही थराला जाणारा, पुर्णपणे कृतघ्न प्राणी मी आजवर पाहिला नाही. हल्ली रोजच्या रोज आमच्या बंटीच्या आठबणीने आम्ही डोळे गाळतोय. बंटीने 'मी तुमचा इमानी नोकर' ही भुमिका कधीच सोडली नाही आणि हे मेले मांजर 'दोन मासे द्यायची औकात नाही तर घरी आणलेत कशाला??' हा तु.क. आमच्यावर दिवसातुन दहा वेळा तरी टाकत असते.

आय हेट पाऊस... चिकचिकीत रस्त्यावरुन्/प्लॅटफॉर्मवरुन्/गाड्यांतुन प्रवास करणे भयाण....

आय हेट पाऊस... चिकचिकीत रस्त्यावरुन्/प्लॅटफॉर्मवरुन्/गाड्यांतुन प्रवास करणे भयाण....>>>>याव्यतिरीक्त पण बघ जरा आजुबाजुला Proud

माझी पावसाची कल्पना थोडक्यात सांगायची तर ऐश्वर्याचे, ताल से ताल मिला >> दिनेश, दोन दिवस त्याची मजा येते पण उरलेले ११८ दिवस काय? मला सूर्य नाही दिसला की उदास वाटत रहाते आणि परत मुंबईचा पावसाळा? नकोच नको.

याव्यतिरीक्त पण बघ जरा आजुबाजुला >> ती काय बघणार? दिनेश तुम्हाला अजूनही याला मासूम म्हणायचे आहे का? Happy

माधव, तो भाजलेली कणसं, भजी, धबधबे असे संदर्भ देतोय !!

सूर्याचे पण वेगवेगळे रुपडे असायचे. गल्फमधला म्हणजे १००० चा बल्ब, खटकन पेटल्यासारखा.
केनयात, बर्‍याचदा गायब असतो.
न्यू झीलंडमधे, दूर दूर असल्यासारखा.
स्वीसमधे तर चक्क् चंद्रासारखा.

हे मेले मांजर 'दोन मासे द्यायची औकात नाही तर घरी आणलेत कशाला??' हा तु.क. आमच्यावर दिवसातुन दहा वेळा तरी टाकत असते.
साधना, या वाक्याशी पूर्ण सहमत.. Happy

हजार पोष्टीच्या मर्यादेपेक्षा दर महिन्याच्या १ तारखेला नि.ग. चा नविन धागा काढला तर..
यामुळे विशेषतः त्या महिन्यातील निसर्गबदल व त्यावरील गप्पा नंतर शोधायला सोप्पे जाईल. हा धागा सतत वाहता आहे, त्यामुळे पोष्ट्स कमी-जास्त हा मुद्दा यांत नसेल.

साधना.. ..," चिकचिकीत रस्त्यावरुन्/प्लॅटफॉर्मवरुन्/गाड्यांतुन प्रवास करणार्‍यांकडे पाहून त्यांना सलाम"
जिप्स्याला धबधब्यांची स्वप्ने पडायला लागली असतील ..
दिनेश दा बॅग्स भरायला लागले....
क्या बात है!!! या धाग्यातून... अपनी मिट्टी की खुशबू.. इथपर्यन्त येतेय !!!

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग >>>> जिप्सी, सेम पिंच, काल संध्याकाळी पावसात भिजत भिजत घरी जातांना मी हेच गाणं गुणगुणतं होते. इतकचं नाही तर ह्या गाण्याचं चित्र कोड करावं का ? असाही विचार डोक्यात घोळत होता.

पेट्रोले पंच्याहत्तरी गाठली तेव्हापासुन गाडीला आराम दिलाय मी. पण पावसाळ्यात पर्याय नाही. आय हेट पाउस.. Happy ते धबधबे बिबधबे फोटोत बरे दिसतात. पण ते चिप्प भिजलेल्या अंगाने गाडीत बसुन परत यायचे म्हणजेही जीवावर येते...

जिप्स्याला बहुतेक ' हे जीवन सुंदर आहे' हे गाणे आठवतेय ...

'दोन मासे द्यायची औकात नाही तर घरी आणलेत कशाला??' हा तु.क. आमच्यावर दिवसातुन दहा वेळा तरी टाकत असते >> अरेरे मांजरांच्या मालकांचे काय हे हाल Lol

मला पाऊस आवडतो,
घामाने अंग भिजण्यापेक्षा , पावसाने भिजलेल अंग परवडत.
हा घ्या एक भरदुपारचा सुर्य चंद्रासारखा , राजगडावर एका पावसाळ्यातला.

जिप्सी,

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग

इथेही डोंबिवलीत नुकताच अवतीर्ण झाला आहे, पहिला पाऊस!

दिनेशदा, धन्यवाद.
मी काढलेल्या फोटोतील तुतारीची झाड/फुले मरगळल्यासारखी वाटतात. का ती तशीच असतात नेहमी.
डाऊन टू अर्थ लक्ष ठेवणारी?

पहिल्या पावसात भिजु नका हो.. वातावरणातला सगळा कचरा पावसाबरोबर खाली येतो. एक दोन पाऊस बरसुन गेल्यावर मग भिजा मनसोक्त..

सगळ्याना पावसाच्या शुभेच्छा!!!

मी माय्बोलिचि नियमित वाचक. निसर्ग गप्पा-८ पूर्ण वाचले. खुपच छान वाचण्यासारखे, पहाण्यासारखे!!

टायपिन्ग मधे हात बसायला वेल लागेल बहुतेक. मग माझेहि आनुभव लिहिन.

नरेंद्र, ती झाडे तशीच असतात. क्वचितच फुलांचा कोन किंचीत तिरपा.
यातले मला समजणारे तर्कशास्त्र असे. जर एवढ्या मोठ्या आकाराचे फुल वरच्या दिशेने उमलले तर त्यात पहाटेचे दव, पावसाचे पाणी वगैरे साठून, परागकण त्यात बुडतील व पक्ष्यांना, किटकांना ते वाहून नेता येणार नाहीत. शिवाय ते पाण्याने वाहूनही जातील, म्हणून ही योजना.
हे फुल अखंड असते. वरच्या दिशेने उमलणार्‍या फुलात, पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था असते.

माझी पावसाची कल्पना थोडक्यात सांगायची तर ऐश्वर्याचे, ताल से ताल मिला... हे गाणे.
दिनेशदा,
अनुमोदन !
त्या गाण्यातला पाऊस मला खरा पाऊस वाटला होता, गाणं खुप आवडलं होतंच

साधना,
मांजराला शाकाहाराच महत्व पटवुन देऊन बघ ..

Pages