निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुद्राक्षाचे झाड आहे हे.>>>>>

धन्यवाद साधना!

तू दिलेला दुवाही पाहिला. त्यातील झाडाशी जुळतंय अस वाटते.
काय एक एक थोर थोर वृक्षांची प्रकाशचित्रे काढली आहेत मी, ते ऐकल्यावर फारच बरे वाटतंय.

गोरक्षचिंचाचे झाड

गोरक्षचिंचाचे फूल

गोरक्षचिंचाचे फळ

गोळेकाका, त्या पहिल्या फुलाला मराठीत तुतारी असे नाव आहे. यात गुलबट रंगही असतो. आमच्याकडे म्हणजे केनयात हे फूल जरा मोठे आणि दुहेरी असते. इथे आपला धोत्रा जरी असला, तरी शंकराच्या पिंडिवर हिच फुले वाहतात.
दुसरे झाड बडीशेपेचे वाटतेय. तिसर्‍या लाल फुलांची इथे चर्चा झालीय. त्याला मराठीत अजूनतरी नाव नाही.

इंद्रा, कुठे दिसले हे झाड. या दिवसात फुलायला लागले असेल, तर सगळ्यांनी राणीच्या बागेत जा बघू. सकाळी
लवकर जा, म्हणजे फुल शुभ्र पांढरे दिसेल. तसेच फुलाचा फोटो, बाजूने पण घ्या म्हणजे तो लोकरीचा गुंडा नीट
दिसेल.

दुसरे झाड कूंभाचे !

कुठे दिसले हे झाड. >> वसईच्या किल्ल्यात... तिथे खूपच वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडं आहेत.

ही पण तिथलीच काही फळझाडं...

मस्त फोटो सगळ्यांचे,
गोळे काका बरेच फिरून आलेले दिसताय. सिल्व्हर ओक आणि जकारांडा पुण्यात भरपूर आहेत.
माझ्या घराजवळ सिल्व्हर ओकची ५०, ६० फुट उंच झाडं आहेत आणि छान फुलतात.

इंद्रा, गोरखचिंचेचे फुल मस्तच आहे रे आणि त्या नंतरचे ते पाम पण.

दिनेश गुलबक्षी एक्दमच सुंदर.

कोणाला तरी तेरडा हवा होता ना? हा घ्या:

शिंदि खजुराच्या वर जे पान आहे तसेच पान कृष्णवडाचेही असते. हे फोटोत दिसतेय ते वडाचे वाटत नाही.

काय एक एक थोर थोर वृक्षांची प्रकाशचित्रे काढली आहेत मी, ते ऐकल्यावर फारच बरे वाटतंय.

वाव... मला कायम साधीच झाडे दिसत आलीत.

वाईट बातमी ही की कोपरखैरणेच्या जवळ एक नवसाचे पार्कियाचे झाड होते, म्हणजे आपले चेंडूफळ. राणीबाग सोङुन मी ते फक्त इथेच पाहिलेले. ते बहुतेक आता जाणार. त्याच्या आधीपर्यंत कत्तल करत आलेत. त्या झाडाच्याच बाजुला दोन शिरीष आहेत, एकाची पाने पांढरट तर एकाची काळसर. सध्या त्यांना शेंगा लागल्यात. ही दोन्ही झाडेही बहुतेक जातील. Sad

शुभरात्री.

गुड न्युज आमच्या बुलबुलने पिल्लू घातले. थोड्याच वेळात फोटो टाकते.

सध्या मी १ आठवडा सुट्टीवर आहे त्यामुळे इथे जास्त येण होत नाही.

सगळ्यांचे फोटो माहीती भन्नाट.

सर्व नि. गकरांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
पर्यावरणाचे रक्षण होऊन निसर्ग उत्तरोत्तर फळत ,फुलत राहो हिच सदिच्छा!
ईंद्रधनुष्य, सर्व फोटो छान.
जागु, अभिनंदन! लवकरच फोटू येऊ देत.
दिनेशदा.. सुंदर रंगीत गुलबक्षीची फूलं..मला पण बिया हव्यात हं मिळाल्या तर ह्या गुलबक्षीच्या.
जिप्स्यानी टाकलेल्या फोटोंबद्द्ल कितीवेळा कौतूक करायच त्याच,अफलातून असतात त्याचे फोटो.त्या फूलाचा क्लोजप तर सुपर्ब!!!
गोळे काकांची फुलं,झाडं सुरेख दिस्तायेत..
<<<तेरड्याच्या शेंगा(?) वाळल्या कि ट्विस्ट होऊन त्यातून बिया बाहेर पडत, वेलचीच्या दाण्यासारख्या..आपोआपच रुजत.. ,कोणत्याही प्रकारच्या मानवसेवेची वाट न पाहता कुठेही उकिरड्यावर, दुर्लक्षित माळावर, नैनसुख देणारी अगणित फुलं उमलत आणी पूर्ण परिसराला शोभिवंत बनवून टाकत..
या वाळक्या शेंगांना दोन बोटांच्या चिमटीत पकडून हलकेच दाबले कि सुर्रकन कर्ल होत ,आतील बिया बाहेर पडत.. ही कर्ल होण्याची गंमत पाहण्यात तासनतास जात..>>>> वर्षूदी, अगदी अगदी!!!
माधव तेरडा मस्त.

दिनेश दा..'८ फूट वाढलेला तेरडा??..'' OMG!!!!!!
जिप्सी... धन्स रे!! तू आणी इथल्या बर्‍याचशा निसर्गप्रेमींमुळे माझं सामान्य ज्ञान वाढण्यास खूप मदत होतीये..
नरेंद्र काका.. मस्त छायाचित्रं.. ती गुलाबी रंगाची फुलं किती सुंदर आहेत..
ते पिवळे बॉटल ब्रश फुलं इथे एका भागात लाल रंगाचे आहेत.. त्या भागात गेले तर फोटो काढीन नक्की..
जागु.. लौकर टाक फोटू पिल्लाचा.. Happy
उजु.. Happy Happy .. या पावसाळ्यात भारतातील तेरड्याचे रंग इथे पाहायला मिळोत इकडे अशी आशा ठेवून आहे

मी आज दुपारी सगुणा बागेत जायला निघतेय.

उजु २-३ दिवस राहता येईल अशी जागा आहे ना ती ? आजूबाजूला अजुन काही आहे का ?

आता लेकीच्या सुट्टीत निगचे पहिल्यापासूनचे भाग तिच्याबरोबर वाचायचा उपक्रम हाती घेणार आहे. शिवाय दिनेशदानं दिलेल्या डॉक्युमेंटरीजही दाखवायच्या आहेत.

आता, निसर्ग गटग करण्याची संधी कधी देताय दिनेशदा?

सुंदर गुलाब जागु
दिनेश दा च्या गुलबाक्षीच्या फुलांचे रंग अप्रतिम आहेत..
मामी... निसर्ग गटग ... काश मै भी जॉईन करती.. SIGH!!!!!!!!!!!!!

हे पहा नुकतच अंड्यातून बाहेर आलेल पिल्लू. काल बुलबुलच जोडप सारख येउन आवज करत होत आणि आपल्या चोचीतून एका मागोमाग एक पिल्लाला भरवत होत. त्यावरुनच आम्हाला बाळाचा जन्म झाला हे समजल. कारण ह्यावेळी बुलबुलने खुपच वर घरट केल आहे त्यामुळे निट फोटोही काढता येत नाही. हे काल दिरांनी घोडा स्टूलवर चढून फोटो काढले.

बुलबुलने ह्यावेळी ड्युप्लेक्स बांधलय हे कालच्या फोटोवरुन समजले.

ह्या बाळाला अजून उबेची गरज आहे म्हणून बुलबुल अजुन भरवून झाल्यावर बाळाला उबवत असते.

जागू, दोन महिन्यांपूर्वीच आम्ही सगुणा बागेपर्यंत पोहोचलो होतो, असेच भटकत फिरत असताना. जागा छान आहे. सुरवातीलाच विविधरंगी कमळांनी भरलेला मोठा हौद आणि माश्यांच्या पेट्या आहेत. आत रहायला जागा आहे ती ओके ओकेच वाटली. तिथल्या कृत्रिम तळ्यात पाणी कमी आणि चिखल जास्ती आहे, त्यामुळे रात्री डासांची भिती असेल. ए़कूण परिसर छान आहे पण अजून देखभालीची गरज आहे असं वाटलं. तिथून मी काही मस्त झाडं घेऊन आले. शिवाय त्यांच्या शेतात पिकणारे तांदुळ, कांदे इ. प्रकारही विकायला होते. सायकलीही भाड्याने मिळतात. एक बैलगाडीही आहे. पावसाळ्यानंतर लगेच गेलं आणि मोठ्या ग्रुप बरोबर गेलं तर जास्त मजा वाटेल. जेवण वगैरे कसं आहे त्याची कल्पना नाही.

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!!!
जागतिक पर्यावरण दिना निमित्त माननिय मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी भ्रमणध्वनीवर (Auto) शुभेच्छा दिल्या... प्लॅस्टिक वापर टाळा हा महत्वाचा संदेश त्यात होता.

दिनेशदा, माधव, साधना, उजू धन्यवाद

जागू अभिनंदन Happy

बुलबुलाचं ड्युप्लेक्स .... Lol मस्त आहे. बाळबाळंतीण सुखरूप आहेत हे ऐकून बरं वाटलं. ते लाल दिसतंय ते पिल्लु का? काही आकार कळतच नाहीये. Happy

अभिनंदन, जागू. Happy

हो मामी ते पिल्लूच आहे.

उजु अग आत्ताच तिथे फोन केला होता पण रुम्स नाहीत तिथे. त्यामुळे आता दुसरीकड जाण्याचा प्लॅन करत आहेत. जवळ दुसरे ठिकाण आहे का जिथे जाणे दगदगीचे नाही होणार ?

जागु, सगुणामध्ये जायचे तर एखादा महिनाआधीच बुकींग कराव लागत रूम्ससाठी, पॉण्ड हाऊससाठीतर दोन -तीन महिने आधी बूकींग कराव लागत. आणि मामी इज म्हणींग राईट! पावसाळ्यानंतर गेल्यावर जास्त छान वाटत, सगळीकडे हिरवळीच राज्य असत.मागच्या नदिलापण भरपूर पाणी असत.
जेवेण टेस्टी असत, अगदी घरगूती चवीचे असते. मी जाऊन दोन-अडीच वर्षे झालीत आता.
अगदी जवळ नाही पण बदलापूर्मध्ये एक फार्महाऊस आहे विष्णूबाग नावाचे. मस्त आहे. तूला आवडेल, भरपूर झाडे आहेत. भर ऊन्हात देखील थंडगार सावली असते झाडांची. श्रावणीला पण आवडेल ती जागा.
ही त्यांची वेबसाईट www.vishnu baug badlapur.com

जागू गुगलमध्ये टाक विष्णूबाग बदलापूर, नक्की साईट आठवत नाहिये ग मला आत्ता. तूला हवा तर त्यांचा नंबर मी तूला समस करते.

आजी तुमची नात/नातू अगम्य आकाराचा आहे हो. बुलबुल या शब्दाचा आकार अजून त्याला लाभायचा आहे. पण फोटोबद्दल धन्यवाद. बारसे कधी करताय? Happy

Pages