'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
वा दिनेशदा - काय सुरेख फुले व
वा दिनेशदा - काय सुरेख फुले व सुरेख फोटोही - सकाळी सकाळी फुलांचे दर्शन घडणे यासारखे सुखद काहीही नाही......
रच्याकने ते मडाराका डे काय प्रकरण आहे ?
मृण्मयी - वाळ्याच्या माहितीबद्दल धन्स........
नमस्कार लोकहो! मला खालील
नमस्कार लोकहो!
मला खालील वनस्पतींची ओळख पटवायची आहे. कृपया मदत करा!
नमस्कार गोळेकाका - कृपया, ते
नमस्कार गोळेकाका - कृपया, ते फोटो जरा मोठे करुन टाकणार का, तसेच कुठले आहेत, कुठल्या सिझनमधले हे कळू शकेल का ? पूर्ण झाडाचे, पानाचे व मग फूल व फळाचे असतील तर ओळखायला बरे पडतात - तसं पाहिलं तर दिनेशदांसारखी दिग्गज मंडळी कुठल्याही एका भागावरुन (पान, फूल, फळ) ओळखू शकतीलच.......
शशांक त्या फोटोवर टिचकी मारली
शशांक त्या फोटोवर टिचकी मारली तर पिकासात मोठ्या आकारत दिसत आहे.
गोळेकाका, हे सगळे फोटो
गोळेकाका, हे सगळे फोटो नैनितालचे का?
दुसर्या फोटोतली सप्तपर्णी आहे.
होय जिप्सी, हे नैनितालच्या
होय जिप्सी, हे नैनितालच्या नैनादेवी मंदिराशेजारचेच फोटो आहेत. आणखीही अनेक वनस्पतींची मला ओळख पटवायची आहे. वेळ होईल तसतसे इतरही टाकतोच!
जिप्सी, यात तुला सप्तपर्णी कुठे दिसली बाबा?
शशांक, मेच्या १३-२१ दरम्यान अलीकडेच नैनितालला केलेल्या सहलीचे हे फोटो आहेत. मला वाटते की पिकासावरील सर्वोत्कृष्ट सापेक्षपृथकता सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नसल्यास ती कशी उपलब्ध होऊ शकेल ते सांगावे.
जो दुसरा फोटो आहे ना तोच
जो दुसरा फोटो आहे ना तोच तो.

हा झूम करून काढलेला फोटो.
जर्दाळु आणि त्याची पाने अशी
जर्दाळु आणि त्याची पाने अशी दिसतातः

अरे वा! छानच मोठा केला आहेस
अरे वा! छानच मोठा केला आहेस की. चला तर मग आता ओळख पटवा, निदान ह्या मोठ्या आकारावरून तरी.
गोळेकाका ते सप्तपर्णीच आहे.
गोळेकाका ते सप्तपर्णीच आहे. पानांचा आकार पहा (हि उत्तरांचल मधील सप्तपर्णी आहे).
गेल्यावर्षीच्या माझ्या उत्तरांचल भटकंतीत काढलेला.
राणीखेतला आम्ही सप्तपर्णीच्या बाबतीत गाईडला हा प्रश्न विचारला होत. त्याने दिलेल्या माहितीनुसार हि पहाडी भागात आढळणारी सप्तपर्णी आहे. आपल्याकडे आढळणार्या सप्तपर्णीची पाने फुले वेगळी आहेत.
सुप्रभात. हे रानफुल आहे. अरे
सुप्रभात.
हे रानफुल आहे.
अरे मी मागच्या सुप्रभात चा फोटो टाकला तो कोणीच ओळखला नाही. तो मदनबाण नसून चमेली आहे.
दिनेशदा गुलाबकळ्यांचे फोटो भन्नाट
गोळेकाका, जिप्सि छान फुले आहेत सप्तपर्णीची.
तो पहिला पांढर्या मोठ्या
तो पहिला पांढर्या मोठ्या फुलाचा फोटो आहे तो मॅग्नेलिया कूळातला आहे. काहि दिवसांपुर्वी आर्च ने याचा क्लोजप टाकला होता. खुप मोठे म्हणजे ओंजळीएवढे फूल असते. अर्थात हि जरा वेगळी प्रजाती आहे.
जिप्सीच्या फोटोतल्या तुर्याची फुले खुपशी, भारंगीची आठवण करुन देताहेत. कदाचित त्याच कूळातला असावा.
शशांक, संदर्भ पुस्तके नाहीत म्हणून मी हतबल आहे !
मडाराका स्वाहिली शब्द आहे. साधारण प्रजासत्ताक दिनासारखा प्रकार आहे हा. घराशेजारच्या स्टेडीयमवर
तिन्ही दलांचे संचलन होते, त्यामूळे आम्हाला गच्चीत उभे रहायलादेखील बंदी होती.
इथल्या गारठ्यामूळे, कळ्या पण अगदी सावकाश उमलतात. आणि फुल सुद्धा २/३ दिवस सहज झाडावर टिकते !
गावठी बदाम कच्च्याच
गावठी बदाम

कच्च्याच बदामांचा पोपट फडशा पाडत आहेत.

जिप्सी काय भन्नाट फोटो काढतोस
जिप्सी काय भन्नाट फोटो काढतोस रे - दाद दिल्याशिवाय रहावत नाही - पण, किती वेळा सुंदर, छान म्हणायचं ....?
हे रानफुल आहे. >>> याच नाव
हे रानफुल आहे. >>> याच नाव काय नाही विचारलस , तरी सांगतो
याच नाव अमरुल आहे Oxalidaceae (Wood Sorrel Family) कुटुंबातल
बायोनाव - Oxalis corniculata. (flowersofindia.net वरुन साभार)
हुश्श.... माझी कॉलर कुठे आहे ते शोधतोय
जिप्स्या सप्तपर्णीचा तुरा, नाताळात सजवलेल्या झाडा सारखाच सुंदर दिसतोय,
शुभ्र बर्फ पडलेल झाड त्यावर लावलेले लाल पिवळे दिवे
जिप्सी काय भन्नाट फोटो काढतोस रे - दाद दिल्याशिवाय रहावत नाही - पण, किती वेळा सुंदर, छान म्हणायचं ....? >>>+१
आज शुकशुकाट का ? शनिवार
आज शुकशुकाट का ? शनिवार म्हणून?
नितीन ते मला माहित आहे.
नितीन
ते मला माहित आहे.
हे पिवळं ऑक्झॅलिस आमच्या
हे पिवळं ऑक्झॅलिस आमच्या बागेत पावसाळ्यात खूप येतं.
सध्या हे आहे बागेत (फोटो आंतरजालावरुन...) Oxalis debilis var corymbosa
"सर्वोत्कृष्ट सापेक्षपृथकता"
"सर्वोत्कृष्ट सापेक्षपृथकता" म्हणजे काय हो गोळेकाका ? (आपल्या साध्या मराठीत कसं पंक्चर, पेपरवेट, पी सी, माऊस...... तसं..). यावरुन मला "अग्निरथगमनागमन मार्गदर्शक ताम्रनील पट्टिका" हा (कधीकाळी पाठ केलेला)शब्द आठवला ...... (कृपया हलके घ्या)....
आयॅम ब्याक!! गुरु-शुक्र वीक
आयॅम ब्याक!! गुरु-शुक्र वीक एण्ड सौदीची राजधानी रियाध ट्रीप मारली. त्या कॉक्रीट जंगल मधे असणारं प्रचंड मोठ प्राणी संग्रहालय हे निसर्ग प्रेमींसाठी एक ओअॅसिसच आहे. घाईत बघितले तरी तीन तास लागले. फ्लेमिंन्गो, वाघ,सिंह, चित्ते, हत्ती, जिराफ, अगणीत पक्षी, तर्हेतर्हेचे पोपट, गरूड वर्गातले पक्षी, रंगीत चोचीचा हॉर्नबिल पाहून एकदम दिलखूष!! थोडे फोटो ही काढलेत टाकतो लवकरच.
धन्यवाद शशांक, जिप्सी,
धन्यवाद
शशांक, जिप्सी, जागू.
आता आणखी दोन फोटो देत आहे. हे आहेत भीमतालच्या काठावरल्या एका वृक्षाचे, जो आपल्या देखणेपणाने हमखास लक्ष वेधून घेत असे.
शशांक,
शुद्ध मराठीत सांगायचे तर
सापेक्षपृथकता = रिझोल्युशन
दिनेशदा,
आधीच्या नोंदीतील पहिले मोठे फूल कशाचे आहे?
असे विचारल्यावर तिथले स्थानिक लोक "कठाळ" म्हणत होते.
मात्र त्या झाडाला कुठेही फणस लागलेला असल्याचे मला तरी दिसले नव्हते.
Jacaranda mimosifolia हे नाव
Jacaranda mimosifolia हे नाव आहे गोळे काका या निळ्या फुलांच्या झाडाचे. सर्वजण जॅकरांदा, जाकरांदा या नावानेच ओळखतात याला - हे नाव इथे मा बो वर सर्चवर टाकल्यास अनेकांनी याचे काढलेले अतिशय सुंदर सुंदर फोटो पहायला मिळतील.
दिनेश दा.. सुंदर रंगीत
दिनेश दा.. सुंदर रंगीत गुलबक्षीचे फूल..
कळ्या तर नुसत्या दिलखूश!!!
जागु चं रानफूल नाजुक ,ब्राईट आहे अगदी..
जिप्स्याचे फोटोज.. क्या बोल्नेका!!! सुपर्ब!!!
गोळे काकांची फुलं,झाडं पण पण सुरेख दिस्तायेत..
श्रीकांत ,फोटोज अपलोड कर लौकर
लहानपणी पावसाळ्यात रंगीबेरंगी तेरडा फुलायचा.. त्याचे इतके वेड लावणारे विविध रंग असत..
कुणाकडे आहेत का फोटो, .. अनेक युगं लोटल्यासारखी वाटतायेत ही सुर्रेख फुलं पाहून..
तेरड्याच्या शेंगा(?) वाळल्या कि ट्विस्ट होऊन त्यातून बिया बाहेर पडत, वेलचीच्या दाण्यासारख्या..आपोआपच रुजत.. ,कोणत्याही प्रकारच्या मानवसेवेची वाट न पाहता कुठेही उकिरड्यावर, दुर्लक्षित माळावर, नैनसुख देणारी अगणित फुलं उमलत आणी पूर्ण परिसराला शोभिवंत बनवून टाकत..
या वाळक्या शेंगांना दोन बोटांच्या चिमटीत पकडून हलकेच दाबले कि सुर्रकन कर्ल होत ,आतील बिया बाहेर पडत.. ही कर्ल होण्याची गंमत पाहण्यात तासनतास जात..
वर्षू, चायनात नसला तरी बाली
वर्षू, चायनात नसला तरी बाली मधे तेरडा नक्कीच असणार. तिथे त्यांच्या बियांपासून तेल काढतात असेही वाचले होते.
तूमच्याकडे तो वेगळ्या रुपात असणार. मी न्यू झीलंडला ८ फूट वाढलेला तेरडा बघितला होता.
खरं तर जरा पाऊस आला म्हणून मी एका झाडाखाली उभा राहिलो, वर बघितले तर झाड तेरड्याचे होते. (हनी आय श्रंक द किड्स सारखे वाटले मला.)
आणि ती बोंडे फुटल्यावर ते फळाचे साल कसे अळीसारखे दिसते ना ? शाळकरी वयात मुलींना ते दाखवून घाबरवले होते !
मुंबईत आता तेरडा, रेल्वेलाईनच्या आजूबाजूला पण दिसतो. खास करुन वाशी पासून पुढे !
दा ही गुलबक्षी काय माती
दा ही गुलबक्षी काय माती प्रमाणे रंग बदलते , किती विविध रंग छ्टा एकाच फुलात दिसतात.
नितीन, मूळ रंग तीनच गडद
नितीन, मूळ रंग तीनच
गडद गुलाबी, पांढरा आणि पिवळा.. मग त्यातून हे असे नक्षीकाम !
काटेसावरीत पण हेच तीन रंग, पण त्यांच्यात असा संकर कधी बघितला नाही मी.
माझ्या कडे काकडी ला फुले
माझ्या कडे काकडी ला फुले येतात पण काकडी येत नाहि काय करु ????
काकडीला, फक्त नरफुलेच येतात
काकडीला, फक्त नरफुलेच येतात का ? वेलाला जरा जोम धरु दे. काहिही न करता काकड्या लागतील.
शशांक, जकारांडाला फळेही
शशांक,
जकारांडाला फळेही लागतात का?
धन्यवाद वर्षू.
हे आणखी दोन फोटो. दुरून पिवळ्या बॉटल ब्रश सारखे फुलांचे झुपके दिसणारे, हे कदाचित निराळेच झाड असावे. झुपके जरा जवळून तपासून पाहा.
माहीती बद्द्ल धन्यवाद दा आज
माहीती बद्द्ल धन्यवाद दा
आज सकाळी पावसाने थोडा शिडकावा दिला
पण त्या मुळे जास्त गरम होतय 
गोळे काका पिकासातुन धागा कॉपी ( अश्या मराठी बद्द्ल दिलगीर आहे) करताना सिलेक्ट साइज medium 640-640px करा त्यामुळे सापेक्षपृथकता वाढेल
Pages