निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, ताजी बोंडे खाऊन नाही येत. पण त्याचा रस काढून, बाटलीत भरुन, जर थोडा वेळ उन्हात ठेवला, तर बाटलीचे झाकण उडून जाते.

तसे सफरचंद, द्राक्ष या फळांच्या सालीवर नैसर्गिक रित्याच, यीस्टचे जिवाणू असतात, त्यामूळे त्यापासून दारू करणे सहज सोपे असते. धायटीची फुले पण ते काम करतात.

मानुषी, आपले व्यवसायक्षेत्र सोडून, बाकी सगळ्या प्रांतातले आहे !!

सर्व निसर्गप्रेमींना नमस्कार !
मानुषी,दिनेशदा,जागु,साधना,शशांकजी,प्रज्ञा१२३
वीकेंडची मिसलेली सर्व (गप्पावजा) माहिती वाचुन काढली ...

गावाकडे जो शेवगा पानमळ्यात लावला जातो, त्या शेवग्याच्या शेंगा ठराविक काळात लागतात (साधारण ऑगस्ट-फेब्रु) आता या महिन्यात शेंगा लागलेल्या दिसत नाहीत ,काल इकडे वडील आले होते ,त्यांना इथे पुण्यात आमच्या शेजारी २-३ झाडे बघायला मिळाली, ज्यांना शेवग्याच्या शेंगा वर्षभर लागतात, सध्याही फुलांचा, कोवळ्या शेंगांनी झाडे भरलेली आहेत, त्यामुळे त्यांना विशेष वाटलं, वडीलांनी काही वाळलेल्या शेंगा घेऊन त्याच्या बिया एका पुढीत गावी जाताना घेतल्या.
(मी २ वर्षापासुन ही झाडे बघत होतो (भाजी खात होतो) पण हा फरक मला मात्र लक्षात आला नाही ..)

बाप्रे.. एका दिवसात किती पोस्ट्स झालाएत!!...........

जिप्सी, तू आणि तुझी कलीग ठीक आहात हे वाचून खूप बरे वाटले.

दिनेशदा, सगळीच माहिती एकदम रंजक आहे. आणि गुलाब आणि त्यांचे फोटो सुंदर. शिवाय ती फ्रेम पण मस्त!

जागू, काय सही दिसताहेत त्या कळ्या.खरंच माधवनी दिलेली उपमा पर्फेक्ट आहे!! जुईच्या आहेत ना? आणि त्यांच्याखालचं पान कशाचं आहे? (खूपच हिरवंगार आहे म्हणून विचारलं!)

गौरी, भेद्रं हे नाव वाचून गंमत वाटली!

अनिल, पुण्यात शेवग्याची अनेक झाडं आहेत,की ज्यांना शेंगा येण्याचा टराविक असा सीझन नसतो. नेहेमी फुलं,शेंगा लगडलेली खूप झाडं दिसतात.

अनिल आमच्याकडे मोहाचा शेवगा आहे. तोही सदासर्वदा फुललेला आणि शेंगा येतच असतात. कलम आणल होत ते माझ्या सासर्‍यांनी. कलमी शेवगा वर्षभर येतो अस मला वाटत. तेच माझ्या आईकडे पुर्वीची झाडे आहेत त्यांना मात्र सिझन प्रमाणेच शेंगा येतात.

शांकली हो जूईच्याच आहेत त्या कळ्या. त्याखालच पान भेंडीच म्हणजे शशांक म्हणतात त्याप्रमाणे पारस पिंपळाच. शांकली मुलीला बक्षीस दे ग आमच्याकडून.

कलमी शेवगा वर्षभर येतो अस मला वाटत.>>>>> हे नवीनच ऐकतो आहे, हा कलमी शेवगा कुठे मिळतो म्हणे ? मी ही आतापर्यंत पाहिलेली शेवग्याची झाडे (अर्थात पुण्यातली) कायमच फुले, शेंगांनी लगडलेली पाहिली आहेत.....

सुप्रभात.

शशांक मग माझा अंदाज चुकीचा आहे. पण हल्ली सगळ्याच झाडांची कलमे करतात ना. तसेच कलम आम्ही नर्सरीतून आणले शेवग्याचे ५-६ वर्षापुर्वी. आता त्याचे मोठ्ठे झाड झाले आहे. १ वर्षातच त्याला शेंगा यायला लागल्या.

शशांकली(!)
तुमच्या मुलीचं कौतुक हं!
जागू तुझ्या आईचंही. (खराटे करतात म्हणून!) अगं मला नेहेमी वाटंत की या नारळांच्या(पुन्हा नारिकेलपुराण?) झाडाचं सगळं नीट रिसायकलिंग झालं पाहिजे. पण मग लक्षात आलं की खटलंही तसंच पाहिजे.
पण झावळ्या इतक्या वाया जातात ना.........पडल्या की बाहेर नेऊन टाकायच्या...काय करणार!
तरी मी कचर्‍याचं नीट विभाजन करून खतासाठी वेगळीच जागा केलीये.

शेवग्याची काही झाडे वर्षभर शेंगा देतात. आमच्या केनयातल्या ऑफिसच्या आमटीत रोजच शेंगा असतात.
(तूम्हाला हे सगळे वाचून मजा वाटत असेल ना !)
पण माझ्या बघण्यातली काही झाडे, पानगळ,मोहोर, शेंगा या चक्रातून जातात.

कलमी झाडे अगदी ५/६ फुटाची झाल्यापासून शेंगा देऊ लागतात.

हे खास साधनाला जळवण्यासाठी.

मी पावसात लावलेला १ फुटीचा तोंडलीची वेल आता चांगलीच फोफावलेय. त्याला तोंडली धरली आहेत. आज बहुतेक संध्याकाळी त्याचीच भाजी करेन. साधनाला मी ह्याच वेलीची सख्खी वेल दिली होती Happy

जागू, तूमच्याकडे आवडेल अशी एक तोंडल्याची कृती इथेच देतो. तोंडली वरवंट्याने ठेचून घ्यायची. बराचसा लसूण पण ठेचायचा. मग तेलावर जिरे, हिंग लाल मिरच्या यांची फोडणी करायची. त्यात लसूण परतायचा आणि मग तोंडली परतायची. तेलात परतूनच शिजवायची मग खोबरे आणि मीठ घालायचे. परतून कोरडी करायची.
माझी अत्यंत आवडती भाजी.

आज आमच्या ऑफिसमधेही तोंडल्याचीच भाजी आहे (आताच किचनमधे जाऊन आलो.) इथे मक्याचे दाणे घालून करतात हि भाजी.

वा जागू - अगदी रसरशीत तोंडली आहेत.... आता एखाद्या पक्व "बिंबा" चा पण प्र चि येऊ दे.......

दिनेशदा - दररोज आमटीत शेवगा - इकडे माझ्या तोंडाला काय पाणी सुटलंय. ...स्लर्प....

ते संस्कृत नाटक आमच्या मुलीने बर्‍याच वर्षापूर्वी बसवले होते - काल ती भाषासमृद्धीची गोष्ट निघाली त्यानिमित्ताने मी त्याचा उल्लेख इथे केला.

मानुषी - बागेतल्या कचर्‍याचे रिसायकलिंग खरोखर कौतुकास्पद व अनुकरणीय.....

जागू, तूमच्याकडे आवडेल अशी एक तोंडल्याची कृती इथेच देतो. तोंडली वरवंट्याने ठेचून घ्यायची.>>>> दिनेशदा - तिथे तुम्ही पाटा-वरवंटा, खल-बत्ता असं काय काय आणून ठेवलंय ???

अरे वा! जागू ही तोंडली कोवळी असताना पोह्यात घालून मस्त लागतात.(जुन्या आठवणी:)
आपण कांदेपोहे करतो तसंच. (बाकी तुला माहितीच असेल म्हणा!)
फक्त कांद्याच्या ऐवजी कोवळ्या तोन्डल्याचे पातळ काप मोहोरी हिंगाच्या फोडणीत घालून एक वाफ काढायची. मग बाकी कांदेपोह्यांसारखंच!
वरून ओलं खोबरं!
लहानपणी आईने पोहे करायला घेतले की आम्ही तिला बागेतून तोंडली, मिरच्या, कढिपत्ता असा फ्रेश मालमाल आनंदाने आणून देत असू!

हं........दिनेशदा
अशीच दोडक्याचीही भाजी मी करते. अगदी कोवळे दोडके शेंडे बुडखे काढून साल(शिरा) न काढता ठेचून(ठेचूनच बरं का!) घ्या. मूग डाळा/हरभराडाळ भिजत घाला. फ़ोडणीत मोहोरी हिंग हिरवी मिरची भिजवलेली डाळ घाला. मीठ किंचित साखर घालून वाफ़ काढा. वरून अखंड सौभाग्यवती(!) खोबरं कोथिंबीर. व्वा! मस्त हिरवी हिरवी होते ही भाजी.

एक आनंदाची बातमी. आम्ही (मी व नवर्‍याने) पेणच्या पुढे माणगाव जवळ साधारण २.५ एकर शेतजमीन घेतली. परवाच हातात ७/१२ आला.

मोजणी झाली की काही कलमे व इतर झाडे लावायचा प्लॅन आहे. सध्या तरी आयुर्वेदीक झाडे लावुया असे आम्ही म्हणतो आहोत. पण नक्की तीच लावायची का / त्यातही कोणती हे काहीच नक्की नाही.

इथे सल्ले मागितले जातिलच तेव्हा ते द्यावे हि प्रेमळ विनंती आत्तापासुन करत आहे. Happy

लोकहो - काय सकाळी सकाळी अशी तोंडाला पाणी आणणारी वर्णनं करुन राहिलात तुम्ही - आताशी कुठे ११ वाजताहेत आणि या सर्व स्वादिष्ट "शाक" पदार्थ वर्णनामुळे मला आताच भूक लागलीये........

वा मोनालिप - हार्दिक अभिनंदन - शेतातल्या पार्टीचे (चुलीवरली झुणका-भाकर) ठरव आधी - बाकी ते सल्ले वगैरे सर्व नंतर.........

अर्रे व्वा! मोनाली अभिनंदन. मी तुला घाबरवत नाहीये पण जमीन कसणं तसं सोपं नाहीये गं! पण काय फीलिंग असतं...स्वता:ची जमीन असल्याचं!
आम्ही ११ एकर नगरपासून ६ कि.मी. वर जमीन घेतली होती. कल्याण रोडला. तिथे काय लावलं नव्हतं ते विचार. नवरोबांना फार आवड शेतीची. पण स्वता:चा व्यवसाय सांभाळून शेती करणं आम्हाला जमलं नाही.
मूग, गहू, त्यातच आंतरपीक म्हणून करडी(किंवा तीळ), १०० झाडं शेवगा होता. मोसंबी होती. भाजीपालाही करत होतो. शेजारच्या शेतकर्‍यांकडून करत होतो. आमच्या शेतातल्या विहिरीचं पाणी ते फुकट वापरायचे. शेतावर एक गाय ठेवली होती. इतकं दूध यायचं घरी! सतत खरवस. चिकाच्या वड्या असं चालू असायचम.
पण सगळं नीट जमलं नाही. कालांतराने गाय मेली. आणि नवरोबांना स्वता:चा व्यवसाय(तेव्हा व्यवसायही "उभरता" होता.
काही वर्षं करून ती जमीन आम्ही विकली.
असो........तुला शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन!

अभिनंदन मोनाली Happy

शेतातल्या पार्टीचे (चुलीवरली झुणका-भाकर) ठरव आधी - बाकी ते सल्ले वगैरे सर्व नंतर.........>>>>>जोरदार अनुमोदन!!!!!

दिनेशदा, मानुषी रेसिपीज ट्राय करेन दोन्ही.
सगळ्यांचे धन्यवाद.

मोनाली तुझे अभिनंदन. एवढे दिवस शोधत होतीस ती मिळाली तर.

अग छोटी झाड लावलीस तर तुला कायम निगा राखण्यासाठी, लक्ष देण्यासाठी जाव लागेल. त्यापेक्षा मोठ्या झाडांची म्हणजे आंबा, फणस, चिकू अशी कलमे लावलीस तर त्यांची जास्त निगा राखावी लागत नाही. पावसाच्या सुरुवातीलाच कलमे लावली की पाणि मारण्यासाठी माणुसही ठेवावा लागणार नाही ४ महिने हिवाळ्यात ४ दिवसांनी एकदा तर उन्हाळ्यात दिवसा आड पाणी मारण्यासाठी गडी ठेऊन दे. शिवाय साफसफाई ही करावी लागेल दर महीन्याला. हा माझा सल्ला आहे. बाकी तुझी आवड महत्वाची.

नाही.

Pages