"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्रिश्चन धर्माच्या समजुतीनुसार का होईना, पण बर्‍याच आफ्रिकन देशात गर्भपात बेकायदेशीर आहे.
इथेही मुलीचे स्थान काही मानाचे आहे असे नाही, पण गर्भ हत्या करण्याचे कुणाच्या मनातही येत नाही.

अमिरखान पैशा साठी हे करत आहेत अस वाटणार्‍यांनी त्यांची निखिल वागळेंनी घेतलेली मुलाखत पहायला पाहिजे होती. अमिर म्हणाले की हे १३ भाग सोडून त्यांनी गेली दोन वर्षे बाकी काहिही केले नाही. एकंदरीतच ही मालिका करण्यातला त्यांचा विचार समाजात व लोकांच्या आचारात काहितरी चांगला बदल व्हावा असाच आहे अशी माझी तरी खात्री पटली.

आफ्रिकन देशात गर्भपात बेकायदेशीर आहे. गर्भ हत्या करण्याचे कुणाच्या मनातही येत नाही. <<<
हे एक टोक आणि स्त्रीभृणहत्या हे दुसरे टोक.
गर्भपाताला कायद्याने बंदी करून ते व्हायचे राहणार नाहीये.
एका महाभागाने अल्ट्रासाउंडवरच कायद्याने बंदी आणावी असे लिहिलेय फेसबुकवर त्याचे समर्थन काय तर अणूउर्जा ही पण संहारक आहे म्हणून तिचे इतर फायदे असले तरी त्यावर बंदी आहे..

हे कायमस्वरूपी, परिणामकारक आणि योग्य उपाय नाहीत.

पैशासाठी म्हणजे काय हो?
त्याला एका फुटकळ बिंडोक चित्रपटांसाठी किंवा जंक फूडच्या जाहिरातींसाठी कोट्यावधी रूपये मिळू शकतात. आज त्याची मार्केट व्हॅल्यू प्रचंड आहे.
त्याने टेलिव्हिजनवर असे विषय घेऊन एक टॉक शो केला तर १३ एपिसोडचे त्याला किती मिळणारेत पैसे असं म्हणणं आहे?
प्रत्येक एपिसोडला तीन-साडेतीन लाख रूपये अशी मौलिक माहिती नक्की कुठून मिळाली? ते आमिरला वैयक्तिक मिळतात की त्याच्या निर्मितीसंस्थेला मिळतात? निर्मितीसंस्थेला मिळत असतील तर प्रत्येक एपिसोडसाठी तीन-साडेतीन लाख रूपये म्हणजे थोडक्यात आमिर स्वतःच्या खिशातून पैसे घालून किंवा अनेकांचे उपकार घेऊन हे एपिसोडस बनवतोय. या एकेका एपिसोडसाठी संकल्पना, संशोधन, संहिता (डॉक्युमेंटेशन असले तरी संहिता असावी लागते), चित्रीकरण (डॉक्यु क्लिप्स आणि स्टुडिओमधले) या सर्वांसाठी खर्च येतो. तसेच ज्या प्रकारे संपूर्ण कार्यक्रम सादर केला गेलाय ती सेन्सिबिलिटी बघता त्याची टिम उत्तम असणार यात वाद नाही. या सगळ्या लोकांची प्रोफेशनल फी पण असते. सगळ्या खर्चाचे गणित हे प्रत्येक एपिसोडला किमान ५ - ७ लाखापर्यंत जाऊ शकते. कदाचित जास्तच.

मिसळपावावर कुणी तरी लिहिले आहे की त्याला एका एपिसोडला ३ कोटी मिळणार आहेत.. मी तेच इथे कॉपी केले..

कार्यामधल्या चांगल्या हेतूपेक्षाही त्यासाठी "दुसर्‍याला मिळालेले पैसे" हा लक्षवेधी प्रकार का असतो? Sad
त्या पैशांचं एवढं कौतुक असेल तर आपणही तेवढे कष्ट घ्यावेत आणि कमवावा की तेवढा पैसा!

जामोप्या, तुम्हाला उद्देशून नाहीये हे.

मी पैशाचा उल्लेखही कौतुकानेच केला होता... कुणी चांगले काम करुन पैसे मिळवत असेल्तर माझा त्याला विरोध नसतो.

समजा मिळाले त्याला ३ कोटी तर तुमचं काय हो?
आहे तेवढी व्ह्यूअरशिप त्याला. बिन्डोक गेम शो पेक्षा अश्या विषयावर काम होतंय हे महत्वाचं नाही का?

'गर्भपात विरोधी" कायद्यामध्ये नक्कीच काहीतरी त्रुटी असल्याशिवाय असे बिनधास्तपणे गर्भजल, गर्भलिंग परीक्षा आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने मोठ्याच नव्हे तर अगदी छोट्या शहरात चालूच शकणार नाहीत हे उघड आहे. कोल्हापूरात तर अगदी ग्रामीण भाग म्हटल्या गेलेल्या ठिकाणावरही सोनोग्राफी केन्द्रातून अशा टेस्ट्स अव्याहतपणे चालत असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्या केन्द्राविरूद्ध पोलिस कारवाई झाली.....[पण हे थेट जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घेतल्यामुळे झाले असेच सर्वसामान्य लोक म्हणणार. एकट्यादुकट्या कार्यकर्त्याला 'चूप' कसे बसवायचे हे डॉक्टरांनाच नव्हे तर अशी महागडी यंत्रे तयार करणार्‍या फॅक्टरीजनाही बरोबर समजते......अल्ट्रासाऊंड यंत्रे तयार करणार्‍या मॅनेजमेन्टचे प्रतिनिधी डॉक्टर लोकांच्या गळ्यात हे यंत्र कसे चाणाक्षरित्या मारतात याचाही उल्लेख कालच्या भागात खुद्द एका सीनिअर डॉक्टरनेच सांगितला.]

नवी दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत जर "Pay five hundred rupees now rather than five lakhs later."...' अशा जाहिराती रेल्वे स्टेशन, पब्लिक ट्रान्स्पोर्ट, बझार, चांदणी चौक असल्या गजबजलेल्या ठिकाणी झळकत असता, त्यांच्याकडे पोलिसांचे 'सोयिस्कररित्या' लक्ष जात नसेल तर अन्य शहरांची काय कथा ?

अतिशय उत्तम कार्यक्रम. जापोम्या ह्या कार्यक्रमासाठी आमीर खान ने ५० कोटी खर्च केलेत असे वाचनात आले. आणि किती कमवणारे, किती गमावणारे हे पहाण्यापेक्षा जे सत्य समोर आलं ते पहा.
अजुन एक आमीर खानच्या रिसर्च तज्ञांच्या नुसार हे करणारे सुशिक्षीत, शहरी लोक जास्त आहेत. ग्रामीण भागात हा प्रकर तुलनेने खुप कमी आहेत..

'गर्भपात विरोधी" कायद्यामध्ये नक्कीच काहीतरी त्रुटी असल्याशिवाय असे बिनधास्तपणे गर्भजल, गर्भलिंग परीक्षा आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने मोठ्याच नव्हे तर अगदी छोट्या शहरात चालूच शकणार नाहीत हे उघड आहे. <<<
गर्भपाताला कायद्याने बंदी नाहीये. होती. आता नाहीये.
गर्भजलचाचणी किंवा गर्भलिंगनिदान चाचणीला कायद्याने बंदी आहे.

डॉ : xx गुणसूत्र असेल तर मुलगी xy असेल तर मुलगा . आईकडून नेहमी x गुणसूत्रच येतं तर वडिलांकडून येणारं गुणसूत्र x की y यावर बाळाचं लिंग ठरतं असं शाळेत शिकल्याचं आठवतंय. काही चुकीचं असेल तर सांगाल का?

खरं आहे.... पण एक्स जाईल की वाय जाईल हे आपल्या मनावर नसतं.... निसर्ग ठरवतो. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष दोघांची चूक नसते असं म्हणतो.

कुणाचाही असा समज नाही की, एका एपिसोडमुळे धाडकन सगळ्या भारतवासियांची मतं बदलतील आणि ऊद्यापासून स्त्री भृण हत्या बंद होईल. पण या विषयाची भयानकता सगळ्यांनाच जाणवलीय हे नक्की. असं करणारे फक्त न शिकलेले/ गावातले लोकच असतात या समजूतीलाही जबरा धक्का बसलाय. जोपर्यंत सामान्य जनता म्हणजे तुम्ही आम्ही याबाबतीत 'यानं काय होणार?' असं म्हणत राहु तोपर्यंत खरच काही होण्याची शक्यता कमी आहे.

अण्णांच्या आंदोलनाशी तुलना करणे बरोबर नाही. एकतर ते त्यात एकटेच नाहीत पुन्हा राजकारणी डावपेच, मुत्सद्दीपणा, लोकांना पुनःपुन्हा एकत्र आणणं, बरोबर घेवुन पुढे जाणं आणखीही बर्‍याच गोष्टी आहेत.

आपल्याला सगळ्यांनाच जादुची छडी फिरल्यासारखं पटकन सोल्युशन मिळावं असं वाटतं. १५-२० दिवस आंदोलन केलं, काम झालं चला पुढे. इतकं सोपं असतं तर काही समस्याच उरल्या नसत्या. १८५७ पासुन लढ्याला सुरूवात झाली आणि १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. तेव्हा सुरूवातीलाच यानं काय होणार म्हणत शांत बसुन राहीलं पुढे जाणार कसं?

हे जनरल लिहीलय. कुणालाही उद्देशुन नाहीये.

याने काय होणार एवढंच आपण म्हणणार असू तर काहीच होणार नाही हे अनेकांनी लिहिलंय वरती.

अण्णा हजारेंच्या आंदोलनाची तुलना नाहीच करता येणार. रहदारीचे वा कसलेही एकही नियम न पाळणारा एक तासभर मेणबत्ती घेऊन चालल्याने, एखाद्या दिवशी उपास केल्याने आपण देशासाठी काहीतरी केले असे समजत फिरू लागतो. तुलना कशी होईल. Happy

"गर्भपाताला कायद्याने बंदी नाहीये. होती. आता नाहीये....."

राईट. गर्भपातासाठी एम.टी.पी.च्या अ‍ॅक्टमध्ये ज्या सीमा निश्चित केल्या आहेत त्या काटेकोरपणे तंतोतंत पाळूनच संबंधित डॉक्टर त्या महिलेचा गर्भपात करतो का या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे कसलीही यंत्रणा नाही [हे संबंधित सरकारी अधिकार्‍यांने इथे रोटरी क्लबच्या एका संवादात प्रश्नोत्तरादरम्यान स्पष्ट केले होते].

'गर्भ मुलीचा आहे' हे अन्यत्र सिद्ध झाले असेल तर गर्भपात करणारा डॉक्टर [जो लीगली क्वालिफाईड असेलच असेही नसते... हेदेखील धक्कादायक आहे] मग अ‍ॅक्टमधील एखादी तरतूद संबंधित फॉर्ममध्ये उल्लेखून संबंधितांच्या सह्या घेतोच.

एमटीपी (१९७५) अ‍ॅक्टमध्ये खालील कारणास्तव केलेला गर्भपात कायद्याने मान्य आहे :

१. गर्भवती स्त्रीची गर्भावस्थामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडण्याची चिन्हे दिसत असतील तर.....
२. गर्भ परीक्षेत होऊ घातलेल्या अपत्यात शारीरिक व्यंग आढळून आले असेल तर....
३. बलात्कारामुळे स्त्रीला गर्भ राहिला असेल तर......
४. १८ वर्षाच्या आतील कुमारीकेला प्रेमसंबंधातून गर्भ राहिला असेल तर.....
५. गर्भवती स्त्रीमध्ये वेडसरपणाच्या छ्टा असतील तर त्या स्त्रीचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यानी गर्भपाताची मागणी केली असेल तर....

इ.इ. अशा परिस्थितीत जे डॉक्टर व्यवसायाच्या नीतिमत्तेला काळोख फासणारेच असतील ते पैशासाठी यापैकी कोणतीही तरतूद आपल्या कागदपत्रात दाखवून 'मुलगी' जन्मापूर्वीच नाहीशी करू शकतात....आणि या देशात ते सर्रास घडत आहेच.

अशोक पाटील

अशोक तेच ते.

त्या कायद्यात मला वाटते, आठवड्यांची पण मर्यादा आहे.

त्या कायद्यानुसार हा निर्णय डॉक्टरने घ्यायचा असतो. आणि त्या निर्णयाला पुष्टी देणारे रिपोर्ट्स जोडायचे
काही बंधन दिसत नाही. कालच्या स्टींग मधेही एक डॉक्टर म्हणाली, इसे बच्चा खराब है बोलके अ‍ॅडमिट
करेंगे.
तसेच मुलगी जिवंत बाहेर आल्यावर काय करायचे याचे सल्ले पण तीच देत होती.

मी खुप वर्षांपुर्वी इथे माझ्या अनुभवावर आधारीत, एनीथिंग गोज, अशी कथा लिहिली होती.त्त्यात अशा मुलींना
दत्तक घेणारे लोक असतात असे सूचवले होते. असे झाले तरी बरेच, निदान त्या मुलीला आयूष्य तरी मिळते.

प्रत्येकानेच बदलायला हव तरच बदल घडेल नक्किच! अमिर ने वास्तव स्मोर आणुन दाखवल आहे , प्रत्येकाने हयाचा विचार करायला हवा , समाज म्हण्जे कोण हो आपणच ना?
वंशाला दिवा हवा अस म्हणणार्‍या प्रत्येकने
म्हातारपणात आधार हवा म्हणुन अस वाट्णार्‍या प्रत्येकाने
मुलीच्या लग्नात हूंडा घेणार्‍याने आणी देणार्‍यानेहि
अय्या तुमच्या घरात मुलीच का सगळ्या? अस खोचक्पणे विचारणार्‍याने
मरणाच्या दारातुन परत आणण्याची ताकद असणार्‍या पण पैशासाठि वेडे बनलेल्या खुनी डॉक्टरांनी

पुष्टी देणारा रिपोर्ट असतो. तोनुसता लेखी वर्णनात्मक असतो.. अमूक महिन्याची प्रेग्नन्सी, लांबी रुंदी, गर्भजल कमी आहे इ इ इ .. त्याच्याबरोबर सोनोग्राफीचा स्क्रीन शॉट जोडणे कंपल्सरी नसते. त्यामुळे असे रिपोर्ट तयार करणे मुष्किल नसते.

आता मात्र कायदा कडक केलेला आहे. प्रत्येक सोनोग्राफी केसचे ऑन लाइन सरकारला रेकॉर्ड कळवावे लागते.

हे जरी केले तरी ब्लीडिंग होत होते आणि हार्ट साउंड मिळाले नाहीत, हे कारण दाखवता येतेच. स्क्रीन शॉट जरी काढला तरी हार्ट चालू होते की बंद हे एका स्क्रीन शॉटवर कसे समजणार?

समजा तेही रेकॉर्ड करायची काही व्यवस्था आली, तरी सोशो ए़कॉनॉमिक रीझन या कारणासाठे अ‍ॅबॉर्शन करता येतेच.. म्हणजे आम्हाला सध्या काही आर्थिक, कौटुंबिक कारणाने मूल नको आहे, हा अधिकार जोडप्याला असतोच. पण मेडिकल रीजन जरा स्ट्राँग वाटते त्यामुळे ब्लीडिंग, नो हार्ट बीट अशीच कारणे दाखवून अशी अ‍ॅबॉर्शन्स होतात.

होय दिनेश.....तो आठवड्यांचा मुद्दा राहिला माझ्याकडून. कायद्याने २० आठवड्याची मुदत दिली आहे. त्यानंतर केल्यास तो 'गुन्हा' होईल.

या बाबीमुळे अशा प्रकरणात गुंतलेल्या कित्येक डॉक्टर्सनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय [कायद्याच्या भाषेत ज्याला Relevant Documentation म्हटले जाते] ती 'कामगिरी' पार पाडण्यात आपले भले मानले आहे. म्हणजे झाले 'यशस्वी' तर पैसा मिळणारच पण दुर्दैवाने काही कॅज्युअल्टी झालीच तर हे कार्य आमच्या दवाखान्यात झालेच नाही असे वकिली सल्ल्याने म्हणायलाही मोकळे.

स्त्री-हक्क चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्त्या 'मानुषी'च्या मधू किश्वर यानी म्हटलेच आहे की, 'या संदर्भात कायदा फार हतबल असल्याचे सिद्ध झाले आहे. नातेवाईकही कशाला आपल्या 'घराण्याची' अब्रू वेशीवर टांगा म्हणून त्या डॉक्टरांच्या विरोधात कोर्टात जातही नाहीत.'

आमीरच्या या एपिसोडमध्ये कायद्याच्या धाकाचेही महत्व अधोरेखित झाले. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात प्रत्येक समस्येसाठी कायदे आहेत, पण अंमलबजावणी होत नाही हे खरंच आहे. पण हे इतकं अंगवळणी पडलं आहे कि, सुस्त समाजाला हलवून जागे करण्याचे काम कुणी व्यावसायिक रित्या अथवा स्वेच्छेने करत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. किमान या कार्यक्रमामागे छुपा अजेंडा नाही, राजकारण नाही ही बाब आश्वासक म्हणायला हवी. आमीर हा आमीरच राहून काहीतरी करू पाहतोय, त्याने त्यासाठी महात्म्याचे सोंग घेतलेले नाही. अशी सोंगं फार काळ टिकत नाहीत आणि नंतर पदरी निराशा येते. आपल्या रोजच्या दिनक्रमामधे काय करता येईल इतकंच तो सुचवतोय आणि त्यासाठीच ही मालिका आहे.

ज्या काळात माझा या क्षेत्राशी संपर्क होता त्या काळात असे गर्भपात शक्यतो रात्रीच केले जात.
त्या काळात ७० रुपयात गर्भपात अशा जाहिराती तर रेल्वेच्या डब्यातही असत.

जा मो प्या नीट सांगू शकतील, पण माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे गर्भाचे लिंग नुसत्या सोनोग्राफीने नीट
दिसत नाही. (आता बाकी चाचण्या असतील) नाळ जर बाळाच्या पायामधून गेली असेल तर काहीच दिसत
नाही. अशा केसेस मधे, खोटेच मुलगी आहे, असेही सांगितले जात असण्याची शक्यता होती.

गर्भाचे लिंग सोनोग्राफीवर समजते.. एखाद्या ५ % केसेस मध्ये त्या जागी नाळ असल्यास लिंग कुठले आहे हे दिसू शकणार नाही... मुलगीच आहे असे खोटे सांगण्याचेही काही केसेस मध्ये होत असेल.

<खरं आहे.... पण एक्स जाईल की वाय जाईल हे आपल्या मनावर नसतं.... निसर्ग ठरवतो. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष दोघांची चूक नसते असं म्हणत<>
डॉक, यात अर्थात चूक काहीच नाही. पण मुलगा न जन्मण्यासाठी (आणि मूल न जन्माला घालण्यासाठी) फक्त स्त्रीलाच जबाबदार धरले जाते त्यासाठी शिक्षाही केली जाते. नवर्‍याचे दुसरे लग्न केले जाते. या माहितीमुळे स्त्री या अन्यायाला उत्तर तरी देऊ शकेल.
स्त्रीला जगण्याचा समान हक्क आहे हा विचार पसरण्यासाठी स्त्री-सबलीकरणाची (आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय) गरज आहे. 'मी मुले जन्माला घालण्याचे मशीन नाही' असे सांगण्याइतके सामर्थ्य प्रत्येक स्त्रीत यायला हवे. तोवर स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी उपयोगी पडणारे प्रत्येक शस्त्र न्याय्यच आहे.

बरं. जोवर गर्भलिंगनिदान नव्हते तेव्हाही जन्मलेला जीव मुलगी असला तर जन्मताक्षणी दुधात /पाण्यात बुडवून, भाताचे तूस खायला घालून, अफूचा ओव्हरडोस देऊन तिचा जीव घेतला जात असे.

मध्यंतरी मी एक सूचना वाचली की सरकारी पातळीवर प्रत्येक गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी करून तिच्या होणार्‍या गर्भाच्या लिंगाची नोंद करण्यात यावी आणि बालकाच्या जन्मापर्यंत पाठपुरावा केला जावा.

जा मो प्या, मला भिती वाटते कि याच गोष्टिंचा फायदा त्या डॉक्टराना कोर्टात मिळणार, याची.

नाही . स्टिंग असेल तर त्यात मुलगी आहे, म्हणून अ‍ॅबॉर्शन करुया असे संभाषणाचे रेकॉर्ड असते. ते कोर्टात ग्राह्य मानतात. गेल्या चार महिन्यात आमच्या तालुक्यात ३ डॉक्टराना प्रत्येकी ३ वर्षे सक्त मजुरी झालेली आहे. त्यात एक स्त्री डोक्टर आहे. एका डॉक्टरवर दोन वेगळ्या केसेस मध्ये २ शिक्षा झालेल्या आहेत. म्हणजे स्टिंग करुन पकडले, त्याची केस सुरु होती. तर त्याने तो उद्योग सुरुच ठेवला. मग पुन्हा एका स्टिंगमध्ये पुन्हा पकडले. दोन्ही केसेसचा निकाल मग नंतर एकाच सुमारास लागला.

हे निकाल मागच्या १-२ महिन्यातले आहेत. अजून सगळे डोक्टर बाहेरच आहेत. कुणी तुरुंगात अजुन तरी गेलेले नाही. दवाखाने सुरु आहेत.

हे झाल्यानंतर आमच्या परिसरात आता नवीन इंडस्ट्री जन्माला आली आहे असे समजले. म्हणजे कर्नाटक आम्हाला जवळ आहे. तिथे हे सगळे सर्रास चालते. तिथे स्टिंग वगैरे काही नसते. मग इथले एजंट एका टेंपोत इच्छुक बायकाना भरुन घेऊन कर्नाटकातुन सगळे करुन आणतात. ( ऐकीव माहितीवर आधारीत)

Pages