"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जाता जाता. प्लीज याला रीअ‍ॅलिटी शो म्हणू नका. रीअ‍ॅलिटी शो ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे.

खरे तर यालाच रियालिटी शो म्हणता येईल... थोडक्यात जे आजूबाजूला खरेखुरे (रियल) घडते आहे त्याची समिक्षा.. अर्थात आजच्या सॉ कॉल्ड रियालिटी शोज ने मुद्दा रियल घेवून त्याच्या सादरीकरणात मात्र निव्वळ सर्कस, मसाला, अ. आणि अ. असे स्टंट केल्याने मूळ रियालिटी शो ची संकल्पना (जी मूळात अमेरीचे पिल्लू आहे) पार बदलून टाकली असल्याने आमिर च्या या कार्यक्रमाला "गेट रियल" असे म्हणता येईल.. Happy

>>आमीरखानसारखा एरव्हीही गडगंज संपत्तीच्या राशीत लोळणारा कलाकार 'आपण या समाजापुढे काहीतरी विचारार्थ ठेवू शकतो ज्यायोगे सरकारही त्या प्रश्नांवर गंभीरतेने पाहायला पुढे सरसावेल....' असा विचार करून आपल्या नावाच्या वलयाचा लाभ त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देत असेल तर त्याचा तो निर्णय स्तुत्य तर मानावाच, पण त्याचे ते करणे 'पैशा'त मोजूही नय>>

अशोक जी,
पूर्ण सहमत.
किंबहुना सर्वच क्शेत्रातील वलयांकित व्यक्तिंनी अमीरचे अनुकरण करून त्यांच्या त्यांच्या प्रकृतीला अनुकूल पद्धतीने कोणत्याही त्यांना आढळणार्‍या भ्रष्ट आचाराविरुद्ध आवाज उठवला तर तसा आवाज उठवणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाना थोडे तरी बळ मिळेल.

समस्या कळलीये, तिची भयानकताही पटलीये. अमुकने काय करावं, तमुकने काय करावं हे सांगणं हा आपला अधिकारच मानतो आपण. कायदा, सरकार काहीच करत नाही करणार नाही हे पण बोलून झालं. आमिरच्या बँकबॅलन्सची चर्चा झाली. आता पुढे काय?
आपण काय करू शकतो. पत्र पाठवण्यापलिकडे काय करू शकतो?
याचा शोध घ्यायला हवा की नको?

आपण काय करू शकतो. पत्र पाठवण्यापलिकडे काय करू शकतो?
याचा शोध घ्यायला हवा की नको?

+१

आमीरची नविन मालिका आणि त्यातुन समाजजागृतीचा त्याचा प्रयत्न तसा छानच आहे. आणि त्याच्या ह्या जागृतीचा समाजमनावर पडणारा प्रभाव काय असेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या लेखावर तावातावाने चर्चा करणारे इथले विद्वान आणि आलेले शेकड्यानी आलेले प्रतिसाद हे पाहील्यावर ही चर्चा म्हणजे "बोलाचा भात आणि बोलाची कडी" याच प्रकारातले आहेत.

"बोलाचा भात आणि बोलाची कडी" याच प्रकारातले आहेत>>>>> असं मला पर्सनली वाटत नाही. कारण इथे चर्चा करून आपण मायबोली हा एक ग्रुप तयार करून, जास्तीत जास्त लोकाना अवाहन करून सरकारकडे याचिका दाखल करू शकतो. बोलाचा भात बोलाची कढी म्हणलं तर दॅट विल बी अ‍ॅन अन्डरएस्टिमेशन ऑफ अ ग्रुप युनिटी/पॉवर.

युट्युब वरून मला पाहता आला एपिसोड इकडे. प्रभावी आहे .
फक्त अमिरने जाता जाता लोकांना मुली नको , एखादातरी मुलगाच हवा असं का वाटतं यावर थोडं भाष्य करायला हवं होतं.

आपण दुसर्‍याला सल्ले देण्याव्यतिरिक्त या मनस्थितीवर ( मुलगी नको किंवा १ तरी मुलगा हवाच ) )काहीतरी करू शकतो असं वाटतं.
मुलगी म्हण्जे फक्त खर्च नव्हे तर आधार सुद्धा वाटला पाहिजे आई-वडिलांना तो ही हक्काचा. म्हातारे आई-वडिल ही मुलींचीही जबाबदारी आहे ही गोष्ट कृतीत आणता येइलच ( इथल्या स्त्रीया हे करतच असतील ).

वडिलोपार्जित संपत्तीवर पाश्चात्य देशांत असतो तसा इंहेरिटन्स टॅक्स लावावा सरकारनं, म्हण्जे खानदानचं नाव, इज्जत, संपत्ती इ. चा मोह जरा कमी होइल.

पहिल्यांदा त्या सिरियल्स मधली मुलींची अतिखर्चिक लग्न, मुलगी म्हण्जे परक्याचं धन, बेटीके घर पानी नही पिते ,खानदान की इज्जत इ. डायलॉगबाजी थांबवली पाहिजे.

"बोलाची कढी...." असले निगेटिव्ह विचार कशासाठी आपण करतो ? भयाण अंधार्‍या रात्री मशाल घेऊन कुणी एखादा येत असेल तर त्या अंधारात चाचपडणार्‍यांनी त्या दिशेने जाण्यासाठी इतरांना हाकारा केला तर ती सर्वांच्याच दृष्टीने उपयुक्त घटना होईल ना ?

आज आमीर हे एक निमित्य झाले. त्याने मशालधारकाचा बिलकुल आव आणलेला नाही, तो फक्त अंधार किती गहन आहे हेच त्या कार्यक्रमातून सांगत असून तिकडे पाठ फिरवून बसलेल्या सरकारला त्याबद्दल असलेल्या कायद्यात काही तरी ठाशीव असे करा असे आपणा सर्वांच्यावतीने सांगत आहे. त्याने फक्त नागरिकांनी वेळोवेळी तशा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दोनतीन ओळीचे पत्र पाठविण्याचे आवाहन केले आहे, जे माझ्यासारख्या कित्येकांनी त्याच रात्री केले. ही संख्या लाखांच्या घरात आहे आणि मला खात्री आहे ही असलेल्या इतक्या साधनांच्या द्वारे सरकारला तो पडद्यावर मांडत असलेल्या या असल्या अनेक प्रश्नांवर उपाय करायला भाग पाडेल.

दुसरी गोष्ट म्हणजे 'मायबोली' सारखी व्यासपीठे अशा संदर्भातील विचारांना जागा देण्यासाठीच जर निर्माण केली असतील तर इथे त्या अनुषंगाने कुणी काही विचार मांडले तर त्याला दूषण देण्यात काय हशील ?

महत्वाचे म्हणजे अशा सर्वस्पर्शी हळव्या विषयावर चर्चा करायची नाही तर मग काय केवळ इथे आयपीएलच्या तमाशावर मते मांडत बसायचे ?

अशोक पाटील

Kiran.. >> केवळ राष्ट्रीय प्रश्न असलेल्याच वाईट गोष्टी करू नयेत आणि राष्ट्रीय प्रश्न नसलेल्या कुठल्याही अनएथिकल गोष्टी केल्या तरी त्याचे काही वावगे ठरू नये आणि अश्या वाईट गोष्टी राष्ट्रीय प्रश्नाच्या स्वरूपात पुढे आप्ल्यावरच त्यांचा विचार करावा असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

तुम्हाला बहूधा माझ्या पोष्टीचा रोख कळाला नाही. थोडक्यात माझे म्हणणे असे होते की अवैध मार्गाने किंवा विनापरवानगी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग प्रसारित करणे ही पायरसी आहे. ईथे लिंक्स देणार्‍यांना ऊत्साहाच्या भरात किंवा अनावधानाने त्याचा विसर पडला असावा. म्हणूनच आपण आपली जबाबदारी ओळखून पायरसीला हातभार लागेल असे काही करू नये. हा मुद्दा आमीरने पटवून सांगितल्यास आपल्याला पटेल पण त्याआधी आपल्याला त्याची जाणीव होऊच नये असे थोडीच आहे?

फारेंड बरोबरच आहे. तो आपल्याला सजग राहून मानसिकता बदलण्यासाठी आवाहन करतोय, पण असा चोरीचा माल बघणे हे सुद्धा मानसिकता बदलण्यातच आले ना. ज्या अर्थी त्यांच्या टीमने ते विडीओ त्यांच्या साईटवर सर्वांना बघण्यासाठी खुले केले नाहीयेत तर त्यामागे त्यांची काहीतरी योजना असेल. त्यांना हवे असेल तेव्हा ते करतीलच ना त्यांचे विडीओ 'पब्लिक'. चॅनेलवर प्रसारित होतांना कार्यक्रम बघणे हे ओघाने एथिकलच आहे ना Happy . असो.

मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहिलेल्यांशी झालेल्या चर्चेतून असे कळाले की आमीर आणि टीमने अतिशय जिकिरीचा आणि प्रभावी रिसर्च केल्याचे प्रत्येक मिनिटाला दिसून येत होते.
फक्त 'स्त्री भ्रूण हत्या घडून येण्यासाठी कोणती मानसिकता आणि कुठल्या सामाजिक रूढी परंपरा कारणीभूत ठरत आहेत' ह्याचा अंदाजही त्यांना रिसर्च मधून आला असेलच तर चर्चेदरम्यान त्यांना सापडलेल्या कारणांचा ऊहापोह व्हायला हवा होता. असे.

मायबोली सत्यमेव जयते असा ग्रुप तयार करावा. प्रत्येक भागात आमीर काहीतरी आवाहन करेल. त्याला ई मेलद्वारा पाठिंबा देता येईल. त्यासाठी दोन तीन लोकांची समिती करा. ई मेल ड्राफ्ट करुन ग्रुप तर्फे संबंधिताना पाठवावा. त्या ई मेलची एक प्रत इथे सर्वाना वाचायला देता येईल

या भागाबाबत बोलायचे तर राजस्तान सरकारला सर्व केसेस एकत्रित सुनावण्यासाठी अ‍ॅ मेल लिहिता येईल.

याच भागाचा आधार घेऊन महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि राज्यपाल याना राज्यातील केसेसचा निकाल लावणे आणि संबंधिताना खरोखरच तुरुंगात धाडण्याबाबत विनंती करता येईल. कारण पेप्रात निकाल येतात. पण हे लोक खरोखरच तुरुंगात जातात का माहेत्त नाही.

तिसरा ई मेल पाठवता येईल इंडियन मेडिकल आणि महाराष्ट्र कौन्सिलला.. ज्यांचे गुन्हे शाबीत झाले त्यांच्यावर कारवाईसाठी. ( हे कितपत शक्य आहे माहीत नाही.. कारण कौन्सिल म्हणणार त्यानी राज्याचा कायदा मोडला, राज्याने त्याना शिक्षा दिली.. आता आम्ही शिक्षा पुन्हा का द्यायची? )

यांच्या प्रती स्टार आणि आमीरलाही पाठवता येतील. सिनेमासाठी माध्यम प्रायोजक म्हणून जी टीम काम करते, त्याना हे सहज जमू शकेल.

जागो मोहन प्यारे यानी मांडलेल्या वरील प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. अ‍ॅडमिन यानी त्यांच्या प्रस्तावावर होकारार्थी विचार करावा असे वाटते.

धागाकर्ते आनंदयात्री यात नक्कीच लीड घेतील.

रेणुका शहाणेचा एक कार्यक्रम यायचा त्यातही सामाजिक समस्या मांडल्या गेल्या पण ग्लॅमर अभावी त्या कदाचित लोकांपर्यंत पोहोचु शकल्या नाहीत. पुलनी म्हटल्याप्रमाणे "या जगात काय म्हटलेय यापेक्षा कोणी म्हटलेय याला जास्त महत्व आहे. थोर माणसे काही फारसे वेगळे म्हणतात असे नाही पण ती थोर असतात हे महत्वाचे." हे आमिर ओळखुन आहे आणि त्याचा स्टारडम तो चांगल्या कामासाठी वापरत आहे.
त्याचा एक समकालीन नट स्वतःतच मग्न आहे आणि स्वतःची धन कशी करायची याचा आणि याचाच विचार करताना दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आमिरचे वेगळेपण नक्कीच उठुन दिसते. जर तुलना करायचीच तर आमिरची तुलना समकालीन नटांशी करायला हवी. अण्णा हजारेंशी नाही.

इथे काही जणानी अर्थकारण मांडुन आमिरचा यात कसा स्वार्थ आहे हे म्हणायचा प्रयत्न केला आहे. स्वार्थी कोण नसते? त्याला स्वार्थी म्हणणार्‍यानी समाजासाठी काय केले आहे याची यादी करायची म्हटली तर बहुधा कोरीच राहील. उगाच त्याचा किती फायदा झाला किती पैसे मिळाले हे उकरत बसण्यापेक्षा त्याने घेतलेल्या उपक्रमाना सपोर्ट केलात तर वेळ सत्कारणी लागेल.

जा मो प्या,

आपल्याकडे व्यावसायिक लेखक आहेत. त्यांनी एक मसुदा तयार करुन इथे चर्चेसाठी ठेवला आणि आपण
प्रत्येकाने तो आपल्या नाव पत्त्यासकट योग्य त्या संस्थेकडे पाठवला तर काम होण्यासारखे आहे.

मेडिकल कौन्सिल च्या नियमातही हे बसत असेलच. तो नियम कुठला आणि कुठल्या नियमाखाली
कार्यवाही करायची ही माहिती मिळवावी लागेल.

या इमेल्सची प्रत आमिरला पाठवता येईल. सध्या विविधभारतीवर असे आव्हान केले जात आहे.
या इमेल्समधे अर्थातच मायबोलीचा उल्लेख असेल, पण इमेल मात्र प्रत्येकाने स्वतंत्रपणेच पाठवली पाहिजे.

ग्रीनपीस या सस्थेचे काम असे चालते. मी त्यांच्या प्रत्येक इमेलला प्रतिसाद देतो. याची ओळख मला
अरुंधती कुलकर्णी यांनी करुन दिली होती.

सगळ्या भागांची चर्चा एका धाग्यावर अशक्य आहे.. या धाग्याला भाग १- स्त्रीभ्रूणहत्या असे नाव द्या..

Kiran.. >> केवळ राष्ट्रीय प्रश्न असलेल्याच वाईट गोष्टी करू नयेत आणि राष्ट्रीय प्रश्न नसलेल्या कुठल्याही अनएथिकल गोष्टी केल्या तरी त्याचे काही वावगे ठरू नये आणि अश्या वाईट गोष्टी राष्ट्रीय प्रश्नाच्या स्वरूपात पुढे आप्ल्यावरच त्यांचा विचार करावा असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

@ चमन
मला तुमची पोष्ट कळाली नाही असं अजिबात नाही. पण अनएथिकल गोष्टी केल्या तर वावगे ठरू नये हे माझ्या कुठल्या पोष्टीतून किंवा वाक्यातून तुम्हाला समजले याचा खुलासा करू शकाल का प्लीज ? माझी पोस्ट अतिशय क्लिअर आहे. तुम्ही घाईत दिलेले उदाहरण आणि त्यातून जाणारा मेसेज याबद्दल मी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे. मी मत दिलेले नाही. पायरसी ही समस्या आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही काय केले आणि नसेल केले तर आमीरसारखा कुणी त्यावर काम करणार असेल तर त्याचे स्वागत कराल का हा अतिशय स्पष्ट प्रश्न आहे. पायरसीचे उदाहरण तुम्ही स्वतःच दिलेले आहे. त्या पोष्टला अनुषंगून तो प्रश्न आहे.

जामोप्या तुमचा प्रस्ताव उमदा आहे. अशोकजी आणि दिनेशदा यांची मतंही लक्षणीय आहेत.

मी एक उपसूचना करू का ? आमीरने आधीच स्पर्श केलेल्या सामाजिक समस्या आता राष्ट्रीय वाहिनीमुळे संबंधितांसहित सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यावर अ‍ॅक्शन होईलही किंवा कदाचित होणारही नाही. त्यानेच सुचवल्याप्रमाणे आपण एक एसेमेस पाठवायचा आहे. शक्य झाल्यास स्वयंसेवी संस्थेला निधी. या समस्यांना आता पंख फुटले आहेत.

आमीरने एक मार्ग दाखवला. त्याने त्याच्या हाताशी असलेलं माध्यम वापरलं. आपण आपल्या हाताशी असलेलं माध्यम वापरून (फेबु, माबो इ. इ. ) ज्या समस्या सर्वांशी संबंधित आहेत पण ज्याबद्दल उदासीनता आहे अशा समस्यांची चर्चा करू शकतो. त्यातून ड्राफ्ट बनवता येईल, कुणाला पाठवायचा, कसा पाठवायचा याचा प्लान ऑफ अ‍ॅक्शन निश्चित करता येईल. हे ठराविक अंतराने केलं तर एका समस्येला भरपूर वेळ देता येईल. ज्याला जमेल त्याने आपली स्पेशालिटी वापरली तर अधिक प्रभावीपणे हे काम करता येईल..

आमचा ई मेल गेला.

---------------------------------
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन.

विषय : स्त्रीभ्रुणहत्येविरोधात गांभिर्याने दखल घेणेबाबत

संदर्भ : देशभर प्रसारीत झालेला कार्यक्रम सत्यमेव जयते- भाग १ Daughters are precious

महोदय,

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरुन सत्यमेव जयते या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला. त्यात आपल्या देशात आणि आपल्या राज्यात होत असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने मी आपणास खालील विनंती करत आहे..

१. सामाजिक संस्थानी स्टिंग ऑपरेशन द्वारे शोधलेल्या दाव्यांचीसुनावणी जलद गतीने व्हावी.

२. गुन्हे शाबीत झालेल्या लोकाना शिक्षा सुनावल्या असतील तर त्यांची अंमलबजावणी त्वरीत करणेत यावी.

३. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. यात स्त्री भ्रूणहत्येचे समाजावरील दुष्परिणाम आणि हा गुन्हा केल्याबद्दल दिली जाणारी शिक्षा यांचा प्रामुख्याने उल्लेख असावा.

धन्यवाद.

आपला विश्वासू,

------------------------------------------------------------------------------------
http://www.sarkaritel.com/states/chief_ministers.php इथे ई मेल आय डी मिळाला. आमीर खान , सत्यमेव जयते, स्टार यांचे ई मेल मिळू शकतील का, त्याना सी सी पाठवायची आहे.

जामोप्या, विविधभारतीवर त्यांचे इमेल पत्ते सांगितले जात आहेत.
पण मसुदा हिंदीमधे भाषांतरीत करावा लागेल.
मी घरी गेल्यावर मेल करतो.

किरण >> मी विचारले 'आपण करतोय त्याला पायरसी म्हणतात आणि त्याने कुणाचे तरी नुकसान होते हे आपल्याला आमीर सांगेल तेव्हाच कळेल का?'
तुम्ही म्हणालात 'पायरसी तुम्हाला राष्ट्रीय प्रश्न वाटतो का?'

तुम्ही कधी ग्रूप डिस्कशन केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल समोरच्याच्या मुद्द्याला प्रतिसाद देतांना 'तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्यालाच पुढे जोडून मी असे म्हणेन की...' किंवा 'तुम्ही म्हणता ते मला मान्य नाही, पटलं नाही आणि माझ्या मताप्रमाणे हा मुद्दा गौण आहे....' असे...

मी म्हणतोय 'दुसर्‍याची गोष्टं विनापरवानगी तिसर्‍याला दाखवणं हे एथिकल नाही'
तुम्ही म्हणताय 'तुम्हाला हा राष्ट्रीय प्रश्न वाटतो का? तुम्ही त्यासाठी काय करता, काय केले इ....'

तुम्ही साध्या प्रश्नाच्या साध्या ऊत्तराला बगल देत प्रतिप्रश्न करत राहिल्यास चर्चा कशी होणार? त्याने फक्त प्रश्न आणि गैरसमज वाढत राहणार. तुम्हाला फक्त तुमच्या प्रश्नांची ऊत्तरे हवी होती तर पोष्टीमध्ये तशी प्रस्तावना करायला हवी होती.
असो. राहू द्यात. हे पुढे वाढवण्यात काही हशील नाही.
तुमच्या पश्नांची ऊत्तरे.

पायरसी ही राष्ट्रीय अजेंड्यावर असावी अशी समस्या आहे असं वाटतं का ?
हो! राष्ट्रीय अजेंड्याचा प्रश्न नाही. जे कायद्यला धरून नाही त्यावर कारवाई व्हावी आणि कायद्याची अंलबजावणी हा राष्ट्रीय अजेंडा होऊ शकतो. चोरी भूखंडाची असो की हक्कांची.

समजा तसं वाटत असेल तर त्यावर आपले विचार, उपाय आपण कधी कुठे मांडले आहेत का ?
संधी मिळेल तसे मांडतो. ईथेही तेच करत होतो.

जर त्यावर उपाय असेल असं वाटत असेल तर अल्प प्रमाणात का होईना कुठे काही काम केलेले आहे का ?
'हे चूक आहे' असे सभ्य भाषेत सांगणे. ज्याला जाणीव होते तो पुन्हा बघत नाही असा अनुभव आहे.

केलेले नसेल तर आमीरसारख्या प्रसिद्ध व्यक्तीने या समस्येवर काम केले तर त्याचे स्वागत कराल का ? हो नक्की.

जर उपाय नाही असेच तुमचे मत असेल तर मग कुणीही त्यावर काम केले तर दोष द्यायचा प्रश्नच राहणार नाही, नाही का ? प्रश्नार्थक चिन्ह आहे पण प्रश्न कळला नाही.

चर्चा भरकटू नये म्हणून हा पायरसीचा मुद्दा सोडून द्या. अ‍ॅडमिन काय ते बघून घेतील.

जामोप्या, धन्यवाद. इमेल केली आहे. किमान शंभरएक मेल गेल्या तरी इनबॉक्स भरून जाईल.

दरम्यान आमिर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहे.
http://www.hindustantimes.com/Entertainment/Television/Post-Satyamev-Jay...

पायरसीचा प्रश्नच नाही.. सत्यमेव जयतेच्या ऑफिशियल वेब साइटवर लिंक उपलब्ध आहे. विकिपेडियावरही यु ट्युबची आणि वेब साइटची अशा दोन्ही लिंका आहेत. http://satyamevjayate.in/

http://en.wikipedia.org/wiki/Satyamev_Jayate_(TV_show)

यु ट्युअबची लिंक सत्यमेव जयते शो यांची आहे. ती अधिकृतच आहे.

https://www.youtube.com/user/satyamevajayateshow

मुळात आमिर स्वतःला महात्मा म्हणून प्रोजेक्ट करतच नाहीये >>> अण्णा हजारेही स्वतःला महात्मा म्हणुन प्रोजेक्ट करत नाहियेत. पुर्वी त्यांना पाठींबा देणारे लोक सरकारच्या आणी नेत्यांच्या उत्क्रुष्ट राजकारणात आंधळे झाले तसे आमीरचे होउ नये असे वाटते. त्याने डायरे़क्ट सिस्टिम्वर हल्ला केला आहेच.

Pages