"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेत ते बसते का? व्यवसाय करताना प्रचलित कायदे पाळायला नकोत का?<<

मी वर लिहलेच आहे, या लोकांनी आपल्या पेशाचा धंदा करुन टाकलाय, आणि एकाद्या गोष्टीचा एकदा धंदा केला की मग कसली नीतिमत्ता आणि कसले कायदे,

>>उद्या एखाद्या श्रीमंत पेशंटच्या नातेवाइकांनी जास्त पैसे दिले म्हणून पैशासाठी त्या पेशंटच्या उपचारांत गडबड पाठवून एखाद्या डॉक्टरने त्याला मुक्ती दिली तर तो निर्दोष असेल का?<<

अजीबात नाही, पण त्या डॉक्टरला ज्या नातेवाइकांनी त्या पेशंटला मुक्ति द्यायची सुपारी दिलीय तेही ह्या गुन्हाला तितकेच जबाबदार आहेत आधी त्यांना शिक्षा व्हावी आणि मग त्या डॉक्टरला. आणि अश्या कीती डॉ़क्टरना शिक्षा वैगेर करत रहाणार आणि कुठपर्यंत, एकाद्या कोडगा आपली लाज कोळून पिऊन असे धंदे करत असेल तर त्याचे कोण काय वाकडे करणार.

डॉक्टरांचे प्रॅक्टिस करण्याचे परवाने रद्द होऊ लागले तर बाकीचे धडा घेणार नाहीत? पकडले जाण्याची, शिक्षा होण्याची भीती जितकी जास्त तितकी गैरप्रकारासाठी घेतली जाणारी किंमत जास्त होईल.

इथे लोक फार भावनीक होऊन त्यांचे विचार मांडताना दिसतात, मानसिकता डॉक्टरानेच का बदलावी, समाजाने का नको, जेंव्हा समाजाची मानसिकता बदलेल आणि डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर गर्भपात करुन घेणारी पब्लिकच नसेल तेंव्हा हे असले प्रकार आपोआप थांबलेले दिसेल. जसे वर सती प्रथेविषयी डेलीया यांनी लिहले आहे.>>>>>>>

समाजाची मानसिकता बदलावी हे तर सर्वच म्हणत आहे आणी ती बदलण्याची गरज आहेच. पण डॉक्टरांनी त्यांची मानसिकता बदलावी असे म्हणले तर त्यात चुकीचे काय आहे ? आणी त्यात भावनिक काय आहे ? ज्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले, ज्यांना मनुष्य देह म्हणजे काय हे नीट समजले आहे त्यांनी स्त्री- पुरुष हा भेदाभेद करुन स्त्री भ्रुण हत्या करावी हे नक्किच घ्रुणास्पद आहे. आणी जर एवढे शिकलेले डॉक्टर जर स्वतःची मानसिकताअ बदलत नसतील तर अडाणी माणसांकडुन काय अपेक्षा करणार ?

आणी शेवटी -- डॉक्टर हा देखील समाजाचाच , पब्लिकचाच भाग आहे मग त्यांनी मानसिकता बदलावी असे म्हणले तर ते मान्य करण्यात एवढी अडचण का आहे आंगे साहेब ?

पुण्याच्या १५ डॉक्टरांची नोंदणी रद्द?

डॉ. अनुराधा संत, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. एन. सी. आंबेडकर, डॉ. लक्ष्मीकांत शहा, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस. एम. हडीर्कर, डॉ. एम. एच. शेठ, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. विलास गायकवाड, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अनुराधा केळकर, डॉ. गणेश गाडगीळ, डॉ. अरविंद कुलकणीर् (सर्व पुणे) आणि डॉ. मोहन नागणे (पिंपरी चिंचवड) या पुण्यातील पंधरा डॉक्टरांच्या विरोधातही व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे शिफारस करण्यात आली आहे.

लिंबुभाऊ, यातली बहुतेक डॉक्टर एका विशिष्ट ज्ञातीतील आहेत.. हे ब्रिगेडींचे कारस्थान तर नसेल ना??? Proud

-आ.न.
कमला सोनटक्के

मित्रांनो

पाच भाग झाले या मालिकेचे. एका रात्रीत क्रांती वगैरे असं उद्दिष्ट तर नक्कीच नसावं या शो चं. प्लीजच इथे धंदा वगैरे बद्दल चर्चा नको. तो मुद्दा निकालात निघालेला आहे. या पाच भागात काही समानता आहे का ? स्वतंत्रपणे एपिसोडस पाहीले तर नव्याने हा मुद्दा मांडला जातोय असं नाही. मग एखादी थीम घेऊन हा शो चालला आहे का ?

पहिला भाग स्त्री भ्रूण हत्येचा. बळी आहे ते असहाय्य भ्रूण. ज्याला आपल्या हक्कांबद्दल तर सोडाच मारेक-यांबद्दलही काही माहिती नाही. मारेकरी आहेत आईवडील. आणि सुपारी घेताहेत डॉक्टर्स. स्त्री भ्रूण हत्याच का ? याच आढावा घेताना मुद्दा येतो तो अस्तित्वात असलेल्या परंपरा आणि सामाजिक रूढींचा. मुलीला जन्म देण्यापेक्षा गर्भातच मारली असती तर बरं झालं असतं हे बोलून दाखवलं जायचं त्याला विज्ञानाची साथ मिळाली आणि ते बोल प्रत्यक्षात खरे झाले.

स्त्री च्या जन्माची ही दैना जाणवली पहिल्या भागात आणि कारणं दिसली दुस-या भागात. लग्नावरचा खर्च, त्यानंतरची परवड. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हे दाखवणारा हा एपिसोड पहिल्या भागाचं उत्तर देऊन गेला.

परंपरा हे एक उत्तर तर आहेच. पण समाजाची अधोगती शिक्षणाने रोखली जायला हवी तसं न होता उच्चशिक्षित डॉक्टर्सच कसायाचं काम करताना दिसले. आणि मग त्या मानसिकतेचा वेध घेतला गेला डॉक्टरांच्या एपिसोडमधे.

एकीकडे लग्न हा असा धंदा बनत असतान प्रेमविवाह करणे हे उत्तर असू शकतं. पण भारतात ते ही सोपं नाही हे दाखवून देणारा पाचवा भाग होता. एकातून दुसरा , दुस-यातून तिसरा, हे सगळे भाग एकात एक गुंफले गेले आहेत आणि फक्त सदसदविवेकबुद्धीला आवाहन करताहेत. विवेक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घटनेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि रूढी परंपरांपेक्षाही. आजची उच्चसिक्षित पिढी सुशिक्षित आहे का असा विचार करायला लावणारी ही मालिका आहे.

न्युलीअर फॅमिलीच्या जमान्यात आजचा माणूस समाजापासून तुटत असताना सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल फॉर अ चेंज म्हणून विचार व्हावा हे माफक उद्देश असायला हरकत नाही. असा फोरम नाहीच ना कुठे !

प्रत्येक एपिसोडनंतर चर्चा चालूच आहेत . फक्त मायबोलीवर नाही तर, कार्यालयात. कॉलेजकट्ट्यावर, सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांमधे, दुपारच्या महिलाष्टकांत.. सगळीकडेच.
काही असो, समाजाचं रूप समोर येतंय. महाराष्ट्रात भ्रूण हत्यांविरोधात धडक कारवाई चालू आहे, राजस्थानात जीवनदायिनी योजना चालू आहे, काही आदर्श उदाहरण समोर येत आहेत. त्याच वेळी निषेध, बहिष्काराच्या धमक्या हे समोर येतंय. डॉक्टरांवरच्या एपिसोडमुळे अत्यानंद होणंही समोर येतंय तर डॉक्टरांचा अनाकलनीय बहिष्कारही. त्या वेळी खूष असणारे काही लोक ज्या वेळी आपल्या समाजाच्या पंचायतींविरुद्ध एपिसोड आला त्या वेळी नाराज झाले. दुस-याची फजिती ती आपली करमणूक. या निमित्ताने समाजाने यावरही विचार केला पाहीजे. एकीकडे विजन २०२० डोक्यावर घेऊन तरुण पिढी नाचतेय त्याच वेळी समाजाचे काही ठेकेदार चर्चाही घडू देत नाहीत. विरोधी विचार मांडू देत नाहीत हे समोर येतंय. पण ,आपणही या सर्वांचा भाग असू कदाचित. प्रत्येक गोष्ट दुस-यावर नेउन ठेवलं कि संपलं असं नको आता. सध्या राजकारणी हे असेच नारळ फोडायचे दगड झालेत. ही संधी आहे बदल घडवायची.

मात्र, तेरा भागानंतर सगळं थंड होईल कदाचित . मग या विचारमंथनाचं काय ? पुढे स्टार प्लस, आमीर खान काय करणार आहेत ? त्यांनी काही केलं तरच आपण चर्चा करायच्या का ? कि मग पुन्हा सत्यमेव जयतेची वाट बघत बसायचं ?

परदेशी राहणा-यांच्या बोलण्यात, लिखाणात विचार स्वातंत्र्याचा आदर, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर या बद्दल खूप काही येतं. अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने ही प्रगल्भता आली असावी ? एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय आपण ?

खूप छान समरी!

सदसदविवेकबुद्धी म्हणजे ज्याला हिंदी/उर्दूत जमीर आणि इंग्रजीत Conscience अस संबोधल जात.. ती प्रत्येकाकडे असते मात्र तिला वारंवार aacess आणि cultivate करायला लागत. आयुष्यात जे काही सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपली सदसदविवेकबुद्धी आकार घेते, प्रगल्भ होते. यालाच माणूस घडवणे म्हणतात. संस्कार, आचार, विचार, वाचन, चिंतन, मनन, कार्य ह्या सर्वातून आपण घड्त असतो. आणि अश्या घडलेल्या माणसांचा समाज सुसंस्कृत असतो. सुशिक्षित म्हणजे फक्त डिग्र्या असा गैरसमज लोकांचा असतो.

परदेशी राहणा-यांच्या बोलण्यात, लिखाणात विचार स्वातंत्र्याचा आदर, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर या बद्दल खूप काही येतं. अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने ही प्रगल्भता आली असावी ? एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय आपण ?

स्वत:च्या सदसदविवेकबुद्धिशी संवाद करणे हा एक उपाय असू शकतो. अंतर-बाह्य बदलण्याकरता आपल्या सदसदविवेकबुद्धिला हात घालणे खूप महत्वाचे आहे. आणि परदेशी समाजात जी सामाजिक प्रगल्भता आहे ती त्यांची जगायची संस्कृती/सहजता आहे. लहानपणा पासून झालेले संस्कार आणि शिकवलेल्या गोष्टी तुमच्या व्यक्तीमत्वाचा भाग होउन जातात. वैयक्तिक प्रगल्भतेबद्दल आमच्या इथे तरी खूप उजेड आहे.

किरण छान आढावा घेतलात.
<परदेशी राहणा-यांच्या बोलण्यात, लिखाणात विचार स्वातंत्र्याचा आदर, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर या बद्दल खूप काही येतं. अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने ही प्रगल्भता आली असावी ? एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय आपण ?>

'आपल्या' कुटुंब/समाज/ह/ळ/क्ष यांपासून दूर राहिले की स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. ते स्वतः निभावून नेण्याची जबाबदारी अंगावर पडते. 'लोक काय म्हणतील'चा पडदा प्रत्येक निर्णयाच्या पार्श्वभूमीला नसतो. साहजिकच
मला जे स्वातंत्र्य मिळतंय त्याचे कारण दुसरे कोणी त्याची मते माझ्यावर लादत नाही. त्यामुळे मीही माझी मते त्यांच्यावर लादणार नाही, असा साक्षात्कार होत असावा.
मोकळा श्वास घेता आला की साहजिकच नाक डर्टी रहात नाही.

हा सगळा निव्वळ तर्क. अनुभवी मंडळींनी बरोबर आहे के ते सांगावे.

'लोक काय म्हणतील'चा पडदा प्रत्येक निर्णयाच्या पार्श्वभूमीला नसतो.>>> हे तर आहेच पण त्याचबरोबर मानवी आयुष्याची किंमत जास्त केली जाते, कदाचित दोन्ही महायुद्धात जवळजवळ लागोपाठच्या पिढीने अनुभवलेला नरसंहार कारण असेल.

'आपल्या' कुटुंब/समाज/ह/ळ/क्ष यांपासून दूर राहिले की स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. ते स्वतः निभावून नेण्याची जबाबदारी अंगावर पडते. 'लोक काय म्हणतील'चा पडदा प्रत्येक निर्णयाच्या पार्श्वभूमीला नसतो.

@भरतः You hit the nail on head!

मी अमेरिकेत शिकायला आले आणि पहिल्या सेमेस्टर मध्ये खाडकन जबाबदार झाले. चॉईसच नव्हता. स्कॉलरशिप टिकवण्याकरता दात्-ओठ खाऊन GPA टिकवायचा, आपले कपडे आपणच धुवायचे, अपली ग्रोसरी आपणच करायची (गाडी नसल्याने बर्फ तुडवत), आपल जेवण आपणच करायच,संडास-बाथरूम क्लीन करायच...हे काय आहे??? रडले होते मी. मग मात्र आयुष्यातला हा बदल अंगी भिनला!

आई कडे राहून, काडिमात्र जबाबदारी न घेउन, मिळवलेले फर्स्ट क्लास आता अजिबात खास वाटत नाहीत. पहिल बाळ कॉलेजात चालयय आणि वयाच्या सतराव्या वर्षी असलेली तिची मच्युरिटी, निर्णयक्षमता बघून बर वाटतय! अजून वाढेल अशी अपेक्षा...नाही खात्री आहे!

<< समाजाची मानसिकता बदलावी हे तर सर्वच म्हणत आहे आणी ती बदलण्याची गरज आहेच. पण डॉक्टरांनी त्यांची मानसिकता बदलावी असे म्हणले तर त्यात चुकीचे काय आहे ? आणी त्यात भावनिक काय आहे ? ज्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले, ज्यांना मनुष्य देह म्हणजे काय हे नीट समजले आहे त्यांनी स्त्री- पुरुष हा भेदाभेद करुन स्त्री भ्रुण हत्या करावी हे नक्किच घ्रुणास्पद आहे. आणी जर एवढे शिकलेले डॉक्टर जर स्वतःची मानसिकताअ बदलत नसतील तर अडाणी माणसांकडुन काय अपेक्षा करणार ?>>

मस्त ! अनुमोदन भरतजी.

किरण, छान पोस्ट.

हा धागा नंतर निवांत पहिल्या पानापासून वाचून काढेन.

मास्तुरेंनी लिन्क दिलेला लेख आवडला. दोन्ही बाजू चांगल्या मांडल्या आहेत.

विशेष आवडलेली वाक्ये...:)

<< प्रथमच हे स्पष्ट करतो की, मी एक वैद्यकीय व्यावसायिक असल्याने माझ्यासकट माझ्या बांधवांचा नालायकपणा अगदी जवळून पाहिला आहे. मला हा नीचपणा अधिक शास्त्रशुद्ध असा समजतो आणि खटकतोही. त्यामुळे कोणाचे समर्थन किंवा कोणावर टीका हा या लेखनाचा हेतू नाही, पण म्हणून विषयाला घाबरत-घाबरत स्पर्श करणे किंवा लपून छपून बाजू मांडणे हेही करण्याचे कारण नाही.>>

<< अर्थात सर्वत्र सर्वच निराशाजनक आहे, असे कधीच नसते. बंद पडलेले घडय़ाळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते. आशेची बेटे आहेत आणि वाढताहेत. फक्त कारवाईच्या नादात या बेटांना बेचिराख करू नका, एवढेच सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच!>>

.

Pages