"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान.

भडकपणे चित्रित केलेल्या रियालिटी शोंच्या वाळवंटात एखादे (आशयाच्या दृष्टीने) समृद्ध ओअ‍ॅसिस सापडावे तसे हा एपिसोड पाहून वाटले. गंभीर विषयावरील इतक्या उच्च दर्जाचे सादरीकरण फार क्वचितच पाहायला मिळते.
अशोक आणि ज्ञानेश यांनी दिलेल्या माहितीबद्द्ल धन्यवाद!
मी टीव्हीवर पाहू शकलो नव्हतो पण अशोक यांनी दिलेल्या लिंकवर पाहिले आणि हे लिहिले. आता रात्री दहा वाजता पुन:प्रसारणही पाहाणार आहेच.
'पुरुषाच्या स्पर्मवरून मुलगा की मुलगी ठरते ' असे आमीरने म्हटले असे मला वाटते. त्याने पुरुषाची चूक असते असे म्हटलेले ऐकले नाही.

मलापण कार्यक्रम आवडला. ओपराच्या शो सारखा वाटला. पण इथे स्लो मोशन वगैरे नसल्यामुळे जास्त भिडला. सहभागी स्त्रियाही खूप संयमी आणि परीपक्वपणे वागल्या. क्रिस्प एडीटींगचा परिणाम?

चिरैय्या गाणं जबरदस्त आवडलं. पुढच्या भागांमधे काय विषय असती याची उत्सुकता लागलीय.

भडक रियालिटी शोज, विश्वास ठेवण्याच्या, बुद्धीच्या आणि कल्पनेच्या पलिकडच्या मालिकांपेक्षा असा कार्यक्रम बघायला आवडला.

पहिला भाग आवडला . कार्यक्रमाविषयी उत्सुकता होतीच , अपेक्षेप्रमाणे चांगलाच आहे.
ते दोषी डॉ. प्रमोशन वगैरे मिळवुन अजुनही काम करताहेत , आश्चर्य वाटले . कमीतकमी केस चालुच असल्याने त्यांना सस्पेंड तरी करायलाच हवे .

अत्यंत संयत सादरीकरण, कार्यक्रमात सहभागी स्त्रियांच्या कहाण्या बघताना अश्रू आवरले नाहीत. बाईच बाईची शत्रू होते म्हणतात ते काही खोट नाही.

मुलगी नको पण का नको? नको म्हणणार्यांच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकायला हवा होता. मध्यंतरी आमच्याकडे टी.वी दुरुस्त करायला माणूस आला होता. त्याच्या भावाला जुळ्या मुली झाल्या. आता त्यांची लग्न लावताना आणि सासरच्यांच्या मागण्या पुऱ्या करताना भावाचं कंबरद मोडेल अशी त्याची प्रतिक्रिया होती. आत्तापासून पैसे जमवायला लागणार असं त्याला वाटत होत ( मुली १ महिन्याच्या होत्या तेव्हापासून). आमच्यापरीने आम्ही त्याला सांगायचा प्रयत्न केला कि मुली हल्ली खूप शिकतात,मोठ्या हुद्द्यावर काम करतात. हुंडा देन घेण कायद्याने बंद आहे, पण ताई आमच्या समाजात तुमच्यासारख नाही असच म्हणत होता.

सुशिक्षित सुसंस्कृत लोकांनाही एंक तरी मुलगा हवा असतो. अमेरिकेमध्ये गर्भाच लिंग आधीच कळू शकत. माझ्या मैत्रिणीला ती प्रेग्नंट असताना एका ओळखीच्या बाईने सरळ विचारलं कि मुलगा आहे कि मुलगी? माझ्या मैत्रिणीने सांगितलं कि आम्ही लिंग परीक्षा केली नाही, त्यावर त्या बाईची प्रतिक्रिया होती ,' नक्की मुलगीच असणार, म्हणूनच सांगत नाहीयेत." आम्ही अवाक, काय बोलाव ते कळेना.

आजचा कार्यक्रम बघितला आणि या गोष्टी आठवल्या. थोडीशी भीतीही वाटली. आई बाबांनी मुली तळहातावरच्या फोडसारख्या वाढवायच्या, जपायच्या आणि जर लग्नानंतर असे लोक भेटले तर?????

अमेरीकेत तो यु ट्युबवरचा व्हिडीओ enable केलेला नाहीये स्टारप्लसने Sad
त्यांना कोणीतरी विनंती करायला हवी भारताबाहेरच्या प्रेक्षकांना पण तो व्हिडीओ बघू द्या म्हणून.
आमीरच्या या कार्यक्रमाबद्दल खूप उत्सुकता आहे.

मला बघायची खुप उत्सुकता होती. यू ट्यूबमूळे बघायला मिळाला. पहिला भाग तरी अपेक्षेला पुर्णपणे
उतरला. पुढच्या भागाची वाट बघतोय.

रुनी,
ईथे दिसतोय, खाली दिलेल्या लींक वर बघ

पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

रुनी मलाही दिसत होता. पण लॅप टॉपची बॅटरी संपल्याने अर्धाच बघितला. ह्रुदयस्पर्शी कार्य्क्रम! अश्रु आवरले नाहीत! आणी हे सगळं सरकारकडूण सुरु झाल्याच ऐकुन संताप अनावर झाला.

नि:शब्द झाले. भिती वाटली परिस्थितीची.
कार्यक्रम संयत.
अजुन काहीच बोलता येत नाहिये आत्ता. शॉक मधून बाहेर यायलावेळ लागेल थोडा.

मीपुणेकर,
पर्यायी दुवे दिल्याबद्दल धन्यवाद गं. दुवे चालताहेत हे तपासले, आता निवांतपणे बघते.

या देशात लाखात एखादा माणुस असतो, बाकीची रानटी जनावरे आहेत. असले चांगले रीएलीटी शोज बघुनही न सुधारणारी औलाद आहे ईथली.

<हे सगळं सरकारकडूण सुरु झाल्याच ऐकुन संताप अनावर झाला>
गर्भलिंगनिदानाचिकित्संची सुरुवात सरकारने नव्हे तर सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी सुरू केली.(ही माहिती आजच्या कार्यक्रमातून मिळाली). मुळात गर्भजलपरीक्षा येऊ घातलेल्या अपत्यात काही जन्मजात दोष नाहीत ना हे पाहण्यासाठी केली जाते. त्यातच भ्रुणाचे लिंगही कळू शकते हे कळल्यावर त्या परीक्षेचा गैरफायदा घेतला जाऊ लागला.
कुटुंबनियोजनासाठी स्त्रीभ्रूणहत्या असे शासकीय धोरण कधीही नव्हते.

लिंकसाठी थँक्स मीपुणेकर ,
खुप आवडला कार्यक्रम , धन्यवाद आमीर , असेच कार्यक्रम येत राहीले तर त्या टिपीकल मानसिकतेत बराच फरक पडु शकेल.

सकाळी हुकला होता कार्यक्रम. आत्ता पुन्हा दाखवत आहेत. पाहताना पहिला विचार येतो तो म्हणजे हे सगळे उघडपणे सांगणार्‍या स्त्रियांची यापुढची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांना या कार्यक्रमात बोलते करणार्‍या लोकांनी त्याची थोडीफार जबाबदारी घेतली पाहिजे.

Pages