योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.
जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..
आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...
पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3
पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm
पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4
पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg
अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
नाही दिसत प्राजक्ता
नाही दिसत प्राजक्ता
गंमत म्हणजे बायकांच्या
गंमत म्हणजे बायकांच्या कपड्यावरून संस्कृति लयाला चाललीये म्हणुन दंगाधोपा करणारे संस्कृतिरक्षक याबाबतीत गप्प बसतात. या प्रश्नामुळे तर संस्कृति कधीच लयाला गेलीये.
आदिवासी पेक्षा मागसलेला आपला समाज झालाय.
बायकांना स्वतंत्र्य मिळाल्याने कुटुम्बव्यवस्थ अडचणीत आलीये असे म्हणणार्यांचे डोळे या कार्यक्रमाने उघडले तरी खूप झाले.
नाही दिसत
नाही दिसत प्राजक्ता>>>>आदिति.... प्राजक्ताने सांगितलेल्या लिंक मध्ये http://sabserial.com/2012/05/satyamev-jayate-6th-may-2012/ Novamov ची लिंक अजुनही दिसते आहे.
http://www.tellytube.in/2012/
http://www.tellytube.in/2012/05/satyamev-jayate-episode-1-6th-may-2012-v...
इथे दिसत आहे आत्ता सुद्धा.
काहीही विशेष होणार नाही..
काहीही विशेष होणार नाही.. कायदा आहे, मोडला जातो दररोज दर सेकंदाला... बायकांना भोगायला लागतंय पण बायका चुप बसतात.. पुरुषाना कळतंय पण पुरुष 'षंढ' झालेत.. एक दोन डॉक्टराना शिक्षा होईल दाखविण्यापुरती आणि परत येरे माझ्या... !!
मस्त टी.आर. पी. वर आमिरखान भरपूर पैसे ओढेल.. आणि परत त्याच्या यशावरचे 'लोणी' ओरपणारे कावळे आहेतच!
असली कृत्ये करणारा मग तो पुरुष, स्त्री कोणीही असो, साल्याना सुळावर चढवले पाहिजेत!
दोन्ही लिंकमधले विडिओ आता
दोन्ही लिंकमधले विडिओ आता दिसत नाहीयेत.
माझ्याकडे दिसतंय मी दिलेल्या
माझ्याकडे दिसतंय मी दिलेल्या लिंकमधलं.
निराशाजनक प्रतिक्रिया येणारच.
निराशाजनक प्रतिक्रिया येणारच. फक्त त्या ठराविक अंतराने आणि वेगवेगळ्या नावाने पण समान शैलीत येताहेत हे मनोरंजक आहे. यावरून पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा एक जोक आठवला.
( कुस्तीचे आखाडे बंद आहेत का सध्या ? कुस्तीगीर दिसत नाहीत .. ;))
मवा, आधी दिसलं नाही पण मग
मवा, आधी दिसलं नाही पण मग बघता आलं. थॅन्क्स
सत्यमेवजयतेच्या वेबसाइटवर
सत्यमेवजयतेच्या वेबसाइटवर (http://www.satyamevjayte.in/) कमेंट सेक्शनमध्ये मी त्यांना लिहून आले आहे. स्टारप्लसने जे व्हिडीओ युट्यूबवर टाकले आहेत ते जगात सगळीकडे दिसू द्या म्हणून. जर दखल घेतली गेली तर चांगलेच आहे. इतरांना शक्य असेल तर त्यांनीही जावून कमेंट लिहून या म्हणजे ऑफिशिअल व्हिडीओज बघायला मिळतील.
चला , मायबोलीकरांनी प्रचंड
चला , मायबोलीकरांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले आमीरचे. प्रतिक्रिया वाचून छान वाटले. मात्र आमीरची आणि त्याच्या या कार्यक्रमाची तुलना अण्णा हजारे किंवा इतर कुणाशी करणे खटकले.
१. आमीरने कधीही आपण देशासाठी सिनेमात काम करत असल्याचा दावा केलेला नाही. त्याने कायम आपण व्यावसायिक असल्याचेच दर्शवले आहे जे देशातील प्रत्येकाला माहीत आहे. पण एक सर्वसाधारण नागरिक म्हणून तो आपली लोकप्रियता चांगल्या कामासाठी वापरतो आहे ज्याचं स्वागत करायला काय हरकत आहे ? एक लक्षात घ्यायला हवं, या मालिकेसाठी दिलेला वेळ त्याने इतरत्र दिला असता तर त्याला कोट्यवधी रूपये मिळाले असते. जाहीरातीसाठी तर सेकंदाच्या रेटने पैसे मिळतात.
२. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने कोणताही मुखवटा धारण केलेला नाही जो "येकही मारा ?" सारख्या ओरखड्यांनी फाटून निघावा.
३. कुठलाही राजकिय अजेंडा दिसून येत नाही. कुणाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले जात नाही. स्वतः न्यायाधीश असल्याचा आव आणलेला दिसून आला नाही. राजस्थान सरकारला देखील विनंती केली जाणार आहे जी मान्य करायला हरकत नसावी.
४. सरकारला अडचणीत आणणे, कुणाला चोर म्हणणे, जथ्ये जमवणे, झुंडींना आदेश देणे असे प्रकार या व्यासपीठाच्या माध्यमातून होतील असे वाटत नाही. मी म्हणतो तेच सत्य, मी म्हणजे देश असा आव किमान पहिल्या भागात तरी आणलेला नाही. पुढे असं काही झालं तर निषेध नोंदवणारा मी पहिला असेन. पण अर्थातच हे एपिसोडस आधीच तयार झालेले असल्याने यश डोक्यात जाऊन पुढच्या भागात परिणाम दिसून येईल असं वाटत नाही. एरव्हीही अण्णांपेक्षा आमीर कितीतरी प्रगल्भ आहे असं वाटतं.
५. राहता राहिला वाद शीर्षक गीताचा... तर तो वाद दुर्दैवी असला तरी पलाश नामक गायक-संगीतकाराला न्याय मिळावा असं वाटतं. पलाशच्या प्रतिक्रियांवरून हा वाद समंजसपणे संपेल असं वाटतं. त्याचा आक्षेप कोरस वर आहे जो योग्य वाटतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार चांगल्या कामासाठी पैसे न घेता त्याने हे गीत दिलं असतं. फक्त परवानगी न घेता काही भाग कॉपी केल्याने आणि श्रेय हिरावून घेण्याने तो दुखावला गेला आहे. अर्थात यात आमीर किंवा स्टार प्लसची चूक आहे असं वाटत नाही. कायदेशीर जबाबदारी नक्कीच आहे. मात्र, त्यांनी ज्या संगीतकाराला हे गीत बनवायला सांगितले त्याने हा वाद सोडवायला हवा.
६. हा कार्यक्रम पाहताना समस्येकडे लक्ष वेधून घेणे हा त्याचा हेतू असल्याचे जाणवते. देशाची विचार करण्याची पद्धत बदलेल याला शंभर टक्के यश मिळणार नाही हे मान्य, मात्र समस्या आहेत आणि त्याबद्दलची झापडं उघडण्याचं काम होईल यात शंका नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आहोत तेच राहून पाठिंबा दिल्यास त्या त्या समस्येचं निराकरण होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. दर शुक्रवारी रात्री आठ वाजता याचा आढावा स्टार न्यूज वर आमीर स्वतः घेणार आहे.
नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. तो हक्कच आहे. फक्त त्यातून काही शिकता यावं, त्रुटी दाखवल्या जाव्यात ही अपेक्षा आहे. बिनडोक प्रतिक्रियांना ( कितीही नावांनी दिल्या तरी ) त्यांची जागा दाखवण्यात यावी असं वाटतं.
सगळी सिस्टीमच सडली आहे , मी
सगळी सिस्टीमच सडली आहे , मी एकट्याने करुन काय होणार ? ह्या मानसीकतेने विचार करणार्यांकरिता -
नसीरुद्दीन शाह असलेली एक लहान फिल्म बघीतली होती . तित १ मुलगा समुद्रकिनार्यावर लाटेने वाहून आलेले मासे परत समुद्रात टाकत असतो . तु एकटा किती वाचवशील ? असे विचारल्यावर मला शक्य आहे तितके तर वाचवू शकतो नां , असे उत्तर तो लहान मुलगा देतो.
Let's be optimistic. फरक पडतोच , प्रतिक्रियांवरुनच जाणवतेय की आपण सगळेच किती हललोय ते.
ऊद्या आमीर खानने पायरसीवर
ऊद्या आमीर खानने पायरसीवर एपिसोड केल्यानंतर आणि त्यात पायरसीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत होरपळलेल्यांच्या मुलाखती दाखवल्यानंतर ईथे ईकडून तिकडून लिंक्स देणे बंद होईल का?
की ईथे दिलेल्या लिंक्स कार्यक्रमाच्या पायरेटेड वर्जनच्या नाहीयेत? तसे असेल तर काही म्हणणे नाही.
धन्यवाद रूनी!! मी सुद्धा तिथे जाऊन विडीओ ऊपलब्ध करून देण्याबद्दल लिहून आलो.
बाकी चालू द्या.
ऊद्या आमीर खानने पायरसीवर
ऊद्या आमीर खानने पायरसीवर एपिसोड केल्यानंतर आणि त्यात पायरसीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत होरपळलेल्यांच्या मुलाखती दाखवल्यानंतर ईथे ईकडून तिकडून लिंक्स देणे बंद होईल का?>>> हो. असं काही प्रमाणात तरी होऊ शकेल.
ऊद्या आमीर खानने पायरसीवर
ऊद्या आमीर खानने पायरसीवर एपिसोड केल्यानंतर आणि त्यात पायरसीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत होरपळलेल्यांच्या मुलाखती दाखवल्यानंतर ईथे ईकडून तिकडून लिंक्स देणे बंद होईल का?
पायरसी ही राष्ट्रीय अजेंड्यावर असावी अशी समस्या आहे असं वाटतं का ? समजा तसं वाटत असेल तर त्यावर आपले विचार, उपाय आपण कधी कुठे मांडले आहेत का ? जर त्यावर उपाय असेल असं वाटत असेल तर अल्प प्रमाणात का होईना कुठे काही काम केलेले आहे का ? केलेले नसेल तर आमीरसारख्या प्रसिद्ध व्यक्तीने या समस्येवर काम केले तर त्याचे स्वागत कराल का ?
जर उपाय नाही असेच तुमचे मत असेल तर मग कुणीही त्यावर काम केले तर दोष द्यायचा प्रश्नच राहणार नाही, नाही का ?
# अमेरिकेत बसून सुद्धा ही
# अमेरिकेत बसून सुद्धा ही मालिका बघता येते.
माझ्या एका मित्राने त्याच्या आईला वेबकॅम तू-नळी समोर ठेव म्हणून अख्खी मालिका पाहिली. तसे तुम्हालाही करता येईल.
# माझ्यामते हा विषय कित्येक दशके जुना झाला आहे. आत्ता अमिरने लोकांना जागवले असे मुळीच वाटत नाही. तो लोकप्रिय माणूस आहे म्हणून त्याची उपेक्षा होत नाही. कित्येक साहित्यकारांनी आणि चित्रपटांनी हा विषय पुर्वी जगासमोर आणलेला आहे. मग आत्ताच ह्यात नाविन्य ते काय मला कळले नाही?
चमन, निदान येथे लोक मिळेल
चमन, निदान येथे लोक मिळेल त्या लिन्कवरून तो एपिसोड पाहायचा प्रयत्न करत आहेत ते त्या सिरीज बद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाल्यामुळे. पायरसी हा येथे मला दुय्यम मुद्दा वाटतो, कारण मुळात भारतातही आम्ही तो विकत काही आणून पाहिला नाही. सर्वांकडे (केबल असलेल्यांकडे) जे चॅनेल दिसत होते त्यावरच आपोआप दिसला. सिरीज वाल्यांनी तो नेटवर सर्वत्र उपलब्ध करून द्यावा.
पायरसीला माझा विरोधच आहे. आपण पायरेटेड गोष्टी पाहतो हे लक्षात आल्यावर आम्ही कटाक्षाने तशा डीव्हीडीज पाहणे, नेटवरून कोठूनही डाउन्लोड करून पिक्चर पाहणे हे प्रकार बंद केले. मी ज्याच्याकडून डीव्हीडी आणतो तेथे "ओरिजिनल" येइपर्यंत थांबतो.
पायरसी ही या एपिसोड मधल्या प्रश्नाएवढी नाही पण स्वतंत्रपणे विचार केला तर गंभीर समस्या आहे असे माझे मत आहे. विशेषतः मराठी चित्रपट व्यवसायाकरिता. पण ती चर्चा येथे अवांतर होईल. दुसरीकडे बोलू.
पोस्टचे काम झाल्याने काढली
पोस्टचे काम झाल्याने काढली आहे.
# माझ्यामते हा विषय कित्येक
# माझ्यामते हा विषय कित्येक दशके जुना झाला आहे. आत्ता अमिरने लोकांना जागवले असे मुळीच वाटत नाही. तो लोकप्रिय माणूस आहे म्हणून त्याची उपेक्षा होत नाही. कित्येक साहित्यकारांनी आणि चित्रपटांनी हा विषय पुर्वी जगासमोर आणलेला आहे. मग आत्ताच ह्यात नाविन्य ते काय मला कळले नाही?
------ या आधी पण हा विषय कित्येकांनी विविध मार्गांनी/ माध्यमांनी जनते समोर आणला असेल... पण म्हणुन अमिरखानाच्या कामाचे महत्व कमी होत नाही कारण... विषय अजुनही ज्वलंत आहे किंबहुना त्याचे गांभिर्य अजुनच वाढलेले आहे.
आमीरखान हा नक्कीच कधी धडपड्या
आमीरखान हा नक्कीच कधी धडपड्या वा उमेदवारी करू लागलेला अभिनेता नव्हता. त्याच्या घरातील अगोदरच्या पिढ्यातील मंडळी चित्रपटसृष्टीत पक्के पाय रुजवून बसले असल्याने त्याला 'पैशासाठी वा कामासाठी' कुठे जावे लागेल याची सुतराम शक्यता नव्हती/नाही. साहजिकच सिने जगतात पाऊल टाकल्याक्षणापासून त्याने आपली वेगळी ईमेज तयार केली आणि पडद्याशिवायही तो सामाजिक प्रश्नाच्या निमित्ताने आपली लोकप्रियता उपयोगात आणू पाहात असेल तर त्यामागे काही अर्थकारण (च) असेल असे मानणे म्हणजे तो मांडत असलेल्या समस्या दुय्यम समजणे असे होईल. गेली काही वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर तीन खान असले तरी रुट लेव्हलला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा विचार फक्त आमीरनेच करून दाखविला आणि तेही कोणताही आव न आणता. पहिल्या भागात त्याने स्पष्टच कबुली दिली आहे की आपण कायदा करू शकत नाही वा कायद्याची अंमलबजावणीही...ते काम शासनाचे. फक्त त्यासाठी एक नागरिक या नात्याने 'विनंती' मात्र जरूर करू शकतो आणि ती मी करीन, तुम्ही फक्त साथ द्या....हे आवाहन.
ही भूमिका स्वागतार्ह आहेच आहे.
आता इथल्या या धाग्यावर त्याला मिळणार्या पैशाबद्दल [मानधन नव्हे, फी] उलटसुलट चर्चा होत आहे. टीव्ही चॅनेल्स हा एक रजिस्टर्ड असा व्यवसाय आहे आणि जगभर तो पैशाच्या प्रवाहातच चालत आहे. ऑप्राशी आमीरची या निमित्ताने चर्चा झाल्याचे वर दिसतेच. पण मग ऑप्रा काय केवळ भाजीभाकरीच्या मोबदल्यात ते कार्यक्रम करीत असते का ? रुपर्ट मरडोकच्या 'स्टार' साम्राजाच्या जगभरातील शाखा विस्तारल्या आहेत त्या पैशाची पेरणी करूनच, मग त्यातील एक विशिष्ट असा हिस्सा कार्यक्रम तयार करणार्या निर्मात्याला देणे क्रमप्राप्तच असते. तिथे तुम्ही आम्ही काय करू शकतो ?
आमीरला प्रत्येक एपिसोडसाठी ३ कोटी मिळणार असे दिसत्ये. याचा काहीसा शोध घेतला असता जी आकडेवारी समोर आली आहे ती पाहता ही रक्कम नगण्यच म्हणावी लागेल >>>
[ही आकडेवारी 'स्टार इंडिया प्रा.लि.' चे कार्यकारी अध्यक्ष श्री.संजय गुप्ता यानी व मार्केटिंग सुपरव्हायझर श्री.हबिब निझामुद्दीन यानीच दिली असल्याने ती प्रमाण मानावी लागेल.]
१. निर्माता फी (आमीर प्रॉडक्शन "ए") : रुपये ३ कोटी
२. प्रत्येक कार्यक्रम सादरीकरण खर्च : रुपये १ कोट
म्हणजेच 'स्टार' चा एका एपिसोडचा साधारण ४ कोटीचा खर्च मान्य.
आता स्टारचे यापासून उत्पन्न :
१. 'सत्यमेव जयते' कार्यक्रम 'स्पॉन्सर' केला आहे एकूण सात घटकांनी. त्यातील प्रमुख म्हणजे भारती एअरटेल, ज्यानी स्टारला मोजले आहेत तब्बल १६ कोटी रुपये. एअरटेलशिवाय अन्य सहा आहेत = अॅक्सिस बॅन्क, कोकाकोला, स्कोडा ऑटो, बर्जर पेन्ट्स, डिक्सी टेक्स्टाईल्स आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन ~ ही स्पॉन्सरशीप आहे प्रत्येकी ७ कोट रुपये फीची. म्हणजेच एका एपिसोडपासून "स्टार प्लस" मिळविणार = १६ + ४२ = ५८ कोटी रुपये.
२. या स्पॉन्सर्सशिवायही दीड तासांच्या या कार्यक्रमातील अन्य कंपन्यांच्या १० सेकंदाच्या जाहिराती स्वीकारण्यात आल्या आहेत (आणि विशेष म्हणजे पहिल्या भागाच्या प्रसारणापूर्वीचे हे सार १० सेकंदाचे स्लॉट विकले गेले होते), त्याचे चार्जेस आहेत = १० सेकंदासाठी १० लाख रुपये. [प्रसारणाच्यावेळी अशा जाहिरातींची संख्या मोजणेही कठीण जाईल....त्यामुळे इथून मिळणारे उत्पन्न अचाटच असणार.....लोकप्रियतेच्या ग्राफवर जाहिरातीचेही दर वाढत असतात.]
स्टारच्या सहा वाहिन्यांवरूनही [यात मराठी 'प्रवाह' ही आहे] हा कार्यक्रम प्रसारित करतानाच आमीर खानने 'दूरदर्शन' च्या सरकारी खात्याला कार्यक्रमाचे विषय आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचे महत्व पटवून दिल्याने दूरदर्शननेदेखील हे सर्व कार्यक्रम ज्या ठिकाणी केबल वा डिश सेवा उपलब्ध नाहीत अशा सर्वदूर भागात या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात विशेष हातभार लावला. 'दूरदर्शन' कडून स्टार ने यासाठी कोणतीही फी घेतलेली नाही.
असा हा आर्थिक लेखाजोखा....एक एपिसोडचा...जवळपास ६० कोटीतून ३ कोटी आमीरला मिळाले म्हणजे स्टारने त्याच्यावर पैशाचा वर्षाव केला असे मानण्यात अर्थ नाही.
अशोक पाटील
अशोक यांच्याशी मताशी सहमत....
अशोक यांच्याशी मताशी सहमत.... सनदशीर मार्गाने पैसे मिळवणे हा त्याचा हक्कच आहे. तो त्याचा वेळ या ज्वलंत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधुन घेण्याकरता देत आहे म्हणुन आपण त्याचे आभारच मानायला हवेत.
त्याच्या पैशाचा उत्पन्नाचा विषय आलाच कसा काय? त्याचा विषयाशी संबंध काय?
सर्व चर्चा वाचली. कार्यक्रम
सर्व चर्चा वाचली. कार्यक्रम नक्कीच अत्यंत प्रभावी असणार यात शंका नाही. दुर्दैवाने मला पाहता आला नाही. सत्यमेव जयते ची जाहीरात रोज रेडिओवर ऐकत होते, त्यामुळे फक्त दुरदर्शन वर आहे असं वाटलं बाकी स्टार प्लसवर पण आहे का? अजून कोणत्या चॅनल्स वर दिसेल? रिपिट टेलिकास्ट कधी आहे? प्लिज मला सांगा, मला पहायचीच आहे सिरियल.
आताच एपिसोड पाहिला - कोणीतरी
आताच एपिसोड पाहिला - कोणीतरी महत्वाचे असे चांगले काम करतय हे पाहुन चांगले वाटले
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
आनंदयात्री वरील पत्ता/फोन/लिंक सगळ्यात वरती चिकटवणार का?
अमीर खान १३ भागांमधे दाखवेल ते दाखवेल, पण तुमच्या-आमचा आजुबाजुला अनेक इतरही समस्या असतात. त्याबद्दल सजग व्हा आणि तो म्हणतो तसे 'सोल्युशन्स' बना. पत्र लिहा, इतरांना जागवा. फारेण्ड म्हणतो तसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणुन निनावीच सही पण वर्तमानपत्रांना, नेत्यांना पत्र लिहा. एका पत्राने काही होणार नाही, १०-१०० ने ही कदाचीत नाही, पण हजारो पत्रे जाऊ लागली तर नक्कीच काही होइल. फरक प्रत्येकामुळे पडतो.
"त्याच्या पैशाचा उत्पन्नाचा
"त्याच्या पैशाचा उत्पन्नाचा विषय आलाच कसा काय? त्याचा विषयाशी संबंध काय? "
~ नाही उदय....कुणी मुद्दामहून पैशाचा विषय काढला नसेलही. पण त्याला एका एपिसोडला ३ कोटी रुपये मिळणार असा सहज एक उल्लेख चर्चेच्या सुरुवातीच्या प्रतिसादात आल्यावर नेमक्या त्याच पानावर त्यासंदर्भात 'पैसे' हा नको असलेला विषय आला. त्यामुळे कित्येक वाचकांची/सदस्यांची अशी समजूत झाली की कार्यक्रमाच्या उत्पन्नातील एक 'भलामोठा' हिस्सा आमीरच्या खात्यात जाणार. प्रत्यक्ष ते आर्थिक गणित काय आहे यासाठी मी ती सारी माहितीच देणे उचीत मानले, इतकेच.
@ दक्षिणा..... रिपिट टेलिकास्ट रविवारी रात्री १० वाजता स्टार प्लस वर ठेवले होते. तरीही इथेच मागील एकदोन पानावर तुला त्या संदर्भातील यूट्युबच्या लिंक आढळतील. त्या क्लिककरून तू पूर्ण एपिसोड पाहू शकशील....बहुतेक सार्या ऑफिसेसनी ती साईट ब्लॉक्/बॅन केली असण्याची शक्यता असल्याने तुला आता घरीच ती पाहता येईल....पण कसेही असले तरी जरूर पाहा....इट्स वर्थ.
अशोक पाटील
काही लिंक अॅड केल्या आहेत.
काही लिंक अॅड केल्या आहेत. कालच्या पुढची चर्चा नंतर वाचेन.
पायरसी ही राष्ट्रीय
पायरसी ही राष्ट्रीय अजेंड्यावर असावी अशी समस्या आहे असं वाटतं का ?>>>
ऐकिव माहिती नुसार पायरसीचा संबंध पाकिस्तान्शी आहे. तो तिथला मोठ्या प्रमणात चालणारा व्यवसाय असुन भारतिय अर्थव्यवस्थेशी त्याचा जवळचा संबंध आहे.
मलाही रविवारी बघायला जमलं
मलाही रविवारी बघायला जमलं नाही पण नेट वर काल शो पाहिला. मन सुन्न सुन्न झाले. काहीच्या कथा बघून तर काटा आला अंगावर. मुर्दाड डॉक्टरांचे बोलणे ऐकून तिळपापड झाला. जगात किती काय भयानक घडतेय पत्ताच नसतो आपल्याला.
निदान अश्या शो द्वारा सगळ्या दुनियेला (नव्याने) कळतय हेही नसे थोडके. अश्या कार्यक्रमाद्वारे जनजागृती होत असेल तर चांगलच आहे. काहीतरी सकारात्मक बदल व्हायला पाहिजे मनापासून वाटतय.
जगात किती काय भयानक घडतेय
जगात किती काय भयानक घडतेय पत्ताच नसतो आपल्याला. >>>>> नीलु बरोबर आहे पण हे तर आपल्या आजुबाजुलाच होतय.
बालकामगार हा विषय आमीरच्या
बालकामगार हा विषय आमीरच्या पत्रिकेत आहे असं समजतं.
आज आपण या विषयाबाबत किती उदासीन आहोत आणि तो एपिसोड झाल्यानंतर आपली दृष्टी किती बदललेली असेल हे इथून पुढे पडताळून पाहीलं तर कार्यक्रमाचं यश आपल्यापुरतं प्रत्येकाला मोजता येईल..
आमिर खानने हा कार्यक्रम
आमिर खानने हा कार्यक्रम करण्याआधी स्टारला ज्या काही अटी घातल्या होत्या त्यानुसार त्याला रविवारी सकाळचाच स्लॉट हवा होता शिवाय दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रसारण व्हायला हवे होते.
कुणाला या दोन अटी कदाचित महत्त्वाच्या वाटल्या नसतील पण थोडा अधिक विचार केलात तर त्यामागचे कार्यकारण लक्षात येइल.
कार्यक्रमाचा एकंदर स्वरूप लक्षात घेता आमिर खान (म्हणजे खरंतर त्याची पूर्ण टीम) टीव्ही या माध्यमाविषयी किती अभ्यास आहे आणी त्याचे सर्व परिणाम ते जाणून घेऊन आहेत हे बघून खरंच कौतुक वाटलं. कार्यक्रम उत्तम आहे यात वाद नाहीच. पण सर्वात महत्त्वाचे आहे ते त्याची वेळ. एकंदर फॉरमॅट (यामधे स्क्रिप्ट्/नेपथ्य त्यासारख्या महत्त्वाच्या बाबी तर आहेतच त्याशिवाय टेक्निकल बाबतीत पण भरपूर काम केलेले आहे.) आजवरच्या भारतीय शोपेक्षा वेगळा असल्याने एकदम प्रभावी ठरत आहे. या कार्यक्रमामधे रीसर्च हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि तिथे हा कार्यक्रम कुठेही कमी पडत नाही हे विशेष.
जाता जाता. प्लीज याला रीअॅलिटी शो म्हणू नका. रीअॅलिटी शो ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे.
Pages