४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा,
तो ब्लॉग मस्तय. इंट्रेस्टिंग. फोटोही फार सुरेख आहेत. थँक्यु
पण तिथल्या पाककृती हेल्दी नाहीत गं. मुलांना द्यायचे म्हणत होतीस का?

माझी मुलगी ३ वर्षाची असताना बायकोचं नेहमी म्हणनं होतं की तिच्या खायच्या तक्रारी आहेत. आम्ही जेव्हा तिला एका बालरोगतज्ञाला दाखवलं तेव्हा त्यांनी तिचे वजन वगैरे चेक केलं आणि बाहेर पाठवलं आणि आम्हाला सांगितलं की तिचं सगळं व्यवस्थित आहे पण तुम्हा दोघांचं काऊन्सेलिंग केलं पाहिजे Happy
जोवर ती तिच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज नीट करत आहे तोपर्यंत काळजी करायचं काही कारण नाही. तिला कधीही फोर्स करू नका खाण्यासाठी. तिच्या ताटात फिंगर फूडचे १-२ ऑप्शन द्या ती तिला पाहिजे ते आणि तेव्हढं खाइल.
सुदैवानं तिला २ वर्षाची असल्यासूनच स्वतःच्या हातानं खायची सवय आहे आणि तिला ते आवडतं. काही विशिष्ट आवडी निवडी आहेत पण खूपच लिमिटेड असल्यानं विशेष काही टेन्शन घ्यायची कधी गरज नाही वाटली.
पिझ्झा, बर्गर, कोक खूप आवडतात पण मागितलं की लगेच मिळतंच असं नाही हे तिला माहिती आहे त्यामुळं फार कधी हट्ट नाही करत. पण आम्हीपण तिला स्वतःहून कधी कधी बाहेर घेउन जातो. पनीर जीव की प्राण असल्यानं (आणि आम्हाला पण आवडत असल्यानं ;)) १-२ आठवड्यातून एकदा पनीर घातलेली भाजी असतेच. शिवाय डोसा, इडली हेही असतात त्यामुळं व्हरायटी असतेच. शाळेत डब्याबद्दल बंधनं असल्यानं चपाती-भाजीच असते आणि डबा जनरली संपवलेला असतो.

माझा अनुभव - kids observe elderly people at home (aai, baba , aaji and ajoba specially) and follow them, particularly this age. my son is now 7 yrs old but i never had any issues with his eating habits. we give him what ever we eat in the same big plate we use rather than giving him in cartoon printed plates . he really enjoys that. Moreover me and my husband never say we don't like particular type of food in front of him. so obviously he test everyting starting from vangyache bharit , karlyachi bhaji and also all types of lonche chatnya . (touch wood).
he eats only four times a day with standard food - breakfast , lunch , snacks and dinner . if he finish his food and his stomach is full he will not eat icecream or chocolate even if other kids are eating it. ( he will definately takes his share and keep it in fridge so taht he can eat it later)

He has liking for varan bhat as compare to poli bhaji . but when he insist he wants to eat only vegetable i don't stop him as far as its home made and healthy food.

i think few things we as parents can do taht will help us (mainly in front of this age kids- lead by example )
1. always check the food before giving it to kids
2. when a food is offer never say kid doesn't like it
3. try and make variety
4. avoid eating junk food in front of kid
5. involve them in cooking theyenjoy if they are part of cooking
6. encourage them to eat all types of food
7. don't crib about food in front of kids
(these ae suggestions which really worked for me )

as far as possible eat together (tv samor basun nako- gappa goshti karat)

धाकटी - सव्वातीन वर्षे- परवा खेळता खेळता पडली. तिच्या हाताला दोन फ्रॅक्चर्स झाली आहेत.
तिला कॅल्शियम वाढण्याच्या दृष्टीने दुध, चीज व इतर दुग्धजन्य पदार्थ याशिवाय काय काय देता येइल? सध्या आमच्याकडे उन्हाला सुरु आहे. कुणाला काही स्पेशल पदार्थ सुचत असतील तर सांगा!

माझ्या मुलाला लहानपणी दूध प्यायला कंटाळा करायचा तेव्हा संत्री द्यायला सांगितली होती...काहीवेळा क्~अल्शियम फॉर्टीफाईड संत्राज्युस मिळतात ते पण ट्राय करू शकतात.

वत्सला, Vit D चे ड्रॉप मिळतात, एक थेंब पुरेसा असतो, तु ज्युस, पाण्यातून देऊ शकतेस किंवा तसाही. माझ्या मुलाला तो एक वर्षाचा असताना फ्रॅक्चर झाले होते तेव्हा त्याच्या पेडिनेच सुचवले होते. मला whole foods मध्ये मिळाले होते. तु तिच्या पेडिला विचारू शकतेस.

तुझ्या इथे शेवग्याच्या शेंगा मिळतात का? त्यात खूप कॅल्शियम असते.. त्याच्या पाल्यात तर खूपच पण तो तुला तिथे मिळेल का ते माहित नाही..

वत्सला, सुकं अंजीर आवडत असेल तर दे तिला. शिवाय ते थंड प्रकृतीचं असतं. उन्हाळ्यात उपयोगी. मनुका पण देता येतील. त्या पण थंड आणि गुणकारी.

धन्यवाद!
डी ड्रॉप्स परत सुरु करते! वरील सगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न करते. बघु काय आवडतय तिला!
रागी म्हणजेच नाचणी ना? इंग्रोमध्ये रागी बघितली आहे. शेवग्याच्या शेंगा पण इंग्रोमध्ये मिळतात! शेवग्याचा पाला मिळणार नाही.

वत्सला तू उसगावात कुठे आहेस? बे एरीयात असशील तर शेवग्याचा पाला कोकोनट हील नावाच्या साऊथ इंडियन ग्रोसरी शॉप मध्ये मिळेल. किंवा कुठल्याही साऊथ इंडियन ग्रोसरीशॉप मध्ये बघ: नक्की मिळेल.

वत्सला, फक्त कॅल्शियम नाही, त्या सोबत आहारच पूर्ण असला पाहिजे. तरच ते सगळं अंगी लागतं.
ठाम पवित्रा घ्यायचा. हे खाल्लंस तरच हे मिळेल. असा !

स्वप्ना_तुषार, मी मेलबर्नला असते पण इथल्या साऊथ इंडियन्/श्रीलंकन दुकानात जाऊन बघते! Happy

दिनेशदा, तुमचे म्हणणे योग्य आहे. माझा प्रयत्न तोच असतो पण सध्या अचानक आलेल्या आजारपणामुळे ती किरकिरी झाली आहे आणि( मी पॅनिक) म्हणुन काही वेगळे देता येइल का असा विचार करत होते.

सुनिधी, धन्स!

तिचे फ्रॅक्चर झाल्यानंतर मलाच 'आपण खाऊ घालण्यात काही चुकलो असु. त्यामुळे कॅल्शियम/डी कमी झाल्यानेच असे झाले' असा मोठ्ठा पॅनिक अ‍ॅटॅक आला होता. वरील दोन्ही लिंकांमधील बरेचसे पदार्थ जेवणात असतात असे लक्षात आले. डॉक्टरांशी बोलताना याचा उपयोग होईल.

काही अ‍ॅपिटायझर डॉ. कडून लिहून घेऊन दिल तर? कारण तिच्या मनाविरूध्द खाऊ घाल्णे अवघडच, आमच्याकडे मनी लहान असताना तोंड अगदी आवळून घट्ट मिटून घ्यायची, अन उघडलच तर गालात घास दाबून ठेवायची.. काय करणार ?..

अवांतर आहे पण, इब्लिस आणि साती, जास्त सांगू शकतील.

माझ्या एका मित्राच्या बायकोच्या बाबतीत, फर्टीन टॅब्लेट मूळे मल्टी ओव्ह्यूलेशन झाले होते पण ट्विन्स होते ते फार नंतर कळले. अर्थातच कॅल्शियमचा डोस कमी पडला. नंतर मुलीला ( एक मुलगा एक मुलगी असे आहेत )
मोठी झाल्यावर अगदी मामुली पडण्यामूळे मल्टी फ्रॅक्चर झाले होते. आता अर्थातच तब्येत उत्तम आहे.

याचाच साईड इफेक्ट का ते माहीत नाही, पण दोघेही निष्णात जिमनॅस्ट होते. राज्य पातळीवर खेळले आहेत.

मी मुलांना सकाळी चहा/ दुध न देता, सरळ खायलाच देतो (म्हणजे बायको देते Happy ) मजेत खातात. नंतर २ तासाने दुध. बाकी त्यांना दर २-३ तासाने खायला हवं, हे खरं.

सकाळी लेकीला मी दुधातुन हनी बंचेस चं सिरीयल देते.
डब्यात स्नॅकला फळ, प्रेट्झील स्टीक्स, चीज, मनुके, खजुर यातलं एखादं देते.
लंच वरण- भात, पास्ता, खिचडी, पी बी & जे असं काहीतरी. कधीतरी शाळेतलं हॉट लंच.

कधी कधी घरी आणते सगळंच पण मी रोज सांगते की सगळं संपव म्हणुन. आपण सांगत रहायचं. मुलं भुक असली की खाणारच. उपाशी तरी कीती वेळ राहणार !

घरात जंक फुड अजिबात आणत नाही. फळं, मेपल सिरप + दही, असं काय काय हेल्दी ठेवते. लेकीचा मुड असेल तर हातानेच उद्योग करुन घेते....अन जंक काहीच नसल्याने जे खाईल ते खाईल. गेल्या महीन्यातच ७ पुर्ण झालेत.

महत्वाचं म्हणजे तिला हे माहीतीये की आईने केलंय तेच खायचं नाहीतर दुसरं काहीच नाही...उपाशी रहायचं. भुक लागली की खातेच पण साधारण जेवायच्या वेळेची विंडो ठरवलीये त्यातंच जमतंय का हे पाहते.

मला ४.५ वर्षाच्या जूळ्या मुली आहेत...त्या पैकी एक सगळ्या भाज्या आवडीने स्वतः च्या
हाताने खाते.."डब्बा काय देउ" विचारले तर "भाजी-पोळी" असे उत्तर येते आणि खाते सुध्धा..
मात्र दुसरी भाज्यान्च्या नावाने लाम्ब पळते.प्र्राठे, मिश्र-पीठाचे धीरडे अश्या प्रकारामध्ये भाज्या खाते..

मी हल्ली तिला सान्गणे चालू केले आहे की, "भाज्या खाल्ल्याने तू स्त्रॉन्ग होशील, उन्ची वाढेल..नाही तर तु छोटीच राहाशील..." तेव्हा पासून थोडी सुधारणा आहे...रोज जेवण झाले की विचारते, "आता मी टॉल झाले का..?"

हे ही सान्गते की, "तू भाजी खाल्ली नाहीस तर तुला के. जी. मध्ये घेणार नाही"
Happy

Pages