४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री, सर्वप्रथम अभिनंदन! Happy
आणि अत्ता याची चिंता करु नकोस... खुप वेळ आहे तुला... पण आमच्या चुका तु करु नकोस.. सुरुवातीपासुन सवयी लावायचा प्रयत्न कर Happy ऑल द बेस्ट!

माझ्या मुलाला कधी काय आवडेल ते सांगता येत नाही, कायम आवड एकच -नॉनव्हेज, ते मात्र कधीही तिखट, चावायला अवघड वाटत नाही- तिन्हीत्रिकाळ चालेल!!!
माझे निरिक्षण हे की रेग्युलर रुटीन चालू असले की बर्‍याचवेळा नखरे कमी असतात. म्हणजे सकाळी दूध मग इडली-डोसा-सँडविच-कॉर्नफ्लेक्स असं काहीही. त्याच्या शाळेतही स्नॅक्स देतात, पण ते किती खातो देव जाणे. घरी आल्यावर त्याला सॉलीड भूक लागलेली असते त्या भरात जे काय असेल ते पोटात जातं. संध्याकाळी सायकल ताबडवून आला की जेवण नीट होतं पण कधीकधी नखरेही असतात. सुदैवाने भाज्या आवडतात. छोटा भीम+निंजा हतोडी हे रोल मॉडेल्स आहेत याचाही परिणाम असावा!!! एवढे सगळे असूनही शरीर 'यष्टी'च आहे.
सुट्टीत आजोळी मात्र निव्वळ लाड आणि कमी श्रम यामुळे प्रचंड नखरे असतात. (परवाच त्याने त्याच्या आईच्या मागे लागून बेसनाचे लाडू करवले, आणि 'हे आजीसारखे नाहीत' असा शेरा मारुन त्यातला एकही खाल्ला नाही!).
चॉकलेटस, फृटी, मॅगी इ.इ.ची भयानक आवड आहे पण मी राहतो तिथे त्याला या गोष्टी दररोज दिसत नाहीत हा फायदा आहे. जेवताना समोर टिव्ही चालू पाहिजे हा एक प्रॉब्लेम आहेच पण सध्या हाताने खायचा प्रचंड उत्साह आहे, हे एक बरे आहे.

अजून एक - इतरांच्या घरी / डब्यात एखादा पदार्थ खाल्ला की त्यांना आवडतो, मग साक्षात्कार होतो, की आईही घरी हे करतेच... मग ते पदार्थ मुलं खायला लागतात. >>> हो हो. आमचा पोरगा पूर्वी बटाटा अजिबात खायचा नाही. मिक्स भाजीतले किंवा इतर पदार्थातले बटाटे वेचून बाजुला काढायचा. गेल्या वर्षी त्याची एक मैत्रिण दर २-३ दिवसांनी डब्यात आलु-पुरी घेवून यायची. तिचं बघून हा पण आलु दे म्हणून मागायला लागला. आता बटाटा खायला त्रास देत नाही.

लाजो, हा इतकं बर्‍यापैकी व्यवस्थित खात असूनही, आमच्या घरात आम्ही दोघं सोडून प्रत्येकाला त्याच्या वजनाची आणि खाण्या-पिण्याची काळजी वाटत असते. Happy
बरं, जंकफुडपासून दुर ठेवण्यासाठी काय करावं. जर हे चांगलं नसतं तर बाकीचे का खातात या प्रश्नाला उत्तर काय?

लाजो, मला आमच्या शाळेतल्या डॉ.नी मुलांना काय खायचंय, काय घालायचंय हे आपण ठरवतोय असं वाटू द्या असं सांगितलं होतं. म्हणजे आज तू काय खाणार? डाळ्-भात की भाजी-पोळी अश्याप्रकारे ऑप्शन द्या. अर्थात शिंग फुटायला लागल्यावर याचा काही उपयोग होत असेल असं वाटत नाही.

सुप्स वगैरे आवडत नाही... ट्राय देखिल करत नाही >>> आमच्याकडे असेच व्हायचे.. मग मी अन नवरा तिला न देता - स्वतः च तिच्यापुढे प्यायचो ( करायला कठीण आहे ) मग ३-४ दा असे केले की मग मी ह्याला म्हणायचे आज कस झालय सूप (किंवा दुसरा आपल्याला तिने खावाच असे वाटणारा पदार्थ) मग छान म्हटल की म्हणायचे," आज ही .. ही अ‍ॅडिशन केलीये -- उत्सुकता निर्माण होते.. मग एकदा हळूच खाऊन पहातेस का ? खायची शक्यता आहे.. अन थोडे थोडे प्यायला लागली की मग चव कळेल तिला.. Happy अर्थात प्रत्येक मुलाचे वेगळे ग..
अन वर मयकर म्हणतात तस तिच्यासमोर ती खात नाही इ.इ. म्हणू नका.. विरोध उगीचच करतात मुलं मग.

खारे बाबा, कसंही, कुठेही खा, हवं तर नाचून दाखवतो, पण खा! >>>>>>>>

माझ्या बाबांच्या मते माझी लेक कोणत्याही उपोषणांसाठी योग्य उमेदवार आहे. Happy

सांगायचं विसरलेच... ऑफिसमधल्या एका कलिगशी या बाबतीत चर्चा करत होते. तर तिने तिच्या मैत्रिणीने केलेला जालिम उपाय सुचवला... मला अजिब्बात आवडला नाही..खरतर रागच आला त्या बाईचा...

ही मैत्रिण तिच्या ६ वर्षाच्या मुलीला नेटवर भयानक भयानक आजारांचे फोटो दाखवायची आणि सांगायची की तु हे खल्ल नाहिस तर तुलाही असच काहितरी होइल.... Sad त्या मुलीच्या नाजुक मनावर काय परिणाम झाले असतिल?? किती खोलवर ..हे फारच एक्स्ट्रिम वाटले मला.... Sad

उगाच एक पोस्ट. माझ्या मैत्रीणीची आई गल्फ मधे प्रायवेट नर्स म्हणुन जॉब करतात.

त्या घरातल्या मुलीने १८ वर्षे झाल्याझाल्या (त्याचसाठी थांबली होती) लग्न केले. लगेच १९ व्यात प्रेग. ७ व्या महिन्यात सी-सेकने डीलेव्हरी, ३-४ थ्या दिवशी मुलगी लेट नाईट पार्टीसाठी बाहेर.

आता घरी काय? तर पेडी ने वेळ व खाण्याची क्वान्टीटी ठरवुन दिलेली. सांगीतले तेवढेच व त्याच वेळी भरवायचे. मुलांनी खाल्लेच पाहीजे. संध्याकाळी ७ ला मुले झोपलीच पाहीजे. त्यानंतर त्या रुम मधे कोणीही जायचे नाही. सीसीटीव्ही मधुन पहायचे. मुल उठले तरी परत जाउन थोपटायचे नाही. अगदीच रडले म्हणजे फारच तरच जायचे. ते मुल सकाळिच डायरेक्ट उठले पाहीजे. तसे ते उठायचे पण. ही गोष्ट ते मुल ३-५ महिन्यांचे असतानाची.

आपण असे करु का? असे झाले तर दिवसभर ताटल्या हातात घेउन फिरणार्‍या तमाम आई वर्गाला - मुल जेवले आता फावल्या काय करायचे असे बाफ काढावे लागतील.

हो आगाऊ, आमचं पण जे काही व्यवस्थित खाणं होतं ते रुटिनमध्येच. एरवी नखरे असतातच. पण ते हे खाणार नाही, ते खाणार नाही असे नसतात..... मी खाणारच नाही असे नखरे असतात. Happy अगदी शनीवार्-रविवारच्या सुट्टीमध्ये पण खायला कुरकुर सुरु होते. अर्थात आम्ही लक्ष देत नाही. खायचं तर वेळेवर जे आहे ते खा नाहीतर मग पुढच्या खाण्याच्या वेळेपर्यंत उपाशी रहा हे सांगतो. पण पठ्ठा दिवसभर उपाशी रहायला तयार असतो. त्याला काहीही फरक पडत नाही. रात्रीचं जेवण मात्र मग घेतो व्यवस्थित.

लाजो ,
एक सांगु का.. बाकीचे सर्व उपाय आधीच करुन झालेत तुझे म्हणून.
(with a lot of disclaimers) nonchalance works sometimes. करुन पहा तुझ्या स्टाईलमध्ये बदल. मागे लागुच नकोस २-३ दिवस.
बहुधा मुलांनाच हे वेगळे आहे, we have pushed too far हे सेन्स होते आणि योग्य तो निर्णय ते घेऊ शकतात. मुलांना आपल्या आंतरिक मर्यादांची instinctively जाण असते असे वाटते.

<<पण तरीही मला असे वाटते कि आपण काय खातोय आणि किती खातोय ते मुलांना लहानपणापासुनच कळले पाहिजे. म्हणजे भुक असेल तितकेच खायची आणि सर्व पदार्थ ( चांगले दिसत असलेले / नसलेले) खायची सवय होईल. >>
अनुमोदन!

मोनाली, आयडीया छानच.
वर अनेकजणींनी लिहिलेय कि बरगड्या मोजून घ्याव्यात वगैरे. पण अतिवजनदार आणि अजिबात खेळत नसलेल्या मूलापेक्षा, टणाटण उड्या मारणारे मूल चांगलेच.
हि पण पासिंग फेज असते. दूध आवडत नसेल तर खीर, आईस्क्रीम, दही, लस्सी
देता येतेच.

कॅल्शियमसाठी नाचणी हवीच. लहानपणापासून सत्व, आंबील प्यायला लावले तर,
लक्ष स्थिर राहते. काही काही मूलांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायची सवय असते.
(मला आहे. मी एकाचवेळी जेवण, वाचन, संगीत ऐकणे आणि म्यूट करुन टिव्ही बघणे
करत असे.) पण त्या सगळ्या गोष्टी नीट केल्या जाताहेत ना ते बघावे लागेल. नाहीतर
एक ना धड, असे होते.

कॅल्शियमसाठी, रोजच्या वरण भातातही, नखभर खायचा चुना घालायचे मालती
कारवारकर यांनी सूचवले होते.
माझ्या पुतण्यावर आम्ही हे सर्व प्रयोग केले होते, वडाळ्याच्या गणेश उत्सवात त्याला
हेल्दी बेबी म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले होते. तो अजूनही तसाच आहे.
त्याला भरवताना एका चपातीचे आठ तूकडे करून, त्यावर भाज्या वगैरे पेरुन, एकावेळी एक तूकडा त्यांच्या तोंडात द्यायचो. त्यापेक्षा लहान तूकडे करायचे नाहीत,
असा नियम होता.

वाचते आहे.

सावलीचा चार्टचा उपाय आवडला.
वर कुणीतरी म्हटलय की मुलाला चीज फार देत नाहीत. चीज कॅलशियमसाठी द्यावे असं डॉ म्हणतात.

अवांतर,
ही मैत्रिण तिच्या ६ वर्षाच्या मुलीला नेटवर भयानक भयानक आजारांचे फोटो दाखवायची आणि सांगायची की तु हे खल् तर तुलाही असच काहितरी होइल....>>>>>> माझी एक मैत्रीण टीनएजमध्ये प्रवेश करणार्‍या मुलाला स्मोकिंग करु नये हे मनावर बिंबवण्यासाठी एका मोठ्या दवाखान्याच्या कॅन्सर वॉर्डमध्ये घेऊन गेली होती.

मला वाटतं भारतीय पालकांच्या बाबतीत हे ज्यास्त असावं आजूबाजूला पाहून असे वाटते.

हे सगळं वाचून आठवले ते दिवस जे अंगावर काटा आणतात , आम्ही कधी कधी तर वासुदेव बनायला पण तयार असायचो. Proud
बरेच डोक असेच सांगतात, ठेवा उपाशी खाईल मग. पण हे कधीच शक्य झालेच नाही.

माझा १४ महिन्यांचा मुलगा एक महिन्यापासून पाळणाघरात जातोय. तिथल्या शिस्तीमुळे बराच बदललाय तो. २-३ दिवसांपासून जेवण पण तिथेच होतं त्याचं. आणि बाकिच्या मुलांचं बघून त्याला आता सगळं चमच्याने खायचं असतं. Happy
मी एक दिवस पाळणाघरात पार्टी होती तिथे गेलेले . तिथे १८-१९ महिन्यांच्या मुलांना हाताने ( काटा चमचा ) जेवताना बघुन थक्क झाले.
आपलच चुकतं का काहि? Sad

मुलाला जेवण कदाचित तिथली लोकं भरवतात पण नाश्ता मात्र हातानेच खायला लावतात.मग हळूहळू सवय होते मुलांनास्वतःच्या हाताने खायची.

रैना Happy

आजच करुन बघते... डिनरटाईम होत आलाच आहे ...

आजचं लंच न खाता परत आलय... कारण... 'लायब्ररीत गेले होते म्हणुन लंच खायला वेळ नाही झाला'... Uhoh
फक्त चिझ क्युब आणि संत्र खल्लं दिवसभरात... :(.

इतरांच्या घरी / डब्यात एखादा पदार्थ खाल्ला की त्यांना आवडतो, मग साक्षात्कार होतो, की आईही घरी हे करतेच... मग ते पदार्थ मुलं खायला लागतात. >>
हो हो.
मी माझ्या मित्राच्या डब्यातील दोडक्याची भाजी त्याने दिल्यावर नाही कशी म्हणायची म्हणुन खाल्लेली.
खुप आवडली. आईला ऐटीत बोल्लो तु घरी दोडक्याची भाजी का करत नाहीस. मला किती आवडते.
आइ म्हणाली होती आपल्याकडे असते. तुच खात नाहीस. ही गोष्ट मी चौथीत असतानाची.
पोहे, मी एका शाळेतील एका ट्रिपला खाल्ले होते. तेव्हापासुन घरिही खायला लागलो. (तिसरीत असताना)
आणि वान्ग्याची भाजी तर मी मोठा ८-९ वीत आलो तरी खात नव्हतो. पण त्यावेळच्या माझ्या क्रशला आवडायची म्हणुन मी ही सुरु केली खायला. Proud

बाकी आगाउने लिहिलय तसं निन्जा हातोडी आणि छोटा भीमची मदत आमच्या घरिही होतेच. Happy
शिवाय त्याच्या शाळेतील बेस्ट फ्रेण्ड ने भेंडीची भाजी आणलेली. ह्यानेही त्यावेळी खाल्ली.
हा आता म्हणतो मला भेंडीची भाजी आवडते. त्यांच्या मित्र मंडळीना हे आवडतं ते आवडतं अस करुनही काहि गोष्टी गळी उतरवता येतात. प्रचंड खेळुन आला की की मग मला खायला दे मला खायला देचा गजर सुखावुन जातोच. Happy

वाचिंग वाचिंग... अजून तरी ही फेज चालू व्हायची आहे... कारण मुलगी अजून ३ वर्षाची व्हायची आहे... त्यामुळे सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट..

वाचिंग वाचिंग... अजून तरी ही फेज चालू व्हायची आहे... कारण मुलगी अजून ३ वर्षाची व्हायची आहे... त्यामुळे सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट..>>>>>> नको नको .. आता पासुन चालु करा...सर्व पदार्थ खायची सवय होईल....

लाजो, तुझ्या मुलीला नगेट्स आवडतात असं लिहिलं आहेस ना. मग कडधान्यांची नगेट्स करुन दिलीस तर खाईल का ? मूग / चवळी / छोले / राजमा ह्यापैकी काहीही उकडून घ्यायचे ( मूग, मटकी, चवळी असेल तर मोड काढून पाणी न घालता उकडायचे ) आणि मग कोरडे भरड वाटायचे, त्यात किसलेले गाजर / पालक / कुठल्याही भाज्या बारीक चिरुन / कोथिंबीर, लसूण पेस्ट, धनाजिरा पावडर वगैरे घालून ब्रेड ( व्हीटब्रेड घे म्हणजे हेल्दी ) / ब्रेडक्रम्स घालून कटलेट्स करायचे. तू नगेट्सचा शेप दे. आणि मग जरा जास्त तेलात कुरकुरीत तळ. बघ मुलीला आवडतंय का.

आमच्याकडे आत्तापर्यंत डाळीत कणिक भिजवून केलेले पराठे रोल्स किंवा व्हिटब्रेडचे अंडं/ चिकन / गाजर-भोमि-कांदा घालून केलेले पिझ्झा सँडविच / छोले घालून सँडविच एवढेच पर्याय आहेत डब्यासाठी. आणि मधल्या छोट्या डबीत बेदाणे. त्याव्यतिरिक्त दुसरं काहीही दिलं तरी डबा परत येतो. सँडविचही एकच द्यायचं / रोल्स असतील तर छोटे दोन ( एकाच पोळीचा ऐवज ) मी म्हटलं की मी जास्त देते, उरलेलं परत आण तर रडारड होते Uhoh

घरी मात्र बर्‍यापैकी समोर येईल ते खातो. नॉन-भारतीय हॉटेलमध्ये स्वतःच्या हाताने जेवतो, घरी स्नॅक्स आपल्या हाताने खातो, भाजी-पोळी / वरणभात मात्र भरवूनच अजूनही. पूर्वी भाज्या जास्त आवडीने खायचा. 'आवडती भाजी कोणती ?' ला 'शेपू.' असं उत्तर देऊन पाहुण्यांना गार करायचा Proud हल्लीहल्ली पोळी-भाजी खायचा फार कंटाळा व्हायला लागलाय, वरणभात एकेकाळी फार आवडायचा तोही आवडेनासा झालाय त्यामुळे आता युद्धासाठी सज्ज व्हावे लागणार असे दिसते Wink

लोक्स, माझेही थोडे अनुभव.

माझ्या लेकीला अगदी चौथ्या महिन्यापासून मी पेज वगैरे द्यायला सुरुवात केली होती. मग सहा महिन्यांची झाल्यावर त्या पेजेतच भाज्या उकडून कुस्करून घालत असे. खिरीमधे साखरेऐवजी खजूराची पेस्ट आणि लगलाच तर थोडा गूळ घालत असे. मग हळूहळू वरण्भात, धिरडी, खिचडी वगैरे. आठव्या-नवव्या महिन्यापासून पोळीचे छोटे छोटे तुकडे भाजीला लावून देत असे. १ वर्षाची झाली तेव्हा ती सगळं व्यवस्थित खायला लागली होती. तिच्यासाठी कधीही भाजी बिनतिखटाची वेगळी वगैरे केली नाही. आपण जे खातो तेच मुलांना द्यायचं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
आता ती चार वर्षाची आहे. लहानपणापासून सगळ्या भाज्या, फळं, कोशिंबीरींची सवय लावल्याने ती सगळ्या भाज्या, सगळी फळं, बदाम अक्रोड, मनुका वगैरे सुकामेवा, कच्ची काकडी, गाजर,बीट वगैरे व्यवस्थित खाते. साधारण दीड पावणेदोन वर्षांची झाल्यावर आमच्याबरोबरच तिचं पान वाढून घ्यायला सुरुवात केली. आणि तिला हाताने जेवायला सांगितलं. सुरुवातीला मुलं खूप सांडतात आणि वेळ पण खूप लागतो. पण हाताने जेवायला मजा वाटते त्यांना. आणि सवयही लागून जाते. तेवढा पेशन्स ठेवणे आवश्यक.
बाकी चॉकलेट वगैरे फक्त सुट्टीच्या दिवशी खायचं असं तिला सांगितलं आहे. इतर दिवशी तिने कितीही हट्ट केला तरी आम्ही देत नाही. फक्त गोड पदार्थ मात्र ती अजिबात खात नाही. पण तेही एका प्रकारे चांगलंच आहे म्हणून तिला गोडाची सक्ती करत नाही.
पण माझ्या मैत्रिणींचं मत असं आहे की ती मुळातच शहाणी आहे म्हणून मला हे शक्य झालं. तसंही असेल कदाचित Happy

पण माझ्या मैत्रिणींचं मत असं आहे की ती मुळातच शहाणी आहे म्हणून मला हे शक्य झालं>>>> प्रत्येक मूल हे वात्रट असतंच... त्यामुळे हे मत अजिबातच बरोबर नाही.. फक्त काही मुलं कुठे वात्रटपणा करायचा आणि कुठे नाही हे फार पटकन शिकतात..

shrushti14.. चालू केलेलेच आहे... सध्यातरी फक्त जेवायला वेळ लागणे एवढाच प्रश्न आहे.. बाकी खाण्याच्या बाबतीत अजूनतरी सगळेच खात असते...

आमच्याकडे पण थोड्याफार प्रमाणात अपर्णानी सांगितलय तसंच करतोय... बहुतेक वेळेस सुरुवात स्वतःच्या हातानी होते पण नंतर कंटाळा आला की अगदी शेवटचे काही घास भरवावे लागतात.. बहुतेक हळूहळू तेही बंद होईल.. कारण तिला आवडाणारे पदार्थ असले की चाटून पुसून स्वच्छ ताटली असते... सध्या तरी बहुतेक सगळ्याच भाज्या आवडीने खाते आहे... रादर बर्‍याच वेळा नुसत्या भाज्याच खात असते... पोळीकडे बघतही नाही...

माझ्या आईला माझ्यामुळे असाच त्रास झालाय. Sad
म्हणजे मी वरण भात सोडून बहुतेक सगळं खायचे पण एकुण खाणंच कमी. कधीही भूक लागली असं तर नाहीच म्हणाय्चे पण किती जरी मागे लागलं तरी मला हवं तेव्हाच जेवायचे. त्यातही जर ऑप्शन असेल तर जे खाणं सोपं, फिरता फिरता खाण्या सारखं असायचं तेच खायचे. खरं म्हणजे अजूनही जर कुणी ताट भरुन वाढलं असेल तर मला जेवण जात नाही. लहानपणी तर अगदी टेन्शन च यायचं तेवढं संपवण्याचं. कारण ताटात टाकलेलं चालायचं नाअही. आई डाएटिशिअन असल्याने डब्यात खायल भाजीपोळी, दही, फळं/सॅलड/सुकामेवा वगैरे द्यायची. ते मैत्रिणींना देऊन मी त्यांच्या डब्यातले नुसते पोहे किंवा लोणचं आणि इडली वगैरे खायचे. पण घरी पोहे इडली बिलकुल आवडीने खायची नाही. बहुतेक आई मागे लागेल, ते नाही खायचं असं होतं. Sad हे सगळं ८=१० वर्षाची होईपर्यंत.
बेसिकली मित्र मैत्रिणी जे खातात ते आमच्याकडे आई खाऊ द्यायची नाही. उदा. मॅगी, चिप्स, पापड, डब्यात नुसती इडली बटर/ पावभाजी/ब्रेड जॅम/ पोहे / लोण्चं पोळी/ तूप पोळी/ बिस्कीटं रसना/पेप्सी इ. शिवाय त्यांचा एकेरी डबा लवकर खाऊन व्हायचा आणि मला पोळीचा एक एक तुकडा खाण्यात वेळ लागयचा. पुन्हा त्यांना खेळता खेळता खाता यायचं अन मला एका जागी बसून खावं लागायचं. त्याम्मुळे मला माझा डबा अगदी बोअर, बॅकवर्‍र्ड वाटायचा.
पण तरी आई न्युट्रीशन समजवून सांगत रहायची. त्याचा उजेड पडायला बराच उशीर झाला. (११-१२ वर्ष) . शाळेत सायन्स मध्ये शिकेपर्यंत. मग मात्र आई जे सांगेल तेच खायचं असं पक्कं झालं. ते अजून पर्यंत.

आमच्या हाफ तिकिटाच आता फुल तिकिट झालय पण लहानपणीच्या (त्याच्या) आठवणी आल्या. दुध पिण्यासाठे खळ्खळ नव्हती कधीच. पण वरण भात लिम्बाच लोणच काकडी नाहितर टोमॅटो ह्या पलिकडे कशालाही नकार होता ( वय वर्ष ४) इतर खाण , पोहे , उपमा, बिग नो. दिवसातुन कितीही वेळा वरणभात दिला तरी चालायचा . मग शाळेत नाश्ता सुरु झाला. सा. खिचडी आमच्या शाळेतल्या सारखी तुला आणि आज्जीला (?) येतच नाही. पोहे तिकडे किती छान लागतात, थापलीपिठ तुम्ही का करत नाही Uhoh , इटली आणि ढोसा बरोबर भाजीची आमटी असते शाळेत. वगैरे गुणगान सुरु झाल. आजी वैतागायची , इथे घरी चान्गल करुन घातलेल नको आणि शाळेतली कौतुक सान्ग्तोय म्हणुन. ही फेज वर्ष्भर चालली.
मग सॉस च प्रेम सुरु झाल. कशाही बरोबर सॉस. असेच दर सहा आठ महिन्यानी बदलणारे ट्रेन्ड येत जात गेले. एकत्र कुटुम्बातल एकट मुल हे त्याच स्टेटस त्याच्या वय वर्ष १० पर्यन्त होत. त्याचा फार गैर्फायदा मात्र घेउ दिला नाही आम्ही सगळ्यानीच.
बकासुर , भिम,लेकीकडे जाउन तुप रोटी खाणारी म्हातारी असे रोल प्ले करुन जेवणाला सुरवात व्हायची. बकासुर बिचारा आमच्या घरी वरण भात आणि काकडीची कोशिम्बीर खायचा. भिमाला ताकद येण्या साठी भाजी अन म्हातारीला तुप साखरेचा कन्टाळा आला म्हणुन फ्रॅन्की (लागतील त्या भाज्या , उसळी आत सारुन आपण मोकळे).
महत्वाच काय तर तो खातोय / नाही खात याचा बाउ केला नाही. करु ही नये. आता तर भुकेच्या वेळी आई घरी नसली तर आपापल करुन खाता येतय.

अगो, धनस गं... करुन बघते तसे नगेट्स Happy

आज दुपारी लंच खल्ल नसल्यामुळे घरी आल्यावर भुक लागली होती. मग आपणहुनच म्हणाली मी माझं लंच संपवते Happy पण तिला अर्धच सँडविच आणि दुध दिलं म्हंटल संध्याकाळी लवकर डिनर करु. मग ६ वाजताच कडक भुक लागली. मी पराठे करता करताच तिला पराठ्यांचे तुकडे करुन दिले. दह्या बरोबर खल्लेन Happy त्यामुळे आज मी खुष... . Happy

ज्या पालकांनी लहानपणापासुन सवय केली आणि ज्यांची मुले खळखळ न करता खातात त्यांना सलाम Happy

जेवणाच्या ताटावर यॉ करून चॉकलेट मागणार्‍या मुलीची कॅडबरीची आणि असेच जेवणाला यॉक करून मॅगीला वॉव करणार्‍या मुलांची जाहिरात यातून मुलांना चुकीचा संदेश जात असेल असे मला वाटत राहते.

lajo, Aaj mee dinner chya veLee lekilaa he discussion sangitale. mhaNaje 'kahee mula kasa traas detaat jevayala, kuthalee mavashee Kaay mhaNali, savalee mavashicha chart' ASA vechaak sangitala. pariNamee tee patapat jevalee aaNi udyachyaa sandwich madhye koNate rang asayAl havet etc vichar karun fridge shodhala.. udya gajar, tomatoes, cheese ASA sandwich hava aahe madamla. udyachyaa play lunch sathee pumpkin chyaa fodee de mhaNat hotee. aahe kee nahee gammat?

सकाळी उठल्यावर इतक्या पोस्ट्स. सगळ्या मॉम कम्पनीचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा.

दोन वर्षापूर्वी हीच स्थिती होती माझ्या घरी. माझा प्रॉब्लेम जरा वेगळा होता. मुलगा सगळे अनहेल्दी खाणे खायचा. रोज जेवणात फक्त चिकन नगेट्स, पास्ता नाहीतर पिझ्झा हवा असायचा. भाज्या दोनच. बटाटे नि टोमॅटो (म्हणजे फ्राइज नि केचप :)) अगदी हैराण झाले होते. तेव्हा एक उपाय केला तो लागू पडला. अर्थात सगळी मुल वेगवेगळी असतात. तेव्हा सगळ्यानाच लागू पडेल अस नाही.

त्याच्या आवडीच जेवण द्यायच, पण आपल्या जेवणातला एक पदार्थ दोन चमचे फक्त- खाल्लाच पाहिजे असा नियम केला. हा जो पदार्थ द्यायचे तो चमचमीत ठेवला. जसे मेथीची गोळाभाजी- पण वरून भरपूर तेलाची फोडणी घालून, पालक पराठा पण सढळ हस्ते तेलातुपात परतून. अस करता करता त्याला या पदार्थाची टेस्ट डेव्हलप होणे की काय म्हणतात तसे झालेय. आता हे पदार्थ कमी तेलातुपातले असले तरी आवडीने खातो. पूर्वी फक्त चीझी जेवण आवडायचे अशी स्थिती होती ती जाऊन आता इडल्या, पराठे, पालकचे सगळे पदार्थ, मुगाची खिचडी, भेळ, मोडाच्या उसळी अगदी आवडीने खातो. ललिता म्हणते तस पदार्थाना देसी नाव न देता- जसे राजमा नि भाताला बीन्स अ‍ॅन्ड राईस वगैरे म्हटले की खूष. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी लढाई मारलीय मी कारण खूप त्रास झाला त्याकाळात. मुख्य म्हणजे तो हेल्दी खात नाही याच खूपच वाईट वाटायच.

जेवणाच्या ताटावर यॉ करून चॉकलेट मागणार्‍या मुलीची कॅडबरीची आणि असेच जेवणाला यॉक करून मॅगीला वॉव करणार्‍या मुलांची जाहिरात यातून मुलांना चुकीचा संदेश जात असेल असे मला वाटत राहते.
>>>>>>>> अनुमोदन,त्याचप्रमाणे टँग,रीअल ई फळांची पेये किंवाजॅम ह्यांच्या जाहिराती पण फसव्या आहेत.त्यात काहिच पोषण्मूल्ये नाहित.वरून भरमसाठ साखर. Sad च्यवनप्राशमध्ये पण कैच्याकै साखर असते. एका ओळखीच्या ग्रुहस्थांनी ( ज्यांची आयुर्वेदिक उत्पादने बनवण्याची कंपनी होती) सांगितलेले कि च्यवनप्राश खाण्यापेक्षा रोज एक आवळा खा.
सध्या मी सोया वगळता कोणताहि सॉस, जॅम ,बटर आणतच नाहि. घरी आणलं कि थोडंका होईना खाल्लं जातच. त्यापेक्षा नकोच ती विकतची दुखणी Happy

वत्सला, सह्हीच गं Happy मी पण ट्राय करते उद्या हा प्रयोग Happy

मधुरीमा... वेल डन Happy

भरत आणि भान <<< अनुमोदन. जाहिराती टिव्ही इ इ चा परीणाम होतच असणार मुलांवर.

Pages