'ANZAC गोल्डीज' - ओट्स + चॉकलेट स्लाईस

Submitted by लाजो on 25 April, 2012 - 09:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ANZAC DAY

२५ एप्रिल हा ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमधे 'ANZAC DAY' म्हणून ओळखला जातो.

ANZAC DAY बद्दल मी LEST WE FORGET! - the ANZACs - एक शौर्य गाथा इथे माहिती लिहीली आहे ती जरूर वाचा.

यंदाच्या ANZAC DAY ला ANZAC बिस्किटांच्या बदल्यात या "अ‍ॅन्झॅक गोल्डीज" केल्या.

Anzac0.JPG
लागणारे जिन्नसः

१२५ ग्रॅम बटर,
दीड कप मैदा,
१/४ टीस्पून बेकिंग पावडर,
३ अंडी (हलकी फेटुन),
१ कप साखर,
१/२ कप ओट्स,
१/२ कप डेसिकेटेड कोकोनट,
१/४ कप गोल्डन सिरप (टीपा बघा),
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स,
२/३ कप व्हाईट कुकिंग चॉकलेट,
आयसिंग शुगर

क्रमवार पाककृती: 

१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. ऑव्हनप्रुफ ट्रे/लॅमिंगटन ट्रे ला बटर्/ऑईल्स्प्रे मारुन ग्रीस करुन त्यावर बटर पेपर पसरा.

२. एका मायक्रोवेव्हप्रूफ काचेच्या बोल मधे नरम बटर आणि व्हाईट चॉकलेट घ्या आणि १ - १ मिनीटाच्या इंटर्व्हल्स मधे जस्ट वितळून एकत्र होण्याइतपत गरम करा. मिश्रण बाहेर काढुन नीट मिक्स करुन घ्या.

३. बटर्+चॉकलेट मिश्रण जरा थंड होऊ द्या. यात आता साखर + व्हॅनिला + हलकी फेटलेली ३ अंडी आणि गोल्डन सिरप घाला आणि स्पॅट्युला/लाकडी चमच्याने नीट एकत्र मिक्स करा.

४. वरच्या मिश्रणात आता चाळलेला मैदा + बेपा हळुहळु मिक्स करा.

५. आता या मिश्रणात ओट्स आणि डेसिकेटेड कोकोनट मिसळा. सगळे नीट एकजीव होऊ द्या.

Anzac1.JPG

६. हे मिश्रण आता तयार ट्रे मधे ओता. वरतुन हवे तर व्हाईट चॉकलेट चे तुकडे पसरा.

Anzac2.JPG

७. १८० डिग्रीला साधारण २०-२५ मिनीटात सोनेरी रंगाच्या झाल्यावर आणि सुई/सुरी घातल्यावर क्लिन निघाल्या वर या 'गोल्डीज' बाहेर काढा.

Anzac3.JPGAnzac4.JPG

८. गोल्डीज पूर्ण गार होऊ द्या. त्यावर आयसिंग शुगर भुरभुरवा आणि त्याचे चौकोनी तुकडे करुन चहा/कॉफी बरोबर गट्टम करा Happy

Anzac5.JPGAnzac6.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढ्या :)
अधिक टिपा: 

Anzac7.JPG

१. गोल्डन सिरप म्हणजे खरतर साखरेचा पाकच. पण यात पाणी वापरलेले नसते. गोल्दन सिरप नसेल तर साखरेचे प्रमाण दीड कप करा किंवा १ कप साधी साखर +अर्धा कप ब्राऊन शुगर,

२. मुळ रेसिपीमधे व्हाईट चॉकलेट नाहिये. त्यामुळे चॉकलेट घातले नाही तरी चालेल.

३. अयसिंग शुगर भुरभुरताना ती बारीक जाळीच्या गाळण्यात घाला आणि मग हलकेच पसरा. एकसारखी सगळीकडे पसरेल.

माहितीचा स्रोत: 
मुळ रेसिपी बिस्किटाची त्यात केलेले बदल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरीच म्हटले आज लाजो कुठे गायब झाली. Happy

अजुन एक जबरी रेसीपी. Happy माझ्या इथे शेफला सांगतो कशी करायची ते. कदाचीत येत असेल त्याला.. Happy

एक मस्त पाककृति...दिसायला बरेचसे केक सारखेच पण चव केक पेक्षा सुंदर असेल ना?करुन पाहीन कधीतरी जमेल तेव्हा.

खूपच छान पाककृती....................कधि वेळ मिळतो ?? .....

आजच या रेसिपीनं मी ब्राउनी केली - कारण चॉकलेट चिप्स वापरल्या आणि मैद्याऐवजी कणिक वापरली. मिश्रण थोडं घट्टं वाटलं म्हणून दूध घातलं. कणिक वापरली म्हणून बेकिंग पावडर थोडी जास्त घातली.

महाप्रचंड यम्मी झाल्या आहेत. लाजो, या रेसिपीकरता धन्यवाद. Happy

आवनमध्ये ठेवण्यापूर्वी :

तयार झाल्यावर :