कमी कटकटीची भरली वांगी

Submitted by मृण्मयी on 24 April, 2012 - 12:52
bharali vaangi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

भरली वांगी म्हंटली की ती करायला लागणारा वेळ, वाटलेले मसाले, कांदे भाजणं, वाटणं असे बरेच प्रकार आठवून करायचा कंटाळा येतो. आई बर्‍याचदा तासाभरात अत्यंत चवदार भाजी करते. ती पाककृती इथे देतेय.

१० जांभळी वांगी. शक्य तितकी कोवळी आणि आकाराला लहान.
२ मोठे कांदे- शक्य तितके बारीक चिरून
१५-१६ लसूण पाकळ्या - बारिक चिरून
४ पेरं आल्याचा तुकडा - सालं काढून बारिक किसलेला.
घरात जो कुठला तयार मसाला असेल तो. (दाक्षिणात्य सांबार्-रसम आणि तत्सम मसाले सोडून), मी सावजी मटण मसाला वापरलाय.
१ वाटी डाळं
१ वाटी शेंगदाणे
पाव वाटी तीळ
मीठ
तिखट
चमचाभर धणेपूड
वाटीभर पावटे किंवा मटरदाणे
३ वाट्या तेल
१ मोठा चमचा चिंच कोळ.
एक गुळाचा खडा
भरपूर कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

* डाळं, शेंगदाणे एकत्र करून भाजून घ्यावे.

* भाजताना शेवटली १-२ मिनिटं उरली असताना तीळ घालून भाजावं. २ मिनिटात गॅस बंद करून दाणे-तीळ-डाळं थंड होऊ द्यावं. गार झाल्यावर मिक्सरातून पूड करून घ्यावी.

*बारिक चिरलेल्या कांद्यात ही पूड, मसाले, चिंच गूळ, तिखट घालून नीट मिसळून घ्यावं

bharali-vaangi-maayboli-1-a.jpg

*वांग्यांना + चिरा देऊन मसाला वांग्यात भरावा.

bharali-vaangi-maayboli-1.jpgbharali-vaangi-maayboli-2.jpg

*तेल गरम करून त्यात वांगी सोडावी. उरलेला मसाला सरळ वांग्यांवर ओतावा.

bharali-vaangi-maayboli-3.jpg

*हलक्या हाताने ढवळून कमितकमी १०-१५ मिनिटं झाकण न ठेवता शिजू द्यावं.

*उकळीचं पाणी घालून रस्सा हवा तितका पातळ करून घ्यावा.

*मटरदाणे आणि चिरलेली कोथिंबीर घालून झाकून देढाजवळ वांगं शिजेपर्यंत शिजवावं.

bharali-vaangi-maayboli-4.jpg

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे३-४ माणसांना पुरेल.
अधिक टिपा: 

*कच्च्या आलं-लसणाचा, कांद्याचा वास येत नाही.

*चिंचगुळाची आंबट्-गोड चव येईल इतकं चिंच-गूळ घालायचं नाही. अगदी जरासं प्रमाण वांग्याच्या कडवटपणा घालवायला पुरतं.

*डाळ्यांमुळे रस्सा घट्ट आणि एकजीव होतो. पाणी-मसाले असं वेगळं होत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे. मी असंच करत आलीय भरली वांगी (डाळं व आलं सोडून).. अजुन कशी करतात मग भरली वांगी??
फोटो भारी आहे ! लाळागाळू! Happy

मस्त Happy

मी नेहमी अशीच भाजी करते. (काळा मसाला+तिखट वापरून अर्थात.) छोट्या कुकरमधे. तेलही कमी लागतं. १ वांगं - १ टी-स्पून तेल.
वांग्यांवर उरलेला मसाला टाकला, की त्यात चिमूटभर कसुरी मेथी टाकते. मस्त स्वाद येतो.

मी परवा तुझ्या कमी (?) कटकटीच्या रेसिपीची भरली वांगी केली. मस्त झाली. वर्थ द कटकट! फक्त सगळा माल मसाला एकत्र केल्यावर भरपूरच झाला आणि तिखटपणा कमी पडला पण झणझणीत न झाल्याने मुलिंनी पण नीट खाल्ली.
पण मी तेल १ वाटीच घातलं , ते घालताना पण हात कापत होता.
धन्यवाद!

अजुन एक सोपि आयडिया म्हणा़जे आवडिचा मसाला वापरुन वा.न्गी भरुन घ्यावी, कुकरच्ब्या डब्यात रचुन एक- दोन शिट्ञाआ घ्याव्या, फोड्णित कधिपत्ता , लसुण पर्तुन मिनिट्भराने वा.न्गी टाकावी, जरा कलसुन उकळिचे पानी टाकायचे.. ५ मिनिटात भाजी खायला घ्यावी.

धन्यवाद मंडळी.

गोगा, आवर्जून कळवल्याबद्दल थँक्यू! Happy

प्रिती, आई हाच मसाला वांग्यात भरण्याआधी सोडे तेलात किंचित सवताळून मसाल्यात घालते. तिला जवळ्याचं पण सांगेन.

आई कांदा, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, तिखट, मीठ, चिंच, गूळ आणि गोडा मसाला असा भरून करते भरली वांगी. मी नुसता तो कालवलेला मसालासुद्धा वाटीत घेऊन खात असे त्याची आठवण झाली तुझे फोटो बघून! Happy

मृण्मयी, कितीदा अशा प्रकारे भाजी केली.छान रेसिपी.माझ्या बाईने तर दुसरीकडे ही भाजी करून त्यांची वाहवा मिळवली आहे. आता त्या घरी भिशी,पार्ट्या वगैरे असतील त्या त्या वेळी इतर स्वयंपाकाबरोबर ही भाजी असतेच असं बाई म्हणे!

Pages