
भरली वांगी म्हंटली की ती करायला लागणारा वेळ, वाटलेले मसाले, कांदे भाजणं, वाटणं असे बरेच प्रकार आठवून करायचा कंटाळा येतो. आई बर्याचदा तासाभरात अत्यंत चवदार भाजी करते. ती पाककृती इथे देतेय.
१० जांभळी वांगी. शक्य तितकी कोवळी आणि आकाराला लहान.
२ मोठे कांदे- शक्य तितके बारीक चिरून
१५-१६ लसूण पाकळ्या - बारिक चिरून
४ पेरं आल्याचा तुकडा - सालं काढून बारिक किसलेला.
घरात जो कुठला तयार मसाला असेल तो. (दाक्षिणात्य सांबार्-रसम आणि तत्सम मसाले सोडून), मी सावजी मटण मसाला वापरलाय.
१ वाटी डाळं
१ वाटी शेंगदाणे
पाव वाटी तीळ
मीठ
तिखट
चमचाभर धणेपूड
वाटीभर पावटे किंवा मटरदाणे
३ वाट्या तेल
१ मोठा चमचा चिंच कोळ.
एक गुळाचा खडा
भरपूर कोथिंबीर
* डाळं, शेंगदाणे एकत्र करून भाजून घ्यावे.
* भाजताना शेवटली १-२ मिनिटं उरली असताना तीळ घालून भाजावं. २ मिनिटात गॅस बंद करून दाणे-तीळ-डाळं थंड होऊ द्यावं. गार झाल्यावर मिक्सरातून पूड करून घ्यावी.
*बारिक चिरलेल्या कांद्यात ही पूड, मसाले, चिंच गूळ, तिखट घालून नीट मिसळून घ्यावं
*वांग्यांना + चिरा देऊन मसाला वांग्यात भरावा.
*तेल गरम करून त्यात वांगी सोडावी. उरलेला मसाला सरळ वांग्यांवर ओतावा.
*हलक्या हाताने ढवळून कमितकमी १०-१५ मिनिटं झाकण न ठेवता शिजू द्यावं.
*उकळीचं पाणी घालून रस्सा हवा तितका पातळ करून घ्यावा.
*मटरदाणे आणि चिरलेली कोथिंबीर घालून झाकून देढाजवळ वांगं शिजेपर्यंत शिजवावं.
*कच्च्या आलं-लसणाचा, कांद्याचा वास येत नाही.
*चिंचगुळाची आंबट्-गोड चव येईल इतकं चिंच-गूळ घालायचं नाही. अगदी जरासं प्रमाण वांग्याच्या कडवटपणा घालवायला पुरतं.
*डाळ्यांमुळे रस्सा घट्ट आणि एकजीव होतो. पाणी-मसाले असं वेगळं होत नाही.
काय फोटो आलाय! जबरी!
काय फोटो आलाय! जबरी!
वा मृ, फोटो, रेसिपी छान आहे!
वा मृ, फोटो, रेसिपी छान आहे! (पण तरी मेहेनत आहे बुवा बरीच!)
(इकडे मिळणारी वांगी मात्र मला अजिबात आवडत नाहीत .. केव्हढाल्या बिया त्यात, गर नाहीच जवळजवळ!)
(भला मेरे आई की कृती और भी सोपी कैसे?
ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, कोथींबीर .. मिक्स करा, वांग्यात भरा, तेलावर परतून शिजवा .. भरली वांगी तयार! :))
यम्मी! फोटो एकदम खास!
यम्मी! फोटो एकदम खास!
सशल +१ ३ वाट्या तेलाने जीव
सशल +१
३ वाट्या तेलाने जीव दडपला खरं सांगायचं तर.
जबरी. नक्की करुन बघणार
जबरी. नक्की करुन बघणार
ही कमी कटकटची... कोणी आयती
ही कमी कटकटची... कोणी आयती खायला घातली तरच.
फोटो मात्र खतरा आहेत.
माहितीचा स्त्रोत फार आवडला
माहितीचा स्त्रोत फार आवडला
जबरी तोंपासु फोटो आहे!!
जबरी तोंपासु फोटो आहे!!
रेसिपी भारी, फोटो खतरी. (इकडे
रेसिपी भारी, फोटो खतरी.
(इकडे मिळणारी वांगी मात्र मला अजिबात आवडत नाहीत .. केव्हढाल्या बिया त्यात, गर नाहीच जवळजवळ!) >>> मला वाटलंच सशल असं काही तरी लिहिणार
मी दिलेल्या कृतीवर पण तुझी अशीच पोस्ट आहे 
मस्तच.
मस्तच.
वोह ...काय जबरदस्त दिसतेय ...
वोह ...काय जबरदस्त दिसतेय ... तोंपासु ... फोटोतुन डायरेक्ट ताटात आली तर .. गरम गरम भाकरी बरोबर ताव मारला असता
कातील...
कातील...
कसली टेम्प्टिंग दिसतायत ती
कसली टेम्प्टिंग दिसतायत ती भरली वांगी.
सशलने लिहीलंय तीच पद्धत माझीही.
फायनल प्रॉडक्ट जबरी दिसतय
फायनल प्रॉडक्ट जबरी दिसतय एकदम
मस्तं रेसिपी. १-२ दिवसांत
मस्तं रेसिपी. १-२ दिवसांत करुन बघणार.
जबरदस्त फोटो आहे. आता वांगी
जबरदस्त फोटो आहे. आता वांगी मिळाली की हीच पद्धत वापरणार. नुसत्या मसाल्याचा फोटो पाहून भरल्या भेंडीच्या कृतीची आठवण झाली.
मन:स्विनीने लिहिली होती ती
मन:स्विनीने लिहिली होती ती कृती.
अवांतर.
अवांतर.
ज ह ब ह रा ह ट !!! मला
ज ह ब ह रा ह ट !!!
मला आत्ताच्या आत्ता ही भाजी खावीशी वाटतेय
. माझ्या आईची कृती सशलने लिहिलीये तशीच . सासूबाई मात्र कांदा लसूण परतून तो मसाला भरतात . तशी सुद्धा मस्त लागते . कच्चा कांदा अजून वापरून बघितला नाहीये , पुढच्या वेळी हीच रेसिपी वापरणार
.
" टिपीकल नागपुरी फोटो आहे "
, असा आमच्या ह्यांचा रीमार्क आलाय हो . ( तू केल्याचं सांगितल्यावर " तर्रीच " असं म्हणण्यात आलंय
)
ज्ञाती, कृपया विचारपूस बघा.
ज्ञाती, कृपया विचारपूस बघा.
हा सावजी मटण मसाला उसगावातील
हा सावजी मटण मसाला उसगावातील इं. ग्रो. मधे मिळतो का ?
>>३ वाट्या तेलाने जीव दडपला
>>३ वाट्या तेलाने जीव दडपला खरं सांगायचं तर.
शूम्पे, वाट्या म्हंटल्यावर बहुतेक वरणाची मोठी वाटी तुझ्या डोळ्यांसमोर आली. मी तिथे मेजरिंग कप लिहायला हवंय. तरी पार्टीसाठी करायची म्हणून १० वांग्यांच्या मापानं घातलेलं इतकं तेल भरपूर होतंच. एरवी कमी तेलात आणि प्रेशरकुक करून देखिल भाजी चांगली होते.
शुगोल, सावजी ब्रँड नाही, पण इतर ब्रँडांचा मटण मसाला मिळतो.
वाट्या म्हंटल्यावर बहुतेक
वाट्या म्हंटल्यावर बहुतेक वरणाची मोठी वाटी तुझ्या डोळ्यांसमोर आली>> होहो खरच आली.
एरवी कमी तेलात आणि प्रेशरकुक करून देखिल भाजी चांगली होते.>> मग मी नक्की करीन! म्हणजे प्रेशरकुक नाही पण कमी तेलात
कास्ट आयर्न स्किलेट मध्ये घालून अव्हन मध्ये शिजवली तर?
कल्पनेच्या भरार्या जास्ती होताहेत का?
छान प्रकार. फोटोही
छान प्रकार. फोटोही सुंदर.
माझा यापेक्षाही एक सोपा प्रकार आहे चांगली वांगी मिळाली तर लिहिन इथे.
चांगली युक्ती, स्किलेटमधे बेक
चांगली युक्ती, स्किलेटमधे बेक करून चांगलं लागलं तर कळव. आलं-लसूण न घालता केलं तर उग्र वास न जाण्याची भानगड नाही.
बरेच सोपे प्रकार आहेत. कोरडा मसाला आणि रोस्टेड डाळीचं पीठ घातलेली भरली वांगी पण मस्तं लागतात.
दिनेश, रेसिपी येऊ द्या.
मस्त फोटो. माझी रेसिपी
मस्त फोटो. माझी रेसिपी याहीपेक्षा सोप्पी आहे खरंअतर.
कांदा किसून त्यात गूळ, दाण्याचं कूट, गोडा मसाला, हवी असल्यास आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, भरपूर कोथिंबीर वगैरे मिक्स करुन घ्यायचं आणि भरायचं वांग्यात. मग नेहमीप्रमाणेच भाजी करायची.
मस्त फोटो आहे..मला वाटतं, असा
मस्त फोटो आहे..मला वाटतं, असा मसाला बाकी भाज्यांमधे वापरायला हरकत नाही.
घरी असलेल्या डाळ्या संपतील तरी
मस्त फोटो. वांगी वीक पॉइंट
मस्त फोटो. वांगी वीक पॉइंट आहे सो करुन बघणारच.
आम्ही शेंगदाण्याचा कुट ,मसाल्याच तिखट, लसून , कडीपत्ता ,खोबर वगैरे वापरुन करतो. रेसीपी टाकणार आता.
आवडली रेसिपी
आवडली रेसिपी
तोंपासु मस्त भाजी!
तोंपासु मस्त भाजी!
Pages