गवारीची चवदार चटणी

Submitted by Geetanjalee on 23 April, 2012 - 07:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गावरान कोवळी गवार, कड़ी पाला , लसूण, शेगादाण्याचा कूट, तेल , मीठ , मिरची , हिंग , जिरे , साई खालचे दही ( आंबट नको )

क्रमवार पाककृती: 

एकदम कोवळी ( बिईया तयार न झालेली )गवार, मिरची तेलावर खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या .
दह्यात कालवून वरून मोहरीची फोडणी द्यावी....चवीपुरता साखर घालावी.
अतिशय चवदार लागते

अधिक टिपा: 

आजी

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच करून पाहिली. उत्तम रेसिपी ! बायकोच्या सल्ल्यावरून गवार,मिरची खरपूस तळल्यावर कडीपत्ताही त्यांतच थोडा परतून घेतला होता. [ खरं तर, दही न घालताही चव घेतली तीही छान होती ! ]. धन्यवाद.