४ वाट्या नारळाचं दूध.
१ वाटी कैरीचा कीस (आंबटपणाचा अंदाज यावा म्हणून चाखून बघावी.)
४-६ तिखट हिरव्या मिरच्या
२ पेरं आलं
५-६ लसूणपाकळ्या
१ लहान चमचा जिरं
१ वाटी चणाडाळ
१ मोठा चमचा धणेपूड
१ मोठा चमचा काश्मिरी तिखट
१ चमचा तिखट
१ लहान चमचा हळद
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
चमचाभर साजुक तूप
६-७ कढिलिंबाची पानं
तळायला तेल (किंवा गोळे उकडायला / वाफवायला पाणी.)
फळं:
चणाडाळ ४-५ तास भिजत घालावी
भिजलेली डाळ, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, धणेपूड, मीठ, हळद, तिखट एकत्र करून शक्य तितकं कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.
या डाळीचे सुपारीएवढे गोळे करून तेलात खरपूस तळून घ्यावे. (गोळे फार घट्टं वळू नयेत. वाटलेली डाळ नीट फेटून घेतली आणि अलगदपणे गोळे वळले तर दडस होणार नाहीत.)
तळण टाळायचं तर हे गोळे चाळणीवर १०-१५ मिनिटं वाफवून किंवा उकळत्या पाण्यात शिजवून घेता येतील.
आमटी:
नारळाचं दूध आणि सालं काढून किसलेली कैरी एकत्र करून बारीक वाटून घ्यावं.
कढत तुपात जिरं तडतडवून गोडलिंबाची पानं घालावी.
वाटण फोडणीत ओतून उकळी आणावी. चवीनुसार मीठ (आंबत वाटल्यास साखर) घालून उकळू द्यावं. साराइतपत पातळ करायला थोडं आधणाचं पाणी घालावं.
गोळे आमटीत सोडून आणखी एक उकळी आणावी.
गरम भाताशी ओरपावं.
आमटीतले गोळे अत्यंत झणझणीत होतील. तेव्हा भातावर घेताना पोटाच्या ऐपतीनुसार गोळे फोडून आमटीत कुस्करावे.
आमटीत जितके गोळे कुस्कराल तितकी ती तिखट होत जाणार. जपून खावी. कर्माची फळं...
नाव वाचून वाटलं की हे पण
नाव वाचून वाटलं की हे पण पाकृचे विडंबन आहे की काय
>>
भुंग्स की बदोलत
ट्रायल बाय फायर, दुसरं काय?


>>
कुणी घरी जेवायला आलं असेल तर मेनू काय या प्रश्नाला "कर्माची फळं" हे नाव भारीये.
>>
आईला सांगते करुन द्यायला आता
कस सुचलं हे नाव??>>>> 'आमटीत
कस सुचलं हे नाव??>>>> 'आमटीत जितके गोळे कुस्कराल तितकी ती तिखट होत जाणार. जपून खावी. कर्माची फळं...' या वाक्यात उत्तर लपले आहे असे वाटते.
अगदी तोंपासु आहे पदार्थ. मस्त.
प्राची, लवकर झोपण्यासाठी रोज
प्राची,
लवकर झोपण्यासाठी रोज ओरडा बसतो मला. चोरुन वाचत होते माबोवर तर तुझ्यामुळे पकडले गेले ना. कसली हसले मी बदाबदा. 
आज केली, मस्त मस्त झाली
आज केली, मस्त मस्त झाली कर्माची फळं
ते नारळाचं दूध आणि कैरी हे कॉम्बिनेशन खरंच अफाट
तिखट जरा बेताने टाकले बाकी,पुढच्या वेळेला अजून झणझणीत करणार
प्रचंड धन्यवाद मृण्मयी,या रेसिपीसाठी 
कसली भारी आहे पाकृ. सध्या
कसली भारी आहे पाकृ. सध्या भरपुर कै-या येताहेत बाजारात. त्यामुळे करुन बघणे आवश्यक.
मृण्मयी, प्राची, कळलं कळलं
मृण्मयी, प्राची,
कळलं कळलं नावाचं गुपित 
मा कर्मफल हे... मी केलेली
मा कर्मफल हे...
मी केलेली कर्माची फळे.
फळे "सकस" वडे भरडीची केली आहेत. त्यात बाकी सांगितलेले जिन्नस घातले. वाफवून मग लंगडीत शॅलो फ्राय केली (चिकटू न देता) आणि बाहेर काढली. त्यातच फोडणी करुन पुढचे कर्म केले. कैरी वाटताना एक मिरची, थोडी कोथिंबीरही घातली आहे.
मस्तं फोटो लोला! तुमची
मस्तं फोटो लोला! तुमची कर्माची फळं सुपरसात्त्विक आहेत!
आवडली कल्पना! फळं तिखट नको असली तर आमटीत मिरची/आलं/ जिरं घालून बघायला हवं.
कर्माची फळं ही रेसिपी केलीत
कर्माची फळं

ही रेसिपी केलीत तर प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं मिळतील .
मृ मस्त झाली होती. चविला मला
मृ मस्त झाली होती. चविला मला ही कोकण्-विदर्भ फ्युजन रेसिपी वाटली.
नारळ आणि चणाडाळ म्हणून.
ती फळं नारळाच्या ग्रेवी मधे कुस्करून खाल्ल्यावर पदार्थ जास्त चविष्ट लागत होता.
हह, काय सुंदर शेपचे बोल्स
हह, काय सुंदर शेपचे बोल्स आहेत ग. फोटो मस्त दिसतोय.
हह, फारच देखणा फोटो! फळं
हह, फारच देखणा फोटो! फळं नुस्तीच खाविशी वाटताहेत. भांडी पण कसली सुंदर आहेत!
मुळात करीला काही खास चव नव्हती. (कदाचित इथल्या बेचव कैर्या आणि कॅनमधल्या नारळाच्या दुधामुळे असेल.) पण फळं आणि रस्सा मिळून चांगलं लागलं.
एचेच, काय सुरेख दिसताहेत
एचेच, काय सुरेख दिसताहेत कर्माची फळं! (मृ, नाव बदल गं पाकृचं...
)
भारी वाटतोय हा
भारी वाटतोय हा प्रकार!
भोगणारच एकदा कर्माची फळं
कर्मफळांचं उदंड पीक आलंय जणू!
कर्मफळांचं उदंड पीक आलंय जणू!
मस्त आहेत सगळ्यांच्या कर्माची फळं.
ही माझी कर्मफळं मी खूप
ही माझी कर्मफळं
मी खूप झणझणीत केली नाहीत. भिजवलेली चणाडाळ फक्त हिरव्या मिरच्या आणि धणे-जिर्याची पूड घालून वाटली आणि गोळे खरपूस तळले. मी नेहमी आंब्याची कढी करते तशी करून त्यात ते तळलेले गोळे सोडले. मस्त चविष्ट झाला होता पदार्थ
सही दिसताएत सगळ्यांच्या
सही दिसताएत सगळ्यांच्या कर्माची फळं
मंजूडे, मस्त आणि सात्त्विक
मंजूडे, मस्त आणि सात्त्विक दिस्ताहेत कर्मफळं!
कृपया आंब्याच्या कढीची पाककृती देणे.
केव्हाच दिली आहे तिने.
केव्हाच दिली आहे तिने.
एच्चेचचं फूड स्टायलिंग भारी
एच्चेचचं फूड स्टायलिंग भारी आहे. भांड्यांचा आकार, खालची प्लेस मॅट, मागचा चमचा सगळं एकदम पर्पजफुल!
सगळ्यांचे मस्त मस्त फोटो पाहून करून बघण्याचा मोह होत आहे.
काल केली आणि चाखली आमच्या
काल केली आणि चाखली आमच्या कर्माची फळं! चविष्ट लागली
कृती बघितल्यापासून करायची होतीच. काल योग आला. ते तळलेले गोळे नुसतेच खाताना इतके तिखट नाही लागले, पण कढी-भाताबरोबर खाताना झणझणीत! ते कसं काय ते कळलं नाही. कर्माचे भोग झालं!
इथल्या सुगरणींनी सुंदर सुबक भांड्यात कर्माची फळं काढून घेऊन फोटो काढले आहेत, तेव्हा मी ते कष्ट घेतले नाहीत
ववि २०१४ च्या आठवणी
ववि २०१४ च्या आठवणी
Pages