ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!
मी चक्रावलो. खाण्यात बदल नाही. जंक फुड -कोल्ड्रिंक्स-हॉटेलिंग वगैरेंना फाट्यावर मार देऊनही हे असं कां ते कळेना! ऑगस्ट २०११ - वजन ७३ किलोवर गेलं. आता स्वतःमध्ये होणारे बदल टिपायला सुरुवात झाली होती. यावर्षी अॅसिडीटीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती, केस गळायला सुरुवात झालेली.., सूर्य वर येतांना मानेकडून वरपर्यंत डोकेदुखीही चढत यायची. ..अशी अवस्था! बरं, अॅसिडीटीवर आजूबाजूला कोणाला सल्ला विचारणार? डॉक्टरांपासून सगळेच जाडजूड! ..आणि प्रत्येकजण सल्ला देतांना दुसर्या कोणाकडून तरी ऐकलेला किंवा डॉकने दिलेला सल्ला पुढे सुपुर्द करायची. आता चाळीशीत आलायस,.. असं चालायचंच आता हळूहळू! वगैरे नकारात्मक रडे सल्ले तर खूपच!! ..आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला, पेक्षा घरातल्या प्रत्येकाला तरी!!
* * *
ऑक्टो. २०११ मध्ये दिवाळीच्या आधी एका मित्राने त्याच्याकडे बोलावलं.- '.. मुंबईचे एक माधव जोशी म्हणून एक न्युट्रीशिअन आहेत. .त्यांचं १ तासाचं आहार व आरोग्य या विषयावर बोलणं आहे, तेव्हा तू ये. ' म्हटलं येतो. गेलो. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कांय खावे यापेक्षा कांय खाऊ नये आणि ते कां खाऊ नये हा भाग स्पष्ट केला. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
६ गोष्टी पुर्णपणे बंद करा, पेक्षा गटारात फेका.
१) साखर २) चहा/कॉफी ३) सर्व बेकरी पदार्थ ४) रिफाइंड तेल ५) लोणचं ६) पापड. आणि हे कां खाऊ नका हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विषद केलं त्याकडे नंतर येऊच..!!
मी मुळांत प्रचंड गोड खाणारा. मस्तपैकी लालसर होईपर्यंत खरपूस भाजलेल्या बेसनाचा एक लाडू मी कधीच खाल्लेला नाही.. एकावेळी जोडी लागायची.
साहजिकच माझ्या मर्मावरच हा माणूस घाला घालतोय म्हटल्यावर मी व्याख्यानानंतर अर्धा-पाऊण तास या न खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्याशी काथ्याकूट केला, विशेषतः साखरेवरुन! त्यांनीही माझे समाधान होईपर्यंत व्यवस्थित उत्तरे दिली पण जीभेच्या मेंदूचे काही समाधान होत नव्हते.
माझे बॉडी पॅरॅमिटर्स काढले. बहुतेक सगळे सीमारेषेवर.. ओलांडली नसली तरी माझ्यासाठी तो धक्काच होता.
झालं! त्या मिनिटाला मी साखर, चहा/कॉफी, सगळे बेकरी पदार्थ, लोणचे व पापड यांना माझ्या जीभेपासून तलाक दिला. रिफाईंड तेलावर माझा डायरेक्ट कंट्रोल नसल्याने त्याला शक्य तितके नाही या वर्गात ठेवले.
घरी आल्यावर हा निर्णय सांगितला. माझ्यापुरता मी पाळणार, तुम्हांला त्रास नाही असं जरी सांगितलं तरी माझ्या या निर्णयाचा घरात कुठेतरी परिणाम होणार होताच. दिवाळीचा सगळा फराळ घरात तयार होता. पण तिथे मी जीभ जिंकली. हे पदार्थ पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन दिवस डोकेदुखीचा प्रचंड त्रास झाला. आता या त्रासाचं शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. दिवाळी संपल्यावर मी आधी किती साखर/ गोड खायचो ते उरलेल्या पदार्थांवरुन लक्षात येतच होते. खरा त्रास कंपनीत होणार होता. सर्व सहकार्यांबरोबर दिवसभरांत त्यांच्या चहाच्या वेळी, जेवतांना त्यांना माझी बाजू समजावून सांगतांना पार कावायला व्हायचं. कारण याचा नेमका परिणाम कांय नी कधी माहित नव्हतं. कॅलेंडरच्या तारखेवर पहिल्या दिवसापासून 'खाल्ले नाही' म्हणून फुली मारायला लागलो. सलग फुल्यांचे दिवस वाढत गेले तशी स्वतःशी कमिटमेंट पक्की होत गेली. बाकी माझ्या जेवणांत काही बदल नव्हता. जॉगिंगही नियमित सुरु होते.
४३ वा दिवस. मी बाबांना (वडीलांना) घेऊन नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिथल्या वजनकाट्यावर वजन केलं. ७१ किलोग्रॅम.....!! आनंदाने उडीच मारली. आधी माधव जोशींना फोन लावला. ते हसत म्हणाले.."उतरवली की नाही तुझी चरबी..!! नुसत्या या ६ गोष्टी बंद करुन एवढा फरक पडला, आता मी सांगेन तसं खायला लागल्यावर तुझी घडी नीट बसेल की नाही बघ..परवा नाशिकला येतोय, तेव्हाच तुझे पॅरामिटर्स काढूया! " मलाही त्याबद्दल जाम उत्सुकता लागली. ते आल्यानंतर पॅरॅमिटर्स काढले, ते खाली देतोय. कंसामध्ये नंतरचे म्हणजे पहिल्या ४५ दिवसांत बदललेले पॅरामीटर्स. आता तर आणखी सुधारीत आहेत.
वजन- ७५.४ (७०.९)
चरबी %- २६ (२१.२)
स्नायू %- ५३ (५२.८)
पाणी %- ५२ (५६)
व्हिसरल फॅट %- ९ (७)
मेटॅबोलिक वय- ५५(४०)
फिजिक रेटींग- २ (५)
बोन मास- २.८ (२.८)
यावेळी त्यांना प्रश्न केला की एका महिन्यांत एकदम ४.५ किलो वजन कमी होणं कितपत योग्य, त्यांवर "ही अनावश्यक चरबी गेलीय. आता यापुढे १ किलोसाठीसुद्धा तुला किती घाम गाळावा लागेल हे लवकरच कळेल तुला!" असं सांगून त्यांनी स्नायू वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि शिफ्टच्या वेळेप्रमाणे कसा आहार घ्यायचा ते सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा जिन्नस वाण्याच्या दुकानांत व भाजी मंडईत मिळणारा. आता सध्या मी या ६ गोष्टी+प्रिझर्वेटीव्ज्+कृत्रिम रंग असलेले पदार्थ टाळूनही मस्त चमचमीत खातोय. अगदी गोडासकट. कारण साखरेऐवजी सेंद्रिय गूळ, रिफाइण्ड तेलाऐवजी घाण्याचं किंवा फिल्टर तेल, चहाऐवजी गुजराथी लोकांकडे असतात ते उकाळे वापरायला हरकत नाही असं माधव जोशी सांगतात. पण हे ऑप्शनसुद्धा कशाला हवेत तर शेवटी आपल्याला हे आजीवन पाळायचे आहे म्हणून. माझ्या बदललेल्या पॅरामीटर्सचा कागद पाहून आता माझ्या कुटुंबातच कांय, पण गंमत करणार्या सहकार्यांनीही या गोष्टी पाळायला सुरुवात केली आहे व त्यांनाही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. माझ्या एका पन्नाशीच्या मधुमेही व गोळ्या सुरु असलेल्या सहकार्याची उपाशीपोटी साखर नेहमी १५० ते १६० यायची. त्याने या गोष्टी वर्ज्य केल्यावर एका महिन्यांत ती ११८ पर्यंत उतरली. त्याला आता डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस परत नीट ठरवण्यासाठी बोलावणे केले आहे. त्याचेही बाकी खाणे व्यवस्थित सुरु आहे.
माझी अॅसिडीटी पहिल्या १० दिवसातच गेली. वजन ६७ वर स्थिर आहे. आता थोडे वजन वाढवायचे आहे पण स्नायूंचे.
वाढलेल्या ढेरीचे आता सपाट पोटांत रुपांतर झाल्याने Rock Climbing चा आता मी पुन्हा आनंद घ्यायला लागलो आहे. उर्जा क्षमता (एनर्जी लेव्हल) खूप वाढली आहे. एकूण सध्या आरोग्यदायी चाललंय!
आता या माधव जोशींबद्दलची थोडी माहिती देतो...
श्री. माधव जोशी बँकेत नोकरीला होते. रसायनशास्त्राचे पदवीधर. १९८२ च्या सुमारास ते नाना पालकर स्मृती समितीत रुग्णसेवा करत असत. त्यावेळी अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि त्यामुळे ग्रस्त त्यांचे कुटुंब बघून आपण कधीच 'रुग्ण' व्हायचे नाही अशी खुणगाठ त्यांच्या मनाशी बांधली गेली. पण...वयाच्या पन्नाशीच्या आधीच गुडघे, कंबर व पाठ्दुखी सुरु झाली. साहजिकच डॉक्टरांनी बरीच बंधनं घातली. आरोग्याचा शोध घेता घेता स्वतःच अनारोग्याच्या मार्गाला लागले. आपले आरोग्य परत मिळवण्यासाठी त्यांनी नाना तर्हेचे सगळे उपाय करुन पहिले पण तात्पुरता परिणाम दिसे, परत ये रे माझ्या मागल्या किंवा आणखी काही तरी नविन उद्भव! योगासने, रेकी, आहारशास्त्र, निसर्गोपचार, प्राणायाम, कपालभाती या सगळ्या गोष्टींचा प्रयोगशील अभ्यास या दरम्यान झाला. सरतेशेवटी ते एका निष्कर्षाप्रत आले, तो म्हणजे आपल्या रक्ताचा पी.एच.
त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
"आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या रक्ताच्या ७.४ या पी.एच. शी आहे. पी.एच. म्हणजे power of hydrogen. म्हणजे एखाद्या द्रवातील हायड्रोजन आयनची संख्या. ते ० ते १४ या रेंजमध्ये मोजलं जातं. '०' ph म्हणजे अत्यंत अॅसिडीक- '७' ph म्हणजे उदासिन आणि '१४' ph म्हणजे अल्कली. आपल्या रक्ताचा ph '७.४' म्हणजे किंचित अल्कली आहे. आपल्या शरीरात चालू असलेल्या चयापचय व श्वसन क्रियेमुळे रक्ताचा ph सतत प्रभावित होत असतो. ph कमी झाला तर त्याला अॅसोडोसिस म्हणतात. जास्त झाला अल्कलॉसिस म्हणतात. पैकी आपण अॅसिडोसिसचाच विचार करुया. या प्रकारात ph कमी होऊन अॅसिडचं प्रमाण वाढतं. निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या असंतुलनाला नियंत्रित करण्यासाठी निसर्गानेच शरीरात पुरेशी व्यवस्था केलेली असते पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या अंसंतुलनात बरीच भर टाकत असतो, ती अशी-
१- अॅसिडोसिस निर्माण करणारं अन्न (मांस, मासे, अंडी, डाळी, धान्ये) यांचा अतिरेक व दूध, फळे, भाज्या, मोड आलेली धान्ये, नाचणी या अल्कली अन्नाचं कमी सेवन.
२- साखर, वनस्पती तूप, शितपेयं, चहा, दारु, तंबाखू यांचं सेवन
३- अॅसिडोसिस निर्माण करणारी औषधे सेवन
४- प्रिझर्वेटिव्ज, कृत्रिम रंग असलेलं अन्न सेवन
आणि इथे गडबड होते.
आता साखर कां नको?
साखर कशी बनते हे सामान्यपणे कुणालाही माहित नसतं. साखरेमध्ये तिच्या पचनासाठी लागणारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरस हे ३ घटक नसतात. उसाच्या रसात किंवा सेंद्रिय गुळांत ते असतात. उसाच्या रसाची ज्यावेळी साखर बनवतात त्यावेळी त्यांत फॉर्मल डिहाईडसारखी घातक रसायने मिसळली जातात. यामुळे हे ३ घटक साखरेतून नष्ट होतात. अशी साखर पोटांत गेल्यावर पचनासाठी लागणारे हे घटक आपल्या शरीरातून घेतले जातात. उदा. कॅल्शिअम हाडांतून नाहीतर दातांतून घेतले जाते. परिणामी हाडे/ दात लवकर ठिसूळ होतात. मात्र एवढा उपद्व्याप करून साखरेपासून शरीराला काहीही फायदा मिळत नाही. कर्बोदके इतर खाण्यातून मिळतातच की!
आपल्या जेवणात ८०% अॅसिडीक व २०% अल्कली पदार्थ असतात. ते प्रमाण उलट करायचं म्हणजे २०% अॅसिडीक व ८०% अल्कलाईज्ड. ते कोणते ते वर १ नं.च्या मुद्द्यांत आलं आहेच. "
माधव जोशींनी या विषयावर 'सात पुर्णांक चार दशांश' या नांवाचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. त्यांतही या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.
तळटीपः लेख थोडा विस्कळीत वाटेल. अनुसरुन बरेच विषय आहेत. थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न केलाय. या विषयांतील अनेक तज्ञ इथेही आहेत. त्यांच्याही सूचना/ मार्गदर्शन मिळेल. उदा. इथे उल्लेखलेल्या आहारासंबंधी, साखर-रिफाइण्ड तेल कसे बनते? त्यांत रसायने मिसळतात कां? त्यांचा शरीरावरील परिणाम वगैरे माहिती.
रमा मधुमेहि रुग्णांनी
रमा
मधुमेहि रुग्णांनी आपल्या आहारात स्टार्च पदार्थ मर्यादित प्रमाणात ठेवणे ईष्ट !!
१०० % अनुमोदन
रमा उत्तम पोस्ट! पण वर
रमा उत्तम पोस्ट!
पण वर मास्तुरेंना पडलेला प्रश्न मलाही आहे.तांदूळ भाजून घेऊन भात करायला सांगतात ते कशासाठी?
रमा तुझ्या पोस्टीची मी वाटच
रमा तुझ्या पोस्टीची मी वाटच पहात होते
लिहिल्याबद्दल धन्यवाद
रमा, छान उलगडून सांगितलत.
रमा, छान उलगडून सांगितलत. खुपच उपयुक्त माहिती! धन्यवाद!
पुर्वा, शुम्पि आणि वैद्यबुवा
पुर्वा, शुम्पि आणि वैद्यबुवा धन्यवाद
पुर्वा,
माझ्यामते तरी तांदुळ भाजुन घेण्याच कारण भात मोकळा होतो एवढच असाव अस केल्याने मधुमेहा च्या दॄष्टिने काहि फायदा असेल मला वाटत नाहि.
एक आनंदची बातमी. माधव जोशी
एक आनंदची बातमी. माधव जोशी देखील माबो कर झाले आहेत. आय डी- madhavdada.
प्रिय हेमंत, माझे
प्रिय हेमंत,
माझे 'आरोग्यानुभूती' शिबिर केल्यानंतर तुझ्या लेखामधून व्यक्त केलेले तुझे अनुभव व त्यांवरील प्रतिक्रिया वाचल्या. या संदर्भात आरोग्याविषयी सजग असलेल्या सभासदांशी संवाद साधण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्दयांच्या संदर्भात तसेच तुझ्या लेखात अंतर्भूत नसलेल्या काही महत्त्वाच्या मुद्दयांबाबतसुद्धा चर्चा करण्याची इच्छा आहे. या संदर्भात, तसेच एकूणच गेली ४ वर्षे मी करीत असलेल्या कामासंदर्भात मी एक निवेदन खालच्या प्रतिसादात देत आहे. मायबोलीकरांचे छोट्या छोट्या गटांमध्ये गटग करून या विषयाचे मंथन झाल्यास आरोग्याकडे पहाण्याचा नविन पैलू समोर येईल. ज्यांना या गटगमध्ये सामिल व्हायची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा, ज्यायोगे आपल्याला ठिकाण- दिवस- वेळ ठरवता येईल. माझा फोन नं. ९८६९४७३४२२ संपर्क- madhavjoshi02@gmail.com
- माधव जोशी
कांदीवली (पू), मुंबई.
हेम लेख छान आहे.
हेम लेख छान आहे. धन्यवाद.
माधव जोशी तुमचे इथे स्वागत आहे.
तुम्ही आहारात आवळा जरुर समाविष्ट करा. दीर्घकाळ त्याचे फायदे मिळतात.
निवेदन. सप्रेम नमस्कार, २१
निवेदन.
सप्रेम नमस्कार,
२१ व्या शतकांत सर्वच क्षेत्रांत नेत्रदिपक वैज्ञानिक प्रगती होऊनसुद्धा सदोष आहार, प्रदुषण, ताण-तणाव यामुळे निरोगी माणूस दुर्लभ होत चालला आहे. मधुमेह, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब यांसारखे विकार, सर्दी, खोकल्याप्रमाणे सामान्य वाटायला लागले आहेत. २०५० साली आपला भारत महासत्ता होण्याचा संकल्प हवेतच विरणार की कांय अशी शंका येऊ लागली आहे.
मी स्वतः चुकीचा आहार, चुकीच्या सवयींमुळे अनेक तक्रारींनी त्रस्त होतो. उदा. वजनवाढ, केसगळती, गुडघेदुखी, कंबरदुखी, अॅसिडीटी.....! गेली ३० वर्षे विविध प्रयोग करून या त्रासांतून मी पूर्ण मुक्त झालो आहे. या प्रवासाचं सूत्र ' रक्ताच्या pH चं संतुलन व धन्वंतरीयोग' हे असून माझा आरोग्यानुभूतीचा अनुभव माझ्या 'सात पुर्णांक चार दशांश- एक आरोग्यानुभूती' या पुस्तकांत नमूद केला आहे व व्याख्यानं - शिबिरं यांच्या माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचवतो.
१) व्याख्यानः कालावधी २ तास
विषय- माझे आरोग्याचे प्रयोग, pH च्या अनुषंगाने आरोग्यमिमांसा व उपाययोजना.
२) कार्यशाळा १ : कालावधी ४ तास
विषय- वरील १) मधील सर्व विषय, अधिक TANITA- 545 च्या आधारे शिबिरार्थिंची तपासणी.
(वजन, बॉडी फॅट, मसलमास, बोन मास, व्हिसरल फॅट, मेटॅबोलिक एज इ.)
-या सर्वांचे विश्लेषण व संगती.
-उपाययोजना
३) कार्यशाळा २: कालावधी ६ दिवस- ३ तास रोज
विषय- कार्यशाळा १) मधील सर्व विषय, अधिक मान, कंबर, गुडघे, पाठीचा कणा व पचन यांची मशागत करण्यासाठी धन्वंतरी योगाचे शिक्षण.
- विविध अन्न घटक व त्यांचा शरीरावर होणारा परिणाम यांचा अभ्यास
- माझ्या 'सात पुर्णांक चार दशांश- एक आरोग्यानुभूती' या पुस्तकाचा अभ्यास.
- आरोग्यपूर्ण विविध चविष्ट पाककृतींचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन.
------
गेल्या ३ वर्षात बदलापूर, मुलुंड, भांडूप, दादर, बोरीवली, वसई, विरार, नाशिक, ओझर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, गुहागर, बंगळुर आणि म्हैसूर या ठिकाणी ५० च्या वर कार्यशाळा व ३०० + व्याख्याने दिली आहेत. HAL ozar, MAHINDRA nasik, FLEETGUARD saswad, LIC mumbai, Bhagini Nivedita Bank Pune तसेच ज्येष्ठ नागरीक संघ, महिला गट, विद्यार्थी, CA, COST ACCNTS, DRs, Engrs अशा अनेक गटांना संबोधित करुन आरोग्यानुभूतीचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. आरोग्याचा हा प्रवास ' कमीत कमी वेळांत- कमीत कमी कष्टांत- जीवनशैलीत बदल न करता करायचा असल्यामुळे असंख्य शिबिरार्थींना त्याचा उत्तम अनुभव आला आहे.
या उपक्रमांतून निद्रानाश, BP, मधुमेह, केस गळती, गुडघेदुखी, कंबरदुखी, अॅसिडीटी, त्वचाविकार, अॅनिमिया, थकवा, कॉलेस्टेरॉल, वजनवाढ, मेनोपॉज अशा असंख्य व्याधींसंदर्भात शिबिरार्थींना आलेले स्फूर्तीदायक अनुभव पुस्तकांत नमूद केलेले आहेत.
तरी या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास माझ्याशी संपर्क करावा..!
-माधव जोशी
संपर्क क्रमांकः ९८६९४७३४२२
ई-मेलः madhavjoshi02@gmail.com
हेम आणि माधवदादा, अतिशय
हेम आणि माधवदादा, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार.
आता माबो वर आरोग्यपूर्ण पाककृतींची स्पर्धा ठेवता आली तर...:)
'सात पुर्णांक चार दशांश- एक
'सात पुर्णांक चार दशांश- एक आरोग्यानुभूती' >> हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध करुन देता येईल का?
अजय, मायबोलीवर कसं उपलब्ध
अजय, मायबोलीवर कसं उपलब्ध होईल हे मला अत्ता महित नाही. तुल हवं असल्यास कुरियरने व्यवस्था करीन. ...माधवदादा.
रमा, उत्तम
रमा, उत्तम पोस्ट.
माधवदादा,
मायबोलीवर स्वागत असो. आमच्यापैकी बरेचजण भारताबाहेर आहेत. थेट शिबीरांना उपस्थित राहणे
शक्यच नाही. इथेच आपण ठराविक वेळ देऊन, शंकानिरसन केलेत, तर आमच्यापैकी अनेक जणांना
त्याचा फायदा होईल.
madhavdada , तुमच्या
madhavdada ,
तुमच्या पुस्तकासंदर्भात मायबोलीच्या प्रशासकांना विपूतून किंवा संपर्कातून लिहा. तुमचं पुस्तक ते खरेदी विभागात ठेवण्यासाठी काय करायचं, हे ते तुम्हांला सांगतील.
माधवजी तुमचं स्वागत आहे
माधवजी तुमचं स्वागत आहे माय्बोलीवर.
हेम हे खुपच उत्तम काम केलस तु.
माधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइनच चर्चेचा बीबी उघडता येइल का?
जिथे शंका विचारता येतील.
माधवजी तुमचे पुण्यातले श्येड्युल आधी कळु शकेल का?
जेणेकरुन उपस्थित राहता येइल..
चिनूक्स, आभार. मायबोलीशी
चिनूक्स, आभार. मायबोलीशी संपर्क केला.
झकासराव , पुण्याला मी खूपदा येतो. यायच्या आधी नक्की कळ्वेन. बीबी उघडता येईल. पण अश्या प्रश्नोत्तरात एक समस्या येते. प्रत्येक प्रश्नाला अनेक उप प्रश्न , पैलू व पार्श्वभूमी असते. हे "एका वाक्यात उत्तरं" द्या. (उदा. भारताचे पहिले पंतप्रधन कोण ? ) असं नसतं. तसंच अश्या प्रश्नोत्तरात सलगपणा नसतो. तू आज विचारणार, मी २ दिवसंनी उत्तर देणार. त्यावर तु ३ दिवसांनी प्रतिक्रिया देणार......... तसंच उत्तर देण्याआधी त्या व्यक्तिचे Body Parameters मला माहित असतील तर उत्तम.( अर्थात हि माझी मर्यादा आहे) मला गावोगावि ( भारतात कुठेहि) जावून लहान लहान गटांमधे ( संख्या -२० ते २५) मंथन करायला जमेल / आवडेल. हे काम मी स्वखर्चाने करतो. तु जर असा ग्रुप तयार करू शकलास तर मी तिथे नक्की येईन व माझ्यापरीने सहयोग देईन. किंबहुना हा माझ्या कामाचा महत्वाचा भाग आहे. (जमल्यास भारता बाहेर जाण्याचा सुद्धा माझा विचार आहे) ६ दिवसांचं शिबीर मात्र सशुल्क असतं.
माधवजी मायबोलीवर तुमचे स्वागत
माधवजी मायबोलीवर तुमचे स्वागत आहे.
तुमच्या मुंबईतील शिबिरांचे वेळापत्रक मिळू शकेल का?
हेम खूप छान लेख. अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमचे आभार.
Regards,
Saamee
सामी .मुंबईत सध्या शिबीर
सामी .मुंबईत सध्या शिबीर योजलेलं नाही. इतर कार्यक्रम असे आहेत.
२९ एप्रिल - १ मे - शिबिर - पुणे
६ मे - लातूर - व्याख्यान
७ मे - लातूर - गट चर्चा
मे - जून - मुंबई मुक्काम - मुंबईमधे शिबीर हवं असल्यास आधी गटच्रर्चा होणं महत्वाचं आहे.
२ ते १४ जुलै - शिबीर - फलटण
१५ ते २१ जुलै - शिबीर - (वडगाव) कोल्हापूर
२२ ते २७ जुलै - शिबिर - नशिक
२८ ते ३० जुलै - शिबीर - ओझर
१ ते ६ ऑगस्ट - शिबीर - नशिक
ऑगस्ट - सप्टेंबर - मुक्काम अमेरिका - ( जमल्यास)
आभारी आहे माधवदादा.
आभारी आहे माधवदादा.
व्वा! हे बरं केलंत वेळापत्रक
व्वा! हे बरं केलंत वेळापत्रक टाकलंत ते!!
कॉलेस्टेरॉल या गरम विषयावर लिहाल का? कारण मलाही बर्याच जणांनी विचारलंय आणि इथेही बर्याच जणांना ती शंका आहेच. शेंगदाणा तेल यामुळे मार खातंय. तेव्हा थोडा वेळ काढून हे प्रकरण विषद करुन सांगाल?
माधवदादा, मायबोलीवर स्वागत!
माधवदादा, मायबोलीवर स्वागत! फारच छान झालं तुम्ही सरळ मायबोली आयडी काढलात ते.
हेमला अनुमोदन! कृपया कोलेस्टेरॉल बद्दल तुम्हाला वेळ मिळेल तसं लिहा.
धन्यवाद माधवदादा! मी तुम्हाला
धन्यवाद माधवदादा! मी तुम्हाला फोन करणारच होते. आत्ताच इमेल पाठवले आहे मला तुमचे पुस्तक "सात पूर्णांक चार दशांश' हवे आहे. पत्ता इमेल मधे कळवला आहे तरी कृपया पुस्तक पाठवावे ही विनंती! मला कदाचित लवकरच या पुस्तकाच्या जास्त प्रेती लागतील तर मी मुंबईच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी रिक्वेस्ट करेन किंवा तुम्ही पाठवू शकलात तर खरच खूप मदत होईल.
धन्यवाद!
-- श्रुती
अरे! तुझ्यमुळे मी पण सुरु
अरे! तुझ्यमुळे मी पण सुरु केले, खुपच फरक जाणवतो आहे. मुख्य म्हणजे , पोटावरिल चरबि १९% वरुन १४% आली. बरोबर, आजुनहि खुप जास्त आहे, पण नीदान फरक तर पडतो आहे ना, ते मह्त्वचे.
हेम , माधव दादा, गेले
हेम , माधव दादा,
गेले महीन्यापासून ( जेंव्हा धागा मी वाचला त्यानंतर) आपण वर्ज सांगितलेले पदार्थ टाळण्याचा प्रयत्न केला,
कार्बोहाड्रेटसला बर्याच प्रमाणात कमी केले. रिझल्टस खुप चांगले आले आहेत, वजन ७ किलो कमी झालय.
हे डाएट चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार !!
तुम्ही खाली सांगीतलेले बॉडी पॉरामीटर्स कसे मोजता येतील. मी ईथे दुबईत रहातो.
चरबी, स्नायू , पाणी, व्हेसरल फॅट, मेटॅबोलिक वय , फिजिक रेटींग, बोन मास
प्रिय विवेक, तु खाण्या बाबत
प्रिय विवेक,
तु खाण्या बाबत जागरुक झालास, त्या बद्द्ल अभिनंदन. तु जर तुझ्या मित्र-परिवाराची एखादी मिटींग योजलीस, तर मी दुबईला येवून ( माझ्या खर्चाने ) एक दिवसाची कार्यशाळा घेईन. तुझ्या सकट सर्वांना त्याचा लाभ होईल व आरोग्याचा प्रवास काटेकोर होईल.
माधवदादा
हा लेख मला खुप आवड्ला. शिवाय
हा लेख मला खुप आवड्ला. शिवाय मला समजेल अशा भाषेमधे लिहिल्याबद्द्ल धन्यवाद.
माझा एक फारच साधा प्रश्न आहे.
दुध गूळ एकत्र केल्यवर दुध नासते हे टाळता येऊ शकेल का?
राहुल.
प्रिया राहुल, दुध व गुळ एकत्र
प्रिया राहुल,
दुध व गुळ एकत्र करुन उकळल्यास दुध खराब होउ शकतं. उकळलेल्या दुधात गुळ घातल्यास दुध खराब होत नाही. गुळाची "बासुंदी" उत्तम बनते, चविश्ट लागते, आरोग्यपूर्ण असते.
माधवदादा
हेमंत, एक समस्या येत आहे.
हेमंत,
एक समस्या येत आहे. तुझा लेख वाचून आलेल्या ई मेलला उत्तर दिलं तर मेल रिटर्न येतो. ( If e mail is received from "notify@maayboli.com"" मायबोलीकराचा व्यक्तिगत ई मेल आला तर त्याला उत्तर जातं. काही माबो कारांना वाटंत असेल की मी उत्तर देत नाहीये. काय करु ?
माधवदादा
तुम्ही तुमची मायबोली
तुम्ही तुमची मायबोली प्रोफाईलमधली विचारपूस बघितली का? कदाचित तिथे तुम्हाला कोणी निरोप लिहीलेला असे तर इमेल नोटीफिकेशन येते मायबोलीकडून विचारपूस मध्ये निरोप आलाय असा आणि तो निरोप पण इमेलने पाठवला जातो त्या इमेलला तुम्ही वर लिहीलय तसे उत्तर देता येत नाही. कोणाचा निरोप आहे हे बघण्यासाठी मायबोलीवर येवून विचारपूस वाचावीच लागेल इथे पहा http://www.maayboli.com/user/38834/guestbook. .
रुनी , आभार. विचारपूस मधून
रुनी , आभार. विचारपूस मधून उत्तरं दिली.
Pages