'मस्साल्याचा टच' - पाककृती स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 20 March, 2012 - 02:22

तोळाभर तिखा तिखा, लहसन का झटका
चुटकीभर नमक, मोहरी की सनक
हलकीशी हल्दी, दालचिनी दर्दी
लहानशी लवंग, खसखस खमंग
उमंग है दिलमें जिसके, उसका सपना होगा सच...
तुमच्या आमच्या जगण्याला जरा मस्साल्याचा टच...

BACKDROP final 20 x  7 feet.jpg

'वळू', 'विहीर' आणि 'देऊळ'च्या तडाखेबंद यशानंतर उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी घेऊन येत आहेत नवाकोरा झणझणीत चित्रपट - 'मसाला'...

उमेश - गिरीश कुलकर्णी यांच्या 'अरभाट चित्र'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संदेश कुलकर्णी आणि प्रायोजक आहेत प्रवीण मसालेवाले.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

चित्रपटाचं नाव 'मसाला'... मग शीर्षकाला साजेशी स्पर्धा हवीच की नाही?

परजा आपापली शस्त्रं...विळ्या, सुर्‍या, किसण्या, कढया, झारे, डाव, चमचे आणि हो, कॅमेरा!
तयार करा एक फक्कडशी पाककृती, मस्तपैकी सजवा, झक्कास फोटो काढा आणि इथे दिमाखात सादर करा!!!

फक्त पुढील गोष्टी ध्यानात ठेवा -

१. पाककृतीत मसाल्याच्या एखाद्यातरी पदार्थाचा वापर असायला हवा. एखाद्या पदार्थाच्या मूळ कृतीत बदल करून नवीन 'जरा हटके' पाककृती चमचमीत शब्दांत लिहून सादर केलीत तर खूपच मजा येईल.

२. पाककृतीचा आकर्षक सजावटीसह फोटो देणे स्पर्धेसाठी बंधनकारक आहे.

३. इथल्या पाककलानिपुणांकडून नवीन पाककृती अपेक्षित आहे. या अगोदर मायबोलीवर लिहिलेली स्वलिखित पाककृती पुन्हा नको. Happy

४. 'मसाला - स्पर्धा' या ग्रुपातच 'नवीन पाककृती' ही लिंक वापरून आपली पाककृती लिहा. या ग्रुपात लिहिलेल्या पाककृतीच स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. तसेच, या पाककृती सार्वजनिक करायला विसरू नका.

५. पाककृती लिहिण्याची अंतिम तारीख आहे १२ एप्रिल, २०१२.

६. एक आयडी कितीही पाककृती लिहू शकतो. प्रत्येक नव्या पाककृतीसाठी नवीन धागा उघडावा.

या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत श्री. भूषण इनामदार.

Bhushan B &  B.jpg

श्री. भूषण इनामदार हे नावाजलेले शेफ आणि आघाडीचे फूड स्टायलिस्ट आहेत. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीत पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हॉटेल ओबेरॉयसारख्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केटरिंग कॉलेजात लेक्चरर म्हणून कार्यरत होते. गेली काही वर्षं ते फूड स्टायलिस्ट म्हणून काम करतात. अनेक बड्या कंपन्यांसाठी त्यांनी फूड स्टायलिंग केलं आहे.

'मसाला' चित्रपटाच्या निमित्तानं होणार्‍या या पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील -

पहिलं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्‍या प्रीमियरची दोन तिकिटं आणि चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.

दुसरं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्‍या प्रीमियरची दोन तिकिटं.

तिसरं बक्षीस - 'मसाला' चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.

***

मंडळी,

या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण अजून दोन दिवसांची मुदतवाढ देत आहोत.. आता पाककृती पाठवण्याची शेवटची तारीख आहे १२ एप्रिल, २०१२..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन

हा उपक्रम सुंदरच

(अवांतर - इनामदार साहेबांना काही कारणाने वेळ झाला नाही तर मला सांगितले जावे अशी विनंती! मीही पाकस्वादनिपूण मानतोच स्वतःला. नांवही भूषण आहे. बघा, पटलं तर)

<< 'अरभाट चित्र'>> Proud
असो. मी अशा स्पर्धेत कदाचित पुढच्या जन्मी भाग घेऊ शकेन Happy
पण छान कल्पना आहे

एवढ्यातच इथे शीर्षकांमधील अमराठी शब्दांबद्दलचा धागा वाचला असल्याने या शीर्षकातील 'टच' हा शब्द मराठी नाही हे एकदम जाणवले.

मवा, 'मस्साल्याचा टच' हे बहुधा गाणे आहे चित्रपटातले. घोषणेच्या सुरूवातीला आहेत काही ओळी, त्यातले जसेच्या तसे घेतले असावे.

लाजो प्रयत्न नाही, तुझा सहभाग हवाच हवा. स्पर्धे बद्दल वाचतानाच तू, दिनेशदा, पूनम, मंजुडी ह्यांच्या प्रवेशिका बघायला मिळणार नक्की हेच मनात आलं माझ्या Happy

>>मसाल्याच्या एखाद्यातरी पदार्थाचा वापर असायला ह>><<
भारतीय जेवणात मसाल्याचा पुरेपुर वापर असतोच, एका पदार्थापेक्षा ज्यास्तच. Happy

मसाल्याचे पदार्थात(पदार्थाच्या नावाखाली) काय धरता/येते?

आता म्हणाल हा काय प्रश्ण आहे.
पण मसाला म्हणजे काही दुकानदार कोथींबीर +लिंबू + मिरची असा मसाला

का रोजच्या स्वंयपाकातील मसाल्याचे पदार्थ?
masaalaa.jpg

मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस जरी मिळालं तरी सुद्धा मुंबईला प्रिमियरला जाणं अवघडच आहे त्यामुळे नुसत्याच पाकृ वाचाव्यात हे उत्तम Proud

मला वाटतं मसाल्या मध्ये वाटून केलेली वाटणे (स्पेशल वाटणे) + रोजच्या स्वंयपाकातील मसाल्याचे पदार्थ (हिंग, हळद, मोहरी, जिरं, बडिशोप, लाल तिखट, गोडा/काळा मसाला) + लवंग, दालचिनी, मिरं, तमालपत्र इ. इ. सर्व अपेक्षित असावं. Happy

मंजिरी सोमण,

तुम्ही मुंबईत नसलात तरी तुम्ही तिकिटं तुमच्या नातलगांना देऊ शकता.
शिवाय पुण्यातल्या खेळांची तिकिटं उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे मुंबईला शक्य नसेल तर पुण्यात बक्षिसाची तिकिटं वापरता येतील. तुम्ही अवश्य स्पर्धेत भाग घ्या. Happy

मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस जरी मिळालं तरी सुद्धा मुंबईला प्रिमियरला जाणं अवघडच आहे >> चालेल तुम्ही बक्षीस जिंका आणि टिकीट मला द्या. Wink

छान.. बक्षिसे ३ आहेत.. त्यापैकी एक दिनेशना, एक जागूना... म्हणजे स्पर्धा फक्त एकाच बक्षिसासाठी आहे.. Proud

शाकाहारी, मांसाहारी, भारतीय, अभारतीय इत्यादी कुठल्याही प्रकारच्या पाककृती स्पर्धेसाठी चालतील. Happy

छान.. बक्षिसे ३ आहेत.. त्यापैकी एक दिनेशना, एक जागूना... म्हणजे स्पर्धा फक्त एकाच बक्षिसासाठी आहे.>> त्यालाही बरेच दावेदार आहेत.

अरे वा, प्रस्न विचारायला आले होते, पण उत्तर आधीच मिळालं.... भन्नाट कल्पना आहे राव! नवनवीन पाकृ शिकायला मिळणार.........मेजवानीच जणू! Happy
:सहभाग घ्यायच्या प्रयत्नातली बाहुली :

Pages