केळेवेळे

Submitted by _प्राची_ on 29 March, 2012 - 22:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ भाजीची पण पिकलेली केळी
१ चमचा किसलेलं आलं
१ चमचा बारीक चिरलेली ओली लाल मिरची
अर्ध लिंबू
मीठ
तेल
http://www.maayboli.com/files/u8252/k1.JPG

क्रमवार पाककृती: 

१ केळं सोलून त्याचे उभ्यात चार तुकडे करून घ्या. मग त्या उभ्या फाकींचे बोटभर लांबीचे तुकडे करून घ्या.
त्याला बारीक चिरलेली मिरची, आलं, मीठ आणि लिंबूरस लावून १० मिनिट मुरवत ठेवा.
नॉनस्टिक तव्यावर चमचाभर तेल सोडून ते तुकडे अरत-परत करून घ्या.
छान सोनेरी रंगाचे झाले की खायला तयार.
http://www.maayboli.com/files/u8252/k3.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

हा घाना मधला पदार्थ आहे. मला इंटरनेट मुळे समजला. एकदा भाजीसाठी आणलेली केळी पिकली. ती फेकून देणं जिवावर आलं मग गुगल्यावर हे सापडलं. केलं. फारच हिट झालं.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार.
आफ्रिकेच्या त्या भागात केळे (प्लांटेन) हे महत्वाचे अन्न आहे. बाळाचा पहिला घन आहार तोच असतो. पण नायजेरियात अति तिखट करतात तो.

छान प्रकार Happy

याचे गोड व्हर्जन म्हणजे बटरमधे परतलेले केळे आणि त्यावर कॅरॅमल सॉस आणि बटर टोस्टेड अक्रोड..... यम्मी Happy

दिनेशदा याचं नाव कसं उच्चारतात ? मी इंग्लिश स्पेलिंग वाचलं आहे ते 'kelewele' असे आहे.
मी आपलं मराठी केळ्याला जवळचं म्हणून 'केळेवेळे' उच्चार केला. कदाचित तो 'केलेवेले' असावा.