फ्रेश होममेड पास्ता... विदाऊट एनी खस्ता... (फोटोसहित)

Submitted by लाजो on 19 March, 2012 - 00:12
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप कणिक (गव्हाचे पीठ),
१ कप रवा (बारीक / मधम),
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल
चवीला मीठ,
कोमट पाणी

क्रमवार पाककृती: 

पास्ता हा हल्ली बर्‍याच घरात आठवडा पंधरा दिवसातुन होणारा पदार्थ. आमच्या घरीही लेक आणि मी पास्ता फॅन्स. अत्तापर्यंत मी नेहमी फ्रेश पास्ता विकत आणत होते पण परवा म्हंटल घरी करुन पहावा.... आणि जमला की हो Happy कणिक, रवा हे आपल्या घरचेच चांगल्या प्रतीचे घटकपदार्थ वापरल्यामुळे पौष्टिक आणि गॅरंटीड!

करुन बघा... सोपा आहे Happy

कृती:

१. कणिक + रवा + मीठ एका बोल मधे घ्या. मधे खळगा करुन त्यात ऑऑ/तेल घाला. हाताने जरा एकत्र करुन घ्या आणि सर्व एकत्र गोळा होईतो थोडे थोडे कोमट पाणी घाला.
२. ओट्यावर थोडे पीठ/मैदा भुरभुरुन त्यावर हा गोळा ठेवा आणि हलक्या हाताने मळा - फार घट्ट नको किंवा अगदी सैल ही नको.
३. साधारण ७-१० मिनीटे मळुन घ्या. तयार गोळा हाताला स्मुथ लागला पाहिजे.
४. हा गोळा क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळुन कमीत कमी २० मिनीटे बाजुला ठेऊन द्या. थोडावेळ जास्त राहिला तरी हरकत नाही.

PastaA.JPGप्रकार १:
५. आता या गोळ्याचे २ भाग करा. एक भाग परत रॅप मधे गुंडाळुन ठेवा. गोळा आणि परत थोड्या पीठावर हलका मळुन घ्या आणि लाटायला घ्या.
६. पोळी लाटताना लाटणे थोडे दाबुन लाटा. आणि प्रत्येकी ३ वेळा लाटल्यानम्तर पोळी अर्धी फिरवा.
७. मधुन मधुन लागेल तसे थोडे पीठ भुरभुरवा म्हणजे पोळी ओट्याला चिकटणार नाही. अश्याप्रकारे लाटत लाटत पातळ पोळी लाटुन घ्या.
८. या पोळीला १/३ भागात दुमडुन परत एकदा मधे दुमडा. प्रत्येक वेळेस दुमडताना थोडे पीठ भुरभुरवा. अशी गुंडाळी बनवुन घ्या.

PastaB.jpg

९. या गुंडाळीला आता पीठ लावलेल्या सुरीने किंवा कातण्याने कापुन घ्या. अश्याच प्रकारे दुसर्‍या गोळ्याची पोळी लाटुन घ्या आणि तुकडे करा.
१०. पास्ताच्या पट्या अलगद उलगडुन पीठ पसरलेल्या ट्रेमधे ठेवा.
११. पातेल्यात भरपूर गरम पाणी त्यात थोडे मीठ घालुन उकळायला ठेवा. कापलेल्या पट्ट्या त्यात हलकेच सोडा.
१२. पास्ता शिजला की हलक्या हाताने पाण्यातुन काढुन निथळुन घ्या. आणि आपल्या आवडत्या सॉस बरोबर खा Happy

PastaC.jpg

हा लेकीसाठी केलेला 'चीझी पास्ता'.

Pasta13.JPGप्रकार २:

जास्त वेळ नसेल तेव्हा पुढिल प्रकारे पास्ता करता येइल.

- रॅप मधुन काढलेल्या गोळ्याची साधारण पराठ्या इतकी किंवा किंचीत थोडी अजुन जाड पोळी लाटुन घ्या
- या पोळीचे धारधार सुरीने/ कातण्याने अरुंद पट्ट्या कापुन घ्या.
- आणि वरच्या स्टेप्स ९ ते १२ प्रमाणे पास्ता शिजवुन घ्या.

PastaD.jpg

हा 'बेसिल चेरी टोमेटो कॅप्सिकम पास्ता'. यात वापरलेले बेसिल, चेरी टोमेटोज आणि कॅप्सिकम घरच्या बागेतले Happy त्यामुळे हा पास्ता अगदी फ्रेश फ्रॉम फार्म पास्ता आहे Happy

Pasta18.JPG

आवडीप्रमाणे यावर पार्मजान चीझ वगैरे घालुन खावे Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल त्याप्रमाणे.
अधिक टिपा: 

- इथे लिहीलय ते वाचुन खुप खटपट लागेल असं वाटतं पण करायला लागलं की पटापट होतो हा पास्ता... स्पेशली 'प्रकार २' अगदीच पटकन होतो.

- माझ्याकडे पास्ता प्रेस नाही... म्हणुन मी लाटुन केला आहे. ज्या पुस्तकातुन रेसिपी घेतली त्यात पास्ता प्रेस वापरले आहे.

- मधे जेव्हा २०-२५ मिनीटे गोळा गुंडाळुन ठेवायचा असतो तेव्हा पास्ता सॉस बनवुन ठेवता येतो... पास्ता शिजला की लकेच सॉस मधे आणि लगेच प्लेट मधे आणि लगेच पोटात Happy

माहितीचा स्रोत: 
इटालियन कुकबुक आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सोप्पी पद्धत आहे ही..आपल्याकडे अंजलीच्या किचन्-प्रेस मधे वेगवेगळ्या जाळ्या आहेत त्यात अशी पट्ट्या बनवणारी सुद्धा आहे.त्यातुन सहज करता येतीलसे वाटत आहे.मस्त आहे.सोर्‍यातुन या पट्ट्या डस्टिंग केलेल्या पेपर वर काढाव्या म्हणजे चिकटणार नाहीत.लाजो,नेहमीप्रमाणे लाजवाब पाकृ आहे.करुन पहाणार.

पास्ता ह्या प्रकाराला नाक मुरडायची सवय होती पण ह्या घरगुती पाककृतीमुळे बनविण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मस्तच!

मी वरणफळं/चिकोल्या या प्रकारे करते. फक्त आपल्या नेहमीची कणिक वापरते. आता या पद्धतीने (रवा, ऑ ऑ घालुन) करुन बघते.

वॉव लाजो.. सुपर गुड जॉब!!!!
हेल्दी पास्ता... मुलीला पाठवते ही रेसिपी लगेच Happy

लाजो
काय सुगरण आहेस गं! आणि ते शीर्षकातलं यमकही भारीच! ...कवितेचं नाव वगैरे वाटतंय!
वर्षू.......तुला +१०.....मीही लेकीला पाठवतेय!

वा मस्तच! माझ्या लेकीलापण फार आवडतो पास्ता Happy
पास्ता सॉसची रेसीपी मिळेल का? मी अजुन कधी घरी बनवला नाही आहे म्हणुन सोप्पी रेसिपी मिळेल तर बरं Happy

लाजो, गुणाची आहेस गं. काय काय बनवतेस ( आणि तेही यशस्वीपणे) Happy
हे दिसतं तर आहे सोपं आणि हेल्दी आहे. एका ब्रेफाला करुन बघायला हरकत नाही. थँक्स !

धन्यवाद लोक्स Happy नक्की करुन पहा...

विदिपा, करा आणि सांगा आवडतो की नाही ते Happy

वर्षूतै आणि मानुषीताई, धन्स Happy लेकींनी केला पास्ता की इथे फोटो अप्लोडा Happy

रैना, कसचं कसचं Happy

विनार्च, सगळ्यात सोपा आणि बेसिक पास्ता सॉस म्हणजे, ऑऑ/तेल गरम करायच, त्यात बारीक चिरलेली लसूण थोडी परतवायची (खमंग नाही), आवडत असेल तर कांदा पातळ चिरुन घालायचा आणि जस्ट पारदर्शक होईपर्यंत परतायचा, त्यात क्रश्ड टॉमेटो घालायचे आणि शिजवायचे. वरतुन आवडीप्रमाणे मीठ, मीरेपूड, ड्राईड इटालियन हर्ब्ज घालायचे आणि मग तयार उकडलेला पास्ता घालायचा. यात हवे तर थोडे क्रिम / पार्मजान चीझ इ इ घालु शकतो. Happy

व्हाईट सॉस मधे इतर भाज्यांबरोबर पास्ता घालुन - व्हे़जी पास्ता बेक करता येतं Happy

मस्त रेसिपी लाजो.. वेळ मिळेल तेव्हा नक्की करुन बघणार.. Happy
पास्ता सॉसची रेसीपी मिळेल का? मी अजुन कधी घरी बनवला नाही आहे म्हणुन सोप्पी रेसिपी मिळेल तर बरं स्मित >> +१ लाजो.. नक्की टाक ग पास्ता सॉसची रेसिपी..

मोनाली Happy अग वेळ असेल तेव्हाच हे असले उद्योग करु शकते... एरवी घर, नोकरी, लेक, नवरा... हे आपलं नेहमीचच Happy

मेधा, वरती एक बेसिक रेसिपी लिहीली आहे बघ...

मामी, निंबे Happy

पास्ता हा प्रकार खरं तर मला आवदत नाही, पण लाजो तू या धाग्याला जे नाव दिलयस ना त्याचं कौतुक केल्या शिवाय राहावलं नाहि Happy वा मस्त ! चला करा फस्त ! Wink

Pages