न्यॉकी/न्योकी - इटालियन पोटॅटो डंपलिंग्ज (फोटोसहित)

Submitted by लाजो on 6 March, 2012 - 16:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मोठे बटाटे (मी रसेट वापरते),
मैदा,
१ अंडे (ऑप्शनल),
मीठ चवीनुसार,
मिरेपुड, इटालियन ड्राईड हर्ब्ज (ऐच्छिक),
पार्मजान/पार्मसन चिज (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

हा करायला अत्यंत सोपा प्रकार आहे पण खायला तितकाच मस्त आणि शिवाय व्हर्सटाईल Happy

मैत्रेयीचं चिकन न्योकी सूप बघुन इथे न्योकी ची पाकृ देत आहे.

*************

१. बटाटे कुकरमधे किंवा मावे मधे उकडुन घ्या. वेळ असेल तर मी बटाटे ओव्हनमधे बेक करुन घेते (चवीत फरक पडतो - जास्त मस्त लागते न्यॉकी Happy ),

२. उकडलेल्या बटाट्यांची साले काढुन एका परातीत/बोल मधे ठेवा आणि पोटॅटो मॅशर किंवा खायच्या काट्याने बटाटे मॅश करुन घ्या... यात एकही गुठळी रहाता कामा नये... अगदी स्मुथ झाले पाहिजे,

IMG_1379.JPG

३. यात आता चवीनुसार मीठ, मिरेपुड्/इटालियन हर्ब्ज/पार्मजान/पार्मसन चिज घालणार असाल तर घाला.

४. हलके फेटलेले अंडे घाला (घालणार असाल तर - नाही घातले तरी चालते),

५. मिश्रणात आता मैदा घालायचा. मैदा घालताना एका वेळेस थोडा थोडा घालायचा आणि हे मिश्रण हलकेच मळायचे,

६. मैदा जास्तही घालायचा नाही, अगदी जस्ट सगळं मिश्रण एकत्र येऊन मऊ गोळा होण्याइतपतच* या गोळ्याचे ४ भाग करा.

IMG_1382.JPG

७. ओट्यावर थोडा मैदा भुरभुरवुन त्यावर एक भाग अगदी हलके मळुन त्याची अंगठ्याऐवढी जाड (साधारण दीड सेमी व्यासाची) सुरनळी बनवा (गोळा रोल करा). सुरीच्या पात्याला मैदा लावुन या सुरनळीचे इंच रुंदीचे तुकडे करा.

IMG_1383.JPGIMG_1386.JPG

८. एका मैदा भुरभुरवलेल्या ट्रे मधे हे तुकडे वेगवेगळे मांडुन ठेवा. एकावर एक ठेवलेत तर चिकटतिल. उरलेल्या तीन्ही गोळ्यांच्या अश्याच सुरनळ्या करुन तुकडे करुन घ्या.

IMG_1389.JPG

९. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात न्यॉकीचे गोळे एकावेळेस थोडे थोडे घाला...गोळे एकाच लेयर मधे असायला हवेत.. एकावर एक आले तर चिकटतिल.

IMG_1393.JPG

१०. न्यॉकी आधी तळाला बसतिल पण लगेच मिनीटभरात पाण्यावर तरंगायला लागतिल. तरंगायला लागताच एका बटर/तेल लावुन ग्रीस केलेल्या बोलमधे न्यॉकी काढुन घ्या.

IMG_1395.JPGIMG_1396.JPG

११. एका पॅनमधे बटर गरम करुन (थोडे जळवुनच) त्यावर तयार न्यॉकी घालुन परतुन गरम गरम खायला छान लागते.

IMG_1398.JPG

१२. न्यॉकी सूप मधे किंवा पास्ता सॉस मधे घालुन खाता येते. बॅसिल पेस्टो आणि गरम न्यॉकी व त्यावर शेव्ड पार्मजान चिज... व्वा व्वा!!!! Happy

वाढणी/प्रमाण: 
३ जणांना पुरेसे.
अधिक टिपा: 

१. अंडे घातल्याने मिश्रण लवकर बाईंड होते. पण नाही घातले तरी चालते.

२. *मैदा जास्त झाल्यास न्यॉकी 'दड्ड' होते... हेव्ही होते .

३. तयार तुकडे लगेच वापरणार नसाल तर त्यावर पीठ भुरभुरवुन फॉईल्/क्लिंगरॅप ने झाकुन ठेवा. आणि आयत्यावेळेस पाण्यात उकळुन शिजवा.

४. वेळ असेल तर न्यॉकीचा एक एक गोळा परत हलकेच मळुन त्यावर खायच्या काट्याने हलके दाबुन 'डिझायनर' न्यॉकी बनवता येइल. मी छोट्या मिनी न्यॉकीज पण बनवते - सूप मधे या चांगल्या लागतात.

५. न्यॉकी गरम गरम खायलाच छान लागते.

६. न्यॉकी पाण्यात न उकळता ओव्हनप्रुफ डिश मधे घालुन त्यावत ऑऑ, मिरेपुड घालुन खरपुस बेक करुन त्यावर चिझ सॉस घालुन पण यम्मी लागते Happy

माहितीचा स्रोत: 
कुक बुक आणि प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी Proud

रैना, हे बघ या चित्रात दाखवलाय ना तसा वापरायचा. त्याच्या आत बटाटा ठेवून प्रेस करायचा. त्याला २ प्रकारच्या जाळ्या येतात , जाड, बारीक जसे हवे त्याप्रमाणे करण्यासाठी.

pr.jpg

लाजो, सॉरी ग. तुझ्या रेसिपीच्या पानावर हे भलतच Happy

नोक्या मस्त दिस्ताहेत. आता विकतच्या न आणता घरी करून मैत्रेयीच्या पध्दतीचं सूप करता येईल.

धन्यवाद लाजो!

हे भारी आहे. हे असे डंपलिंग तयार करून याचे बरेच काय काय प्रकार करता येतील ना?
पण मैद्याऐवजी कणिक वापरली तर असेच होईल का?
वरती कोणीतरी कणिक वापरून करून बघते म्हणाली होती. रिझल्ट काय?

मैदा नको म्हणजे नकोच वाटतो.

फक्त २ प्रश्न लाजो :
१. बटाटा काट्याने/मॅशरने मॅश न करता, सरळ किसणीवर किसला तर ? चालेल का?
२.अंडे नाही घातले तर चवीत फरक पडेल का?

धन्स लोक्स Happy

@टोकुरिका,
१. अंड नाही घातलं तरी चालेल. वरती केलेल्या न्यॉक्या बीनाअंड्याच्याच आहेत.
२. बटाटे किसणीवर किसुन चालतिल, फक्त गुठळ्या/मोठे तुकडे रहाता कामा नयेत.
३. बटाटे पूर्ण शिजेपर्यंत बेक करायचे. आता किती वेळ लागेल हे किती बटाटे, किती मोठे बटाटे आणि ओव्हनचे टेम्प यावर अवलंबुन आहे.

@नी, कणिक घालुन करुन बघायला हरकत नाही पण चव, रंग सगळच वेगळं लागेल. आणि बाईंडिंगसाठी कणिक कितपत उपयुक्त ठरेल माहित नाही....

असे डंपलिंग तयार करून याचे बरेच काय काय प्रकार करता येतील ना?<<<

नी, परवा उरलेल्या न्यॉक्यंची करी केली होती.... हा बघ फोटु....

IMG_1403.JPG

कसल्या यम्मी दिसताहेत या न्यॉक्या!

हे माझं न्यॉकीचं पीठ. मी मैदा फारच कमी घातला बहुतेक. त्यामुळे न्यॉक्या विरघळल्या नाहीत पण अगदी खुटखुटीतही राहिल्या नाहीत. पण फक्त न्यॉक्यांचा फोटो काढायला विसरले. Sad

मी न्यॉक्यात ओरेगानोही घातले होते. चव फारच मस्त आली होती. सुपातही छान लागल्या. हे सुप आणि घरी बेक केलेला कणकेचा ब्रेड :

वॉव लाजो..ग्रेट रेसिपी...
यम्मी.. आणी सोप्पी... Happy
धन्स! फोटू टाकल्याबद्दल..

मी आज लाजोच्या पद्धतीने न्योकी करुन बघितले. अंडे नाही वापरले तरी
चालते, असे वाचल्यावर करायचेच असे ठरवले होते.
यासाठी मी बटाटे उकडताना, फ़्रेंच पद्धत वापरली. म्हणजे बटाटे सोलून,
तूकडे करुन, मीठ घातलेल्या पाण्यात उकडले. हि पद्धत तशी अयोग्य आहे कारण
मग बटाट्यात स्टार्च शिवाय काहीच रहात नाही. पण मॅश केल्यावर मात्र छान पिठूळ
होतात. मी सेल्फ़ रेझिंग फ़्लोअर वापरलेय, आणि थोडेच करायचे होते, म्हणून हातानेच
गोल केले. मस्त हलके झाले. ऑलिव्ह ऑईल मधे थोडेसे चाईव्ह्ज घालून, हे गोळेच
जरा घोळून घेतले. सॉससाठी टोमॅटो पेस्ट, गार्लिक पावडर वापरली. ती तेलातच परतून
त्यात जरा पाणी घातले व आटवले. मग त्यावर दोन तीन थेंब सोया सॉस टाकला.

बटाटे शिजवताना, त्यात बाकीच्या काही भाज्या घातल्या होत्या. तो स्टॉक वापरुन
फ़्राइड राईस पण केला. थांकू लाजो !!!

वॉव, दिनेशदा. खास दिसतायत दोन्ही. न्यॉक्या म्हणजे छोटे बटाटेच वाटतायत. आणि हा रंगित फ्राईड राईस कसला यम्मी आहे. Happy

धन्स मामी आणि दिनेशदा, लग्गेच करुन बघितल्याबद्दल Happy

@ मामी सूप आणि ब्रेड रोल्स पण भारी दिसतायत Happy

@ दिनेशदा, सेरे फ्लार वापरल्यामुळे आणखीन हलक्या झाल्या असतिल न्यॉक्या... मस्त गोल गोल शेप दिला आहे... गोट्यांबरोबर तो डफ्फर असतो ना तश्या दिसताय्त..... तो फ्राईड राईस तर एकदम खतरा सही दिसतोय!!

Pages