ओळखा पाहू, खरे काय?

Submitted by अभिप्रा on 8 February, 2012 - 14:19

माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.

IMG_2624.JPGIMG_2628.JPG

गुलमोहर: 

अभिप्रा,दर वेळी हे चित्र बघितलं की मी अवाक होतेय खरंच..किती दिवस लागले हे पूर्ण व्हायला?

खुपच नुतन कल्पना.........जाणवणारा जिवंतपणा !!!!

अ श क्य ......... विश्वासच बसत नाहीये. खरंच जादू आहे तुझ्या बोटात ...... !!

मला गरगरलं हे बघून. बुद्धी चालेनाशी झाली. ते गुलाबा चं फुल सुद्धा तुम्हीच काढलाय ना ? मी वेड्यासारखी काकांचे फोटो बघत त्यातला नेमका कोणता गुलाब चित्रात वापरला आहे हे तोलून बघत बसले. हा का तो, हा का तो.. असं बर्‍याच वेळा केल्यावर बाकीचे अभिप्राय वाचले.. माझी एकटीची ही कथा नाही हे बघून बरं वाटलं. पहिला प्रयत्न हा असेल तर पुढे काय ??? Happy तुम्हाला शुभेच्छा !

Pages