Submitted by आनंदयात्री on 6 January, 2012 - 04:32
ठिकाण/पत्ता:
ठाणे कलाभवन केंद्र
बिग बझार शेजारी,
कापूरबावडी,
ठाणे (पश्चिम).
जिप्सी उर्फ योगेश जगताप (;)) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.
त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.
दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत
१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.
२. नोंदणी केल्यास आकडा बघून (जिप्सीला) आनंद होईल हे आपल्याला माहित आहेच.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, January 8, 2012 - 07:30 to 09:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भटक्या, काढला रे. आता स्वतःला
भटक्या, काढला रे.
आता स्वतःला नोंदवून टाक पटकन!
किती वाजेपर्यंत असाल तिथे ?
किती वाजेपर्यंत असाल तिथे ? मी त्याच दिवशी भारतात येतोय. यायला ८ वाजतील.
प्रदर्शनाची वेळ संपत असेल तरी मायबोलीकरांना भेटता येईल मला.
मज्जाय.... काश मला येता आलं
मज्जाय.... काश मला येता आलं असतं...
मजा करा लोक्स
गटग आयडिया मस्त, नचिकेत तू
गटग आयडिया मस्त, नचिकेत
तू स्नॅक्स+ चहा पण स्पॉन्सर करणार आहेस का रे?
अवांतर,
६.३० ते ७ च्या दरम्यान अवतरले (टपकले) तर (योगेश व्यतिरीक्त तो कुठे जाणार म्हणा :)) कुणी भेटणार आहात का?
मी येईन. चालेल ना
मी येईन. चालेल ना
प्रदर्शन बघून भेटायचं की
प्रदर्शन बघून भेटायचं की भेटून प्रदर्शन बघायचं?
तू स्नॅक्स+ चहा पण स्पॉन्सर करणार आहेस का रे?
६ वाजता येतील त्यांना माझ्याकडून!
येणार असलीस तर नोंदणी कर आधी.
मोनाली, या की! असं 'चालेल ना' वगैरे (डुआय असल्यासारखं) का विचारताय? मला असंच वाटतं हल्ली..
सॉरी मोनाली! तुम्ही ९ वर्षे
सॉरी मोनाली! तुम्ही ९ वर्षे जुन्या दिसताय.. इग्नोर मारा ते वाक्य!
ये बिनधास्त पजो, माझ्या घरी
ये बिनधास्त पजो, माझ्या घरी ये, जाऊयात सगळे मिळून
नाव नोंदणी केली
नाव नोंदणी केली
बागु.... सो स्वीट... मी
बागु.... सो स्वीट... मी कळवते तुला....
मला पण यायचय
मला पण यायचय
नोंदणी केली आहे रे.. मी ६
नोंदणी केली आहे रे.. मी ६ पर्यंत पोचायचा प्रयत्न करतो..:)
दिनेशदा.. प्रदर्शन संपले तरी आपण भेटू शकतोच... चिंता नसावी..
मोनाली, चालेल ना काय
मोनाली, चालेल ना काय विचारतेस? ये की... तू मला आणि मंजूला भेटलेली आहेस की एकदा
पजो, नक्की कळव
पजो, नक्की कळव
मी तर उद्या सकाळी पण जाऊन
मी तर उद्या सकाळी पण जाऊन येईन.. रविवारी बाकीच्यांना भेटायला..
प्रदर्शन पहायला किमान ३०-४० मिनिटे हवीत. शिवाय संध्याकाळी माजिवडा जंक्शन येथे प्रचंड ट्राफिक असते. तेंव्हा गटग आणि प्रदर्शन असा पुरेसा वेळ हातात ठेवूनच यावे..
थोडे लवकर आलात तरी हरकत नाही..
मी मिस्णारे दिनेशदा, तुमच्या
मी मिस्णारे
दिनेशदा, तुमच्या बॅग मधे थोडी जागा असेल तर मल पण न्या ना सोबत...
रोहन, मला तपशीलवार सांगू
रोहन, मला तपशीलवार सांगू शकशील काय तिकडे कसं पोचायचं ते?
मंजूडी.. तुझ्या घरावरून
मंजूडी..
तुझ्या घरावरून डावीकडे वळून हायवे गाठायचा आणि जंक्शनवरून उजवीकडे वळून थेट घोडंबंदरच्या दिशेने. तिथे माजिवडा वरून जरा पुढे गेले की उजव्या हाताला जाणारा पहिला रस्ता (जुना ठाणे - भिवंडी रस्ता) पकडायचा. ते नवीन बिगबझार आणि सिनेमास्टार सुरू झालंय ना त्याच्या बाजूलाच आहे कलादालन.
सेनापती, ट्राफिक
सेनापती, ट्राफिक रिपोर्टबद्दल धन्यवाद!
मंजूडी - +१
मलाही ठाणे ईस्ट आणि वेस्ट एवढंच ओळखता येतं...
वाट शोधायचे प्रयोग डोंगरांत बरे... इथे तूच सांग कसं पोचायचं ते!
सविस्तर लिहितो... थांबा..
सविस्तर लिहितो... थांबा..
ठाणे कला दालन हे ठाण्यात माजिवडा येथे आहे. सर्वात जवळची खुण 'लेक सिटी', 'सिनेमास्टार' किंवा बिग बझार. ठाणे स्टेशन वरून येणार असलात तर बस, रिक्षा सहज मिळतील. रस्त्याने मुंबईमार्गे, भिवंडी मार्गे किंवा बोरीवली मार्गे येणार असलात तर शहरात न शिरता हायवेने गोल्डन डाईज नाका / माजिवडा नाका येथे पोचा. हे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि घोडबंदर रोडच्या जंक्शनला आहे.
मी पण येतेय रे सगळ्यांनो
मी पण येतेय रे सगळ्यांनो
नोंदणी करा की मग..
नोंदणी करा की मग..
ठाणे कला दालन हे ठाण्यात
ठाणे कला दालन हे ठाण्यात माजिवडा येथे आहे >> कापुरबावडी सिग्नलला उतरुन जुन्या आग्रा रोड (भिवंडीकडे) जाणार्या रस्त्याला वळायचे. बिग बाझारच्या बाजुला ..
मी पण असेलच तिथे ...
मी मिसणार
मी मिसणार
मी पण नक्की येणार....
मी पण नक्की येणार.... दिनेशदा तुम्हाला भेटन्याचि फार इच्छा आहे!!!
मी पण नोंद केली रे
मी पण नोंद केली रे
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद (नचि तुला खास धन्यवाद रे ह्या धाग्यासाठी )
अरे वा जिप्सी.. तू पण येतो
अरे वा जिप्सी.. तू पण येतो आहेस काय... मस्त..
ए जिप्स्या, खास धन्यवाद काय
ए जिप्स्या, खास धन्यवाद काय त्यात?
अरे लोक्सांनो, मला उद्या दुपारनंतर ऑफिस आहे...
बघू... कसं काय जमतंय ते...
आज संध्याकाळी कुणी भेटू शकेल
आज संध्याकाळी कुणी भेटू शकेल काय?
आणि एक सांगा..बोरिवलीहून बेस्ट बसने आले तर कोणत्या ठिकाणी उतरावे लागेल?
देवा.. आज संध्याकाळी शक्य
देवा.. आज संध्याकाळी शक्य नाही.. बोरीवालीहून बसने आलात तर कापुरबावडी येथे उतरा.
कापुरबावडी येथे उतरुन जुन्या आग्रा रोड (भिवंडीकडे) जाणार्या रस्त्याला वळायचे. बिग बाझारच्या बाजुला ..
Pages