पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

Submitted by limbutimbu on 4 January, 2012 - 00:35
ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार
तारीख/वेळ: 
शनिवार, January 14, 2012 - 08:00 to 10:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला काहिही वाहुन जात नाहिये.. आता बिन्धास्त गप्पा मारा इथे >>>>>>> त्या भीतीनेच मी काही लिहीत नव्हतो, इथे.

माझं येणं थोड डळमळीत आहे त्यामुळे नाव नोंदवत नाहिये अचानक टपकले तर चालेल ना?
>>>>>>>>> न चालायला काय झाल?

माझं येणं थोड डळमळीत आहे त्यामुळे नाव नोंदवत नाहिये अचानक टपकले तर चालेल ना?>>>>>>> चालत नको येवुस.. बरंच लांब आहे..

माझं येणं थोड डळमळीत आहे त्यामुळे नाव नोंदवत नाहिये अचानक टपकले तर चालेल ना?
>>>>>>>>> न चालायला काय झाल? Happy

अरे डळमळीत असो नै तर कसही, नाव तर नोन्दवा! निदान नोन्दविलेल्या नावान्चि सन्ख्या तरी मस्त भलीथोरली दिसु दे की ! Wink
नाव नोन्दवल नाही तर यायचच नाही, असा काही नियम किमान इथे आत्ता तरी नाहीये! Happy

लिंब्या, संध्याकाळी ७ म्हणजे मला परत पुण्यात जायला किती वाजतील? मी सकाळीच समजत होते. असो मी खादाडीला नाही थांबले तरी नुसते भेटुन जायचा प्रयत्न करीन सगळ्यांना

असो मी खादाडीला नाही थांबले तरी नुसते भेटुन जायचा प्रयत्न करीन सगळ्यांना >>> अवश्य या, निदान भेट तरी होईल

राज्या आणि सम्या येण्याची शक्यता दाट आहे. Happy
राज्याचा फोन आला होता त्याने इथेही नाव नोंदणी केली आहे.

राज्या येतोय. अरे वा ! तानाडुन थेट भक्ती शक्तीला येणार आहे काय तो?
झकास अरे खादाडी साठी ठिकाणं कोणती ठरवायची?

सुक्या राज्या पुण्यातच आहे. तो हापिसातुन डायरेक्ट इकडे येणार आहे.
खादाडी म्हणशील तर उद्यानाच्या आजुबाजुलाच बरेच गाडे असतात तिथे जो जे वांच्छिल ते तो लाहो म्हणायच.
माझा तर उपास आहे. कुणाला जर बाहेरच एकत्र जेवण करायच असेल तर प्राधिकरणात बरेच स्पॉट आहेत की.
त्याना रसोइ से दाखवुया. मी मात्र शक्यतो घरीच जेवायला जाणार आहे. उद्या जर काही बदल झाला तर मी तुमच्या सोबत आहेच. Happy

झकासराव!... रसोई से तर मस्तच आहे... पण भक्ती शक्तीच्याच मागच्या साईडला असलेलं 'वृन्दावन' केव्हा पण बेस्ट!! फक्त किती लोक येणार.. त्यानुसार टेबल आधी बुक करावं लागेल!!

किन्वा मग रसोई से च्या अलीकडचं सावरकर भुवनला टर्न घ्यायच्या आधीचं 'गायत्री' पण लय भारी!!!

किन्वा मग मॉन्जिनिजच्या लेनवरचं 'कामत' हॉटेल!.... आणि अगदी हटके काही खायचं असेल तर मग 'कामत' शेजारचंच 'दिल्ली चाट" मस्त आहे!! नैतर मग मागच्या साईडची 'वासूची बिर्याणी' आहेच्च!

Happy

खूपच कल्ला वगैरे करायचं असेल.. तर 'भक्ती शक्ती' वरून 'सरळ अप्पूघरला जायचं... आंणि 'कोलम्बस' किन्वा 'माय फेअर लेडी' त बसून मस्त एन्जॉय करायचं....

Happy

हुश्श!... दम्ले बै मी.. Wink

limbutimbu | 4 January, 2012 - 03:19 नवीन
झकोबा, त्या सुक्याला खबर कळवली का?
नितिनरावान्चे बुकिन्ग नै झालेले अजुन!
ऑफिसच्या कामानिमीत्त आजच कोल्हापुरला जायचे आहे.

क्षमस्व लिंबुराव

प्रत्यक्षात हजर मायबोलीकर्स Happy

१ योगुली
२ aabasaheb
३ limbutimbu
४ चिमुरी
५ मिता
६ चम्पी (मिसेस चम्पक)
७ झकासराव
८ मिसेस झकासराव
९ सूर्यकिरण
१० राज्या
११ फदि अर्थात स_सा

अरे यार, मी तर अकरा की बारा जण (लहान मुले सोडून) मोजले होते, मग राहिले कोण? कोण राहिले असेल माझ्याकडुन लिहायचे तर दुरुस्त करा बघु वरील लिस्ट.

अपेक्षित पण येऊ न शकलेले:
१ नितिनचन्द्र
२ शुभांगी हेमंत
३ योगिता

पिंचिकरान्नी हे गटग यशस्वी केले, सर्व सहभागी माबोकरान्चे मनःपूर्वक आभार अन अभिनन्दन Happy

Pages