निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

he divas maatr shevanteechech ! chhaan.
Jagu, aataa fulaache close ups ghet jaa. varachyaa phoTomadhehee
crop karataa yeeel.

सग्ळे सग्ळे दिवसभरात गप्पा मारून घेता ना? Angry
माझ्याबरोबर शेअर करायला कुणीच नस्तं..:अरेरे:

असो. जागू, जामची फुलं सुंदर. आणि शेवंतीचे तर खासच! लाल जामची फळं किती गोड दिसताहेत नाही? फारच सुंदर. आणि पांढरी फुलं थोडी पेरूच्या फुलांचा भास करून देताहेत.

शिवाय तू जामच्या कळ्यांपासून मोठ्या फळांपर्यंत सर्व स्टेजेस मधले फोटो दिलेस ते छान केलंस. त्या लाल जामच्या फुलांचे फोटो काढता आले तर काढ ना. ती पण फुलं सुंदर दिसतात.

गुलाब मस्त आहे.

एक प्रश्न आहे.
हळद लावली होती साधारण ऑगस्ट मधे. पानं आता वाळताहेत. मला नंतर जमणार नाही म्हणुन मी काल सगळी हळद काढली. तर काही जाड खोंडं झालीत. पण बाकीची बारिक नाजुक आणि पांढरीच आहेत. जाड वाल्यांची साल काढुन पाहिली नाहिये पण आत पिवळी झाली असावी.
तर लावलेली हळद केव्हा काढावी म्हणजे सगळी खोंडं पिवळी झाली असती?

जामावर जाम नजर ठेवावी लागेल.

दिनेशदा, आम्ही नक्की नक्की कौतुकाने बघू हो... इतके सुंदर गुलाब आपल्या इथे फक्त खास रोझरीज मधेच बघायला मिळतात. त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसकट गुलाब मी तरी फक्त प्रदर्शनात आणि काही खास लोकांनी आवर्जून लावलेलेच बघितलेत. नशीब असतं एकेकाचं!!

जागू ताई , फार सुंदर जांभ !
मी दापोलिला हिरव्या , गुलाबी , गुलाब जांभ ( ह्याचा स्वाद गुल्कंदा सारखा येतो ) पाहिले आहेत....

जाम नुसते पाहूनच मजा आली. लाल जाम पाहिले नव्हते. सुंदर दिसतात.
दिनेशदा, कसलं सुंदर आहे फूल. मन एकदम खूष.
जागू, मानुषी आणि शांकली, कशा आहात तुम्ही? मला पण तुमच्यात घ्या Proud . कालच पाय प्रचंड मुरगळला आहे. सरळ रस्त्यावर चालता चालता. काय करत होते, लक्ष कुठे होते अशा प्रश्नांना बंदी आहे. Happy

म्हणे १२० रु. ला डझन?!!!!! चक्कर >>>> जागू लखोपती झालीस ग Happy

अहो त्याला विचारायचे झाडाचा नाही १का जामचा भाव सांग. हा. का. ना. का Happy

सावली, हळदीला छान फुलोराही येतो. देठातूनच पांढरा पुष्पकोश येतो आणि त्यात पिवळी जांभळी फुले येतात. त्यानंतर ते झाड मरते. त्यावेळी ती काढतात. पण खोडापासून हळकुंडे करायची प्रोसेस मात्र कठीण आहे. त्यासाठी जमिनीखाली पेव खोदावे लागतात. हे काम सांगली
भागात होते.

त्या ओल्या खोडाचे आता लोणचे करता येईल. ती हाताळताना मात्र जपून. कारण हात, सुरी सगळे पिवळेधम्मक होते.

आता बाजारात ओली हळद आली आहे.

वैजयन्ती. मी एकदम ठिक आहे आता. तू काळजी घे. पाय मुरगळल्यावर आम्ही आधी निगडीची पाने भाजून मुरगळलेल्या जागी बांधून ठेवायचो. सुजला असेल तर अंबेहळद उगाळून लाव.
मी सल्ले दिले तरी मी मात्र खुप निष्काळजी प्राणी आहे. मी एक दिवस गोळ्या घेउन सोडल्या आणि काहीच नाही लावल. माझ्या इच्छाशक्तीवरच बरा झाला पाय Lol पण चुकीचे आहे हे. तुम्ही काळ्जी घ्या.

मोनाली मग कुरीयर सर्विसही मला जामच्या ट्रान्स्पोर्टसाठी परवडेल. Happy

ज्ञानेश अरे वा मग परत गेलात तर त्याचे नक्की फोटो काढा.

दिनेशदा मला त्या गुलाबाचा सुगंधही आला.

कालच पाय प्रचंड मुरगळला आहे. सरळ रस्त्यावर चालता चालता. काय करत होते, लक्ष कुठे होते अशा प्रश्नांना बंदी आहे.>>>>>"रस्ता" ठिक आहे ना? Proud Light 1

तुम्ही सगळ्याजणी सध्या "आजकल पांव जमी पर नही पडते मेरे" असंच काहिसं गुणगुणत असाल ना? Proud

तुम्ही सगळ्याजणी सध्या "आजकल पांव जमी पर नही पडते मेरे" असंच काहिसं गुणगुणत असाल ना? फिदीफिदी>>>
का
"आज मै उपर आसमाँ नीचे......." हे म्हणत असाल ?
जागूचे नवीन सदस्य सुंदरच.

मी सगळी रानफुले एकत्र केली आहेत ह्या ब्लॉग मध्ये. मला अजून निट काही ब्लॉगच जमत नाही. काही सुचना असतील तर नक्की सांगा.
http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/2011/12/blog-post.html

जागू.... सफेद जाम, लाल जाम आणि शेवंती या तिन्ही झाडांच्या बिया तुला काढून ठेवता येतील का? मला घरी लावायला हवी आहेत... Lol

जिप्सी Lol
मला रेखा च्या गेटाप मधे जागु दिसली. बकिच्यांना पाहिले नाहिना अजुन नाहितर त्याही दिसल्या असत्या Happy

मोने Happy

सेनापती जाम मध्ये बिया असतात त्या रुजतात की नाही हे माहीत नाही कारण झाडाखाली कधी मला रोपे उगवलेली दिसली नाहीत.

ब्लॉग वर केलेले लिखाण एडीट कसे करतात ? आता मिळतील तशी नावे मला टाकायची आहेत.

जाम १२० रु प्रति डझन!!..... विकण्याची कला आली की काहीसुध्दा विकता येत हो,पण त्याच्या उलट अलिबाग ला माझ्या घराजवळ एक आजोबा राहतात. त्यांच्याकडचे झाड असेच जांबानी अगदी लदबदलेले असते व ते येताजाता लोकांना देतात मी पण अनेकदा खाल्लेत माझा मुलगा व त्याची मित्रमंडळी मात्र अतिपरिचयात अवज्ञा करतात. कार्टी शिंची खेळता खेळता एक दिवस म्हणत होती " ए त्या आजोबांकडे नको जाउया ते सारखे सारखे जाम खायला लावतात." Lol

@शांकली, सग्ळे सग्ळे दिवसभरात गप्पा मारून घेता ना?>>>> फिकर नॉट!! सौदीत मी भारताच्या अडीच तास मागे असतो, शांकली आगे बढो हम तुम्हारे साथ है Happy

@सेनापती,गच्चीतल्या बागेत पहिल्या फोटोत त्या काचेच्या भांड्यात झाडाऐवजी मासे च ठेवले अन अवती भवती झाड अस केल तर मस्त दिसेल.

हळद कशी लावायची, मी ही ओली हळद आणलीय बाजारातुन तीच लावायची का?? हसु नका हां प्लीजच, मला माहीती नाही नक्की हळद कशी लावायची असते ती, पण मला हळदीची पाने फार आवडतात म्हणुन विचारतेय.

हसा, हसा सगळेजण.......... पण आम्ही अशा रडूबाई नाहीच आहोत मुळी!!, वैजयंती we are sailing in the same boat!! काय करत होते, लक्ष कुठे होते अशा प्रश्नांना बंदी आहे.>>>>>> अगदी बरोबर!!

श्रीकांत खूप खूप धन्स!

मोनाली.......... मला बघितल्यावर तू बहुधा पूर्वीची टुणटुण आठवेल.........(जाऊंदे! मी एक निश्वास
टाकला बरंका!)

Pages