दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

Submitted by नीधप on 1 December, 2011 - 23:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता. Happy )
kala-gool.jpg

१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 

१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल. मी गॅसवरून उतरवायची थोडी घाई केली त्यामुळे थोडी जास्तच मऊ पडलीये वडी.
ready-dodol.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 

वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.

गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

माहितीचा स्रोत: 
गोवन मित्र मैत्रिणी, इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी , भारी दिसतयं की दोदोल , नवीन पदार्थ माहीत झाला.
आता बेबिंका म्हणजे काय ते शोधणं आलं Proud
नाचणीच्या सत्वाला इंग्रजीमधे काय म्हणता येईल? >>> Ragi Malt / Ragi Satwa / Finger Millet Malt
संदर्भ http://gayatriskitchen.blogspot.com/2015/09/ragi-malt-ragi-satwa-finger-...

हे असंच केलं जातं. व्हेजी व्हर्जन वगैरे नाहीये.
तुला अंडंवालं व्हर्जन असं काही आठवत असेल तर ते हे नाही. त्याचे नाव बिबिन्का. ते येत नाही मला. आणि पॅकबंद मिळते ते आवडलंही नाहीये.
पण गेल्या महिन्यात पणजीत 'मॉम्ज किचन' म्हणून हॉटेल आहे तिथे खाल्लं बिबिन्का ते बरं होतं.

सुंदर, फोटोही छान.

आजच गावाहून आलेली नाचणी दळून आणलीय पण काळा गुळ इथे कसा मिळणार.

Pages