शंकरपाळी

Submitted by सीमा on 22 October, 2011 - 02:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

साखर : १ते १/२ कप
तुपः १ कप
दुध : १ कप
या मिश्रणात मावेल एवढा मैदा (हवं असेल तर थोडस गव्हाच पीठ अ‍ॅड करु शकता)
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

दुध गरम करायला ठेवावे.
त्यात साखर विरघळवून घ्यावी. तुप मिक्स करुन एक उकळी आणावी.
आता हे मिश्रण संपुर्ण गार करुन घ्यावे. गार झाले कि यात मावेल एवढा मैदा घालून पीठ अगदी घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवावे. जाड पोळी (साधारण पराठ्यापेक्षा जाड) लाटुन त्याच्या शंकरपाळ्या कापाव्यात.
मध्यम आचेवर तळुन घ्याव्यात.
शंकरपाळ्या तयार. दुसर्‍यादिवशी खायला जास्त खुशखुशित लागतात.

वाढणी/प्रमाण: 
एक वाटीच्या प्रमाणात खुप होतात.
अधिक टिपा: 

तुप थोड कमी चालेल. पण जास्त घालू नका. शंकरपाळ्या विरघळतात. मैद्यात हवे तेवढे गव्हाचे पीठ मिक्स करु शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कालच झाल्या शंपा. ह्या दिवाळीला आई माझ्याकडे आहे त्यामुळे तिच्या देखरेखीखाली सगळे चाललेय. तीची हीच टेस्टेड अँड प्रुव्ड रेसिपी आहे. फक्त आमच्याकडे साखर थोडी कमी लागते.

मी पण मिश्रण गरम असतानाच मैदा त्यात घालते. बाकी सगळे तसेच... हा एकच जिन्न स असा आहे दिवाळीचा

की कधीच बिघडत नाही असे मला वाटते.. Happy म्ह णुन माझा दरवर्शी पहिला हाच पदर्थ असतो.:)

आताच गोड शं.पा.केले.साखर १ १/२ वाटी,१ वाटी दुध,१ वाटी तुप ,..साखर विरघळे पर्यंत गरम केले.मिश्रण कोंबटअसताना त्यात पाव चमचा मीठ मावेल तितका [साधारण ५ वाट्या] मैदा घालुन भिजवले.गरम तेलात मंद आचेवर गुलवट तळले..छान खुसखुशीत्,बेतशीर गोड शं.पा झालेत..
आता उद्या खारे शं.पा आणि मठरी.........

ह्याच पद्धतीने पोर्णिमा आयडीने जुन्या मा.बो. वर कृति दिली होती. अगदी बिनचुक होतात, माझे ही मस्त झालेत.

शंपा मध्ये जरा रवा मिक्स करुन बनवल्या तर खाताना जो दाताखाली रवा येतो त्याने अजुन मजा येते शंपा खायला. Happy

पल्लवी, मस्त दिसतायत शंपा.
मी तळण्याऐवजी बेक्ड शंपा करते. हेल्थ कॉन्शस म्हणुन नव्हे तर वेळ वाचावा म्हणुन, तेवढाच वेळ माबो आणि इतरत्र सत्कारणी लावता येतो. Proud

प्रमाण :- पावणे दोन वाटी मैदा,पावणे दोन वाटी कणिक, एक वाटी कोमट दुध, एक वाटी तुप, एक टेबल स्पून तेल,, एक वाटी साखर, एक टी स्पून बेकिन्ग सोडा,. वेलची पुड.

कृती:- सगळे मिक्स करते. साधारण तासाभराने, लाटुन चौकोनी कापुन बेकिंग ट्रे वर ठेवते . थोडे तेल स्प्रे करते आणि १५० डिग्री से. वर साधरण १५ ते २० मिन. भाजते. त्या आधी २०० डि.से. अवन प्री हीट केलेला असतो. भाजुन झाले कि लगेच बाहेर न काढता, अवन बंद करुन, आतच ठेवते. अवनचा पंखा सुरु ठेवते.

तेल कापण्या आधी स्प्रेड केले तर चांगले. कापलेले चौकोन बेकिन्ग ट्रे वर उचलुन ठेवणे वेळखाऊ आहे, पीठ व्यवस्थित मळले गेले असेल तर छान खुसखुशीत होतात, थोडे जाडसरच लाटायचे. मस्त लेयर्स होतात
. Happy

शंकरपाळे वेळखाऊ प्रकार वाटतो म्हणून करायला जात नाही. पण खायला खूप आवडतात Happy सीमा, फोटो टाक की. मी_पल्लवी छान दिसत आहेत शंपा. बेक्ड शंपाचा पण येऊदे लवकर.

मी ईलेक्ट्रिक बीटरवर दूध तूप साखर मिक्स करून घेते. मग मावेल तसा मैदा घालते. नंतर गोळा हाताने थोडासा मळून तीन चार तास झाकून ठेवला.

मस्त खुसखुशीत झाले शंकरपाळे. Happy अगो, या पद्धतीने माझे अवघ्या वीस मिनिटात करून झाले. अर्थात चचौकोन कापणे आणि तेलात सोडणे हे काम नवर्‍याने केले म्हनून.

अगं, ते पोळ्या लाटणे, चौकोन कापणे आणि तळणे ह्याचाच तर कंटाळा. दोन-तीन जणींनी मिळून केले तर मजा येईल. वेळ कसा जातो ते कळत नाही Happy

नंदिनी, तळणे हेच सगळ्यात जास्त वेळखाऊ प्रकरण आहे. पीठ मळण्याचा वेळ वाचवण्यासाठी बीटर किंवा फु प्रो उत्तम. मी तर पीठ ब्रेड मेकरच्या dough प्रोग्रॅमवर मळते. नो झंझट. १४ मिनिटे व्यवस्थित मळले जाते. Happy
तोपर्यंत दुसर्‍या एखाद्या पदार्थाची तयारी करता येते.

अगो, फोटो काढते गं लवकरच. Happy

चारू, मला ते एकदा बेक्ड्स शंकरपाळे/करंज्या वगैरे पदार्थ करून बघायचे आहेत. बिघडायची शक्यता वाटते म्हनून करत नाही.

मी गेल्या सहा महिन्यात एक पापड पण तळला नव्हता, आता एकदम इतकं तळण करतेय. Happy

आधी केलेल्या संपल्या म्हणुन काल परत बेक्ड शंपा केल्या. प्रमण तेच पण काल थोडे बदल केले ते वर लिहिते आहे. तळलेल्या शंपा तेलामुळे तुकतुकीत दिसतत पण चवीला मला तरी या जास्त आवडल्या. तेलाची आफ्टर टेस्ट नाही. आणि तेल पोटात जात नाही.

* साईझ लिमीट साठी इमेज क्रॉप केली आहे. तसेच रिजोल्युशन बरेच कमी करावे लागले आहे.DSCF4505_copy_0.jpg

चारुलता तुमच्या पद्धतिने मी शंकरपाळ्या बनवल्या पण बरोबर फुगल्या नाहि.कच्चयाच राहिल्या. Sad
<<<<<१५० डिग्री से. वर साधरण १५ ते २० मिन. भाजते. त्या आधी २०० डि.से. अवन प्री हीट केलेला असतो. भाजुन झाले कि लगेच बाहेर न काढता, अवन बंद करुन, आतच ठेवते. >>>>>>>प्रमाणे केले... काय चुकले असेल?

हा मागच्या वर्षीचा फोटो.

रेसीपी आता, उपयोगी पडेल म्हणून वर काढून ठेवत आहे.