
रिकोटा चीज -१५ Oz चे दोन डबे
Unsalted Butter - २ कप किंवा ४ स्टीक्स
साखर - २ कप
मिल्क पावडर - २ कप
मँगो पल्प - १ कप
पिस्त्याची पूड- अर्धा कप
खाण्याचा हिरवा रंग- ४ थेंब
पिस्त्याचे तुकडे ( सजावटीसाठी)
बर्फी करण्याआधी अर्धा तास बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
आधी आपण मँगो बर्फी करणार आहोत.त्यासाठी मँगो पल्प आटवायचा आहे.
एका नॉनस्टीक भांड्यात मँगो पल्प घेऊन मध्यम आचेवर ठेवा.सतत हलवून गुठळ्या होऊ न देता १ कप मँगो पल्प अर्धा कप होईपर्यंत आटवा आणि थोडा गार करायला बाजूला ठेवा.
आता एका मायक्रोवेवच्या भांड्यात मऊ झालेले १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर आणि १ कप मिल्क पावडर व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
आता भांडे बाहेर काढून त्यात आटवलेला मँगो पल्प घालून चांगले ढवळून घ्या आणि अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत एकदा बाहेर काढून चांगले ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
बर्फी तयार होत आली कि मिश्रण भांड्यातून सुटून येऊन गोळा होऊ लागते.
गरज पडल्यास अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि तुपाचा हात लावलेल्या चौकोनी भांड्यात ओता.वाटीच्या तळाला तूपाचे बोट लावून मिश्रण एकसारखे सपाट करा आणि बाजूला ठेवा.
आता पिस्ता बर्फी
एका मायक्रोवेवच्या भांड्यात राहिलेले साहित्य म्हणजे १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर,१ कप मिल्क पावडर आणि अर्धा कप पिस्ता पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
बाहेर काढून त्यात ४ थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून नीट ढवळून परत २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत बाहेर काढून ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण सुटून आले नसेल तर अंदाजे अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि मँगो बर्फीच्यावर ओता.तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करा.
वरून पिस्त्याचे तुकडे टाकून सजवा.थोडे गार झाले कि बर्फी सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.
डाएट करणार्यांनी बर्फीचा वाससुद्धा घेऊ नका
मायक्रोवेवच्या रेसिपींना घाबरणार्यांसाठी- कृती सोपी आहे.न घाबरता करा
प्रत्येक मायक्रोवेवची पॉवर वेगळी असल्याने अंदाजे करा.प्रत्येक वेळी मिश्रण ढवळायला विसरु नका.
ही बर्फी थोडी मऊसर असते.
(No subject)
ही बर्फी इथल्या मित्रमंडळीत
ही बर्फी इथल्या मित्रमंडळीत एवढी पॉप्युलर आहे. एका मैत्रिणीची नणंद येतेय, तिनं निघायच्या आधीच 'बर्फी बनवून ठेव' असा निरोप दिला
दिवाळीची सुरूवात बर्फी एवढी
दिवाळीची सुरूवात
बर्फी एवढी आवडली सगळ्यांना. ते ‘यशाचा सोपा मार्ग‘ टाइप्स दहावी-बारावीचे क्लासेस असतात तसं ही बर्फी पार्ट्यांमध्ये पॉप्युलॅरिटीचा सोपा मार्ग आहे
काय सुंदर दिसतेय. ती दुसरी
काय सुंदर दिसतेय. ती दुसरी लाईट कलरची बर्फी कसली आहे? आणि ती अंडी?
मस्त बर्फी!
मस्त बर्फी!
आणि ती अंडी? >>>> सायो ग्रेमा !!
अंडी सर्विन्ग फोर्क्स आहेत
अंडी
सर्विन्ग फोर्क्स आहेत ते. विचित्र दिसताहेत फोटोमध्ये पण प्रत्यक्षात फार मस्त आहेत.
एक मँगो बर्फी आणि दुसरी पिस्ता.
आत्ता!!!! अंडीच दिसतायत तर.
आत्ता!!!! अंडीच दिसतायत तर. फोर्क आहेत हे कसं कळणार?
जबरी दिसताहेत बर्फ्या.
जबरी दिसताहेत बर्फ्या.
काल पुन्हा केली पिस्ता बर्फी
काल पुन्हा केली पिस्ता बर्फी. मी यावेळी अर्ध्याऐवजी पाऊण कप पिस्त्याची पूड घातली आणि साखर कमी केली, ती पण पाऊण कप घातली. एकुणात पिस्त्याची चव आली आहे जी एरवी एवढी जाणवत नाही आणि गोडास पण बेताची झालीये. आम्हाला आवडली अशी पण.
अगं ते सर्विंग फोर्क वाली
अगं ते सर्विंग फोर्क वाली अंडी समजली. पण ती बर्फ्यांवर आहेत ती बारकी अंडी कसली
Pages