मँगो-पिस्ता सँडविच बर्फी

Submitted by पूर्वा on 28 September, 2011 - 15:19
mango pista sandwich burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रिकोटा चीज -१५ Oz चे दोन डबे
Unsalted Butter - २ कप किंवा ४ स्टीक्स
साखर - २ कप
मिल्क पावडर - २ कप
मँगो पल्प - १ कप
पिस्त्याची पूड- अर्धा कप
खाण्याचा हिरवा रंग- ४ थेंब
पिस्त्याचे तुकडे ( सजावटीसाठी)

क्रमवार पाककृती: 

बर्फी करण्याआधी अर्धा तास बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
आधी आपण मँगो बर्फी करणार आहोत.त्यासाठी मँगो पल्प आटवायचा आहे.
एका नॉनस्टीक भांड्यात मँगो पल्प घेऊन मध्यम आचेवर ठेवा.सतत हलवून गुठळ्या होऊ न देता १ कप मँगो पल्प अर्धा कप होईपर्यंत आटवा आणि थोडा गार करायला बाजूला ठेवा.
आता एका मायक्रोवेवच्या भांड्यात मऊ झालेले १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर आणि १ कप मिल्क पावडर व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
आता भांडे बाहेर काढून त्यात आटवलेला मँगो पल्प घालून चांगले ढवळून घ्या आणि अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत एकदा बाहेर काढून चांगले ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
बर्फी तयार होत आली कि मिश्रण भांड्यातून सुटून येऊन गोळा होऊ लागते.
गरज पडल्यास अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि तुपाचा हात लावलेल्या चौकोनी भांड्यात ओता.वाटीच्या तळाला तूपाचे बोट लावून मिश्रण एकसारखे सपाट करा आणि बाजूला ठेवा.
आता पिस्ता बर्फी
एका मायक्रोवेवच्या भांड्यात राहिलेले साहित्य म्हणजे १ कप बटर (२ स्टिक्स),१५ oz रिकोटा चीजचा १ डबा,१ कप साखर,१ कप मिल्क पावडर आणि अर्धा कप पिस्ता पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्या.
ह्या मिश्रणाला १० मिनिटे मायक्रोवेव करा.
बाहेर काढून त्यात ४ थेंब खाण्याचा हिरवा रंग घालून नीट ढवळून परत २ मिनिटे मायक्रोवेव करा.
परत बाहेर काढून ढवळून अजून २ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण सुटून आले नसेल तर अंदाजे अजून १-२ मिनिटे मायक्रोवेव करा.
मिश्रण तयार झाले कि मँगो बर्फीच्यावर ओता.तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करा.
वरून पिस्त्याचे तुकडे टाकून सजवा.थोडे गार झाले कि बर्फी सेट करायला फ्रिजमध्ये ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या ३०-३५ वड्या होतील.
अधिक टिपा: 

डाएट करणार्‍यांनी बर्फीचा वाससुद्धा घेऊ नका Proud
मायक्रोवेवच्या रेसिपींना घाबरणार्‍यांसाठी- कृती सोपी आहे.न घाबरता करा Happy
प्रत्येक मायक्रोवेवची पॉवर वेगळी असल्याने अंदाजे करा.प्रत्येक वेळी मिश्रण ढवळायला विसरु नका.
ही बर्फी थोडी मऊसर असते.

माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर 'अमया' च्या रेसिपीवर आधारित http://www.maayboli.com/node/7474
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा!! पाकृ मस्तंय, पण लई खटाटोप आहे बघा! त्यापेक्षा अ‍ॅटलांटाला येऊन फुकटात खाणं सोपं आहे. Happy (त्या आधी कमीतकमी ५ दिवस उपास करू.)

वा वा टाकलीस का रेसिपी !! मृ साठी करशील तेव्हा आणि बाकीही जेव्हा करशील तेव्हाही आमच्यासाठी ठेव आणि पाठवून दे ! Wink

फारच सही होती ही बर्फी !!!!

राखी,मँगो पल्प न आटवता १ कप घातला तर बर्फी मिळून यायला वेळ लागेल/बर्फी मऊ होईल आणि अर्धा कपच घातला तर आंब्याची चव कमी येईल असे वाटल्याने मी आटवला.पल्प ऐवजी हापूस आंब्याची पावडर मिळत असेल तर ती पण टाकून बघता येईल.

खूप छान दिसतेय बर्फी. पण ही सर्व करे पर्यंत फ्रीज मधेच ठेवायची का? आणी बाहेर काढल्यावर पाणी वगैरे नाही ना सुटत?

अहाहा, कसली दिसतेय खतरु. माझ्याकडे सगळ्या मायबोलीकरांना पुरुन उरेल एवढा मँगो पल्प आहे तेव्हा आत्ता दिवाळीत नक्कीच करेन.

सगळ्यांना धन्यवाद!!
अमयाचे स्पेशल धन्यवाद Happy
प्रॅडी, बर्फी झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायची.बाहेर काढून ठेवली कि थोडी मऊ होते पण पाणी वगैरे नाही सुटत.साधरण कलाकंद सारखी कन्सिस्टंसी असते.तू पण पत्ता पाठव नाहीतर Wink
सायो, तू माझी बर्फी करुन बघ मी तुझी करुन बघते.तुझी मलई बर्फी कधीची करायची आहे मला Happy

सिंडाक्का _/\_
तू पण पत्ता पाठव नाहीतर <<<पाठवते. मग तू लाईव्ह ट्युटोरियल घे.घरी येऊन Happy
माझ्याकडे आंब्याचा मावा आहे. मला वाटतं आमरस आटवण्या ऐवजी तो घालता येईल.

Pages