मक्याच्या कणसांची धिरडी

Submitted by आरती on 26 September, 2011 - 15:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सहा कणसांचा कीस,
अर्धी वाटी तांदुळाच पीठ,
चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा,
चार लसणाच्या पाकळ्या,
सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,
चवीपुरते मीठ,
चार चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.
मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.
कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.
चटणी बरोबर खावीत.

dhirade.jpg

अधिक टिपा: 

घाई असल्यास, भिजवुन लगेच केली तरी चांगली होतात.
पाण्याचे प्रमाण हे मक्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यावर अवलंबुन असेल.
मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
कुठेतरी पुस्तकात वाचल्याचे आठवते, नंतर काही बदल होत गेले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत गं. नक्की करुन बघेन. स्वीटकॉर्न ची पण चांगली होतील का की गोडसर लागतील?
नुसती भाजलेली, उकडलेली कणस. मक्याची उसळ, भजी खूप आवडत त्यात अजुन १ प्रकार अ‍ॅड होईल Happy

मस्त! आणि आळशी लोकांनी कॉर्नचे दाणे वाटणाबरोबर वाटले आणि त्यात पिठे मिक्स केली तर चालेल काय? कोण विडा उचलतंय ह्याचा?

मक्याच्या कणसांचा कीस करुन त्याचा उपमा न करता धिरडी करण्यापेक्षा फ्रोझन मका दाण्यांना मिरची कटरमध्ये वाटून त्याची धिरडी करावीत असा माझा तुम्हा दोघींना स्प आणि प्रा सल्ला आहे. करा आणि खा Happy

छान!

मिनी, राखी, लालू, अगो,सिंडरेला, स्वाती ... धन्यवाद.
सिंडरेला, थोडासा बदल Happy
दिनेश, थोडे बारिक करुन घ्यावेच लागतील ना ?
दिपा, दुध निघतेच त्याला काही पर्याय नाही. थोड्या जाड किसणीने किसुन बघ.

छान वाटतोय हा प्रकार Happy

सु मा मधे मिळणार्‍या क्रिम्ड कॉर्नची पण बनवता येतिल ही धिरडी. आणुन ट्राय करुन बघते Happy

थोडी गोडसर लागतात का ही धिरडी?

सगळे फु. प्रो. मधून काढले >> स्वाती, एकदमच झटपट झाली असतील. Happy

थोडी गोडसर लागतात का ही धिरडी? >> नेहमीचा मका असेल तर नाही लागत.

काल या कृतीने थापून थालीपीठ केले, धिरडी करायची होती हे आत्ताच प्रतिसाद द्यायच्या वेळी कळले Proud
काल करतांना ही कृती वाचून पण धिरड्यांऐवजी थालीपीठं कशी केली हे मला अजून कळलेलं नाहीये. चवीला चांगली झाली होती पण. मी डब्यातला स्वीट कॉर्न वापरला मिक्सर मधुन काढून.

रूनी Lol

Pages