Submitted by pulasti on 26 March, 2009 - 12:58
पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले
गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?
मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
गुलमोहर:
शेअर करा
श्वासांचे
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
मस्त.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
पुन्हा एक
पुन्हा एक छोट्या बहरातली गजल, आणि किती वेगवेगळ्या कल्पना. आवडली सगळीच गझल.
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?>>>हे तीन शेर तर फारच आवडले.
शेवटचे ३
शेवटचे ३ आणि शहारा खूप आवडले!
पुलस्ती,
पुलस्ती, तुमच्या लौकिकाला पुरेपूर साजेशी गझल..!
छोट्या बहरची गझल लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे.
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
या शेरांबद्दल आम्हा पामरांनी काय बोलावे..!
मस्त !!! आज
मस्त !!!
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!>>>> हे दोन शेर जबदस्त आवडले !
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
मस्त
मस्त ग़ज़ल!
नवर्षाच्या पहिल्या दिवशी मन प्रसन्न झाले.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
आज दवाला
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
व्वा! मस्त आहे कल्पना!
खुप
खुप छान....सगळेच शेर आवडले..
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?>>> तर अप्रतीम!!!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
क्या बात
क्या बात है दोस्त.... जियो
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले......... हा तर एकदम मार डाला शेर !!
तुमच्या गझला खूप आनंद देऊन जातात पुलस्ति .... असाच आनंद वारंवार मिळावा
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
क्या बात
क्या बात है, पुलस्ति!! मस्त गझल, त्यातही:
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
हे अप्रतिम!!!
म्या
म्या पामरानी काय बोलावे. तुम्ही गझलेच्या क्षेत्राचे उस्ताद आहात. खुप आवडली..
सगळेच शेर सुरेख, पण विशेषतः हे आवडले...
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
अप्रतिम
अप्रतिम गझल पुलस्ति...!!
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?.......वाह! क्या केहने...
पुलस्ती
पुलस्ती व्वा अजून एक मस्त गझल
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले >>क्या बात हैं
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
>>> हे ही खूप आवडले
सुंभ आणि काम तुझ्याविन पण मस्त
पण
आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले
ह्याचा पूर्ण अर्थ कळलाय असे वाटत नाही.. कृपया सांगशील का?
मतला मात्र थोडा संदिग्ध वाटला
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
आपला तर
आपला तर बाबा दंडवत. कधी जमेल असलं भन्नाट लिहायला ???
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
प्रतिसादा
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!
छान!!
छान!!
फार छान!
फार छान! शेवटचा शेर खूपच आवडला
मस्त
मस्त गझल
सुधीर
मस्त गझल.
मस्त गझल.

गझलेतला ग तरी कधी जमेल का मला?
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
अजून
अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले
हा शेर खुप आवडला...
छान गझल
छान गझल पुलस्ती.
सुंदर. जयदी
सुंदर.
जयदीप ओक
**********
इथे बघा :- माझे लेखाटन