सोलकढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2011 - 03:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ ओला नारळ खरवडून.
१५-२० कोकमे (आमसुल)
४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल)
१ चमचा जिर
तुप
कढीपत्ता
साखर
मिठ
मिरची पुड पाव ते अर्धा चमचा

क्रमवार पाककृती: 

कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा.

खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते.

जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या.

कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला.

आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट.
(कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे)

वाढणी/प्रमाण: 
कमित कमी प्रत्येकी १ ग्लास.
अधिक टिपा: 

सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते.
ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये.
हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ अगदी अगदी. फक्त तिथला इंद्र म्हणजे डॅनी-द-रखवालदार आहे आणि तिथे अन्नपूर्णेचं राज्य आहे.

... तिथं वातावरण 'सूरमय' आहे, खमंग पापलेट आहे पण नावालाही पाप नाही, कढया आहेत पण बढाया नाहीत, आणि ... स्वतः ब्रह्मदेव कमळं वहातोय ........... !!!!! Wink

सोलकढी मध्ये मी आलं घालते. आणि हिरव्या मिरचीची फोडणी. एकदम थंड करुन प्यायची. क्लास लागते.

छान रेसीपी आहे जागू. तिखट घालून करुन बघेन.

जुई, जागोमोहन, दिपा, मृण्मयी Lol धन्यवाद.

भाऊ Lol आणि धन्यवाद आमच्या उरणला स्वर्गाची उपमा दिल्याबद्दल तसेच इतक्या चांगल्या उपमा दिल्याबद्दल. पण तो बाजुच्या बाहुल्याचा एक डोळा का बंद आहे ? तो जन्मताच असा आहे का ? Lol

मामी Lol

जागुदी मस्त आठवण करून दिलीत सोलकढीची. मला फार आवडते सोलकढी. मी प्रथम सोलकढी दादरला गोमंतक मध्ये माझ्या बाबांबरोबर टेस्ट केली होती. इतक्या वर्षात मी विसरूनच गेले होते आत्ता ह्या वीकएंड ला करतेच बघा तुमच्या पद्धतीने आणि तुम्हाला कळवते कशी झाली ती. रेसिपी वरून तरी मला एकटीला बनवायला जमेल अस वाटत आहे......:)

<< पण तो बाजुच्या बाहुल्याचा एक डोळा का बंद आहे ? तो जन्मताच असा आहे का ? >> तसा असलाच तर परत करणार; माबोच्या दुकानातूनच घेतलाय तो !! Wink
[ तुमचं कौतुक मनापासूनचंच असतं. शिवाय, माबोवर रहायचंय मला !]

तुमचं कौतुक मनापासूनचंच असतं. शिवाय, माबोवर रहायचंय मला !]
भाऊ ते माहीत आहे हो मला म्हणूनच मी माझ्या विधानापुढे हाहा करुन हसणारा बाहुला ठेवलाय. राग आला असता तर रागीट ठेवला असता. कौतुकाच म्हणाल तर ते सगळ तुमच्यासारख्यांचे आशिर्वाद म्हणायचे. धन्स.

अनन्या धन्स.

जागु,
हा लेख वाचुपर्यंत मला सोलकढी घरी देखील शक्य आहे (मला शक्य होईल) हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
Happy

जागू.... मस्तं फोटो आणि छान रेसिपी... बहुतेक मालवणी घरात मांसाहार असला की दह्याचं-ताकाचं काही करत नाहीत. विशेष्तः मालवण्/कोकण कडे सोलकढीच असते.
कोकणात सोलकढीला फोडणीचं कौतुक नसतं. पण त्यात तिरफळं घालतात. एक विलक्षण मिरमिर चव येते त्याने. तिरफळं माशाच्या आमटीतही (तिखलं) घालतात.
तसच आमसुलं भिजवून ठेवताना, आम्ही त्यात चार हिरव्या मिरचीचे तुकडे टाकतो. देताना, वरून थोडी कोथिंबीर पेरायची.

जागु मस्तच तोपासू दर रविवारी असते आमच्या घरी

साखरे एवजी गूळ पण चंगला लागतो.

मी सोलकढी करताना फोडणी थंड झाली कि नारळाच्या दुधात टाकतो, गरम असताना फोडणी टाकली कि नारळाचे दुध फाटते

मस्तच आहे हि कृती, करून बघेन नक्की

मी पण बिनाफोदानिची करते, थोडेसे आले पण घालते अणि मिक्सेर मधेच ४ पाकळ्या लसून , आले, १ हिरवी मिरची आणि साखर नाही ग़लत...
तशी पण करूँ बघा एकदा..खुपच मस्त लगते...

घरात आगळ नसल्यामुळे आमसुलं उकळून त्यांचा कोळ काढायची आयडिया आवडली. काल तसंच करुन रेडीमेड नारळाचं दूध घालून मस्त सोलकढी पिता आली. टिपेबद्दल धन्यवाद जागू.

जागुले, लागलीस का स्वयंपाकाला! आणि माबोवरही यायला लागलीस.
असो......तर माझ्याकडे घरचे नारळ+कोकणातून आलेली घरचीच गुलाबी रंगाची ताजी ताजी आमसुलं किंवा घरचंच आगळ यांची मस्त सोलकढी वरचेवर होते.(बिन फ़ोडणीची आणि थंड.)
पण जर फ़ोडणी घालायची असेल तर, विशेषत: थ्ंडीत किंवा पावसाळ्यात.............
तर ही घ्या कृती:
आधी खोबऱ्यात थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घट्ट् दूध बाजूला ठेवा.
मग कोमट पाणी घालत घालत याच खोबऱ्याचं सगळं दूध पातळसर काढून घ्या. या दुधाला तांदुळ पिठी/बेसन पीठ एक दीड चमचा लावून घ्या. गॅसवर उकळायला ठेवा. ढवळत रहा. मीठ साखर चवीप्रमाणे घाला. आता याला तूप, सुकी मिरची, कढिलिंब, हिंग, जिऱ्याची फ़ोडणी घाला. या फ़ोडणीत थोडा घरचा सांबार मसालाही(पण बाजारात मिळणारा लाल भडक नको.) घाला. जरा चमच्याने ढवळा. गॅस बंद करा. चांगली चरचरीत फ़ोडणी वरील पातळ दुधाच्या मिश्रणात ओता. चांगली उकळी आल्यावर गॅस बारीक करा.
आता यात आमसूल/आमसुलाचा रस/आगळाचा एखादा चमचा घालून ढवळा. आता ते सर्वात आधी काढलेले नारळाचे घट्ट दूध घाला. ढवळत रहा. उकळी आली की गॅस बंद करा. कोथिंबीर घाला.
जर योग्य प्रमाणात आंबटपणा असेल तर साखर/गूळ काहीच लागत नाही. खोबऱ्याच्या दुधाने जेवढी गोडी येईल तेवढी पुरते.
पण आंबट गोड जर थोडं जास्त हवं असेल तर मात्र गूळ घालावा. ही कढी अगदी गरमागरमच वाढावी.
भाताबरोबर मस्त लागते.

Pages