सोलकढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2011 - 03:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ ओला नारळ खरवडून.
१५-२० कोकमे (आमसुल)
४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल)
१ चमचा जिर
तुप
कढीपत्ता
साखर
मिठ
मिरची पुड पाव ते अर्धा चमचा

क्रमवार पाककृती: 

कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा. उकळी आली की ५ मिनीटांत गॅस बंद करा.

खवलेल्या नारळाच्या किसात लसुण पाकळ्या घालुन (ऑप्शनल) थोडे थोडे पाणी टाकुन मिक्सरमध्ये फिरवा. मग एखा भांड्यात मोठी गाळणी किंवा फडक्याने गाळून घ्या. साधारण तिन वेळा पाणी टाकुन दुध काढून घेता येते.

जिरे तव्यावर भाजुन गार झाल्यावर कुटून घ्या.

कोकमाचा रस कोमट झाला की तो दुधात मिसळा. मस्त दुधकोल्ड्रिंगचा रंग येतो. त्यातच कुटलेले जिरे, मिठ, साखर घाला.

आता जर फोडणी हवी असेल तर तुप गरम करा त्यात कढीपत्ता घालुन थोडी मिरचीपुड घाला व ती फोडणी वरिल मिश्रणात ओता. झाली सोलकढी झटकेपट.
(कढीपत्याचा घरात पत्ता नसल्याने मी घातला नाही, वाचकांनी समजुन घ्यावे)

वाढणी/प्रमाण: 
कमित कमी प्रत्येकी १ ग्लास.
अधिक टिपा: 

सोलकढी ही लगान मोठ्या दोन्ही ग्रुपची आवडती कढी. अगदी नुसती प्यायला मजा येते.
ज्यांना लसुण आवडत नाही त्यांनी घालु नये.
हॉटेलमध्ये माझ्यामते बिनफोडणीचिच सोलकढी मिळते.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केल्याकेल्या ही गरम्/कोमट प्यावी आणि उरलेली फ्रिजमधे थंड करुन प्यावी. दोन्ही तर्‍हेने यम्मीच लागते (हॉटेल मधे अशी चिल्ड सोलकढी पहिल्यांदा प्यायली होती मी) Happy

जागुडे नुसत्या आठवणींनीच तोंपासु Proud

फोडणीची सोलकढी म्हणजे सहीच.बर्‍याच दिवसात सोलकढीच प्यायलेली नाहीए. Uhoh आज ट्राय करायलाच हवी.

साधना ला अनुमोदन!!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...... बरोबर तळलेले बोंबिल्...स्लर्र्र्र्र्र्र्र्र्प!!!!!!!!!!!!

यम्म्म्म... सह्हीच. खुप आवडते सोलकढी.. बीना फोडणीची आणि भरपूर कोथिंबीर घालुन Happy नुसतीच प्यायची कोल्ड्रिंक सारखी Happy

आता फोडणी घालुन ट्राय किया जाएगा Happy

मी बिनाफोडणीची करते व लाल तिखटाऐवजी नारळाचे दुध काढुन झाल्यावर शेवटचा चव व एकदोन हिरव्या मिरच्या आणि लसुण बारीक वाटुन गाळुन वापरते.
अशीही फोडणीची करुन बघेन आता. गरम गरम हातसड्या तांदळाचा वाफाळणारा भात आणि सोलकढी , स्वर्ग सुख नुसत Happy

कविता, अश्विनीमामी, जॉनी, साक्षी, वर्षू, लाजो, निकिता दक्षीणा शुभांगी धन्स.

मी आता वरील सगळ्या व्हरायटिंची करुन पाहणार आहे.

वर्षू उरण गटगला दोन्ही केले होते मी. तळलेले बोंबिलही आणि सोलकढीही.

जागु,
वाह ! आता मला सोलकढी (माझ्या) घरी देखील प्यायला मिळेल यात शंकाच नाही.
Happy
तुमच्याकडुन वरचेवर टाकण्यात आलेल्या अशा आणि इतर अनेक (चविष्ठ) लेखांमुळे, ते वाचुन जाग्या झालेल्या आठवणींनी तोंपासु हे नेहमीचं झालं आहे, त्यामुळे तोंपा कमी होत आहे, याला जबाबदार कोण ? याचा खुलासा करावा.
Lol Lol

आहा! आली का त्या स्वर्गीय सोलकढीची रेसिपी. ती अप्रतिम चव मी कधीच विसरणार नाही. जागुले, तुझी ही सिक्रेट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

जागुले, तुझी ही सिर्केट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. >> असे आहे होय. आता लवकरच करुन पहाण्यात येइल Happy
मला सांगा नारळाचे दुध काढण्यासाठी खवणे मस्ट आहे का? की दुसरा काही ऑपशन Uhoh

मामी मी पण तुझ्या स्पेशल प्रतिसादाची वाट पाहत होते. धन्स.

अनिल त्याला तुमच्या जिभेचे चोचले जबाबदार आहेत. :हाह:

इंद्रा धन्स.

वर्षा अग नारळाचे छोटे तुकडे करुनही मिक्सरमध्ये टाकु शकतेस.

मी एक सोपी काम चलाऊ पद्धत सांगू का?

बाजारामधे डाबर होममेडचे कोकोनट मिल्क मिळते ते विकत आणावे. भिड्यांचे योजक कोकम आगळ रत्नागिरीला मिळते (हे घरात असणे माझ्यासाठी सध्य मस्ट आहे. कोकमे भिजवायचा त्रास नाही) या कोकोनट मिल्कमधे चवीनुसार कोकम आगळ, जिरे, हि. मिरची, मिठ घालून ढवळले की दोन मिनिटात सोलकढी तयार. वाटल्यास वरून फोडणी द्या अथवा नका देऊ. Happy

डाबरचे रेडीमेड कोकोनट मिल्क मिळते. लसूण जिरे कोथिंबीर, मीठ वाटायचे व कोकम सिरप ( शुगर लेस)
हा शॉर्ट कट.

मी बिनाफोडणीची करते व लाल तिखटाऐवजी नारळाचे दुध काढुन झाल्यावर शेवटचा चव व एकदोन हिरव्या मिरच्या आणि लसुण बारीक वाटुन गाळुन वापरते.>>> मीही अशीच करते. फक्त जिरेही वाटते नारळाच्या चवाबरोबर. Happy आणि थंडगार कढीच पितो आम्ही.

मी पण बिना फोडणीची करते, पण लसूण नाही वापरत. दुधात मिरची आणि आल टाकते. लसूण कधीच टाकली नाही . यावेळी तुमच्यापद्धतीने करून बघेन Happy

नारळाच्या दुधात कोकमचे लिक्विड घातल्यास सोल्कढी होते का? ( उद्या काहीही करुन सोलकढी प्यायची आहे.. Happy )

मी खोबर वाटताना जराशी कोथिम्बिर घालते, अगदी थोडी चव आली पाहीजे पण रन्ग नाही. आणि १ कोकमही घालते. फोडणी नाही आणि वरुन बारीक चिरलेली कोथिम्बिर, तोम्पासू

स्वर्गाची आणखी एक वरची पायरी - कोकम तयार करताना ज्या ताज्या रसात [आगुळ] कोकम घोळवून सुकवतात, त्याच रसात नारळाचा किस, हिरवी मिरची व लसूण यांचा मिक्सरमधून काढलेला रस [ जागूजीनी सांगितल्यानुसार] मिसळायचा. चवीनुसार मीठ. बस्स, अफलातून रंग व स्वाद !!
स्वर्गातली याच्या पुढची पायरी म्हणजे डायरेक्ट इंद्रासनच !! Wink

<< मला इंद्रासन नको. जागूच्या सोलकढीने भरलेल्या भांड्याशेजारी बसवा. >> माबोवर सध्या एकच समीकरण गाजतंय - स्वर्ग = उरण !
तेंव्हा नको म्हटलंत तरी तुम्ही मागताय तें इंद्रासनच आहे !! Wink

Pages