मग गुगलवर मराठीच का नाही?

Submitted by निनाद on 19 July, 2011 - 20:31

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात,

'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
इंडिअन रीडरशिप सव्‍‌र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.'

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.

मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका.
दुवा: www.petitiononline.com/gmarathi
तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आपण सर्वांनी एकत्र येऊन काही केले तर आशा आहे. यातून गुगलला काही तरी फरक पडेल!

भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण त्यांनाहि माहित आहे की अंडरलायिंग इंन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडि डेवलप असले तरी आपण काही विशिष्ठ सेवा, नि तीही उत्तम दर्जाची नि स्वस्तात देऊ शकतो! <<

अजुन एक गैरसमज. झक्कीसाहेब, याबाबतीत तुमचं ज्ञान कमी पडतंय असं मला नाइलाजाने म्हणावं लागतंय. विप्रो, इंफोसिस या कंपन्या आयबीएम, अ‍ॅक्सेंचर इ. शी मॅनेंजमेंट कंसल्टंसीमध्ये स्पर्धेत उतरल्या, अगदी त्यांचे पार्टनर लेवलची माणसं घेऊन. पुढे काय झालं? या धाग्याचा मान ठेऊन पुढचं लिखाण आवरतो. माझं आधिच्या पोस्ट्वरचं आमंत्रण अजुन ओपन आहे... Wink

वर कुणीतरी शब्दकोषची लिंक दिलेली आहे. तिथे मी ५ निरनिराळे (ब्रिटीश) इंग्रजी शब्द टायपून पाहिले. एकाचाही मराठी प्रतिशब्द मला मिळाला नाही. १-२ मराठी शब्दही विचारले. त्याचे इंग्रजी प्रतिशब्दही मला मिळाले नाहीत. Uhoh काय उपयोग असल्या साईट्सचा? गूगल-ट्रान्सलेटर जेव्हा केव्हा मराठीची सुविधा देऊ करेल तेव्हा त्यात अगदी इतक्या पाट्या तरी टाकलेल्या नसतील अशी एक गूगल-प्रेमी म्हणून मला आशा वाटते.

मीच दिली आहे शब्दकोषाची लिन्क. मराठी लोकांनाच मराठी भाषा नकोशी होत चालली असल्याने शब्दकोषात शब्द भरण्याचे काम कोण आणि कशासाठी करणार ?
विकिपिडिया वर मराठी मधे कमी माहिती आहे, तिकडे माहिती लिहिली तरी वाचणारे पाहिजेत ना.
आत्ताच्या आणि येणार्‍या पिढ्यांना सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे, मग कशाला पाहिजेत लोकांना मराठी शब्दकोष आणि भाषांतर ? Angry

>>या ६८०२ पैकी किती जणांनी http://www.google.co.in/ ही साईट चेक केली आहे?
की आपले सही मागितली, दिली ठोकून!! <<
अहो झक्कीसाहेब, गुगलची हि भारतीय साइट बरीच जुनी आहे. ऑनलाइन पिटीशन "गुगल ट्रान्सलेट" (हे वेगळं अ‍ॅप आहे) मध्ये मराठी सामील केली जावी यासाठी आहे.

गुगलने मराठी भाषेचा समावेश भारतीय वेब्साइट, जीमेल वर कधीच केलेला आहे. माझ्या सुरुवातीच्या पोस्ट मधला "अंडरलाइंग इन्फ्रास्ट्रक्चर" चा उल्लेख याच संदर्भात होता.

बघा परत एकदा, त्रोटक माहितीच्या आधारावर गैरसमज करुन घेतलात... Happy

अच्छा, म्हणजे आपण सह्या करायच्या की झाले. कुणि अमेरिकन माणूस करेल का मराठीत भाषांतर? तुमच्यापैकी कुणाला काही ते काम करण्यात स्वारस्य नाही? नुसत्या सह्या करायच्या? काही सज्जड कारणे दिली आहेत का त्यात? की ज्यायोगे गूगलसारख्या, बोलून चालून पैशासाठी धंदा करणार्‍या लोकांना त्यात स्वारस्य आहे? कुणि काही सुचवले आहे की ते हे काम करायला तयार आहेत? जिथे तिथे नुसते अर्ज, याचना, भीक मागणे.

उगीचच काहीतरी उपद्व्याप करायचे!! त्यापेक्षा तुम्हीच का नाही एक साईट काढत मराठीत, विकिपेडिया, किंवा गूगलसारखी? एव्हढे हुषार म्हणवता स्वतःला, तुमच्या जीवावर अमेरिका चालते म्हणे!नानाची टांग! काय दगडधोंडे केले आहे तुम्ही भारतात??

मग निरनिराळ्या इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, इ. पुस्तकांच्या प्रकाशकांकडे पण एक पत्र पाठवू, मराठीत भाषांतर करा म्हणून.

पण मी नाही सही करणार. काय गरज आहे? उगाचच थँक यू ला धन्यवाद म्हणायचे नि त्याला इश्टाईलमधे 'धन्स' म्हणायचे!!
नि मराठीसिनेमे, नाटके,पुस्तके यात कुणाला काय स्वारस्य? इथे 'मायबोली' वरच बघा ना. हिंदी, इंग्रजी शीर्षके दिल्याशिवाय कविता होतच नाहीत! मग गूगल तर बोलून चालून अमेरिकेतले. तसे भारतातले काय मराठी लोकांनी केलेले तुम्ही वापरता? सगळे तर इतरांकडून घेतलेले, अगदी मराठी साहित्याचे समीक्षण करताना फॉसिलायझेशन वगैरे इंग्रजी शब्द वापरायचे! कधी मराठी सारेगमप वरील निवेदिका नि परिक्षक यांचे बोलणे ऐकले आहे? त्यांना का नाही आधी सांगत मराठी बोला म्हणून?

शिवाय आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्यात गेले की किती छान. सगळे उच्चभ्रू लोक तिथेच पाठवतात आपल्या मुलांना. मी पुण्यामुंबईखेरीज कुठे जात नाही, नि तिथे काही मराठी यायची आवश्यकता नाहीये. इंग्रजी, हिंदी असले तर पुरे. विशेषतः पुण्यातल्या रिक्षेवाल्यांना तर मराठी समजतच नाही! त्यांनी मराठी बोलावे असा काही कागद करून त्यावर सह्या घेतल्या तर?

आधी आपले घर सुधारा! मग इतरांकडे बघा!!

पण मी नाही सही करणार. काय गरज आहे? उगाचच थँक यू ला धन्यवाद म्हणायचे नि त्याला इश्टाईलमधे 'धन्स' म्हणायचे!!
नि मराठीसिनेमे, नाटके,पुस्तके यात कुणाला काय स्वारस्य? इथे 'मायबोली' वरच बघा ना. हिंदी, इंग्रजी शीर्षके दिल्याशिवाय कविता होतच नाहीत! मग गूगल तर बोलून चालून अमेरिकेतले. तसे भारतातले काय मराठी लोकांनी केलेले तुम्ही वापरता? सगळे तर इतरांकडून घेतलेले, अगदी मराठी साहित्याचे समीक्षण करताना फॉसिलायझेशन वगैरे इंग्रजी शब्द वापरायचे! कधी मराठी सारेगमप वरील निवेदिका नि परिक्षक यांचे बोलणे ऐकले आहे? त्यांना का नाही आधी सांगत मराठी बोला म्हणून?

शिवाय आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्यात गेले की किती छान. सगळे उच्चभ्रू लोक तिथेच पाठवतात आपल्या मुलांना. मी पुण्यामुंबईखेरीज कुठे जात नाही, नि तिथे काही मराठी यायची आवश्यकता नाहीये. इंग्रजी, हिंदी असले तर पुरे. विशेषतः पुण्यातल्या रिक्षेवाल्यांना तर मराठी समजतच नाही! त्यांनी मराठी बोलावे असा काही कागद करून त्यावर सह्या घेतल्या तर?>>>>> अनुमोदन झक्की.

ह्म्म्म अगदी खरे आहे, आजकाल बरेच वेळा सकाळ सारख्या वृत्तपत्रांमधे देखील कधी कधी अयोग्य शब्द येतात. तमाम मराठी लोकांनी जर भाषेची बाब गांभीर्याने घेतली नाही तर नंतरच्या काळात आपली भाषा ही केवळ जुन्या साहित्यात सापडेल लोकांना. यावर तावातावाने खुप मुद्दे येतील, की दरवर्षी कितीतरी पुस्तके लिहिली जात आहेत, तुम्ही फक्त पुण्या मुंबईपुरताच विचार करता, इ. इ. पण इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा आणि मराठी माध्यमाच्या कमी होत जाणार्‍या शाळा पहाता तसेच एकंदरीतच लोकांची भाषेबद्दल, भाषाशुद्धतेबद्दलची अनास्था पहाता मी म्हणतो तो दिवस नक्कीच दूर नसेल.

मी फारच वाईट शब्दात लिहीले असे मला सांगण्यात आले. विशेषतः भीक मागा म्हंटले म्हणून.
अहो, खरे सांगायचे तर, संतापाने अंगाचा भडका उडतो. जरा शांत झाल्याशिवाय लिहीत नाही म्हणून बरे, नाहीतर आणखी काही काही लिहीले असते.

नुकताच झालेला सारेगमप कार्यक्रम बघितला. म्हणजे हिंदी सा रे ग म प निघेस्तवर सगळे अमेरिकेतल्या भारतीयांना शिव्या देण्यात गुंतले होते, पण उशीरा का होईना, जाग आली, मराठीसाठी काही करावे म्हणून.

तर या कार्यक्रमात आलेले महेश नावाचे कुणि तरी 'मराठी' बोललेले ऐका!! किती शब्द मराठी, नि किती इंग्रजी ते मोजा!! उद्या गूगलवर हे शोधले तर त्याचेहि मराठीकरण दुसर्‍या कुणितरी करावे म्हणून सह्या करणार! त्या महेशला का बरे मराठी शब्द आठवत नाहीत? audience, actors, ego, common man, react, change, project, reach या शब्दांना मराठी शब्द नाहीत? बघा झीमराठी वर ८ ऑगस्टचा कार्यक्रम!! मग सांगा, गूगलला मराठी करायला!!

उग्गीच काहीतरी दाखवायला! प्रचंड ढोंगीपणा!!

त्यापेक्षा आपला नेहेमीचा उद्योग करा. म्हणजे अमेरिकेतील भारतीयांना शिव्या! म्हणजे काय, आम्ही लक्षच देत नाही, दीड दमडीची किंमत देत नाही कुणि तुम्हाला. पण तिकडे तुम्ही सांगा, आम्ही ठणकावून शिव्या दिल्या, अमेरिकेतल्या लोकांना!!
आधी पुण्यातल्या रिक्षेवाल्यांकडे दम भरून सांगायची ताकद नाही की महाराष्ट्रात मराठी बोला म्हणून, नि गूगल कडे काय बघता? आधी तुम्ही मराठी शिका नि मग लोकांना सांगा!

वा, वा! शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? अशी नुसती गाणी म्हणा, तेहि नवीन मराठीत, एकदम हिप हॉप ची चाल चोरून, ब्रेव्ह आम्ही सरदार्स, आम्हाला व्हाट्ट फीअर कुणाची?
Angry Angry Angry

झक्कींचा 'लोक मराठी बोलत नाहीत' हा मुद्दा बरोबर आहे.
पण "आधी पुण्यातल्या रिक्षेवाल्यांकडे दम भरून सांगायची ताकद नाही की महाराष्ट्रात मराठी बोला म्हणून,"" >> हे पटले नाही. तुम्ही जरी पुण्यात्/भारतात असतात तरी तुम्ही तरी हिंमत केली असती कशावरुन ? लोक प्रयत्न करत नसतीलच असं नाही. मागे फचिन ने म्हणल्याप्रमाणे काही गोष्टि राजकीय पातळीवरच शक्य असतात. सरकारने रिक्षावाल्यांना मराठी बोलायचा फतवा काढला तर बोलतील ते कदाचित. Proud

तुम्ही जरी पुण्यात्/भारतात असतात तरी तुम्ही तरी हिंमत केली असती कशावरुन ?
तिथे राहून मी पण अर्धे इंग्रजी, अर्धे हिंदी असे 'मराठी' बोललो असतो! बोलतहि होतो.

स्वाभिमान, हिंमत, सरकारची वाट न बघता आपणहून पुढाकार घेणे हे सगळे परदेशात राहून समजते काय असते ते. भारतात नाही. भारतात अजून स्वातंत्र्य म्हणजे आपले आपण करायचे हे माहीतच नाही, सगळे दुसर्‍या कुणि करायचे! त्यांना विनंत्या अर्ज करायचे!

नुसत्या सह्याच करायच्या असतील तर करा! पण त्या बरोबर गूगलने तसे का करावे, त्यात त्यांचा काय फायदा हेहि लिहायला नको का? गूगल हा धंदा आहे! उगाच सह्या करून ते करतील असे वाटत नाही! एव्हढेच हवे असेल तर स्वतः त्यांना सांगा, आम्ही आमचे पैसे भरून करू! ते का नाही करत?

खरा अभिमान असता तर आता अक्कल आहे, पैसा आहे. गूगलला जे जमले ते तुम्हाला का नाही जमणार? का करत नाही स्वतःचे स्वतः? नि निदान गूगल विकत घ्या!! आहेत ना पैसे? मग काय हवे ते करा!!

नि नसेल जमत, म्हणून रिक्षेवाल्यांशी हिंदी नि इकडेतिकडे अर्धे अधिक इंग्रजी हेच तुम्ही मराठी म्हणत असाल तर गरज काय आहे उगाच मराठी, मराठी म्हणून ओरडण्याची?? काय बोलतात लोक आजकाल! गूगल, यु ट्युब, फेसबूक यांना मराठी करा म्हणण्या अगोदर भारतातच मराठी करा. निदान मराठी कार्यक्रमात तरी मराठीतून बोला.

सरकारने रिक्षावाल्यांना मराठी बोलायचा फतवा काढला तर
पण सरकार तुमचेच आहे ना? मग सांगा तुमच्या प्रतिनिधींना कायदा करायला!
मी तर ऐकले की या रिक्षांचे मालक पुष्कळसे मराठीच आहेत. त्यांच्याकडे आधी अर्ज, सह्या करा ना!

त्या राज ठाकरेने म्हणे काहीतरी चळवळ केली होती. चळवळ कसली, नुसती गुंडगिरी! भर विधानसभेत रस्त्यावरच्या गुंडांसारखी मारामारी. हीच का महाराष्ट्राच्या विधानसभेची लाज?
नि पुढे काय झाले? बोलले का ते महेश नि अजय, अतुल मराठीत? रिक्षेवाले तरी? त्यांच्याहिसमोर शेपूट घातली? शेवटी खुद्द तो राजसुद्धा हिंदीत बोलतो- हमने एकहि मारा वगैरे.

सद्यपरिस्थितीत मराठीचा आग्रह धरणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा! जाहीरातबाजी. कुठेतरी निवडणुकीत उभे राहून एकदा निवडून यायचे या साठी काहीतरी काढायचे. राज ठाकरेने केले, आपणहि करू.
आळशी, कामचुकार लोकांचे धंदे!

तिथे राहून मी पण अर्धे इंग्रजी, अर्धे हिंदी असे 'मराठी' बोललो असतो! बोलतहि होतो. >>> तुम्ही बोलत होता ना, तसेच इथलेही बोलतात. Proud

स्वाभिमान, हिंमत, सरकारची वाट न बघता आपणहून पुढाकार घेणे हे सगळे परदेशात राहून समजते काय असते ते. भारतात नाही. >>> हो, बरोबर असेल तुमचे, पण मग ते काय असते हे समजले की ते तिकडेच वापरावे लागते. असे नवगुणी लोक इथे आले तरी त्यांना स्वाभिमान, हिंमत वगैरे बासनात गुंडाळून ठेवावी लागत असणार इथे. होक्कीनै ? जैसा देस वैसा भेस.
थोडक्यात काय, जिथे शक्य आहे तिथेच हे गुण दाखवले जातात.

खरा अभिमान असता तर आता अक्कल आहे, पैसा आहे. गूगलला जे जमले ते तुम्हाला का नाही जमणार? >> आता माझ्या स्वतःकडे अक्कल किंवा पैसा यातलं काहीच नसल्याने यावर मी काही बोलू शकणार नाही. Proud पण बहुतांशी अक्कल अन पैसा असलेले लोक ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, त्यातून देशाचे / समाजचे भले करायला जावे अशी परिस्थिती इथे नाही.

असो. तुमचा मराठीचा मुद्दा पटतोय. पण भारतात किंवा इथल्या लोकांमध्ये काय दोष आहेत हे तुम्हाला-आम्हाला काय सगळ्या जगालाच माहीत आहेत. पण कुण्या सुशिक्षित माणसाला आपले आयुष्य, संसार, करीयर सोडून या सगळ्या सिस्टीम शी भांडत बसायला अन त्यात स्वतःची वाताहात करुन घ्यायला वेळ नाही. एकट्या माणसाने हिंमत दाखवून भारतात काय होते ते सगळेच जाणतात. जो तो आपापले बघतो, बघणार. ज्याला इथे आवडत नाहीये, बाहेर स्वाभिमान, अक्कल, हिंमत शिकायची संधी मिळतेय तो जाणार. असे सगळे असताना उगाच रोज चिडचिड करण्यात काय हशील ?

७२८१.....

७२८१.....

भारतात १५०० बोलीभाषा आहेत. त्या सर्वाना माहीत आहेत का? त्याचप्रमाणे गुगलच्या लोकाना सगळ्या भाषा माहीत असणे कसे शक्य आहे?

शिवाय हिंदीत ट्रान्स्लेट करा म्हटले तर सर्वर डाउनचा मेसेज येतो.

trans.JPG

शिवाय हे भाषांतर म्हणजे शब्दा शब्दाचे भाषांतर असते. मागे एकदा गंमत म्हणून विशालच्या एका लेखाचे भषांतर केले तर त्यात 'विशाल' चे भाषांतर इंग्रजीत ह्युज असे होत होते ! Happy

हे विशालच्या कवितेचे भाषांतर... ओरिजिनल http://www.maayboli.com/node/28571

kavit.JPG

कवितेच्या शेवटी विशालचे भाषांतर लार्ज असे आहे ! Biggrin

ईन्ग्लिअशचे मराठीदेखील असेच काहीतरी होणार.

हे या लेखाचे ईंग्लिश भाषांतर...... ( हिंदी--> इंग्लिश)

Neither of Guglvr Mrathich mug?
Ninad | 20 July, 2011 - 04:31
Guglne Gujarati Kannada Pasun Tyatun Mratheela Vgळnyat shelf until Bhashancya Bhashatrachi soy Kelly Gage Sighs Sighs. Yanni Yaviruddh herpes Magnyasati Bharat Gotoskr a online petition Bnvli Sighs. Northern Construction Hoil Ashi Sighs hope Yadware minimum Kahi voice.

Aplya Lekhat Mhntat Bharat, Indian law or Sevet Bhashanmdhye first Hindeela 2008 Krnyat shelf implant. Or other Bhashanna Yasati Deshatil Pahowi Lagli three longtime Watts. Guglne comes Urdu, Bengali, Telugu, Tmiळ, Kannada and Gujarati or Bhashannahi Krun Getle Sighs Samil. Marathi only Vळcnila Zingabai Sighs'
s Information Detat Krnyasati Pude Mrathiche extensive interest,

'Guglchi translation service available Bhashanmdhye Sighs 64. Jagat Snkyene Pandharawya Sthanavar Ahet Marathi language. Yacha means lack Snkyene Mrathihun Aslelya Miळto 50 Bhashanna or Sevecha benefits. French, Italians Kinwa Korean or more Ahet Bhashikanpecsha Marathi language.
indian readership Swrhe or Snsthenusar Bartat Vrittptrancya Wacksnkyet Hindinntr Marathi Wackancha incentives order. Tyanantr Malyaळi ​​and Ingrji Wackanchi Sighs number. Marathi comes Bhashet active Ahet Wahinya 10 television. "

Ase Asunhi Guglne Mratheela Tewave O Anaklniy Kode Sighs away.

Marathi Mansachi Google until Pohocli Pahije indisposition. Mhnun Tyanni Bnvli Sighs an online petition. Or neg Yaciket right Krayla Visru.
Duwa: Wwwlpetitiononlinelcom / Gmarathi
Tumcya importance each Shiche Sighs, Aapan Srwanni Yeun Kahi collect bananas Sighs expected level. Kahi Guglla Yatun Pdel Northern difference!

Bharat Gotoskr written Loksatta Mdhye of Alela Guglla Mrathiche Wavde? ha article.

दाद .. herpes ( हिंदी दाद म्हणजे हर्पेस-नागीण त्वचारोग! )
आहे.. Sighs Proud
एकत्र केले .. collect bananas Rofl

Biggrin काय करणार असलं भाषांतर घेऊन? आहे ती भाषा बिगडायची !!

Pages