हाय ओला बरसतो पाऊस आहे...

Submitted by विशाल कुलकर्णी on 30 August, 2011 - 03:52

*******************************************
धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...

माय काळी आज पान्हावे नव्याने
स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे...

रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे

वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...

चातका का, येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?

चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...
*******************************************

विशाल

गुलमोहर: 

वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...

का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?

सुरेख!!!

सही!

वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...
वा!!

बादवे, चातक म्हणायचं होतं का विशाल?? की चकोरच?

कविता / गझल छानच जमलिय.
हा
चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...
शेवट मस्त वाट्ला, ज...ब....री

का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?

आहाहा..व्व्व्वा व्व्वा व्व्वा विशाल राव .. एक सदाबहार गझल दि ली त आम्हाला ... प्रत्येक पावसाला आठवेल अशी लज्जतदार गझल...

खुप खुप आभार मंडळी !
कणखर म्हणतात तसे गझल किं कविता हा विषय बाजुला ठेवून देवुयात Wink सर्वांना आनंद देवुन जातेय हे महत्वाचे ! Happy
आनंदयात्री, आभार ! माझा नेहमीच चातक आणि चकोर यात गोंधळ होतो. आवश्यक बदल केलाय ! Happy