निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा,साधना,जागू -
तुमच्या काळजीपोटी केलेल्या सूचनेबद्द्ल थँक्स ! तुमचे म्हणने खरे आहे.मीही आंब्याचे झाड लावणार नव्हतो.पण ते झाड हापूस आंब्याचे संकरीत आहे,त्याचा विस्तार नेहमीच्या आंब्याच्या झाडांइतका होत नाही,असे नर्सरीवाल्याने सांगीतले आहे.फार तर १०-१२ फूट वाढेल.तरीही मी नक्कीच लक्ष ठेवीन आणि आणि कोणाकडूनतरी पून्हा खात्री करून घेईल.बाकी साधनाने सांगीतलेली खत देण्याची पध्दत खरोखर वेगळीच आहे.गरज पडेल तशी नक्की ट्राय करेन.

आशुतोष,
फूलांचा फोटो पाहून मला संक्रांत वेलीच्या फूलांची आठवण झाली.छान आहे फोटो.

मामी, पहिल्या दोन फोटोतल्या झाडांच नाव ' बेगोनिया'. इथे उसगावात जवळ जवळ सर्वत्र आढळणारं झाड आहे हे. पांढरा, गुलाबी आणि लाल अश्या तीन रंगात सहसा आढळतं. हे perenial आहे. थंडीत dormant झालं तरी मरत नाही. पानं जाड, तांबडसर हिरवी असतात. झाडाला सावली / partial sun मानवते.
खूप छान फोटो आहेत.

कुंड्या एक सारख्या आकाराच्या आणी एक सारख्या रंगाच्या असल्या, व बर्‍याच ( म्हणजे quantity मधे खूप) असल्या,
कि बागे ला एक वेगळच सौंदर्य प्राप्त होतं हे कळस आणी मामी ह्यांच्या फोटो वरुन लक्षात येतयं.

मंडळी हल्लीच बहिणीकडे 'दिन का राजा' म्हणून झाड बघितले. ती म्हणाली त्याच्या फुलांना रातराणीसारखाच मस्त सुगंध येतो फक्त ती फुले दिवसा फुलतात. विकीवर पण दिसतय ते झाड. कोणी बघितलय का हे झाड? कुंडीत येईल का?

कळस, तुमची बाग सुंदरच आहे. Happy कधी येऊ बघायला आम्ही Happy

सावली, लोकसत्तातील तीच बातमी लिहायला आलो होतो. Happy

"दिन का राजा" >>>>मस्तच :-). फोटो इथे पहायला मिळेल.

कळस, खूप छान आहे तुमची बाग Happy ते आंब्याच्या झाडाचं मात्रं परत एकदा दुसर्‍या जाणकाराला विचारुन घ्या. १०-१२ फूट म्हणजे ठीकच आहे, काठीला आकडा लावून जमिनीवरुनही आंबे काढता येतील Proud

मामी,
एकपेक्षा एक झक्कास फोटो!
ती अर्जुनाची झाडे इकडे पुण्यात एअर पोर्ट रोडला, टिंगरेनगरजवळ पाहायला मिळाली.
Happy

:

अगं खरंच असतात साप तिच्या आसपास. एकदा रातराणी खाली पाचोळा झाडताना वरुन माझ्या पायाशी पडला होता. त्याच्या आधी ३ तास अजून एका रातराणीवरुन साप लोंबकाळला होता.

अगं ते मुद्दाम रातराणीला शोधत येत नसावेत. त्यांना झाडावर राहायला आवडत असेल नी हिच्यावर काटे नसतील म्हणुन हिला लगडले असावेत.. साप सुवासाला भुलून येतात ह्या गैरसमजामुळे केवडा, रातराणी इ. झाडे लोक घराजवळ लावत नाहीत (नी मस्त सुगंधी रात्री मिस करतात Happy )

पुढच्या वेळेस काळजी घे, पायाऐवजी डोक्यावर पडला असता तर तु सैरावैरा धावत असताना त्या बिचा-याला किती त्रास झाला असता .... Proud

अगं नशिब समज की खराट्याचा तालात फटकारा त्या सापाला लागायच्या आधिच मी हे काय पडलं म्हणून बघितलं. तर पावलांपाशी साप आडवा पडला होता. सुंदर होता.

डोक्यावर पडला असता तर लांब वेणी दिसली असती.

मलाच आश्चर्य वाटतंय अजूनही की मी घाबरले कशी नाही. काही सेकंदांनी त्याला नीट ऑब्सर्व केल्यावर लक्षात आलं की आपल्याला इथून निदान दूरतरी जायला हवं. मग तुळशींच्या वाफ्यावरुन लांब ढांग टाकून पलिकडे गेले आणि तिथे साप असल्याचं लोकांना शांतपणे सांगितलं. नंतर सिक्युरिटीने शोधला तर बाजूच्या गवतात निघून गेलेला.

तो लोंबकाळणारा साप तर दोन सिक्युरिटीची माणसं बोलत असताना त्यांच्या मधे तोंडापाशीच लोंबकाळत आला होता.

माझ्या सिटाउटमधे सध्या रात्री रातराणी घमघमते. मस्त वाटतं. असं वाटतं माझा सिटाउट म्हणजे रातराणीचं अत्तर भरलेली मोठ्ठी चौकोनी कुपीच आहे.

रातराणी चा हा सिजन आहे का?

आमच्या इथे पण फुलली आहे. वास मात्र दरवळत नाही. घ्यावा लागतो

अश्विनी,
सापाला त्याच्या शरीराचे तपमान नियंत्रित करता येत नाही, म्हणजे आपल्यासारख्या warm-blooded वाल्यांसारखे त्याच्या शरीराचे तपमान कायम रहात नाही कारण हे सर्व सरपटणारे प्राणी cold-blooded असतात. त्यामुळे वातावरणात उष्मा वाढला की ते गारव्याला म्हणून काही वनस्पतींपाशी येतात. तसेच गार वाटू लागलं की बिळात किंवा मुंग्या-वाळवींच्या वारुळात जाऊन बसतात.
आणि त्यांना फक्त जिभेनी भक्ष्याचं अस्तित्व जाणवतं. ती सेन्सर्सचं काम करते. सुगंध्/दुर्गंध त्याला समजत नाहीत.
पण तुमच्या धिटाईला मानलंच पाहिजे. कारण बहुतेक सर्वांची फार वाईट अवस्था होते या हात-पाय नसलेल्या आणि कुठलाही आवाज न करणार्‍या प्राण्याला पाहून.

खरे खोटे माहीत नाही,पण असे म्हणतात की रातराणी जवळ साप येऊ नये म्हणून "दिन का राजा" त्याच्याजवळ लावावे (ऊतारा ).मी मात्र रातराणी घराबाहेर लावली आहे (उगीच विषाची परीक्षा कशाला!) (आता ३ फूटापर्यंन्त वाढली आहे),आणि हो रात्री मस्त सुगंध येतो.सध्या फूल्ल सिझन आहे.

या निमित्ताने मला एक ताजा अनुभव शेअर करावासा वाटतो.मागच्या रविवारी सं.५ च्या सुमारास आमच्या मागच्या अंगणात खूप कावळे,बुलबुल ,शिंजीर यांचा गलका चालू होता.मागील कंपाऊंडलगत एकमेकांत गुंतुन वाढलेल्या चाफा/जास्वंद/संक्रांत वेलीभोवती त्या सर्वांची सदैव उठबस चालू होती.बहूधा कावळे छोट्या पक्षांची अंडी खायला आली असावीत असा मी तर्क केला.मी शांतपणे मागच्या दारात बसून "डाळींब" खात काय घडते हे निसर्गनिरीक्षण कौतुकाने करीत होतो . २०-२५ मिनीटानंतर अचानक मला कंपाउंडच्या रेलींगवरून (साधारण १० फूट उंच आहे) अंगावर डाग असलेले एक अजगर मोठ्या रूबाबात झाडाकडे येतांना दिसले. त्यामुळे मग मला कावळे ओरडण्याचे खरे कारण कळाले.ते कावळे त्याच्यावर हल्ला करत नव्हते,पण त्याच्या आजूबजूला अगदी जवळ जाऊन त्याला एकडे तिकडे जाण्यापासून पराव्रुत्त करत होते.
मी ताबडतोब माझ्या एका सर्पमित्राला फोन केला,परंतू तो त्यावेळी बाहेर गेला होता.त्याच्याच सांगण्यावरून ०२०-१०१ ला फोन केला (महत्वाचा नं.लक्षात ठेवा) व त्यांच्याकडून धायरीतील सर्पमित्राचा फोन नं. घेऊन त्याला बोलावून घेतले.तो येईपर्यंत जवळपास ४५ मिनिटे मी सापवर लक्ष ठेऊन होतो.अर्थात्,फूल क्रेडीट गोज टू ट्वीन "कावळे ब्रदर्स ". हा सर्व वेळ दोघे दोन बाजूंनी जणू पहारा देत होते व त्यांनी सापाला झाडावरच नजरकैदेत ठेवले होते.त्याला हलूच देत नव्हते.

सर्पमित्राने आल्याआल्या सर्वांना सुरक्षीत अंतरावर पिटाळले व मोठ्या शिताफिने
सापाला बाहेरील बाजूने काठीने हळूच ढकलून आत फरशीवर उतरायला भाग पाडले व मग आरामात (?) पकडून बरणीत बंदिस्त केले.बरणीत पकडल्यानंतर सापाने कुकरच्या शिट्टीसारखा जोराने सूऽऽऽऽ असा फूत्कार टाकायला सुरुवात केली,कारण आम्ही ज्याला अजगर समजत होतो तो खरेतर "घोणस" जातीचा अत्यंत जहाल विषारी साप होता.
या घटनेनंतर आमच्या कॉलनीत पक्षांबद्द्ल विशेषतः कावळ्यांबद्द्ल आदर वाढला आहे.जरा कुठे पक्षांचा गलका ऐकू आला की आम्ही सावध होतो व बाहेर येउन इकडे तिकडे, जमिनीवरच नाही तर झाडावरही, संशयास्पद नजरेने पाहायला लागतो.कारण पकडलेला साप मादी घोणस होता व एक नर घोणस व त्यांची पंचविसएक पिल्ले या परिसरात फिरत असणार असे सर्पमित्राने जाताजाता आम्हाला सांगीतलेले आहे !! Biggrin Biggrin

जिप्सी,बाग बघायला नक्की या .:) मोस्ट वेलकम !

केशरी फुले बिग्नोनिय अंग्विसकॅटी - मांजराच्या नख्यांसारखी पाकळी असते म्हणून .
हनिसकल ची फुले लहान, मुख्यतः पांढरी असतात. इथे ( अमेरिकेत ) हनी सकल हे वीड मानतात बरेच जण. आपल्या इथे कोरांटी उगवते तसं इथे हनीसकल दिसतं. या दिवसात संध्याकाळाच्या वेळेस अगदी भरभरून फुलतात , मंद नाजूक वास असतो फुलांना.

जांभळी फुले बहुतेक सेज / साल्व्हिया या कुळातली वाटतायत. लॅव्हेंडरची पाने एकदम नाजूक असतात.

कुठल्याही झाडाला खत घालताना अगदी बुंध्याशी न घालता थोडे पसरून घालावे म्हणतात.
इथे अंगणात चेरी, ओक, बर्च अशी झाडं असली तर त्यांना पाणी घालताना पण बुंध्याशी न घालता सूर्य माथ्यावर असताना सावली जिथे पडेल तिथे घालावं म्हणतात.

धन्स, कळस Happy

कारण पकडलेला साप मादी घोणस होता व एक नर घोणस व त्यांची पंचविसएक पिल्ले या परिसरात फिरत असणार असे सर्पमित्राने जाताजाता आम्हाला सांगीतलेले आहे !!>>>>>>हे अगदी खरंय. Happy

कारण पकडलेला साप मादी घोणस होता व एक नर घोणस व त्यांची पंचविसएक पिल्ले या परिसरात फिरत असणार असे सर्पमित्राने जाताजाता आम्हाला सांगीतलेले आहे !! >>> 13[1].gif

मण्यारीलासुद्धा बरीच पिल्लं होतात ना? आजोळच्या मागच्या अंगणाच्या पायठणीच्या आत मण्यार आणि तिची पिल्लं निघाली होती.

शांकली, कळस, जेव्हा एखादा साप जवळ येतो तेव्हा तो विषारी की बिनविषारी ते बघत बसण्याएवढा वेळ नसतो. तेव्हा तिथून दूर जाणेच योग्य की अजून काही करावे?

कळस, खरंच त्या कावळ्यांनी त्या घोणसाला स्थानबद्ध केलं म्हणून तुम्हाला तो पकडता आला. नाहीतर पाऊण तासात तो अख्ख घर फिरुन आला असता.

बाग बघायला नक्की या >>>> पहिलं लक्ष कुठे सळसळ जाणवतेय का तिथेच जाईल Biggrin

शोनू, तुझ्या बागेचा फोटो टाक ना.

अश्विनी,
खरंय तुमचं, पुढ्यात आलेला साप विषारी की बिनविषारी हा विचार करण्यापेक्षा तिथून निघून जाणंच चांगलं. पण साधारण ठोकताळे आपल्याला माहिती पाहिजेत. Happy

बाग बघायला नक्की या >>>> पहिलं लक्ष कुठे सळसळ जाणवतेय का तिथेच जाईल >>> अके सहियेस.
प्रसन्न वाटते सकाळी सकाळी हे सर्व वाचुन. चालु द्या माझे वाचन चालु आहे.

कळस... Happy

सापाबद्दल भरपुर गैरसमज आहेत. त्याला मारल्यावर तिथे अजुन ७ साप येतात हा अजुनेक गैरसमज. आता दुर्दैवाने कळसच्या इथला साप वर गेला असता नी उरलेले दोन-तिन डझन साप लोकांना नंतर दिसले असते तर त्यांनी लगेच एक मारला की सात उगवतात या गैरसमजावर विश्वास ठेवला असता. Happy

मेधा, खरे हनिसकल तु म्हणते तेच असावे. मी याचे हनीसकल हे नाव फ्लॉवर... वर वाचले. मला फक्त्स बिग्नोनिया हेच माहित होते.

बाकी प्राणीसृष्टीतले रखवालदार खुप जागरुक असतात. मानवी रखवालदारांसारखे चोर चोरी करत असताना संगमनताने झोपा काढत नाही. जंगलात वाघासारख्या प्राण्याला शिकार मिळायला असंख्य अडचणी येतात त्या केवळ या प्राणी रखवालदारांमुळे.

Pages