मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबूंजींच एक गाणं

तोच चंद्रमा नभात..........

मी पहिलीत असताना .....पप्पा रोज कैसेट लावायचे......

आणि मी ऐकणार.....

तोच चंद्र.......... मान.......... भात..........

२- ३ वर्श गेलि..नीट समजायला....

स्वप्ना, मी पण ते कित्येक वर्ष " हिंमतवाली आखोंका " ऐकायची. मग " प्रेमात पडण्याची हिंमत असलेले डोळे " असले महान अर्थ लावायची.

"जरी या पुसून गेल्या सार्या जुन्या खुणा रे" हे मी बरीच वर्ष "चर्या पुसून गेल्या सार्या जुन्या खुणा रे" असं ऐकायचे.

तसंच "शारद सुंदर चंदेरी राती" हे गाणं आत्ताआत्तापर्यंत "चारच सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा धूरच धूर" असं "देवदास" छाप ऐकायला यायचं. Happy

चुकीचं नाही ऐकलं मी हे गाणं-
ओय लक्कि, लक्की ओय मध्ये "चहिदे, चहिदे... (म्हणजे बहुतेक पाहिजे या अर्थी) म्हणत असतो,.. ते ऐकुन मल तो च च्या भाषेत चहीदं, चहिदं (दही) म्हणतोय असाच भास होतो. आता तर तेच बसलय पक्कं डोक्यात!

>>स्वप्नांचा धूरच धूर... सॉलीड!

बाजार सिनेमातलं गाणं आहे, " दिखाई दिये यूं के बेखुद किया..." . कुणी अर्थ सांगू शकेल का प्लीज.
गाणं खूप छान आहे.

मी खालचे गाणे पहिल्यांदा एकले तेव्हा मला 'चना बेचना चना बेचना' असेच एकायला आले.
कान देवून जवळ जवळ २०-२५ वेळा एकले मी नी मैत्रीणीने. कारण गाणे मैत्रीणीच्या गाडीत सीडीवर एकले होते. मूवी माहीत न्हवता. तिलाही कळत न्हवते कारण तिलाही कोणी तरी ही दिलेली होती.

एकाच, तुम्हाला पण नक्कीच वाटेल एकल्यावर, चना बेचना...

शब्द असे आहेत मुखड्याचे,

आवारा मंजर,दिल आशिकाना,
पहेलू मे दिलबर आलम सुहाना,
दिवारोंसे अब छुटके चाहू तुझे मै तुटके
चना बेचना चना बेचना....
अगदी हेच एकायला येते... कान फुटले ती सीडी एकून एकून.

कोणाला माहीतेय काय मूवी आहे ते? अन नक्की ती काय ओळ आहे?

manuswini, मी हे गाणं ऐकलं नाहीये. पण तुम्ही म्हणता तसंच हे "चन्ना वे चन्ना" असं असू शकतं.

एक गाणं आहे. बहुतेक पंकज उधासने गायलेलं, ते मला असं ऐकू यायचं "एक तरफ उसका घर, एक तरफ मै खडा". मला वाटायचं तिच्या भावाला किंवा वडिलांना घाबरून घरासमोर यायची ह्या प्रेमवीराची हिंमत नसेल कदाचित. पुढे कोणीतरी सांगितलं की ते "एक तरफ मयकदा" असं आहे. Happy

"ऐसा लगता है जैसे बनके बादल
मेरे बदन को भिगोके मुझे छेड रहे हो"

हे इतके सुंदर गाणे मी अगदी परवापरवापर्यंत असे ऐकत होते...

" ऐसा लगता है जैसे बनके बादल
मेरे बदन को धो के मूझे छेड रहे हो"

Uhoh

mansmi18 या बाफची सुरूवात (जुन्या मायबोलीवर) याच गाण्याने झाली होती....

विनय Happy

साथिया ये टायटल साँग एका महाभागाच्या तोंडून मी असे ऐकले आहे

तेरे बालों की पनाह मे
किसी और की रात गुजरे ????
तेरी काली काली आँखे
कोई उजडी बाग निकले..

कोणी मला दुसरी ओळ नक्की काय आहे ते सांगेल का?

तेरे बालों की पनाह मे
किसी और की रात गुजरे ????
तेरी काली काली आँखे
कोई उजडी बाग निकले..>>>>>

तेरे बालों की पनाह मे
ये सियाह रात गुजरे
तेरी काली काली आँखे
कोई उजली बात उतरे

असे शब्द आहेत ते. Happy

Pages