मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

rangaseth धन्यवाद! ह्या दोघातला जय कोण आणि वीरू कोण हा प्रश्न सेकंदाच्या एक सहस्त्रांश इतक्या वेळेपुरता मनात डोकावून गेला. मग "काय फरक पडतो" असा सुज्ञ विचार मागोमाग आला Happy फरदीन खानवर डुबवण्याइतके पैसे कोणाकडे आले हा आणि एक प्रश्न! असो.

तर नया दौर मध्ये एक गाणं आहे "मांगके साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार". मला बरेच दिवस हे "मांग" म्हणजे सिंदूर भरतात ती मांग असं वाटायचं. म्ह्टलं सौभाग्याबरोबरच बाई जन्मभराचं संसारसुख मागते आहे. चांगलं आहे! नंतर लक्षात आलं की ती म्हणतेय तुझी साथ मागून मी सगळं जग मागितलं. मांग हा शब्द "मागणे" ह्या अर्थी आहे. Happy आमचं हिंदी हे असंच पहिल्यापासून!

माझ्या लहानपणी सैगलचे 'आ लौट के आजा मेरे मीत' हे गाणे एक काका त्यांच्या कार्यक्रमात

>>>

रन्गासेठ, हे गाणे सैगलचे नसून मुकेश चे आहे. सारंगा चित्रपटातले.
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

रॉबीन, धन्यवाद!! मी ज्यावेळी हे मूळ गाणे ऐकले त्यावेळी मला मुकेश आणि सैगल यांच्या आवाजातील फरक कळत नव्हता :-(, तसेच हे गाणे फार कमी वेळा ऐकल्यामुळे फरक कळाला नाही, चूक दुरूस्त केल्याबद्दल धन्यवाद.

बाकी मला सुरेश वाडकरांच, 'काळ देहासि' हे या गाण्यातील 'काळ देहासि आला काहू' या ओळीतला शेवटचा शब्द अजूनही कळाला नाही, काहू का पाहू?? (हे गाणे प्रथमेश लघाटे याने लिटील चँप मधे छान गायले होते.)

१> मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके,
बैठा दिया पलंग पे, मुझे खाट से उठाके.... हे ऐकू आलेले शब्द

गाण्याचे मूळ शब्द आहेत...
मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके,
बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठाके.... चित्रपट - याराना

२> उलटा ही फिरू, ईन हवाओं मी कही... हे ऐकू आलेले शब्द
गाण्याचे मूळ शब्द आहेत...
उडता ही फिरू, ईन हवाओं मी कही...

३> गाण्याचे मूळ शब्द आहेत...
मै हु तुझपे वारी सजना... चित्रपट - कामचोर
कॉलेजच्या स्नेहसंमेलनात गायक गात होता...
मै हु तुझको भारी सजना...

बैठा दिया पलंग पे, मुझे खाट से उठाके...

उलटा ही फिरू, ईन हवाओं मी कही
>>>> Rofl

Washing Powder Nirma... ही ओळ माझ्या दोन्ही भाच्या लहानपणी 'Washing कावळे निरमा' म्हणून मोठ्याने गायच्या...

रंगासेठ, ते गाणं 'काळ देहासी आला खाऊ' असं आहे...

ते कुठल्याश्या चित्रपटात श्रावणाच गाण आहे ना .

सावन आया सावन आया
...........
............
............
आने वाल सब आये है लेकीन तुम कब आओगे

ह्या गाण्यात त्या टींब टींब वाल्या ओळी मी अश्या म्हणायचो
बेडूक आया
गांडूळ आया
गोगल गाय आया (का आयी ? )

लेकीन तुम कब आओगे Happy

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

vivekdesai66 Happy

हा बाफ सुरु आहे म्हणून बरं आहे. अनेक वर्षांच्या शंकाचं निरसन होतंय. हे असंच एक गाणं, परवा परत ऐकलं आणि लक्षात आलं की अर्थ अजून कळलेला नाही.

वो चुप रहे तो मेरे दिलके "दाग" जलते है.

हे "दाग" च आहे का मला तसं ऐकायला येतंय? "जुन्या जखमा ताज्या होतात" असा अर्थ असावा का?

प्रिय केदार१२३,

आपल्या हिंदी चित्रपट गीतात सावन आणी प्रेम कायमच हातात-हात घालून फिरत असतात.. त्यामुळे तुम्ही कुठला गाण सांगताहात ते लक्षात येत नाहीय, एवढी सावन-प्रेम युक्त गाणी आलेली आहेत आणी रोज येताहेत... तरीपण तुमचे Substitutes आपल्याला आवडले... कारण त्या सगळ्यांचा श्रावण/ पावसाशी थेट संबंध आहे... लगे रहो...

स्वप्ना_राज,

आपण ऐकलेला शब्द "दाग" हाच आहे... तो शब्द 'मनाला झालेली जखम' या अर्थाने वापरलेला आहे... जास्त काही विश्लेषण देत राहत नाहीये... गायिका लता मंगेशकर, संगीतकार मदन मोहन...

रॉबिन, आ लौटके गाणं 'रानी रुपमती' मधलं आहे. चु.भु.दे.घे.

'आ लौट के आजा मेरे मीत'
Film: Rani Roopmati (1959)
Music: S N Tripathi
Lyrics: Bharat Vyas
Singer (s): Lata / Mukesh
Starring: Bharat Bhushan, Nirupa Roy
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

उलटा ही फिरू, ईन हवाओं मी कही >>> Lol

मै हु तुझको भारी सजना...>>> Lol

______________________________________________
- प्रकाश

माझ्या मित्र-मैत्रीणीनो,

तुम्हा सगळ्यांना हल्लीचं "वाऱ्या वरती गंध पसरला, नाते मनाचे..." हे गाणं (चित्रपट: सावरखेड एक गाव) बर्यापैकी माहीत असेलच... या गाण्याच्या अगदी शेवटी गायक (कुणाल गांजावाला), काय आणी कसले शब्द म्हणतो, ते कुणी सांगू शकेल काय???... आज पर्यंत मला तरी ते शब्द नीटसे समजलेले नाहीत... म्हणून ही एक विनंती...

त्याला शेवटी शेवटी गांजा चढला असेल म्हणून त्याचे शब्द कळत नसतील Proud
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

सहि ऐकू येत ना कधी कधी ...
मला पण काहिच्या कहि ऐकू यायच...
दिल है छोटासा गाण्यात ..महक जाऊ मै आजतो ऐसे च्या ऐवजी ....महक जाऊ मै खाजता ऐसे ऐकू यायच..
कुची कुची रखमा मधे.. नाचे मोर पानीमे छमछम, गाये कोयल दिललचाहे सरगम च्या ऐवजी
नाचे मोर पानीमे छमछम, गाये बैल दिललचाहे सरगम ऐकू यायच.

कितीतरी दिवस माझी बहीण तडप तडप के इस दिलसे ... गाण अस गायची ..

तडप तडप के इस दिलसे आह निकलती रहि उसको सजा दी जायेगी ऐसा क्या गुनाह किया...

तर अशी हि चुकिची ऐकलेली गाणी..

>> रहि उसको सजा दी जायेगी ऐसा क्या गुनाह किया.>>>> Lol

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

>>गाये बैल दिलचाहे सरगम Happy

dakshina, तुमची सिग्नेचर मस्त आहे!

हे माझ्या ३ वर्षाच्या मुलाने ऐकलेले चुकीचे गाणे...
कालच त्यानी 'देव माझा विठु सावळा' ऐकल.
मग थोड्या वेळानी खेळताना गुणगुणत होता... 'देव माजा विठु सावला, मान त्याची माझी आवळा.'

Orchid, अगदी असेच :हाहा:!! मी पण असेच समजत होतो!! Biggrin
"माळ त्याची माझिया गळा" असे मूळ शब्द असावेत!!

" काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा,
मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा,
लिंबावानी .......तुझी, बिटावानी होटं,
टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोटं,"

..... च्या जागी नक्की काय शब्द आहे?

कांती म्हणजे रंग. >>>> अहो मॅडम कांती म्हणजे त्वचा असा मी अर्थ समजत होतो.
कांती - त्वचा, काया, कात वै. वै.

कांती = complexion असं मलाही वाटतंय.

असो. "दादीअम्मा, दादीअम्मा, मान जाओ. छोडोभी ये गुस्सा जरा नचके दिखाओ" हे गाणं ऐकून मी जरा बुचकळ्यात पडले होते. नंतर लक्षात आलं की ते "ह्सके दिखाओ" आहे. Happy

तसंच दुसरं गाणं - नानी तेरी मोरनीको मोर ले गये, बाकी जो बचा था काले चोर ले गये. हे असंच आहे का मलाच काहीतरी विचित्र ऐकायला येतंय? असंच असेल तर ह्या ओळींचा अर्थ काय?

आज हमने दिलका हर किस्सा तमाम कर दिया, खुद भी पागल हो गये, तुमको भी पागल कर दिया
प्यारके इक तीरने तुमको भी घायल कर दिया, खुद भी पागल हो गये, तुमको भी पागल कर दिया
सर सर ओ सर, वी लव्ह यू

"सर" ह्या पिक्चरातलं हे गाणं. अतुल अग्निहोत्री हा ठोकळा आणि पूजा भट ही ठोकळी ह्यावर चित्रित झालेलं, मागे "सर" दिसायचा यथाशक्ती प्रयत्न करणारा आणि अ‍ॅक्टीगची सगळी जबाबदारी येऊन पडलेला नासीरुद्दीन शाह!

आता मला पडलेला प्रश्न हा - पहिल्या दोन ओळी ह्या ठोकळा-ठोकळी एकमेकांना उद्देशून म्हणताहेत का त्या 'सर'ला? 'सर'ला उद्देशून म्हणताहेत असं असेल तर त्यांचा अर्थ लागत नाही. आणि एकमेकांना उद्देशून म्हणताहेत असं असेल तर शेवटी त्या 'सर'ला कशाला मध्ये आणतात?

Pages