मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तव शुभ आशिक मागे

टू मच! Happy

मेर पति सिर्फ मेर है .........अस कहितरि सिनेमा आला होता..
त्यतले मि ऐक्लेले गाने.........भला है बुरा है जैसभि है तेरा पति मेरा देवता है.......

अरेच्चा अँकी आधी वाचलच नाही Sad

हो जुन्या माबोवर लिहील होत हे Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

स्वाती...

हा सिनेमा पाहिला असलास तर शिरीष कणेकरांना भेट...
त्यांना भरून येईल....
_______
मैं हूं ना !!!

ankyno1, अगदी अगदी....त्यांनी "मेरा पति सारे महिलामंडल का है" असं कुठली स्त्री म्हणेल असं काहीतरी ह्याबद्दल म्हटल्याचं मला अंधुक स्मरतंय Happy

एक लहानपणी ऐकलेलं गाणं आहे "किलबिल किलबिल पक्षी बोलती". उमा थर्मनचा "किल बिल" पिक्चर लागला तेव्हा हे गाणं आठवून खूप हसायला आलं. कोणाला ह्या गाण्याचे बोल आठवताहेत का? मला फक्त शेवटची ओळ "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई" एव्हढंच आठवतंय Sad

"मेरा पति सारे महिलामंडल का है">>> :)... शिरिष कणेकर एक नंबर Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

लहानपणी सकाळच्या वेळेस मुंबई ब वर ऐकलेले समुहगीत...
सत्यमेव जयते आमचे दीर आत आले.. Happy
(ओरिजिनल गाणे सत्यमेव जयते आमचे ब्रीदवाक्य आहे)
--------------------------
फिर छिडी बात.. बात फूलोंकी...

सत्यमेव जयते आमचे दीर आत आले.. >>>
शँकी Rofl

किलबिल किलबिल पक्षि बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानो पानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही एक मी गाव पहीला बाई

एम पी ए,
कित्ती छान! Happy

सत्यमेव जयते आमचे दीर आत आले>> Biggrin
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

एम पी ए, धन्यवाद! असा गाव असता तर किती बरं झालं असतं. Happy

"रजनीगंधा" मधलं गाणं मी काही दिवस "युही महके प्रीत प्रियाकी मेरे अरुणाके मनमे" असं ऐकत होते. नंतर ते "मेरे अनुरागी मनमे" आहे ते कळलं पण त्याचा अर्थ लागत नाही

ते किलबिल किल्बिल पक्षी बोलती गाणं मला खुप आवडायचं..
त्याचे पुढचं कडवं..
त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती मुलेच सारी.. असं आहे.. माझ्या बाळासाठी आत्ता घेतलेल्या सीडीमध्ये पण आहे गाणं..:)

"साहब, बिबी और गुलाम" मधलं "साकिया आज मुझे नींद नही आयेगी, सुना है तेरी मेहफिल मे -- जगा है" ह्या गाण्यात -- च्या जागी काय शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय कोणाला माहित आहे का?

मेरे अरुणाके मनमे Lol

'रस' जगा है असे मी समजतोय पहिल्यापासून.

अय्या मी ते ..'रत जगा' असे ऐकत होते .आणि रात्रीचं जागरण असा सोयीस्कर अर्थ लावला होता..! उत्तर भारतात.. देवीचा 'जगराता' होतो.तोच उलटा 'रत जगा' अस समजत होते..! Sad

मेरे अनुरागी मनमे" आहे ते कळलं पण त्याचा अर्थ लागत नाही

>>>
अनुराग म्हणजे प्रेम.अनुरागी मन म्हणजे प्रेम करणारे मन.योगेशचे शब्द आहेत.

नयना, असेल तसेच कदाचित. मलाही नीट माहीत नाही.

हे दूरच्या टोका, तसे नाही ते, 'रस जगा है' असंच आहे.

swapna_raj
"मेरे अनुरागी मनमे" आहे ते कळलं पण त्याचा अर्थ लागत नाही

======================================

खरं तर ह्या गाण्याची पोएट्री अत्यंत सुंदर आहे.

तुम्ही जे म्हणताय त्याचा शब्दशः अर्थ म्हण्जे " माझ्या ह्या तुझ्यावर भाळलेल्या मनात तुझ्या प्रेमाचा सुगंध रजनीगंधा सारखा असाच दरवळत राहु देत"

ह्यातील भावना काहिशी " जीवनात ही घडी अशीच राहू दे" सारखी आहे.

"साहब, बिबी और गुलाम" मधलं "साकिया आज मुझे नींद नही आयेगी, सुना है तेरी मेहफिल मे -- जगा है" ह्या गाण्यात -- च्या जागी काय शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय कोणाला माहित आहे का?
===============================================
ते गाण "साथिया आज मुझी नींद नही आयेगी, सुना है तेरी मेहफिल मै रतजगा है" असंच आहे. ह्याचा अर्थ मला आज झोप येणार नाही कारण तु आजची रात्र कुणाच्या (म्हणजे सौतनच्या)सोबतीत (शैय्येत) "जागवणार" आहेस!

सर्वांना धन्यवाद! Happy

>>हे दूरच्या टोका,

Happy "ओ दूरके मुसाफिर" असं काहीतरी वाटलं हे वाचून.

या गाण्याचे चित्रीकरण हि आगळे आहे. नर्तिका मिनु मुमताज उजेडात असली तरी सहनर्तिकांचे चेहरे अंधारात आहेत.

अजुन एक चित्रपट 'मुझे जीने दो'
नदी-नाले ना जाव श्याम पैया पडु.... Happy
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

आकाशी झेप घे रे पाखरा
तोडी (की सोडी?) सोन्याचा पिंजरा
हे गाणे, परवा कुठल्या मूड मधे होतो आठवत नाही, पण खूप वेळा चूकून
'आकाशी झोप घे रे पाखरा ...' असे गुणगुणत होतो. आणि नंतर माझे मलाच हसु आवरत नव्हते.

=== I m not miles away ... but just a mail away ===

Pages