मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेरलॉक! ह ह पु वा. सीतेला पिटतोय. डोळ्यांपुढे खरेच असे घडतेय हे बघून.:D:-D

शेरलॉक! ह ह पु वा. सीतेला पिटतोय. डोळ्यांपुढे खरेच असे घडतेय हे बघून.:D:-D

मला ते ईजाजत मधील गाणे एक तुम्हारे कांदे कातील किंवा खातील असेच काहीतरी ऐकू यायचें. नंतर कळले.नासीरच्या घरी ती कांदे खाते आणि कांद्यांचा काहीतरी प्रेमवाढीशी संबंध आहे असे वाटायचे!

काल माझी ६ वर्षांची लेक पूर्ण ताल, सुरात तल्लीन होउन मोठ्याने " उडे जब जब झुल्फें तेरी, कबाडियों का दिल मचले" गात होती. आणि आमची ह. ह. पु. वा होत होती!

ह्याच गाणयातील पूढ्यच्या ओळी आहेत " उस गांव के सौ बार करु सदके, के जहां मेरा यार बसता" ही ओळ मला अत्ता अत्ता पर्यंत "उस गांव के सुवर के भी सदके, के जहां मेरा यार बसता" अशी ऐकायला येत होती!

माणिक वर्मा चे एक गाणे आहे, ते आमच्या मातोश्री
'कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज
लवचिक तुझा बांधा आणिक भरदार'
असे गात असत. आम्हाला कळेना बांधा लवचिक आणि भरदार दोन्ही कसा असु शकेल.
हे खरे म्हणजे ...
'कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज'
=== I m not miles away ... but just a mail away

"हरियाली और रास्ता" ह्या सिनेमातलं एक गाणं आहे. मला शब्द बरोबर माहित आहेत (बहुतेक!) पण अर्थ लागत नाहिये...बरीच वर्ष..

बोल मेरी तकदीरमे क्या है मेरे हमसफर अब तो बता
जीवनके दो पहलू है, हरियाली और रास्ता
कहा पे है मेरे प्यारकी मंझील तू बतला तुझको है पता
जीवनके दो पहलू है, हरियाली और रास्ता

ह्यातलं "जीवनके दो पहलू है, हरियाली और रास्ता" काही कळत नाही, मी माझ्या परीने हरियाली म्हणजे स्थैर्य, सुख आणि रास्ता म्हणजे अस्थिरता, शोध असा अर्थ लावला. कोणाला काही कल्पना?

उस गांव के सुवर के भी सदके ; अगदी अगदी!!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मरथि गाणः धुन्द मधुमति नाच्ररे हे मला धुन्दम धुन्ति अस ऐकु याय्चा आनि कलतच नव्हता अर्थ....

archckul, मला वाटतं ते गाणं "धुंद मधुमती रात रे, रात रे" असं आहे. चू.भू.द्या.घ्या.

हो ते गाणे तसेच आहे. किचकवध नावाच्या सिनेमात, किचकाला भुलवण्यासाठी हे गाणे वापरले आहे. पुर्ण गाणे लिहितो, आज उद्या.
याच चालीवरचे, अश्याच अर्थाचे हिंदि गाणे पण आहे, कारण हा सिनेमा दोन्ही भाषेत निघाला होता.

आता अंताक्षरीवर लिहीतांना आठवले, लहानपणी
झुठ बोले कौआ काटे
काले कौवे से डरियो
मै मैके चली जाउंगी
तुम देखते रहियो

हे गाणे ऐकतांना नेहमी गडबड व्हायची.
आधीच हिंदीची बोंबाबोंब... ! मग मै मै के म्हणत का जातेय तेच कळायचं नाही..
त्यावेळेस ते बकरीसारख बॅ बॅ मॅ मॅ करत जाते अस वाटायच. Sad

धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे यौवन नाचे, उगवला, रजनीचा नाथ रे, नाथ रे, नाथ रे

जललहरी या धीट धावती, हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा येई मंदिरा, येई मंदिरा
अली रमले कमलात रे नाथ रे

ये रे ये का मग दूर उभा ही घटीका न निसटून जायची
फुलतील लाखो तारा परी ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनी, ओठी लावूनी
कटीभवती धरी हात रे नाथ रे.
- किचकवध, लता

लहानपणी माझ्या काकांनी "एवढा स्मरणशक्तीचा अभिमान असेल तर एकदा ऐकून म्हणून दाखव हे गाणं" अशी पैज लावली होती म्हणून पूर्ण लक्षात राहिलेलं बहुतेक पहिलं गाणं असावं हे. Happy

उस गांव के सुवर के भी सदके Lol

अक्ष्री, धन्यवाद, ते दुनियासे डोल मला ही माहीत नव्हते.

प्यार माँगा है तुम्ही से न इन्कार करो या किशोर च्या गाण्यात तो शब्द मला काय 'नयनीकार' असाच वाटायचा. तेव्हा वाटायचे की नयनीकार हा बेकरार, इकरार सारखा काहीतरी शब्द आहे Happy

क्श धन्यवाद हे गाने दिल्याबद्दल.मला हे गाने खुप दिवसान्पासुन हवे होते.

धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे यौवन नाचे, उगवला, रजनीचा नाथ रे, नाथ रे, नाथ रे

जललहरी या धीट धावती, हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा येई मंदिरा, येई मंदिरा
अली रमले कमलात रे नाथ रे
यामध्ये अली रमले कमलात रे याचा अर्थ काय ?

म्हणजे भुंगे (अली) कमळांत रमले आहेत.

क्श धन्यवाद.

आई शपथ नावाचा एक मराठी चित्रपट येऊन गेला... त्यात रीमा, सुबोध भावे, उर्मिला कानिटकर, तुषार दळवी, मानसी (आडनाव आठवत नाही), श्रेयस तळपदे इ. कलाकार होते. त्यातली गाणी अप्रतीम आहेत (आठवा: ऐनक मे छब देखने जाऊ) त्यात एक गाणे आहे त्याची पहिली ओळ मला कळत नाही. ते गाणे मला असे ऐकू येते

दिस चार झाले मन
पाखरू होऊन

नक्की गाणे काय आहे?

क्ष... मला इतके दिवस वाटायचे "हरी (विष्णू) रमले कमलात रे" असे ऐकू यायचे! मंदपणा! Biggrin

>>"हरी (विष्णू) रमले कमलात रे"
jaijuee, ह ह पु वा! सॉलिड!

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करतय निघालाच्या सुरा?
हे नक्की दुसरी ओळ काय आहे? कधीच नीट एकू येत नाही.

मनु,
आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सरा निघाल्या सासुरा.... सया निघाल्या सासुरा... असं आहे. Happy

manuswini, मलाही नीट कधी ऐकू आलेलं नाहीये, पण मला वाटतं "पाठवणी करा सया निघाल्या सासुरा" असं काहीसं आहे ते. म्हणजे मैत्रिणीची सासरी पाठवणी किंवा पाठराखण करायला निघाल्या आहेत.

मला कळायचचं नाही कधी. धन्यवाद दक्स्,स्वपना. Happy

खिलाडी चित्रपटातल 'वादा रहा सनम होंगे जूदा ना हम' हे गाण खुप छान आहे Happy

त्यात आयेशा जुल्काच्या ओष्ठी (आणि अलका याज्ञीक च्या तोंडी) ओळी आहेत ' देखा तेरी निगाहोमे कमी ना हो वफाओमे' ह्या ओळी कित्येक दिवस मला 'कमीना होगा बाहो मे' अश्या काहीश्या आयकायला यायच्या आणि कमिना म्हणूनही अक्षय कुमाराचा चेहेरा हसरा कसा असा प्रश्न पडायचा Proud

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केद्या...

हे जुन्या माबो वर पण लिहिलं होतंस का?
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...

नुकताच माझा मुलगा राष्ट्रगीत शिकलाय.... तो म्हणतो .. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिक मागे.....

Pages