मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केतु... 'आह ठुस्सुsssम' Lol

अगं आम्ही पण तेच करतो... गाण्यातील शब्द कळला नाही की यमक जुळवुन ठोकुन देणे ... Proud

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

महानंदा या सिनेमातील एक गाणे..मागे उभा मंगेश मधे एक कडवे आहे.

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे

हे मला कसं ऐकु यायचं माहितिय?
जन्मजन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी
विरा कीर्ती म्हणू भोंगी (भोंगी म्हणजे आमच्या सांगली कडे सिमला मिरची)
शैलसूतासंगे रंग, मस्तकी वाहे.

मला वाटायचं, की कसलं गाणं आहे, शंकराला "भोंगी" काय म्हणते?, आणि म्हणते ते म्हणते आणि वर डोक्यावरुन रंगाची गंगा का वाहवते?

"एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी.. " हि shanky ची post वाचुन मला एकदम "सारेगमप लिटिल चॅम्प्स" मधल्या मुग्धा ने ही असच म्हणल होत हे आठवले. तिला अवधूत दादा ने नंतर सांगितले पण होते, की बाळा, ते "कोल्यावरी" असे आहे. आणि यावर माझा आणि माझ्या "अहों" चा बराच वाद झाला. त्याचं म्हणणं ते
कोल्ह्यावरी च आहे. मी बरच सांगुन पाहिल की एकविरा ही कोळी लोकांची देवी आहे, त्यामुळे ते "कोल्यावरी" असे आहे. पण छे हो, पटायलाच तयार नाही त्याला. त्याच्या logic प्रमाणे,त्या देवीला बळी द्यायची पद्धत असेल आणि म्हणुन बळी साठी आणलेल्या "कोल्ह्यावर" तिची नजर असणारच...आता मला सांगा, कोंबडी, बकरा, अगदी जुन्या काळी रेडा पण बळी दिलेला ऐकलाय मी, पण कोल्हा बळी दिलेलं अजुन तरी कानावर आल नाही. तुम्ही ऐकलय का?

केतु... कोल्ह्याचा बळी... Happy Biggrin Rofl
-योगेश

खरे तर मलाही हेच वाटत होते इथे हे आज वाचेपर्यन्त. 'कोल्ह्यावरी' म्हणून. ते कीतीही वेळा एकले तरी तसेच येते एकायला.

मला एक मिथून चक्रवतीचे नी अनिता राज( ?) गाणे अजून कधीच कळले नाही,
त्याची सुरुवात अशी आहे, मला आतापर्यन्त कीतीही वेळा एकून असेच एकायला आले(पहिल्या दोन ओळी तरी,दुसर्या ओळी फक्त कळतात. कोणाला माहीती आहे का हे गाणे?)

जिहाले मस्ती मुकुंद बरंजीश,
बहाले हिजडा बेचारा दिल है,
सुनाइ देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है.

अजूनही मला खरेच ते मुकुंद ,बरंजीश, हिजडा असेच एकायला येते. अजून अर्थ कळला नाही तो एक प्रश्ण आहेच. Happy
कोणी एकले आहे का हे गाणे? बघा तुम्हालाही असेच एकायला येइल. Happy

ते गाणं अस आहे मनुस्वीनी .. जून्या माबो वर ह्यावर बरीच चर्चा झालेली आहे .
Ooo....
ho..o...

(Jeehale muskin main kun baranjis
Behaal hijra bechaara dil hai) -2
(Sunai deti hai jiski dhadkan
tumhaara dil ya hamaara dil hai)-2
(Vo aake pahlu main aise baithe) -2
Ki shyaam aur rangeen ho gayi hai
Ki shyaam rangeen ho gayi hai
Ki shyaam rangeen ho gayi hai
(Zara zara si khili tabiyat
zara si gumgeen ho gayi hai)-2

Zihaale muskin ....
sunai deti hai ....

(Ajeeb hai dil ke dard)-2 yaaron
(Na ho to mushkil hai jeena iska) -2
(Jo hon to har dard ek heera
Har ek gam hai nageena iska)-2

Zihaale muskin ....
sunai deti hai ....

(Kabhi kabhi shaam aise dhalti hai
Jaise ghoonghat utar raha hai, utar raha) -2
(Tumahre seene se uthta dhuaan
hamaare seene se guzar raha hai) -2

Zihaale muskin ....
sunai deti hai ....

Yeh sharm hai ya haya hai, kya hai
(Nazar uthate hi jhuk gayi hai) -2
(Tumhari palkon se gir ke shabnam
hamari aakhon main ruk gayi hai) -2

Zihaale muskin ....
sunai deti hai ....

-----------------------------------------
सह्हीच !

जिहालें मस्कीं मुकुं-ब-रंजीश
बहारे-हिज्रां बेचारा दिल हैं

अर्थ... अर्थातच माहित नाही... गुलजारजींनी लिहीलंय....
-योगेश

अरे.... माझ्या आधीच दीपुर्झाने हे आख्खं गाणं इथे टाकलेलं दिसतंय...
-योगेश

पण त्याचा अर्थ काय्(खास करून त्या वरच्या दोन ओळींचा?)
मला तर त्या गाण्यात शीवी आहे असे वाटायचे नी नक्की काय चाललेय कळलेच नाही हजारदा एकून सुद्धा. मला गाणे बघितल्याचे आठवत नाही पण नेहमी अंताषरीत का बहुधा (डम्ब्शराड मध्ये,नक्की आठवत नाही कुठला खेळ तो)क्लु असायचा की मिथून नी अनीता राज. बर्‍याच वेळा आम्ही असेच म्हणायचो गाणे(वरती लिहिल्याप्रमाणे हिजडा वगैरे म्हणत नी हसायचू जोरात. :))

अरे देवा,आलं का हे गाणं परत! लंपनच्या भाषेत सांगायचे तर एकशे एकोणतीस वेळा याची चर्चा इथे झाली आहे (आता लंपन कोण हे विचारु नका,प्लीज!)
थोडक्यात अर्थ असा आहे- तुझ्या विरहात घायाळ झालेल्या माझ्या मनाकडे अशा रागावलेल्या नजरेने पाहू नकोस.

********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मनुस्वीनी , ते जुन्या माबो वर शोधवं लागेल , कोणीतरी (नाव आठवत नाही) गाण्याचा अर्थ दिलेला आहे तिथे..
-----------------------------------------
सह्हीच !

कुणी "दोस्ताना" मधील शिल्पा शेटटी वर चित्रित गाणे बघितले का...
काहिच कळत नाही...

Trendi.pravin
------------------------------------
स्टाईल मे रेहेने का ......always

रंग दे.... मधील 'लुज कंट्रोल' हे कित्त्येक महिने कळले नाही. नेहमी मला ते 'यु स्कोउंड्रल' वाटायचे.... Sad

जेव्हा मी...तु मिले..दिल खिले..और जिने को क्या चाहिये..हे गाणे ऐकतो..तेव्हा मला माझा मित्र आठवतो..तो कायम हे गाणे...
गुणिले..भागिले..आता बेरिज करायचे...असे म्हणायचा...:)

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

काल सारेगम लिटल चॅम्प्स मध्ये अवधुत गुप्तेने ऐकवलेले गाणे
मानसीचा चित्रकार तो
तुझें मी नंतर चित्र काढतो
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

कालच्याच सारेगम लिटल चॅम्प्सच्या episode मध्ये आर्याने मजेत ऐकवलेले गाणे
सख्या रे, घायाळ मी हरणी ची सुरुवात हा महाल कसला, रानझाडी ही दाट ऐवजी हा हमाल कसला, रानझाडी ही दाट Lol

===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

दोस्ताना मधले ते गाणे ऐकण्या साठी नसून फक्त 'बघण्या'साठी आहे,त्यामुळे काहीही शब्द चालतात Proud
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

कोयल थूऽऽके, थूऽऽके गाए मल्हार, कह दोके तुम होSSSमे रिSSSवर्ना!, पाठीवरती झी मखमली
'इश्क जादू डिस्को' SAHI RE SAHI, KHARACH EKA PEKSHA EK DHAMAL , HASUN HASUN PUREVAT JHALI!

HI I am Vaishali from Pune.
I have newly joined maayboli.

>>गुणिले..भागिले..आता बेरिज करायचे << Lol

गुणिले..भागिले..आता बेरिज करायचे...असे म्हणायचा.
कोयल थूऽऽके, थूऽऽके गाए मल्हार, Happy
हसुन बेजार झालेला स्माईली
ह.ह.पु.वा.
काय धम्माल बाफ

ते देवदास मधले माधूरी नक्की काय म्हणते हे सुद्धा मला अजून कळले नाही. ढाई श्याम नाम के और चक मूक चुमले चुमले... हे वाक्य मला अजून कळले नाही. अर्थ सुद्धा नी ओळी सुद्धा.

ते असं आहे मनुस्वीनी ....

ढाई शाम रोक लइ ,रोक लइ ,रोक लइ
ढाई शाम रोक लइ , और चकमक मुख चूम लइ
मुख चूम लइ,मुख चूम लइ,
सर से मोरी चुनरी गयी,गयी,गयी
सर से मोरी चुनरी गयी सरक सरक सरक
सरक सरक सरक ,सरक सरक सरक

-----------------------------------------
सह्हीच !

ढाई श्याम नाम के और चक मूक चुमले चुमले... >>>> हे हे हे.... हहपुवा...
मला पण असेच काह तरी वाटत होते...

धन्स दीपुर्झा.. Wink

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

युवा चित्रपटातील गाणि तर भलतीच आहेत.काही कळतच नाहीत्.एक गाणे-
डोल डोल डमाटे, डोल डोल डमाटे, डोल डोल डमाटे, तमतुमयुत्ते
डोल डोल डमाटे, डोल डोल डमाटे, डोल डोल डमाटे, सलाम नमस्ते!!!
डीगा डीगा डिगा डिगा डिगा डीन
डीगा डीगा डिगा डिगा डिगा डीन

आणि दुसर गाण
शकालाकाबोका काहेका राबोता
शकालाकाबोका काहेका है बोका
हट जा हट जा रे हट जा हट जा रे
हट जा हट जा रे हट हट हट हट!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

ए. आर्. रहमान् बर्‍याच वेळा तत्याच्या गाण्यात अगम्य भाषा वापरतो .. कळणं कठिणच असतं .. E.g. तू लिहीलं आहेस ते युवा मधलं, हल्लीच Slumdog Millionnaire मधलं ओ साया .. काय शब्द आहेत तेच कळत नाही .. Uhoh

पण ते दुसरं गाणं बहुदा असं आहे,

धक्का लागा बुक्का
खाएगा जा मुक्का
हठ जा हठ जा रे
हठ जा हठ जा रे

डोल डोल डमाटे,>>>> डोल डोलना पापे... डोल डोलना पापे ....

Pages