मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते अवतार चित्रपटातले गाणे 'दिन महिने साल गुजरते जायेंगे...' ते 'तीन, महिने , साल' असे अगदि काल पर्यन्त ऐकु येत होते.
आणि जणांना ते जुने गाणे 'याद किया दिलने कह हो तूम' ते 'प्यार किय दिल ने कहा हो तुम' असे वाटायचे.

'सखी मन्द झाल्या तारका' च्या ऐवजी
'मतीमन्द झाल्या तारका' ..............

अगदी अगदी...
मला हे कधी चुकीचं नाही ऐकू आलं, पण मला नेहमीच हे गाणं असं म्हणावंसं वाटतं :

मतीमंद झाल्या खारका!

अगदी...या गाण्यावर मी मागे पण पोस्ट टाकली होती.. Happy
माझा एक क्लासमेट हे गाणे
'मतीमंद झाल्या बायका.."
असे म्हणायचा...! ( आणि नंतर मार खायचा)

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला तालिबान-लश्कर (चाँद तारे) सारे... Happy
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

नयना.... Lol Proud Biggrin

'मतीमंद झाल्या बायका.." Rofl Rofl Rofl

बरं झालंत इथे हे टाकलंत... Wink

>>एक उन्चा लम्बा कद, दुजा सोणी ही तू हद... अ ओ, आता काय करायचं
>>तिजा रुप तेरा चमचम करदा नी
>>मै एवीतेवी (अ ओ, आता काय करायचं) तेरे उत्ते मरदानी....

मला अजुनही खरा शब्द माहीत नाही.... Uhoh

कित्येक वर्षांनी आलो माझ्या बाफवर...

नगाडा, नगाडा, नगाडा बजा... असं काहीतरी गाणं Jab We Met मधे आहे...

त्यात मधे मधे 'कच्ची कैरियां,' असं ओरडतात असं मला बरेच दिवस वाटत होतं. लिम्बावर गाणं आहे (निम्बोडा) तर कैरीवर का नको? शेवटी लोणचंच घालायचं ना?

ते 'कट के लै गया' (बहुतेक 'दिल' असावा), असं आहे असं कोणीतरी सांगितलं..

विनय Happy

लहानपणी शाळेत सकाळी प्रार्थना आणि भजन म्हणावे लागे.

डोक्यावर चांदोबा आणि गंगा
जटाधारी देवाचे नाव सांगा
शंख डमरू त्रिशुळ लांब
वल्कल नेसतो भोळा सांब

मी:
डोक्यावर चांदोबा आणि गंगा
एकातरी देवाचे नाव सांगा
शंख डमरू त्रिशुळ लांब
परकर नेसतो भोळा सांब

mbjapan
तुम्ही नवीन मराठी / रानडे बालक मंदीर मध्ये होतात का...?
_______
कुणासाठीतरी शिजवण्यात
एक वेगळीच मजा येते
स्वतःसाठी बनवलं तर
ती निव्वळ गरज असते...

विनय,
नगाडा गाण्यात मध्ये मध्ये म्हणतात ते मला अजुनही "दंग रहे गया" असे ऐकु येते, खर काय आहे ते त्या गीतकार आणि गायकालाच माहीत. Happy

मी लहान असताना घरी दर आठवड्याला आईचं आणि आजीचं भजनी मंडळ जमायचं. त्यांचं एक भजन होतं 'चल साधका' असं. या भजनातलं एक कडवं आहे :

हे सिद्धटेक प्रसिद्ध रे येथेच कैटभ भंजिला
श्रीविष्णुने जय लाभण्या साकारिले गणनायका
ही पुण्यवान रे धरा, ही पुण्यवान मृत्तिका ||

ही ओळ आठ - दहा बायका मनापासून, आळवून गात असायच्या, आणि मला आणि भावाला ऐकू यायचं :

ही पुण्य वानरे धरा, ही पुण्यवान मृत्तिका

सिद्धटेकला गणपतीच्या देवळात एकदम वानरं शिरून धुमाकूळ घालताहेत असं अजूनही डोळ्यापुढे येतं माझ्या. Lol

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

mbjapan आणि गौरीचं पोस्ट वाचून हे आठवलं :

देव माझा विठू सावळा....

माझा एक इन्दौरी मित्र हे गाणं असं म्हणायचा -

देव माझा विठू चावला... Happy

काल ते 'उंचा लंबा कद..' पाहिलं..
इक उंचा लंबा कद
दूजा सोनी भी तू हद
तीजा रूप तेरा चमचम करदा नी
मैं एवी तेरे विच मरदा नी...

अशी काहीतरी आहे ती शेवटची ओळ.. 'मरदा नी'.. अर्थातच, मी तुझ्यावर 'मरतो'.. कट्रिना कैफला बघून कोण असे म्हणणार नाही? Happy
------------------------------------------
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो! Proud

अय्या ते मरदा नी आहे होय?
मी ते मर्दानी समजुन विचार करत होते की यात कॅटरीना कैफ मर्दानी कशी झाली???

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला तालिबान-लश्कर (चाँद तारे) सारे... Happy
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

हे कटरिने,
आधीच उंच अंगकाठी,
त्यात दिसायलाही काटा,
त्यावर तुझं चमचमतं रुप,
म्हणून मी तुझ्यावर मरतो!

Happy
_________________________
-Impossible is often untried.

आताच्या नवीन गाण्यामध्ये इतके english शब्द असतात ना की एक शब्द कळला तर शपथ.......

एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी.. Happy

एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी..

हे कोल्ह्यावरी नसून "कोल्यावरी" असं आहे. कोळी => कोली. म्हणून कोल्यावरी...

मला ही आधी हे कोल्ह्यावरी असंच ऐकू यायचं.. Happy

कॅटरीना मर्दानी Proud
आणि अक्षय जनानी
(असेल बुवा कारण गाण्याच्या आधी कॅटरीना अक्षय ला आगीतून उचलून आणते अस काहीस दृष्य आहे)

चिन्धी बान्धते द्रौपदी हरीच्या पोटाला ...........

(हरीच्या बोटाला .. असे आहे मूळ.)

>>एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्याव>> शँकी... Lol
मला पण ते असंच ऐकू येतं नेहमी...

पप्पु कांट डान्स साला गण्यातले 'पापा केह्ते है बडा नाम करेगा, मेरा पप्पु तो ऐसा काम करेगा' हे वाक्य मला
'बाप के नाम को बदनाम करेगा, मेरा पप्पु तो ऐसा काम करेगा' असे ऐकु येते नेहमी. Uhoh

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
पहिल्या पावसाची सर कळण्यासाठी, ग्रिष्मातील वेल असायला हवं ..
पापण्यातील ओल कळण्यासाठी हृदयातील कढ कळायला हवं..
जळणं ठाउक असण्यासाठी नुसती आग माहीत असुन चालत नाही...
....त्यासाठी कमीत कमी करपलेल असाव लागतं..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

बेकरार करके हमे यु न जाइये
आपको हमारी कसम मौत( ???) आइये...! Sad

आपको हमारी कसम मौत( ???) आइये!

हा हा हा हे हे हे ही ही ही हो हो हो Rofl Biggrin Rofl Biggrin

आमच्या इथे एक गुजरथी बया आहे आणि माझा मित्र सन्दीप ह्या दोघा॑ची "घनदाट"मैत्री आहे. आता तिची बदली बडोद्याला झाल्यामुळे ती चालली आहे.

आता गाणे,
"बिलायची नागिण निघाली....नागोबा डुलायला लागला" अस॑ एक मराठी गाण॑ आहे.....त्याच॑ एकाने विड॑बन केल्यामुळे ते अस॑ झालय.....

"गुजरात ची नागिण निघाली......सॅ॑न्डीबाबा डुलायला लागला....!!!!" :ड

ह्यामुळे मी खर॑ गाण॑ विसरलो आणि इथे खर गाण॑ लिहिण्यासाठी ३ - ४ लोका॑ना विचाराव॑ लागल॑. :ड

हे नवीन "मशकल्ली, मशकल्ली" गाणं काय भानगड आहे? मला तर हे "आशिकअली" वगैरेसारखं काहीतरी नाव असावं असं वाटतंय, किंवा "कथकली" सारखा नाचाचा प्रकार......काव आणला आहे ह्या गाण्याने....मी आजकाल ते लागलं की एफएम चॅनेलच बदलते....

मशकल्ली कबुतराच नाव आहे बहुतेक Happy
आता मला अभिषेक आणि सोनम ची नाव काय असतील ह्याच कुतुहल वाटायला लागलय Happy
(त्यामुळे हे गाण 'काव' न आणता 'गुटर्गू' आणायला हवय Proud )
Light 1

Happy सोनम म्हणजे अनिल कपूरची मुलगी? तिला आणि एक पिक्चर मिळाला? कोणाकडे एव्हढी हिंमत आणि एव्ह्ढे पैसे आहेत? आणि ते पण ह्या इकॉनॉमीत? Happy

मी काही दिवस दोस्तानामधलं "नोबडी लाईक माय देसी गर्ल" हे गाणं "नोबडी लाईक्स माय देसी गर्ल" असं ऐकत होते Happy तरी म्हटलं ह्याची गर्लफ्रेंड कोणाला आवडत नाही आणि हा खुशाल जगाला ओरडून काय सांगतोय!

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

हे गाणे मला

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिकेत रासफुल जा तुझ्या घरी

असे ऐकु यायचे.... अर्थ लागत नसला तरी मी ते गाणं तसाच म्हणायचो....

काय मस्त धागा आहे. हसुन हसुन मुरकुन्डी वळली माझी. इतकी हसले की खुर्चीवरुन पडायची वेळ आली हो..माझी पण ही जुनी सवय आहे, की जर गाण्यातला एखादा शब्द किंवा वाक्य कळले नाही तर आपल्याला जे यमकाप्रमाणे बरोबर वाटतं ते बिनधास्त ठोकुन देणे.
"देवदास" मधे एक गाणे आहे. "काहे छेड मोहे",त्या मधे माधुरी च्या आवाजातल्या काही ओळी आहेत. एक वाक्य ती म्हणते, "आहट सुन जियरा गयो धडक धडक धडक",.. ही ओळ मी बरेच दिवस,"आह ठुसुम जियरा गयो धडक धडक धडक" अशी म्हणायचे.

Pages